झरे वाहती शुभ्र फेसाळ कैसे
कुणी योजिल्या भव्य येथे शिळा
तरुवल्लर्रीचे इथे मुक्त गाणे
फुले डोंगराचा पिसारा निळा
Author
Post Views: 5
झरे वाहती शुभ्र फेसाळ कैसे
कुणी योजिल्या भव्य येथे शिळा
तरुवल्लर्रीचे इथे मुक्त गाणे
फुले डोंगराचा पिसारा निळा
केशवसुतांनी कवितेतून कवित्वाची नवी जाणीव प्रकट केली हे त्यांचे वैशिष्ट्य. ‘आम्ही कोण? ‘ या कवितेत कवितेबद्दलचा विचार मांडला आहे, पण त्याशिवाय त्यांच्या इतरही अनेक कवितांमधून त्यांनी कवितेचे महत्त्व ठासून सांगितले आहे. ‘अशी असावी कविता म्हणून’, ‘रांगोळी घालताना पाहून’, ‘जे रम्य ते बघुनिया मज वेड लागे’, ‘जिने मला वेडे केले तिच्यावरी ही फिर्याद’ किंवा ‘दुर्मुखलेला’ या कवितांमधून त्यांनी कवितेच्या निर्मितिप्रक्रियेविषयी व एकूणच कवितेचे मोठेपण दाखवून दिले आहे. […]
पारवा म्हणजे कबूतर. घराच्या कौलारावर अथवा वळचणीला काहीही हालचाल न करता तासन्तास शांतपणे बसून राहिलेले कबूतर अनेकांनी पाहिले असेल. एखाद्या योग्याप्रमाणे जणू काही ध्यान लावल्यासारखे ते स्थितप्रज्ञ बसलेले असते. कबुतराचा आवाजदेखील घुमल्यासारखा धीरगंभीर असतो. अशा स्थितप्रज्ञ पारव्याचे चित्र बालकवी कसे रेखाटतात पहा […]
‘कोलंबसाचे गर्वगीत’ ही कुसुमाग्रजांच्या गाजलेल्या कवितांपैकी एक. या कवितेत मानवतेचे निशाण हाती घेऊन नवनवे प्रदेश शोधून काढणाऱ्या कोलंबस या खलाशाचे, त्याच्या ध्येयासक्तीचे चित्रण कुसुमाग्रजांनी केले आहे. ही कविता कुसुमाग्रजांनी १९३६ मध्ये लिहिली. त्या वेळी ते केवळ चोवीस वर्षांचे होते. ऐन तारुण्यात त्यांच्या प्रतिभेने मोठी झेप घेतली आणि काव्यप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. […]
Copyright © 2025 | Marathisrushti