c-profiles-site
डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteभारत व चीन या दोन देशांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसर्या चीन जपान युध्दाच्या पार्श्वभूमीवर, भारताने चीनमध्ये आपत्ग्रस्त वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या ५ वैद्यकीय तज्ञांपैकी ते एक होते. अचूक वैद्यकिय कौशल्ये, प्रसंगवधानी स्वभाव, व असामान्य नेत्तृत्वगुणांमुळे कित्येक जखमी चिनी नागरिकांन व सैनिकांना पुनर्जीवन मिळाले होते.
डॉ. नित्यानंद मांडके
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनित्यानंद मांडके हे भारतामधील एक सुप्रसिध्द हृद्यरोगतज्ञ होते. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया केल्यानंतर ते खर्या अर्थाने प्रकाशात आले असले तरीही त्याआधीसुध्दा अनेक अशक्यप्राय वाटणार्या शस्त्रक्रिया त्यांनी त्यांच्या जादुभर्या बोटांनी यशस्वी करून दाखविल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४८ मध्ये पुण्यात झाला. बारावी पर्यंतचे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवला व याच महाविद्यालयात त्यांना त्यांची उर्वरित आयुष्याची सोबतीण मिळाली. शालेय व महाविद्यालयीन जीवनातसुद्धा डॉक्टर नितु हे अतिशय हुषार व कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचीत होते.
डॉ. उल्का अजित नातू
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteस्त्रीरोग व प्रसुतिशास्त्र तज्ज्ञ, योगतज्ज्ञ. मूळातच एम.डी. असलेल्या डॉ. उल्का यांनी योग शिक्षण पदविका प्राप्त करुन गेली दहा वर्षं त्या योगचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
डॉ. प्रकाश आमटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआदिवासी क्षेत्रात काम करणारे सुप्रसिद्ध समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे हे सुप्रसिद्ध समाजसुधारक बाबा आमटे यांचे द्वितीय पुत्र आहेत. ते त्यांच्या पत्नी डॉ. मंदाकिनी आमटे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथे लोक बिरादरी प्रकल्प या नावाने स्थानिक आदिवासी लोकांसाठी दवाखाना चालवतात.
डॉ. डी. एच. तांबेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमुळचे वर्धा जिल्ह्यातील असणारे डॉ.डी.एच. तांबेकर सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ व त्यातील संशोधन करणारे वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध आहेत. उच्च शिक्षण नागपूर विद्यापीठातनं पूर्ण झालं असून, मध्य प्रदेशातील सागर विद्यापीठातून त्यांनी “आचार्य” ही पदवी संपादन केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteअंधश्रध्दा निर्मूलनासाठी १९८९ साली समविचारी कार्यकर्त्यांना जमवून “महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती” ही संघटना स्थापन करणारे बुध्दीवंत, विज्ञाननिष्ठ आणि साहित्यिक डॉ.नरेंद्र दाभोलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९४५ रोजी सातारा जिल्ह्यातील माहुली येथे झाला.
डॉ. दामोदर खडसे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteडॉ. खडसे यांची आजवर ३४ पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांच्या ‘काला सुरज’ या कादंबरीला १९९२ चा राष्ट्रीय साहित्य पुरस्कार प्राप्त झाला आहे. जयवंत दळवी यांच्या ‘कालचक्र’ या मराठी नाटकाचा तसेच ‘रामनगरी’ या राम नगरकर यांच्या आत्मचरित्राचा हिंदी अनुवाद त्यांनी केला आहे. ‘अपने ही होने पर’ या हिंदी काव्य संग्रहात विं. दा. करंदीकरांच्या कवितांचा अनुवाद संग्रहित केला आहे.