C-02-A-Profiles-Site
संजय सुरकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteमूळचे नागपूरचे असलेले संजय सुरकर यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५९ रोजी झाला. राज्य नाट्य स्पर्धेत त्यांच्या अनेक एकांकिका गाजल्या. संजय सुरकर यांना अभिनेता व्हायचं होत कारण स्पर्धांमधील अनेक एकांकिकांमध्ये दिग्दर्शनाबरोबरच त्यांनी अभिनयही केला होता. ‘वंश’ ही सुरकर आणि मंगेश कदम यांनी एकत्रित दिग्दर्शित केलेली एकांकिका राज्य नाट्य स्पर्धेत पहिली आली होती.
श्रीरंग मनोहर दिवाण
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्रीरंग मनोहर दिवाण हे नागपुरमधील प्रसिध्द ज्योतिषी, प्रवचनकार, व वास्तुदोषनिवारण तज्ञ आहे. वास्तुशास्त्राच्या काही निकषांवर तसेच सिध्दांतांवर आज आधुनिक विज्ञानही विश्वास ठेवित असल्यामुळे आज अगदी सर्वच व्यवसायांमधील नवीन वास्तु बांधणारे लोकं, वास्तुशास्त्राप्रमाणे निर्दोष मानल्या गेलेलं घर बांधण्याकडे आपला कल ठेवतात.
श्रीराम कृष्णाजी बोरकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteआंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिद्ध बोलपट निर्माते, दिग्दर्शक व्हि.शांताराम आणि ज्येष्ठ साहित्यिक आचार्य अत्रे या दोन दिग्गजांचा सहवास लाभलेले श्रीराम बोरकर हे ठाण्यातल्या लेखकांमधल एक परिचित नाव
शैलेश पालकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteश्री शैलेश पालकर हे पत्रकार असून रायगड आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध विषयांवर लिखाण करत असतात.
श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी (पठ्ठे बापूराव)
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub site‘वग’, ‘गौळणी’, ‘पदे’, ‘कटाव’, ‘सवालजवाब’ आणि तमाशाचा फड’ यासाठी ज्यांनी एक काळ गाजवला ते श्रीधर कृष्णाजी कुळकर्णी तथा पठ्ठे बापूराव. पठ्ठे बापूरावांचा जन्म सांगली जिल्ह्यात वाळवे तालुक्यात हरणाक्ष रेठरे या गावी झाला. औंधच्या महाराजांच्या आश्रयाखाली इंग्रजी पाचव्या इयत्तेपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.
श्रीधर गजानन माडगूळकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - profiles sub siteसाहित्यिक,लेखक,राजकारणी….१९९७ साली इंटरनेटवर मराठी भाषेतील जाळं या पहिल्या साप्ताहिकाची सुरवात करुन याचे यशस्वी संपादन,गदिमा.कॉम या मराठीतील सर्वात मोठया साहित्यिक वेबसाईटच्या रचनेत सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी,मराठीसृष्टी.कॉम या साहित्यिक वेबसाईटच्या सल्लागार मंडळाचे सदस्य.