जनगणना जातगणना होऊ नये!
Category:
लेखसंग्रह वैचारिक लेखनभारत सरकारतर्फे दर दहा वर्षाने केल्या जाणार्या जनगणनेला गेल्या 1 मे पासून सुरुवात झाली आहे. ही जनगणना संपूर्ण भारतात एकाचवेळी होत असून त्यासाठी लाखो प्रगणक उन्हातान्हांत फिरून माहिती गोळा करीत आहेत. यावेळी जनगणनेसोबतच राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टर तयार करण्याचे काम केले जात असल्याने जनगणना प्रक्रियेत सहभागी झालेल्या प्रगणक आणि पर्यवेक्षकांना मोठीच कसरत करावी लागत आहे;