(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख ४

    स्वातंत्र्यवीर सावरकरांचे संपूर्ण कुटुंब स्वातंत्र्याच्या होमकुंडात होरपळून निघाले होते. नातेवाईक, सगेसोयरे, अगदी जवळच्या लोकांनी सुद्धा त्यांना दूर लोटले होते. सरकारी ससेमिरा मागे लागल्यावर तर लोकांनी त्याच्याकडे जाणेयेणे, बोलणे टाळले होते. क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू.

      June 3, 2019


  • मराठी अभिनेते यशवंत दत्तात्रय महाडिक ऊर्फ यशवंत दत्त

    आई - वडील यांच्याकडून आलेला अभिनयाचा वारसा, उपजत अभिनयकौशल्य या बळावर यशवंत दत्त यांनी मराठी नाटक आणि चित्रपट यांत आपला ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला. मराठीनंतर त्याला हिंदीतही चांगली संधी चालून आली होती. नकला हा यशवंत दत्त यांचा स्थायीभाव होता. शाळेत असल्यापासून ते शिक्षकांच्या इतक्यात हुबेहूब नकला करत असत, अर्थात, पुढे नकला करण्याची सवय त्यांच्या कामी आली. "थंडर्स' नावाच्या ऑर्केस्ट्रात ते काम करत असत. निवेदन आणि नकला करून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत झाले होते. यशवंत दत्त या हरहुन्नरी अभिनेत्याची ती सुरवात होती.

    यशवंत दत्त यांच्या आई - वडिलांनी चित्रपटात व नाटकांत कामे केली होती. वडिलांनी तर "गरिबांचे राज्य' या नावाचा चित्रपट काढला होता; पण दुर्दैवाने या चित्रपटात त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला. यशवंत दत्त यांना गरिबीचे चटके सोसावे लागले. आपल्याला आलेल्या आर्थिक अपयशामुळे वडिलांचा यशवंत दत्त यांनी नाटक व चित्रपटसृष्टीत जाण्यास विरोध होता; पण अखेर त्यांनी यशवंत दत्त यांना परवानगी दिली आणि मार्गदर्शनही केले. घरच्या गरिबीवर मात करताना यशवंत दत्त यांनी उडप्याच्या हॉटेलात नोकरी केली, पानाच्या गादीवर काम केले, अखेर "फिलिप्स' मध्ये ते कामगार म्हणून रुजू झाले. यशवंत दत्त यांनी आपल्या अभिनयक्षमतेच्या जोरावर या कंपनीला विविध एकांकिका आणि नाट्यस्पर्धांतून विविध प्रकारची बक्षिसे मिळवली. यशवंत दत्त यांच्यामुळे फिलिप्स कंपनीचे नाव कलाक्षेत्रात गाजत होते. राज्य नाट्यस्पर्धेत "अडीच घरं वजिराला' हे नाटक पुणे केंद्रातून निवडले गेले, मग मुंबईच्या नाट्यसंस्थांकडून त्यांना बोलवणी येऊ लागली.

    दत्ता भट यांच्यासारख्या नामवंत अभिनेत्याने त्यांना आपल्याबरोबर काम करण्यासाठी बोलावले. "गरिबी हटाव' या नाटकात यशवंत दत्त यांनी चुणूक दाखवून दिली. नंतर यशवंत दत्त यांची तीन नाटकं आली. यशवंत दत्त यांना नाव मिळवून दिले ते "नाथ हा माझा' या नाटकाने. या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका मस्त उभा केला, की लोकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे. हे नाटक अचानक बंद पडले, पुन्हा काही काळाने ते परतले ते "वेडा वृंदावन' या नाकातून. त्यानंतर सुरू झाला यशवंत दत्त यांचा चित्रपटक्षेत्रातील प्रवास. "सुगंधी कट्टा', "दगा'मध्ये त्यांनी खलनायक, नायक रंगवला. मराठी चित्रपटसृष्टीला तेव्हा एका चांगल्या नायकाची गरज होती, ती पोकळी यशवंत दत्त यांनी भरून काढली. "भैरू पैलवान की जय', "दौलत', "फटाकडी', "आपली माणसं', "आयत्या बिळात नागोबा', "पैजेचा विडा' आदी चित्रपटांतून त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या. "शापित'मध्ये केलेल्या भूमिकेची दखल देशपातळीवर घेतली गेली.

    चित्रपटात काम करून प्रसिद्धी मिळत असताना त्यांनी नाटक करणे सोडले नाही. प्रत्येक नटाला मोह पडावा अशी भूमिका म्हणजे "नटसम्राट'मधील गणपतराव बेलवलकरांची..“ती वयाच्या चाळीसाव्या वर्षी इतकी सहजगत्या साकारली की प्रेक्षकांनी या व्यक्तीरेखेला अक्षरश: डोक्यावर घेतले. त्यानंतर यशवंत दत्त यांनी “गगनभेदी” नाटक केले. त्यानंतर त्यांच्या कारकीर्दीतील सर्वात महत्त्वाचे नाटक म्हणजे “वादळ माणसाळतंय”. वसंत कानेटकर यांनी बाबा आमटे यांच्या आयुष्यावर लिहिलेले हे नाटक यशवंत दत्त यांनी अत्यंत प्रभावीरित्या केले. त्यानंतर सुध्दा वसंत कानेटकर यांच्याच “सोनचाफा” आणि जयवंत दळवींच्या “कालचक्र” या दोन्ही नाटकांमध्ये यशवंत दत्त यांनी अभिनय केला.त्याचप्रमाणे “सरकारनामा” चित्रपटातून त्यांनी रंगवलेला खलनायक अगदी हुबेहूब रंगवून प्रेक्षकांकडून दाद मिळवली; ती आजही अनेकांच्या स्मरणात आहे.

    यशवंत दत्त यांनी "शापित" तसंच "संसार" या चित्रपटातून साकारलेल्या भुमिकांना "राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट अभिनेता" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नाटक, चित्रपट यामध्ये मग्न असलेल्या यशवंत दत्त यांच्यामध्ये एक हळुवार कवी लपलेला होता. यशवंत दत्त यांनी मराठी चित्रपट आणि रंगभूमीला दिलेलं योगदान अतुलनीय आहे. यशवंत दत्त यांचे ११ नोव्हेंबर १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 18, 2017


  • सुभाष थोरात

    सुभाष थोरात यांचा जन्म 17 जानेवारी 1957 मध्ये पावनवाडी येथे झाला. सरकारी सेवेमध्ये रूजु झाल्यानंतर, अभियांत्रिकी कौशल्यांमध्ये त्यांनी अभुतपुर्व असे यश मिळविले आहेत. थोरात हे शिक्षणाने मॅकेनिकल इंजिनीयर असुन त्यांना कविता करण्याचा, लघुकथा लिहीण्याचा व वेगवेगळ्या विषयांवरची पुस्तके चाळण्याचा छंद आहे.

      August 22, 2011


  • वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे

    झुणकाभाकरफेम समतानंद अनंत हरी गद्रे यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते. वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे यांचा जन्म १६ ऑक्टोबर १८९० रोजी झाला.

      November 5, 2017


  • बापूसाहेब जोशी

    जोशी, बापूसाहेब

    ‘प्रसाद’ प्रकाशनाचे संस्थापक, साहित्यिक य. गो. जोशी ऊर्फ भाऊ यांच्या अखेरच्या काळातील ही गोष्ट. भाऊंनी त्यांच्या चिरंजीवाला सांगितले, ‘बघ, या व्यवसायात पडणार असशील, तर मी बरीच प्रकाशने करून ठेवली आहेत. ती विकत राहिलास तरी तुझा चरितार्थ चालेल.’ त्यावर चिरंजीव म्हणाले, ‘काय भाऊ, य. गो. जोशींच्या मुलाला तुम्ही स्टॉक विकायला सांगताय. मी तुमच्याही पुढे जाईन.’ भाऊंचे चिरंजीव म्हणजे मनोहर ऊर्फ बापूसाहेब जोशी.

    ऐन विशी-बाविशीतच बापूसाहेब वडिलोपार्जित प्रकाशन व्यवसायात उतरले, प्रसाद मासिकाचे संपादक झाले आणि व्यवयासात यश मिळवत, कर्तृत्वाचा ठसा उमटवत त्यांनी वडिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवला. बापूसाहेब म्हणजे सदाप्रसन्नता, उत्साह आणि उमदेपणा. बापूसाहेबांचे गेल्या शुक्रवारी पुण्यात निधन झाले. सदाशिव पेठेतील प्रसाद प्रकाशनाच्या कार्यालयात आता बापूसाहेबांचा दरबार पुन्हा कधीच भरणार नाही, ही कल्पनाही खूप वेदना दायक आहे. मराठी ग्रंथांसाठी ठेव म्हणून रक्कम ठेवा, ठेवीच्या व्याजातून ग्रंथ मिळवा आणि मुदतीनंतर ठेव परत न्या, अशी अभिनव योजना बापूसाहेबांनीच १९८० मध्ये प्रथम आणली आणि पुढे अशा सहा योजना त्यांनी यशस्वी करून दाखवल्या. या योजनांमधील ९९ ग्रंथांपैकी ८४ ग्रंथ आजवर प्रसिद्ध झाले आहेत आणि उर्वरित प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. ‘आपले वेद, आपली उपनिषदे, आपली पुराणे,’ ‘सुबोध शांकर ग्रंथावली,’ ‘देवभाषेचे देणे: मराठीचे लेणे’ या ग्रंथ ठेव योजना मोठय़ा प्रतिसादाने पूर्ण झाल्या आणि ‘समर्थ वाग्वैजयंती,’ ‘अभिनव प्रसन्न दर्शन’ ‘पंचमहाकाव्ये’ या योजनातील ग्रंथ प्रसिद्धीचे काम सुरू आहे. भारतीय संस्कृतीची सर्वार्थाने नव्याने ओळख करून देणारे बापूसाहेबांचे हे ग्रंथप्रकल्प यशस्वी झाले ते त्यांच्या परिश्रमांमुळे, बिनचूक नियोजनामुळे, अफाट लोकसंग्रहामुळे आणि पारदर्शी व्यवहारांमुळे. गेली ५० वर्षे ‘प्रसाद’ मासिक प्रसिद्ध करताना त्यांनी दरवर्षी एक दैवत विशेषांक प्रसिद्ध करण्याची योजना सलग २८ वर्षे चालवली. त्यानंतर नद्यांवरील विशेषांक प्रसिद्ध केले. प्रत्येक दिवाळी अंकात ते एक विस्तृत संतचरित्र प्रसिद्ध करीत असत. त्यांचे हे सारे विशेषांक आजही संदर्भग्रंथासारखेच वापरले जातात. प्रकाशनाचा व्याप सांभाळतानाच प्रसिद्ध श्री देवदेवेश्वर संस्थानचे विश्वस्त म्हणूनही बापूसाहेबांनी अतिशय उत्साहाने सुमारे २५ वर्षे काम पाहिले. बापूसाहेबांवर मराठी वाचकांनी मोठा विश्वास दाखवला. ‘आमची ठेवीची रक्कम परत नको. आमचे पैसे तुमच्या चांगल्या कामासाठीच वापरा,’ असे सांगून अनेक ठेवीदार मुदत संपल्यानंतर त्यांची ठेव बापूसाहेबांनाच परत देत असत. असे प्रेम करणारे वाचक बापूसाहेबांना लाभले आणि तीच त्यांची प्रकाशन व्यवसायातील ‘मोठी ठेव’ ठरली. बापूसाहेबांच्या बरोबरीने त्यांची कन्या उमा बोडस याही गेली दोन दशके प्रकाशनाचे काम पाहत आहेत. बापूसाहेबांनी हाती घेतलेल्या अनेक योजना पुढे नेण्याची जबाबदारी आता या पुढच्या पिढीकडे आली आहे.

      August 5, 2017


  • गंगाधर महांबरे

    गंगाधर महांबरे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मालवण येथील टोपीवाला हायस्कूलमध्ये झाले. त्यांचा जन्म ३१ जानेवारी १९३१ रोजी झाला.पुढे ते पुण्यास राहू लागले. ‘पश्चिमा’ पुणे नियतकालिकाचे कार्यकारी संपादक झाले. मालवणच्या ‘बालसन्मित्र’ या पारुजी नारायण मिसाळ यांच्या पाक्षिकात त्यांच्या बालकथा, कविता आणि अन्य लेख प्रसिद्ध व्हायचे. पुढे ही लेखनाची आवड वाढत गेली. त्यांनी पुण्याला गेल्यावर वृत्तपत्रव्यवसायास सुरुवात केली. पुढे भावगीतकार व चित्रपटगीतकार म्हणून त्यांना विशेष प्रसिद्धी मिळाली.

    ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या, नववधू प्रिया मी बावरते, मधू मागशी माझ्या सख्यापरी, जन पळभर म्हणतील हाय हाय’, ‘मावळत्या दिनकरा’ अशी कित्येक गीते आज ही लोकप्रिय आहेत. उत्कट भावकाव्यात गणना होणारी त्यांची अनेक गीते आहेत. महांबरे यांनी ‘कंठातच रुतल्या ताना’ निळा सावळा नाथ, बोलून प्रेमबोल, ‘संधीकाली या अशा’ ‘नयनात तुझ्या सखि सावन का?’ अशा कित्येक सुंदर उत्कट भावकविता लिहिल्या. आजही रसिकांच्या मनात त्या घोळत आहेत. उत्तम भावगीतरचनांप्रमाणेच त्यानी सुरेख चित्रदर्शी भावरम्य चित्रपट गीते लिहिली होती. त्यामुळे त्यांची चित्रपटगीतकार म्हणून सर्वदूर ख्याती पसरली. त्यांची चित्रपट गीते असलेले मराठी चित्रपट म्हणजे ‘युगे युगे मी वाट पाहिली’, ‘सौभाग्यकांक्षिणी’ ‘एकटी’, ‘प्रीत तुझी माझी’ इत्यादी आहेत. गंगाधर महांबरे यांच्या गाजलेल्या चित्रपट गीतात ‘तूच खरा आधार’, ‘जादुगारा तुला मी’, ‘देवाघरच्या फुला’, ‘पाण्यातले पहाता प्रतिबिंब हासणारे’, ‘हळदीकुंकवाला हळदीकुंकवाला बाई सुवासिनी झाल्या दंग’ इत्यादी गीते गाजत आहेत. त्यांची कित्येक गीते आशा भोसले, लता मंगेशकर, सुधीर फडके इत्यादी नामवंत गायक- गायिकांनी गाऊन महांबरे यांच्या गीतरचनांना योग्य तो न्याय दिलेला आहे. सुप्रसिद्ध नाटककार व बंगाली वाङ्मयाचे अभ्यासक मालवणचे नामवंत साहित्यिक भार्गवराम विठ्ठल तथा मामा वरेरकर यांचा जीवनपट चितारणारे ‘एक अविस्मरणीय मामा’ हा छोटासा चरित्रग्रंथ महांबरे यांनी लिहिला आहे. याशिवाय ‘चार्ली चॅप्लीन’,‘रसिका तुझ्याचसाठी’, ‘मॉरिशस’, ‘मराठी गझल’ इत्यादी अनेक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. भारतीय आकाशवाणीचे एक मान्यवर गीतकार म्हणून त्यांचे आकाशवाणीसाठी योगदान आहे.

    चित्रपट रंगभूमी, आकाशवाणी, दूरदर्शन, ध्वनीमुद्रिका, संगीत मैफल, कॅस्टेस् आणि आता सी. डी. इत्यादी माध्यमांनी कवी मा.गंगाधर महांबरे यांच्या गीतांचा अनुरुप उपयोग करून घेतला आहे. ‘रसिका तुझ्याच साठी’ या त्यांच्या गीताची ध्वनिमुद्रिका एका अमेरिकन कंपनीनेही प्रसिद्ध केली होती. नवी दिल्ली येथील नॅशनल प्रोडक्टिव्हिटी कौन्सिलने त्यांना १९८३ साली पोएट ऑफ दि इयर हा सन्मान दिलेला असून गोव्याच्या गोमंतक मराठी अकादमीने सन्माननीय फेलोशिप दिली होती. केंद्र सरकारचे आणि महाराष्ट्र सरकारचे अन्य पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले होते. मा.गंगाधर महांबरे यांचे २३ डिसेंबर २००८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 7, 2017


  • गझलविश्व समृद्ध करणारे प्रसिद्ध गझलकार इलाही जमादार

    इलाही जमादार यांनी १९६४ सालापासून काव्यलेखनाला प्रारंभ केला. कविवर्य सुरेश भटांनंतर मराठी गझलेला उत्तुंगतेवर नेणारे गझलकार अशी त्यांची ओळख होती. ते आकाशवाणी आणि दूरदर्शनचे मान्यताप्राप्त कवी व गझलकार होते. विविध मराठी, हिंदी, उर्दू दैनिके व मासिकांतून इलाहींच्या कविता व गझला प्रसिद्ध झाल्या आहेत.

      March 1, 2022


  • स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन

    हा सामना तीन दिवसांचा होता. मध्यमतेज गोलंदाज मोहंमद निसार यांनी (९३-५) सलामीवीरांना झटपट माघारी धाडल्याने पहिल्या तासातच ३ बाद १९ अशी यजमानांची वाईट अवस्था झाली.

      June 25, 2022


  • सुप्रसिद्ध गायिका हिराबाई बडोदेकर

    हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये. रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली होती. त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या. पूर्वी त्या मुख्यत: मुंबई केंद्रावरून गात असत.

      December 7, 2021


  • हिंदी चित्रपटनिर्माते व दिग्दर्शक यश चोप्रा

    यश चोप्रा यांच्या चित्रपटाचे वैशिष्टय म्हणजे गीत आणि संगीत. यश चोप्रा हे कवी असल्याने त्यांनी स्वत: कधीही उथळ दर्जाची गीते निवडली नाहीत. त्यामुळे सगळी इंडस्ट्री आनंद बक्षीची धूळ झाडत असतानाही चोप्रा यांनी साहिर लुधियानवीची साथसंगत कधी सोडली नाही.

      October 21, 2017