व्यक्ती-परिचय

श्रीरंग मनोहर दिवाण

Category:

 

श्रीरंग मनोहर दिवाण हे नागपुरमधील प्रसिध्द ज्योतिषी, प्रवचनकार, व वास्तुदोषनिवारण तज्ञ आहे. वास्तुशास्त्राच्या काही निकषांवर तसेच सिध्दांतांवर आज आधुनिक विज्ञानही विश्वास ठेवित असल्यामुळे आज अगदी सर्वच व्यवसायांमधील नवीन वास्तु बांधणारे लोकं, वास्तुशास्त्राप्रमाणे निर्दोष मानल्या गेलेलं घर बांधण्याकडे आपला कल ठेवतात.

व्यक्ती-परिचय

श्रीराम कृष्णाजी बोरकर

Category:

 

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध बोलपट निर्माते, दिग्दर्शक व्हि.शांताराम आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा सहवास लाभलेले श्रीराम बोरकर हे ठाण्यातल्या लेखकांमधल एक परिचित नाव

व्यक्ती-परिचय

श्रीधर गजानन माडगूळकर

Category:

 

साहित्यिक,लेखक,राजकारणी….१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील जाळं या पहिल्या साप्ताहिकाची सुरवात करुन याचे यशस्वी संपादन,गदिमा.कॉम या मराठीतील सर्वात मोठया साहित्यिक वेबसाईटच्या रचनेत सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी,मराठीसृष्टी.कॉम या साहित्यिक वेबसाईटच्या सल्लागार मंडळाचे सदस्य.

व्यक्ती-परिचय

शैलेश पालकर

Category:

 

श्री शैलेश पालकर हे पत्रकार असून रायगड आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध विषयांवर लिखाण करत असतात.

व्यक्ती-परिचय

श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी (पठ्ठे बापूराव)

Category:

 

‘वग’, ‘गौळणी’, ‘पदे’, ‘कटाव’, ‘सवालजवाब’ आणि तमाशाचा फड’ यासाठी ज्यांनी एक काळ गाजवला ते श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी तथा पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूरावांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी झाला. औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.

व्यक्ती-परिचय

शोभना रानडे

Category:

 

प्रजासत्ताक दिनानिमित्त पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यापाठोपाठ पद्म पुरस्करांची खिरापत होत असल्याची टीका
ही सालाबादप्रमाणे करण्यात आली. मात्र, काही व्यक्तींना पद्म किताब जाहीर केल्याबद्दल कुणाचेच दुमत नव्हते. त्या म्हणजे शोभना रानडे!

गांधीवादी विचारांच्या प्रसारक, ज्येष्ठ सामाजिक कार्यर्कत्या, दूरदृष्टी असलेल्या गांधीवादी, लहान मुलांसाठी लाडकी आजी… अशा शोभनाताई. गेल्या सहा दशकांहून अधिक काळ महिला सबलीकरण, मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकास आणि तरुण पिढीपर्यंत गांधीजींचे विचार पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शोभनाताई. महिलांना स्वातंत्र्यच नव्हे तर स्वत:ची मतं मांडण्याचे अधिकारही मिळाले नव्हते, अशा काळात नाशिकमध्ये १९३५ साली काही मुलींनी ‘यापुढे आम्ही केवळ देशासाठीच जगणार’ अशी शपथ घेतली. पुढे हीच संस्था ‘हिंद सेविका संघ’ म्हणून नावारूपास आली. या मुलींमध्ये अवघ्या तेरा वर्षांची एक मुलगी म्हणजेच शोभना रानडे यांचाही समावेश होता.

व्यक्ती-परिचय

संकेत आहिरे

Category:

 

संकेत अहिरे यांनी जर्मनी सारख्या प्रतिष्ठीत व तंत्रज्ञानप्रेमी देशात आपल्या प्रगल्भ बुध्दिमत्तेचा व अफाट कल्पनाशक्तीचा सुंदर मिलाफ साधला असून, आपल्या कार्यक्षमतेने सर्वच भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. कन्सेप्ट मिडीया वर्क्स ही जर्मनीमधील प्रथितयश व वेब तसेच संगणक क्षेत्रातील कोणत्याही समस्येवर रामबाण इलाज असणारी कंपनी आहे.