लेखसंग्रह

मूर्ख आणि शहाणे! शिका!

Category:

 

समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या सुप्रसिध्द दासबोधात मुर्खांची लक्षणे सांगितली आहेत. ही लक्षणे पढतमूर्खांची म्हणजेच मूर्खपणा आणि शहाणपणा यातील फरक कळणार्‍या मुर्खांची आहेत. अशा पढतमूर्खांची विस्तृत लक्षणे रामदास स्वामींनी सांगीतली असली तरी त्यांच्या समर्थ प्रतिभेला 21व्या शतकातील मुर्खांचा वेध घेता आला नाही, असे खेदपूर्वक नमूद करावेसे वाटते. अर्थात त्यात दोष स्वामींचा नाही, केवळ रामदास स्वामीच नव्हे तर इतर कोणत्याही अलौकीक प्रतिभेच्या व्यक्तीला मुर्खात काढण्याची प्रचंड क्षमता 21व्या शतकातील भरतखंड निवासी लोकांमध्ये आहे. अधिक स्पष्ट सांगायचे तर 17व्या शतकात दासबोधाची रचना करणाऱ्या रामदास स्वामींना 21व्या शतकात भरतवर्षात सरकार नामक एक विचित्र यंत्रणा उभी होईल आणि मूर्खपणाच्या व्याख्याच ही यंत्रणा बदलून टाकेल, अशी शक्यता वाटण्याचे काहीच कारण नव्हते. तशी पुसटशी शंका जरी त्यांना आली असती तर त्यांनी आपली पढतमूर्खांची इतर सर्व लक्षणे बाद करीत केवळ, ‘तो येक महामूर्ख, जो असे प्रामाणिक’ हेच एक लक्षण कायम ठेवले असते.

  October 6, 2002


लेखसंग्रह

To be chkd-जरा आजूबाजूला बघायला शिका!

Category:

 

बायबलमध्ये एक बोधकथा आहे. येशू ख्रिस्त फिरत-फिरत एका गावात आले. त्यावेळी त्यांना दिसले की गावातील सगळेच लोकं एका मैदानात जमले आहेत. प्रत्येकाच्या हातात दगड आहे आणि मैदानाच्या मध्यभागी एका खांबाला बांधलेल्या स्त्रीला ते दगडांनी ठेचून मारणार आहेत. त्या स्त्रीचा अपराध कोणता, याची चौकशी केल्यावर येशू ख्रिस्तांना सांगण्यात आले की, ही स्त्री व्यभिचारी आहे आणि या गुन्ह्याची शिक्षा म्हणून तिला दगडांनी ठेचून मारण्यात येणार आहे. येशू ख्रिस्तांना त्या स्त्रीची दया आली किंवा त्यापेक्षा अधिक गावकर्‍यांच्या बुध्दीची कीव वाटली. पहिला दगड त्या स्त्रीकडे भिरकावल्या जाण्यापूर्वी येशू ख्रिस्ताने उपस्थित जमावाला उद्देशून म्हटले की, या स्त्रीला शिक्षा केली पाहिजे हे मान्य, परंतु ही शिक्षा देण्याचा अधिकार केवळ त्याच व्यक्तीला आहे, ज्याने एखादेही पाफत्य केलेले नाही. येशु ख्रिस्तांच्या या आवाहनाने उपस्थित जमाव अंतर्मुख झाला आणि प्रत्येकाच्या हातातील दगड गळून पडला. ही घटना किंवा कथा बोधप्रद असली तरी त्यातील बोध त्या घटनेपुरताच प्रासंगिक ठरला. पापी, अन्यायी किंवा कर्तुत्वहीन लोकांनी स्वत:लाच न्यायाच्या उच्चासनावर बसवून इतरांकडे दगड भिरकावण्याचा अधिकार बाळगणारी मानसिकता आजही विद्यमान आहे. ती स्त्री त्यावेळी भाग्यवान ठरली, परंतु असे भाग्य त्यानंतर कुणाच्या वाट्याला आले नाही.

  September 29, 2002


लेखसंग्रह

हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

Category:

 

हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणाऱ्या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे.

  August 18, 2002


लेखसंग्रह

हे हलाहल आम्ही पचवू शकणार नाही

Category:

 

हिंदुस्थानला कायमस्वरूपी गुलामीत ढकलू पाहणार्‍या शक्तींनी बाहुबलाऐवजी बुध्दिबळाने आपले प्रयत्न चालविल्याचा उल्लेख मागील ‘प्रहार’मध्ये मी केला आहे. या शक्तींनी आपली कुटिल योजना तडीस नेण्यासाठी तीन प्राथमिक लक्ष्ये निर्धारित केली आहेत. त्यापैकी संस्कृतीवरचे त्यांचे अप्रत्यक्ष आक्रमण कसे यशस्वी ठरले, याचा उहापोह मागील लेखात झालाच आहे.

  August 18, 2002


लेखसंग्रह

पारतंत्र्याचे पाश आवळले जात आहेत!

Category:

 

एखाद्या राष्ट्राची शक्ती प्रामुख्याने तीन घटकांवर अवलंबून असते. पहिला घटक म्हणजे त्या राष्ट्रातील नागरिकांना एकमेकांशी बांधून ठेवणारी संस्कृती आणि परंपरा, दुसरा घटक म्हणजे त्या राष्ट्राची व्यापार-उदिमात सामावलेली आर्थिक ताकद आणि तिसरा व सर्वाधिक महत्त्वाचा घटक म्हणजे त्या देशाची तरूणाई! हिंदुस्थानला कायम अधिपत्याखाली ठेवू पाहणाऱ्या शक्तींनी या तिन्ही घटकांवर आपले लक्ष केंद्रित केले. हिंदुस्थानरूपी कामधेनूचे कायमस्वरूपी दोहन करण्यासाठी ही कामधेनू कायम लाचार करण्याचे षडयंत्र शिजवले गेले. पुन्हा एकदा हिंदुस्थानला हलाल करण्यासाठी कसायांनी आपल्या सुऱ्या परजल्या आणि यावेळी तर इंठाज कसायांचे कौशल्य फिके पडावे, इतके बेमालूम तंत्र वापरले गेले. पहिला आघात या महाकाय राष्ट्राला एकत्र बांधून ठेवणाऱ्या संस्कृतीरूपी धमणीवर केल्या गेला.

  August 11, 2002


लेखसंग्रह

अति तिथं माती

Category:

 

भारतीय पुराणातील भस्मासुराची आणि युरोपियन लोकसाहित्यातील मिडास राजाची कथा जवळपास सर्वांनाच माहीत आहे. भस्मासुराची प्रवृत्ती आणि आताच्या अतिरेक्यांची प्रवृत्ती यामधील साम्य लक्षात घेतल्यास भस्मासुराला आद्य क्रांतिकारकाच्या धर्तीवर आद्य अतिरेकी म्हणून संबोधण्यास हरकत नाही. तर अशा या भस्मासुराने भगवान शंकराला वर मागितला होता की, तो ज्या वस्तूला हात लावेल ती वस्तू भस्मसात होऊन जाईल. भोळा सांब म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या भगवान शंकराने परिणामांचा विचार न करता तथास्तू म्हणून टाकलं. आता आपलं कोण काय वाकडे करु शकतो, या विचाराने उन्मत झालेल्या भस्मासुराने सर्वांना त्रास देण्यास प्रारंभ केला. आणि शेवटी तो साक्षात भगवान शंकराच्याही मागे लागला.

दैनिक देशोन्नती मध्ये पूर्वप्रकाशित हा लेख ४ ऑगस्ट २००२ रोजी मराठीसृष्टीवर अपलोड करण्यात आला.

  August 4, 2002


लेखसंग्रह

डॉक्टर आजारी झालेत!!

Category:

 

मनुष्य समाजप्रिय प्राणी आहे, असे म्हटले जाते. नव्हे तो समाजप्रिय प्राणी आहेच. आदिम काळातील रानटी अवस्थेपासून मनुष्यप्राण्याची ती स्वाभाविक गरज ठरत आली आहे. शत्रूच्या तुलनेत शारीरिकदृष्ट्या दुर्बल असलेले प्राणी समूहाने वावरून आपली सुरक्षितता जोपासतात, हा निसर्गनियम आहे आणि मानव त्याला अपवाद नाही. ही सुरक्षितता जोपासताना एकमेकांना सहकार्य आणि आलेल्या संकटाचा सामूहिक मुकाबला केला जातो. प्रगत मानवात ही व्यवस्था समाजाच्या रूपाने अधिक विकसित झाली. परस्परांच्या सहकार्याने सुखी आणि समृध्द जीवन व्यतीत करणे सामाजिक व्यवस्थेचा पाया ठरला. इतर प्राण्यांमध्ये ही व्यवस्था प्राथमिक स्वरूपात असताना मानव प्राण्याने मात्र आपल्या बौध्दिक विकासाच्या जोरावर ही व्यवस्था चांगलीच सुदृढ केली. असे असले तरी सध्याची परिस्थिती पाहता मानव स्वत:च्या हाताने ही व्यवस्था उद्ध्वस्त करायला निघाला की काय, अशी साधार भीती वाटू लागली आहे.

  July 28, 2002


लेखसंग्रह

निखार्‍यांचा कोळसा होऊ नये!

Category:

 

एक पौराणिक कथा आहे. रघुराजाच्या दरबारात एक याचक आला. त्या याचकाने मागितलेले दान देण्याइतकी संपत्ती रघुराजाच्या खजिन्यात नव्हती. काय करावे, ही चिंता रघुराजाला पडली. याचक दारातून विन्मुख होऊन जाणे त्याकाळी अपमानास्पद समजले जायचे. याचकाला संतुष्ट तर करायचे होते, परंतु खजिन्यात तेवढे द्रव्य नव्हते. शेवटी एकच पर्याय होता.

  July 21, 2002


लेखसंग्रह

आता उरले लुटण्यापुरते

Category:

 

पृथ्वीचा फेरफटका मारताना एकदा आद्य वार्ताहर नारदमुनींना एक गलेलठ्ठ डुक्कर घाणीत/गटारात लोळताना दिसले. ईश्वरी अवताराचे महाभाग्य लाभलेल्या वराहाची ती अवस्था नारदाला पाहवली नाही. नारदमुनींनी लगेच त्या वराहाला स्वर्गसुखाची अनुभूती द्यायचे ठरवले आणि स्वत:बरोबर स्वर्गात येण्याची विनंती केली.

  July 7, 2002


आरोग्य

नवी अस्पृश्यता

Category:

 

सांगली जिल्ह्यात एड्स रुग्णांची संख्या एक लाखापेक्षा जास्त असल्याच्या आशयाचे वृत्त नुकतेच एका बड्या मराठी दैनिकात उमटले. अशा तह्रेच्या बातम्यांचे आजकाल नावीण्य राहिलेले नाही. अधूनमधून अशा आशयाच्या बातम्या उमटतच असतात. दोन-तीन वर्षांपूर्वी तर आता अकोल्याहूनही प्रकाशित होणाऱ्या एका मराठी दैनिकाने एड्समुळे मृत्युमुखी (?) पडलेल्या एका व्यक्तीच्या नावासह बातमी प्रसिद्ध केली होती. आमच्या संपादकीय विभागाने मात्र त्या रुग्णाच्या नावाचा उल्लेख न करता बातमी प्रसिद्ध करण्याचे तारतम्य बाळगले होते. रुग्णाचे नाव प्रसिद्ध न करता बातमी छापल्यामुळे त्या गावचा आमचा वार्ताहर तणतण करीत कार्यालयात आला होता. मात्र जेव्हा त्याला हे समजावून सांगितले की, बाबा रे मरणारा तर मेला. एड्सने मेला की आणखी कशामुळे हे त्यालाच ठाऊक. पण तो एड्सने मेला ही बातमी त्याच्या नावासकट छापल्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना समाजाकडून अस्पृश्यतेची वागणूक मिळेल. आपल्याला त्या पापात सहभागी व्हायचे नव्हते, म्हणून आपण नाव छापण्याचे टाळले, तेव्हा त्याची समजूत पटली.

  June 16, 2002