मोहीम तलाव पुनरुज्जीवनाची
Category:
युवा-विश्व लेखसंग्रह वैचारिक लेखन शैक्षणिकयशोगाथा सार्वत्रिक व सर्व दूर असायलाच हव्यात.पर्यावरण व प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच काही व्यक्ती स्वतःच्या प्रतिभेचा वापर करून नवनवीन मार्ग व त्यावर उपाय शोधत आहेत.गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे यांच्या प्रयत्नांमुळेच अनेक तलावांनी मोकळा श्वास घेतलाय, त्याचबरोबर ६३ तलावांचे पुनरुज्जीवनही झाले आहे. तसेच शालूताईंनी महिलांना मासेमारी क्षेत्रात आणून या क्षेत्रातील पुरुषांची मक्तेदारी मोडून काढली. यासाठी त्यांनी महिलांना मासे पकडण्यापासून ते बाजारात त्यांची विक्री करण्यापर्यंत आवश्यक ते प्रशिक्षण दिले.निमगाव, मोरगाव अर्जुनी तालुका, जिल्हा गोंदिया येथील शालू जगदीश कोल्हे या गेल्या नऊ वर्षांपासून फीड (FEED) या संस्थेच्या माध्यमातून माजी मालगुजार तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम करीत आहेत .या तलावांमधील बेशरमाची झाडे नामशेष झाली आहेत. शालू कोल्हे म्हणतात, “केवळ पाणी आणि माती असणे यास तलाव जिवंत आहे, असे म्हणता येत नाही. जीवविविधता, प्राणी, पक्षी, जनावरांसाठी चारा व लोकोपयोगी वनस्पती जर तलाव परिसरात विपुल असेल तरच तो तलाव जीवनदायक ठरतो.
July 2, 2026