श्री ब्रम्हदेव मंदिर
Category:
लेखसंग्रहपुराणांनुसार ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांपैकी ब्रह्मा ही पहिली देवता आहे. तो ब्रह्मांडाचा निर्माता मानला जातो. पुराणकथांनुसार विश्वनिर्मात्याने सर्वप्रथम ब्रह्मांडिय जल निर्माण केले व त्यात एक बीज टाकले. त्यापासून सोनेरी ब्रह्मांडिय अंडे तयार झाले. त्या अंड्यातून एक हजार वर्षांनी सृष्टीकर्त्याने स्वतः ब्रह्माच्या रूपात जन्म घेतला.