अवर्गिकृत

चिऊताईचं घर शोधून द्याल का?

Category:

 

जंगले आणि झाडे तोडून सर्वत्र सिमेंटच्या जंगलांचे साम्राज्य पसरत चालले आहे. याचे दुष्परिणाम सर्वच प्रकारच्या प्रदूषणात होऊ घातले आहेत. त्यात काही पक्षी आणि प्राणी लुप्त होऊ लागले आहेत. चिमणी, घुबड, रानपिंगळा, कबुतर असे पक्षी काही दिवसांनी फक्त पुस्तकातून आणि चित्रांतून दिसतील. २० मार्च हा दरवर्षी जागतिक चिमणी दिन पळण्यात येतो या निमित्ताने चिमण्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे.

  March 25, 2013


अवर्गिकृत

इकोफ्रेंडली होळी रंगपंचमी

Category:

 

आतापर्यंत होळी आणि रंगपंचमी कशी साजरी होत आली आहे ते आपण बघत आलो आहोत. पण सध्या राज्यात दुष्काळ आहे पाण्यासाठी गावागाडील लोकांना वण वण भटकावे लागत आहे म्हणून त्यावर एक विचार कवितेतून.

  March 24, 2013


लेखसंग्रह

आसाम प्रश्न व पाकिस्तान – सावरकरांच्या नजरेतून

Category:

 

आसामी हिंदुवरील भावी संकट आसाम मुसलमान बनविण्याचा डाव हिंदुस्थानातील सर्व हिंदु समाज व विशेषतः आसाम मधील हिंदु जनता यांचे एक भयानक आरिष्टाकडे मी लक्ष वेधू इच्छितो. आसाम प्रांताला मुसलमान बहुसंख्याक प्रांत बनवून तेथील हिंदूंचे जिणे अशक्य करुन सोडण्याची कारवाई चालू आहे.

  March 23, 2013


अवर्गिकृत

या बापूंचे करायचे काय?

Category:

 

इथे आख्खा महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. माणसांना प्यायला पाणी नाही. जनावरं पाण्यावाचून तडफडतायत. मुंबई-ठाण्यासारख्या पाण्याची ददात न भासणार्‍या भागातही दिवस-दिवस पाणी गायब होतेय. दुष्काळग्रस्त भागातील जनता एकेक थेंब पाण्यासाठी तहानलेली आहे. गावंच्या गावं स्थलांतर करतायत. आपण ही परिस्थिती रोजच विविध वाहिन्यावर पहातच आहोत.

या भीषण दुष्काळी परिस्थितीत शेजारच्या राज्यातून एक “बापू” येतो आणि आपल्या करणीने त्याच राज्यात जन्म घेतलेल्या दुसर्‍या महात्मा बनलेल्या“बापूं”चं नाव धुळीला मिळवतो. स्वयंघोषित “संत आसाराम बापू” यांचे हे कर्तृत्व. दुष्काळाने अवघा महाराष्ट्र होरपळत असताना आसाराम बापू यांनी अध्यात्माची गोळी दाढेखाली ठेवून होळीच्या नावाखाली लाखो लिटर्स पाण्याची नासाडी केली. केवळ एकदाच नाही तर दोनदा.

  March 19, 2013


अवर्गिकृत

श्री विघ्नेश्वर – ओझर

Category:

 

अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले

जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

  March 18, 2013


अवर्गिकृत

गृहिणींना विश्रांतीची घंटाच नाही !

Category:

 

नुकताच ८ मार्च रोजी जागतिक महिलादिन सर्व जगभर मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. परंतू त्यात भारतासारख्या अनेक पुरुषप्रधान देशातील पुरुषांचा सहभाग किती होता? आणि नसल्यास सर्व स्त्री-पुरुषांनी नक्कीच आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.

  March 18, 2013


अवर्गिकृत

शेतकर्‍यांच्या विवंचना

Category:

 

आज आपण पाहता सगळीकडे दुष्काळ पसरला आहे. पाण्याविना पशु, पक्षी आणि मानव हैराण झाले आहेत. कधी निसर्ग कोपतो तर कधी राजकारणी कोपतात. कधी नैसर्गिक आपत्ती येते तर कधी मानवाने घडवलेली आपत्ती त्रास देते. एकूणच सर्व आनंदी आनंद आहे. सगळीकडे मर्यादेचे उलंघन होत आहे.

  March 16, 2013


अवर्गिकृत

यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्षानिमित्तानं..!

Category:

 

यशवंतराव चव्हाण यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी १२ मार्च १९१३ रोजी झाला. त्यांच्या ७० वर्षांच्या आयुष्यात त्यांनी जे काम केले आणि महाराष्ट्राची आणि देशाची जी सेवा केली ती स्वातंत्र्य प्राप्तीनंतरच्या काळातील काहीच एकमेवाद्वितीयांपैकी एक. त्यांनी संतांची आणि समाज सुधाकारांची पार्श्वभूमी असणाऱ्या महाराष्ट्रापुढे त्याच पायावर शिवाजी महाराज-फुले-टिळक या आणि अशा अनेकांच्या विचारांच्या प्रेरणेने नव्या महाराष्ट्राचा कळस उभा केला.

  March 13, 2013


अवर्गिकृत

ज्ञानपीठ पुरस्कार (नोबेल पुरस्कार इतकाच सर्वश्रेष्ठ)

Category:

 

माहितीच्या विज्ञान आणि तंत्रज्ञातील प्रगतीच्या जोरावर देश-विदेशात नवनवीन शोध लागताहेत आणि तरुणपिढीबरोबर इतरही मंडळी वाचन संस्कृती पासून दुरावत चालली आहेत असे काही विश्लेषकांच्या माहितीच्या आधारे कळते.

  March 13, 2013


अवर्गिकृत

श्री. गिरीजात्मज – लेण्याद्री

Category:

 

या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले.

  March 12, 2013