खाद्ययात्रा

डाएट पॅन – एक वरदान

Category:

 

डाएट पॅन हा १८ – १० स्टिल पासून बनवलेला असतो. यात १८% क्रोमियम व १०% निकेल असते ज्यामुळे याचा पृष्ठभाग इतर स्टिल प्रमाणे सछिद्र नसतो तर तो एकसंघ (नॉनपोरस) असतो, त्यामुळे खाद्यपदार्थ या पॅनला सहसा चिकटत नाही.

या प्रकारच्या स्टिलला सर्जिकल स्टिलपण म्हणतात. हे अत्यंत उच्चदर्जाचे स्टिल असते. सर्व प्रगत देशांत याच स्टिलची भांडी वापरतात. इतर नॉनस्टिक भांड्याप्रमाणे याला टेफलॉनचे कोटींग नसते, त्यामुळे ही भांडी रोजच्या स्वयंपाकासाठी वापरता येतात. कारण नॉनस्टिक प्रमाणे या भांड्यांचे आयुष्य मर्यादित नसते.

  April 14, 2016


खाद्ययात्रा

घारकुटाचे वडे

Category:

 

काहीशा विस्मृतीत गेलेल्या किंवा धावपळीच्या जीवनशैलीत मागे पडलेल्या अनेक पारंपरिक पदार्थांना सणावारांच्या निमित्ताने स्वयंपाकघरात पुन्हा मानाचे स्थान मिळते. घारकुटाचे वडे हे त्यापैकीच. श्रावणात शनिवारी मारुतीला व शनीला ह्या वड्यांची माळ करून घालण्याची प्रथा आहे. श्रावणी सोमवारी शंकराच्या नैवेद्याला हे वडे व दही आणि घारगे करण्याची पद्धत आहे. काळाच्या ओघात आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात ती खरंच विस्मृतीत गेलेली दिसते.

  February 11, 2016


खाद्ययात्रा

दडपे पोहे

Category:

 

एक ओला नारळ फोडून त्यातील पाणी बाजूला काढावे. नारळ खवून घ्यावा. कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. एका लिंबाचा रस काढावा. हिरव्या मिरच्यांचे मध्यम आकाराचे तुकडे करावे. कैरी किसून घ्यावी.

एका मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबाचा रस, खवलेला नारळ, साखर, चवीपुरते मीठ,चमचाभर कैरीचा किस, नारळातील पाणी सर्व एकत्र करून सारखे करावे. ५ – १० मिनिटे तसेच झाकून ठेवावे.

  January 6, 2016


खाद्ययात्रा

डाळीच्या करंज्या

Category:

 

आदल्या दिवशी रात्री हरभर्‍याची डाळ भिजत घालावी. दुसर्‍या दिवशी सकाळी डाळ, हिरव्या मिरच्या, ५-६ लसूण पाकळ्या एकत्र करून मिक्सरवर वाटाव्या.

वाटलेली डाळ कुकरच्या भांड्यात घेऊन ४-५ शिट्ट्या देऊन शिजवून घ्यावी. शिजलेली डाळ ताटात गार करत ठेवावी. गार झाल्यावर हाताने मोकळी करून त्यात साखर आणि मीठ घालावे.

  January 4, 2016


खाद्ययात्रा

ब्रेड रोल

Category:

 

बटाटे उकडून सोलून मळून घ्यावे. आलं, मिरची, लसूण यांचे वाटण करावे. मटारचे दाणे काढून एका पातेल्यात पाणी घालून त्यात चिमुटभर खायचा. सोडा घालावा. त्यात मटार घालून गॅसवर उकळत ठेवावे. ५ – ७ मिनिटांनी मटार शिजल्यावर पाणी निथळून घ्यावे. एका मोठ्या. बाऊलमध्ये कुस्करलेले बटाटे, आलं-मिरचीचं वाटण, कोथिंबीर, शिजलेले मटार, लिंबाचा रस, चवीपुरतं मीठ घालून सर्व एकव कालवून सारण तयार करावे.

  December 22, 2015


खाद्ययात्रा

कोथिंबिरीचे समोसे

Category:

 

मैद्यामध्ये गरम तेलाचे मोहन आणि मीठ घालून मैदा भिजवून ठेवावा. कोथिंबीर निवडून, धुऊन, चिरून घ्यावी. कढईत अर्धा डाव तेल गरमकरून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेली कोथिंबीर घालून दोन वाफा आणाव्या. त्यात लाल तिखट, चारोळी, मीठ, गरम मसाला, डाळीचे पीठ, मीठ घालून भाजीप्रमाणे परतावे. गॅस बंद करून लिंबाचा रस घालून सारण सारखे करून गार करावे.

  December 16, 2015


खाद्ययात्रा

साबुदाणा चकली

Category:

 

सर्वसाधरणपणे उपवास म्हटले की डोळ्यासमोर येतात ते पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याची खीर, बटाट्याचा किस वगैरे. मात्र उपवासाच्या पदार्थातही साठवणीचे अनेक पदार्थ आहेत. यातीलच एक म्हणजे साबुदाण्याची चकली. एकदा बनवून ठेवून जेव्हा हव्या तेव्हा तळून किंवा मायक्रोवेव्ह ओवनमध्ये भाजून घेतलेल्या या चकल्या बहारदारच.

  November 19, 2015