C-02-A-Profiles-Site
पद्मावती विष्णू गोळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteप्रेमभावने बरोबरच स्वातंत्र्य आणि समता या मूल्यांचे प्रतिबिंब ज्यांच्या कवितेत दिसते त्या पद्मावती विष्णू गोळे या प्रसिद्ध कवयित्री होत्या. १० जुलै १९१३ मध्ये त्यांचा पटवर्धन घराण्यात जन्म झाला. एम. ए. पर्यन्त शिक्षण झाल्यावर त्या पुण्यालाच वास्तव्यास होत्या. ‘प्रीति प्रथावर’ हा १९४७ मध्ये त्यांचा पहिला काव्यसंग्रह प्रकाशित झाला.
पी. सावळाराम
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteकुसुमाग्रजांनी त्यांना ‘जनकवी’ ही उपाधी दिली होती. ‘गंगा-यमुना’ हा त्यांच्या गीतांचा संग्रह पुस्तकरुपाने प्रसिध्द झाला आहे.
पंडित विजय घाटे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteविजय घाटे यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान, उस्ताद विलायत खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद शाहिद परवेझ आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या सोबत साथ केली आहेत.
पंडित हृदयनाथ मंगेशकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमंगेशकर हे नांव जरी उच्चारलं तरी डोळ्यासमोर एकाहून एक संगीतरत्न असणारी पाचही भावंड उभी राहतात. लता, आशा, उषा, मीना आणि त्यांचे बंधू पंडित हृदयनाथ. पंडित हृदयनाथ यांचा जन्म २६ ऑक्टोबर १९३७ रोजी झाला.
पांडुरंगशास्त्री आठवले
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteवयाच्या बाविसाव्या वर्षी दादांनी आपल्या वडिलांनी सुरू केलेल्या पाठशाळेत भगवद्गीतेवर प्रवचनं द्यायला सुरुवात केली.१९५४ मध्ये जपान येथे झालेल्या दुसर्या धार्मिक परिषदेत त्यांनी वेद आणि भगवद्गीतेवरील तत्त्वज्ञानावर भाषण केले.
पुरुषोत्तम नागेश ओक उर्फ पु. ना. ओक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteपु.ना.ओक यांनी मुंबई विद्यापीठातून एम.ए आणि कायद्याची पदवी घेतली. काही काळ फर्ग्युसन महाविद्यालयात इंग्रजी शिकवले आणि त्यानंतर ब्रिटीश आर्मी जॉईन केली. दुसऱ्या महायुद्धात सिंगापूर मध्ये त्यांची पोस्टिंग होती.
पंकज झारेकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteनिसर्ग प्रेम माणसाला कुठवर घेवुन जावु शकत याच मुर्तिमंत उदाहरण म्हणजे पंकज झारेकर. फोटोग्राफीचा कुठलाही शैक्षणिक किंवा व्यावसायिक अनुभव गाठीशी नसताना या निसर्गवेड्या कलंदराने निसर्गाच्या विवीध ॠतुंनुसार बदलणार्या गहिर्या रंगांना व रूपांना ज्या सौंदर्यपुर्ण शैलीमध्ये कैद केले आहे, त्याबद्दल् त्याला साक्षात निसर्गदेवतेची दुवादेखील मिळाली असेल. पंकज हा चारचौघांसारखा दिसणारा, वागणारा परंतु चाकोरीबाहेरच्या स्वप्नांना अभिमानाने मिरवणारा, सर्व कलांचा प्रेमी असा स्वछंदी तरूण. ही स्वच्छंदीपणाची देणगी पण, त्याला बेधुंद करणार्या निसर्गाकडूनच मिळाली.