जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
विजय हजारे हे सी. के. नृायडू यांचे शिष्य होते. १९५१ ते १९५३ ते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान राहिले होते. ॲडीलेड येथे १९४८ मध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या संघासमोर त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकवण्याचा पराक्रम केला.
May 10, 2010
संजय खापरे यांनी आपल्या रुपेरी पडद्यावरील वाटचाल महेश मांजरेकर यांच्या ‘प्राण जाये पर शान ना जाये’ या हिंदी चित्रपटापासून सुरु केली. त्यानंतर खापरे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत रॉकी हॅण्डसम या चित्रपटातही काम केले. आपल्या कारकिर्दीत संजय खापरे यांनी जत्रा, गाढवाचं लग्न, टाटा बिर्ला आणि लैला, अजब लग्नाची गजब गोष्ट, अग्निपरिक्षा, भाऊचा धक्का, काकस्पर्श, फक्ता लढ म्हणा, प्रियतमा, लयभारी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, वॉण्टेड बायको नं 1, मर्डर मेस्त्री, दगडी चाळ, गलबत, डिस्को सन्या, फॅमिली कट्टा, झाला बोभाटा, नगरसेवक, तलाव, मेमरी कार्ड, बे एके बे या चित्रपटातून अभिनय केला आहे.
May 31, 2022
पुण्यामध्ये एक 'आगळे वेगळे' ज्योतिषी आहेत. त्यांचे भविष्य कथन अचूक आणि सकारात्मक असते. पण त्यांच्या मते ज्योतिषामध्ये कांही अनीष्ट प्रथा आहेत. 'कर्मकांड' या नावाने या प्रथा आजही अस्तित्वात आहेत. शापित पत्रिका, कालसर्प योग, नारायण नागबळी, मंगळ दोष, ग्रह दोष, नक्षत्र दोष, साडेसाती, वास्तू दोष ही ती 'कर्मकांडे' आहेत. त्यांच्या मते प्रत्यक्षात अशी कोणतीही कर्मकांडे अस्तित्वात नाहीत. ही सर्व काल्पनिक किंवा मानव निर्मित आहेत.तसेच देवाची शांत, ग्रह शांत,नक्षत्र शांत यातील 'शांत' या शब्दाला त्यांचा विरोध आहे. त्यांच्या मते पृथ्वीवरील कोणीही माणूस एवढा महान किंवा शक्तिवान झालेला नाही की तो एखाद्या देवाची, ग्रहाची किंवा नक्षत्राची शांत करू शकेल.तो फार फार तर त्यांची 'पूजा' करू शकेल. त्यामुळे कुठलीही 'शांत' ही शेवटी एक 'पूजा' असते. अशा प्रकारच्या पूजांना किंवा धर्म कार्यांना त्यांचा विरोध नाही. पण कर्मकांडांना त्यांचा सक्त विरोध आहे. ही कर्मकांडे व शांती म्हणजे ज्योतिष शास्त्रातील अंध श्रद्धा आहे असे त्यांचे म्हणणे आहे. अनेक लोक अशी कर्मकांडे व शांती करण्यासाठी वारेमाप पैसे खर्च करीत असतात. पण त्याचा उपयोग होत नसतो. ही कर्मकांडे व शांती म्हणजे ज्योतिषांना व धर्म कार्य करणाऱ्या गुरुजींना पैसे मिळवून देण्याची साधने बनली आहेत. ज्योतिषातील या अनीष्ट प्रथा व अंध श्राधेविरुध्ध आवाज उठविण्याचे व जन जागृती करण्याचे काम त्यांनी सुरु केले आहे. हे प्रवाहाच्या विरुध्ध पोहाण्यासारखे आहे याची त्यांना जाणीव आहे.आपणही आपल्या परीने त्यांच्या या कार्याला हातभार लावायचा प्रयत्न करू या!
या ज्योतिषाचे नाव नंदकिशोर जकातदार असे आहे.
-- उल्हास हरी जोशी
January 10, 2011
January 10, 2011
य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले.
July 19, 2022
अरुणा ढेरे ह्या मराठी साहित्य विश्वातील एक नावाजलेल्या लेखिका आहेत. आतापर्यंत त्यांनी बरीच पुस्तकं लिहिली आहेत. एक लेखिका म्हणून त्यांनी आतापर्यंत वैयक्तिक निबंध , लघुकथा , कादंबऱ्या, कविता , बालसाहित्य , मोनोग्राफ्स, मालिकांसाठी पटकथा व संवाद अशा विविध विभागात लेखन केले आहे.
September 19, 2020
हिंदी सिनेमाच्या ग्लॅमरस दुनियेत कारकीर्द घालवूनही शशी कपूर यांचं मन घुटमळत राहिलं ते पृथ्वी थिएटरपाशी. काही वर्षांपूर्वी पं. सत्यदेव दुबे यांना मानवंदना म्हणून पृथ्वी थिएटरने महोत्सव आयोजित केला होता, तेव्हा शशी कपूर व्हीलचेअरवर बसून पृथ्वी थिएटरमध्ये आले होते एका कोपऱ्यात शांतपणे बसून नाटकवाल्यांचा चाललेला जल्लोष शांतपणे निरखत होते आणि स्मितहास्य करत होते.
December 20, 2021
आशा बगे या मराठी कादंबरीकार, लेखिका आहेत. त्यांना २००६ मध्ये भूमी या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
त्यांचे प्रकाशित झालेलं साहित्य -
भूमी (कादंबरी, मौज प्रकाशन गृह)
दर्पण (कथासंग्रह, मौज प्रकाशन गृह)
निसटलेले (कथासंग्रह, मेहता पब्लिशिंग हाऊस)
मारवा (कथासंग्रह, मौज प्रकाशन गृह)
त्रिदल (कादंबरी, मौज प्रकाशन गृह)
अनंत (ललित, विजय प्रकाशन)
चंदन (ललित, विजय प्रकाशन)
धर्मक्षेत्रे कुरूक्षेत्रे (ललित, विजय प्रकाशन)
श्रावणसरी (निसर्ग)
December 15, 2010
वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं लहान वयातच नंदू पोळ यांचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. 'साष्टांग नमस्कार' या नाटकातून त्यांनी अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. नंदू पोळ यांनी अनेक चित्रपट, मालिका तसेच नाटकातून आपल्या अभिनयाचे प्रेक्षकांची मने जिंकली होती.
नंदू पोळ यांची लहानखुरी मूर्ती ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाच्या प्रारंभीच ‘श्री गणराय नर्तन करी’ या नांदीत प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत असे. 'गाढवाचं लग्न' या सिनेमातील 'राजा'च्या भूमिकेला वेगळी ओळख नंदू पोळ यांनी मिळवून दिली.
सिंहासन, सामना, एक होता विदूषक, नागिन, एक डाव भुताचा, कथा दोन गणपतरावांची, पक पक पकाक, दुर्गे दुर्गट भारी, गाढवाचं लग्न, इसराल गावाची इसराल माणसे, हसतील त्यांचे दात दिसतील या चित्रपटांतून त्यांनी काम केले होते. अनेक टीव्ही सीरियल्स आणि मालिकातूनही त्यांनी अभिनयाची चुणूक दाखवली.
नाजुका, प्रवासी, अडोस-प़डोस, मुक्ती, पिंपळपान, अकलेचे तारे, कायपालट यासारख्या मालिका-टीव्ही सीरियल्समध्येही त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. मराठीप्रमाणेच हिंदी, कन्नड, गुजराती चित्रपट मालिकांतही त्यांनी काम केले.
डॉ. जब्बार पटेल, सई परांजपे, मणी कौल, अरुण खोपकर, स्मिता तळवलकर हे दिग्दर्शक तसेच डॉ. श्रीराम लागू, निळू फुले, ओम पुरी, नसिरुद्दीन शहा, मोहन आगाशे, नाना पाटेकर, अशोक सराफ यांच्यासोबत त्यांनी दीर्घकाळ काम केले.
मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान असणाऱ्या थिएटर अकॅडमीचे ते संस्थापक सदस्य आणि २० वर्षे कार्यकारी सदस्य होते. नंदू पोळ यांनी देशात अडीच हजार, तर परदेशात शेकडो नाट्यप्रयोग केले. स्वत:चा कलाप्रवास त्यांनी ‘मी, नंदू पोळ’ या पुस्तकातून उलगडला आहे.
पोळ उत्तम ध्वनिमुद्रणतज्ज्ञ होते. त्यांच्यातल्या उत्तम ध्वनिमुद्रणतज्ज्ञतेमुळे गणेशोत्सवात मंडळांच्या देखाव्यांमागील शब्द- स्वर ध्वनिमुद्रित करण्यासाठी ते रात्र- रात्र कष्ट करत. नंदू पोळ यांनी स्वत:चा स्टुडिओही काढला होता. नंदू पोळ यांचे २८ जुलै २०१६ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
July 29, 2017
जागतिक कीर्तीचे योगाचार्य आणि या विषयावरील लेखक बी.के.एस. अय्यंगार यांचा जन्म १४ डिसेंबर १९१८ रोजी झाला. आरोग्य योग, योग सर्वांसाठी, योग-एक कल्पतरू इ. पुस्तके त्यांच्या नावावर आहेत.
## B. K. S. Ayengar
July 27, 2017
परचुरे प्रकाशन मंदिर या मराठी साहित्य विश्वातील सर्वात जुन्या व जाणत्या प्रकाशन संस्थेचे गजानन पांडुरंग परचुरे उर्फ ग.पां. परचुरे हे संस्थापक होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर व आचार्य अत्रे या दोन महापुरूषांचे निस्सीम भक्त असल्यामुळे त्यांनी या दोघांच्या जीवनसंघर्षांवर आधारित असलेली व त्यांचे व्यक्तित्व उलगडवून दाखवणारी अनेक दर्जेदार पुस्तके प्रकाशित केली आहेत. व्यावसायिकतेचे गणित डोक्यात नसूनही रसिकांना सतत नवीन वाङ्मय वाचायला देण्याची जिद्द असल्यामूळे, परचुरेंनी साहित्यविक्रीचा उच्चांक गाठला होता.
January 12, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti