(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • लक्ष्मण शंकरराव काटेकर

    लक्ष्मण शंकरराव काटेकर, हे तुळजापूर येथील रहिवाशी असुन परिचीतांमध्ये तात्या या नावाने लोकप्रिय आहेत.

      August 22, 2011


  • इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर

    इज्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मायर यांचा जन्म ३ मे १८९८ रोजी झाला. गोल्डा माबोविच म्हणजेच गोल्डा मायर या इज्रायलची "आयर्न लेडी" म्हणून ओळखल्या जात असत. १९६९ ते १९७४ त्यांनी इज्रायलचे पंतप्रधानपद भुषविले. ज्युईश धर्माभिमानी, कणखर देशभक्त, मुरलेली राजकारणी, लोकप्रिय व्यक्तिमत्व ह्या सर्व व्याख्यांनी ओळखली जाते. १९७० साली अमेरिकेत "सर्वात आवडती (admired) स्त्री" म्हणून निवडल्या गेलेल्या गोल्डा यांचा जन्म तेंव्हाच्या रशियामध्ये (आता युक्रेन) झाला. त्या लहान असताना वडील नोकरीधंद्यासाठी अमेरिकेला गेले आणि लवकरच त्यांनी आपल्या कुटुंबाला तिथे बोलवून घेतले.

    गोल्डा अमेरिकेतल्या मिलवॉकी शहरातील ज्युईश वसाहती मध्ये मोठी होऊ लागल्या. माध्यमिक शाळा संपल्यावर गोल्डा यांना उच्च माध्यमिक शिक्षणाकरता मात्र आईवडीलांकडून विरोध व्हायला लागला. लग्न करुन मुलीनं घर वसवावं अशी आईवडीलांची इच्छा तर पुढे शिकून शिक्षक व्हावं ही गोल्डा यांची इच्छा! शेवटी कंटाळून त्या आपल्या मोठ्या बहिणीकडे डेन्व्हरला पळून गेल्या. तिथे त्यांच्या कुटुंबाबरोबर राहून उच्च्माध्यमिक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. इथ पर्यंत गोल्डा यांचा राजकारणाशी, प्रखर ज्युईश धर्मियांशी फारसा संबंध आला नव्हता, पण बहिण आणि तिच्या नवर्याचकडे ज्युईश अभ्यासक, धर्माभिमानी लोक येऊन चर्चांच्या, गप्पांच्या मोठ्या फैरी झडायच्या. त्यांचं बोलणं ऐकून, हळूहळू चर्चांमध्ये सहभागी होऊन गोल्डा झायऑनिझम कडे जास्त आकृष्ट होऊ लागल्या. डेन्व्हर मध्ये असताना त्या मॉरिसच्या, प्रेमात पडली. त्या काळात १९१७ मध्ये ब्रिटिशांनी त्यांच्या अंमलाखाली पॅलेस्टाईनची घोषणा केली.

    जगभरातील 'ज्यू लोकांसाठी त्यांची एक जागा / घर' अशी ह्या पॅलेस्टाईनची संकल्पना होती (National Home for the Jewish people). त्यानंतर महिन्याभरातच लग्न झाल्यावर पॅलेस्टाईनला रहायला जायचं ह्या अटीवर गोल्डा यांनी मॉरिसशी लग्न केले. १९२१ साली दोघही पॅलेस्टाईनला रवाना झाले आणि आयुष्याच्या पुढच्या टप्प्याला सुरुवात झाली. सुरुवातीचे आयुष्य अतिशय गरिबीमध्ये खडतर रितीने जात होते. गोल्डा हळू हळू छोट्या पातळीवर झायॉनिझम आणि त्यासंदर्भातील कामांमध्ये स्वतःला व्यस्त करत होत्या. काम, दोन मुले, संसार ह्यामध्ये गोल्डा पारंपारीक ज्युईश पद्धतीने घर चालवायचा प्रयत्न करत होत्या. मॉरिस आधीपासूनच फार पारंपारिक ज्यू नव्हता. खटके उडायला लागले.

    १९२८ मध्ये गोल्डा मुलांसकट कामाकरता तेल अविवला रवाना झाली आणि हळू हळू लग्न संपुष्टात आले. ह्यापुढे मात्र गोल्डा ज्युईश कष्टकरी लोकांकरता काम करणार्याह "Histadrut" ह्या संघटनेत झटपट एक एक पायरी चढत त्यांच्या पॉलिटीकल विभागची प्रमुख बनल्या. त्याकाळात दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. वर्ल्ड झायॉनिस्ट ऑर्गनायझेशन मध्ये गोल्डा यांनी अनेक महत्वाच्या भूमिका पार पाडल्या. ज्यूंच्या पुनर्वसनाकरता एकट्या अमेरिकेतून ५० मिलीयनपर्यंत देणग्या जमा केल्या. प्रखर धर्माभिमानी, देशभक्त आणि तेवढीच प्रभावी वक्ती अशी त्यांची प्रतिमा होती.

    पुढे १९४८ साली इज्रायलची स्थापना झाली. पहिले पंतप्रधान बेन-गुरीयन यांच्या मंत्रिमंडळात 'मिनिस्टर ऑफ लेबर' म्हणून गोल्डा यांची निवड झाली. स्वतंत्र झाल्या झाल्या शेजारी अरब राष्ट्रांनी इज्रायल वर हल्ला चढवला. ह्या धामधुमीत स्वतःचा जीव धोक्यात घालून मुस्लीम स्त्रीच्या पेहेरावात वेशांतर करुन सरहदी पलिकडे जॉर्डनच्या किंग अब्दुल्लला युद्धात भात घेऊ नका म्हणून विनवणी करायला गोल्डा गेल्या. नवीन सैन्याला लढायला शस्त्रास्त्र आणि पैशांची गरज होती तेंव्हा ती मागणी करायला गोल्डा तडक अमेरिकेला पोहोचल्या. १९५६ साली परराष्ट्र मंत्री म्हणून गोल्डा यांची नेमणूक झाली. इतर राष्ट्रांबरोबर सौहार्दाचे संबंध प्रस्थापित करणे, औद्योगिक, तांत्रिक, मिलिटरी क्षेत्रात सहकार्याने काम करणे इत्यादी बाबींवर त्यांनी विशेष भर दिला. १९६६ साली गोल्डा यांनी निवृत्ती पत्करायचे ठरवले.

    शांत आयुष्य जगणे, कुटुंबियांबरोबर वेळ व्यतित करणे, तब्ब्येतीकडे लक्ष देणे इत्यादी गोष्टींकरता ही निवृत्ती आवश्यक होती. पण नियतीच्या मनात वेगळेच काही होते. १९६९ झाली त्यावेळच्या पंतप्रधानांचे निधन झाले आणि राजकीय अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून तिच्या पक्षाने पंतप्रधानपदाकरता त्यांची निवड केली. ही त्यांची राजकीय कारकिर्दीची परमावधी होती. त्या लोकांची आवडती पंतप्रधान होती. देशात राजकीय स्थैर्य येत होते तेवढ्यात १९७३ मध्ये इजिप्त आणि सिरियाने इज्रायल वर अनपेक्षितपणे हल्ला चढवला (योम किप्पूर वॉर). निकराने प्रतिकार परत इज्रायलने हल्ला परतवला आणि शेवटी त्यांचा विजय झाला, त्यात २७०० इज्रायली सैनिक धारातिर्थी पडले. एका छोट्या राष्ट्रकरता ही जबर किंमत होती. स्वत:च्या मनचे ऐकण्यापेक्षा मिलिटरीचे ऐकून सैन्य आधीच सीमेपाशी न हलवल्याचा गोल्डा यांना प्रचंड पश्चाताप झाला पण वेळ गेली होती. सगळे देशवासी आता तिच्याविरुद्ध झाले होते. सैनिकांच्या मृत्यूंचे खापर तिच्यावर फोडले गेले आणि १९७४ साली गोल्डा यांनी राजीनामा दिला.

    योम किप्पूरच्या युद्धमुळे झालेले सर्व दु:ख आणि पश्चाताप, लोकांनी नाकारल्यामुळे झालेला अपमान आणि उपमर्द ह्यामुळे खचलेली गोल्डा शेवटच्या काही वर्षात मात्र परत समाधानाने जगू शकली. काळ लोटला लोकांचा प्रक्षोभ कमी झाला आणि आधीच अतिशय लोकप्रिय असलेल्या गोल्डाला लोकांचे उदंड प्रेम मिळले. गोल्डा मायर यांचे ८ डिसेंबर १९७८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      December 8, 2021


  • कोकणातील भाजपचा ८० च्या दशकातील एकमेव चेहरा आप्पा गोगटे

    सिंधुदुर्ग जिल्ह्याचे देवगड विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेत नेतृत्व करणारे आप्पा गोगटे यांनी उभ्या हयातीमध्ये जनतेप्रती वडीलकीचे नाते जपले. आप्पा गोगटे सदरा, धोतर अशा साध्या वेशातील आमदार मंत्रालयात एखाद्या ठिकाणी जात असे तेव्हा नवागतास ते आमदार आहेत, याचा भासही कधी झाला नाही. पराकोटीची साधी राहणी, संयमी पण ठाम वक्तृत्व, वडीलकीचे नातं जपणारी व्यक्ति अशी अनेक वैशिष्ट्यं त्यांच्याबाबतीत सांगता येतील.

      June 16, 2019


  • विजय कुलकर्णी

    “हुसेन टू विजय कुलकर्णी” या चित्र मालिकेच्या माध्यमातून औरंगाबादचे चित्रकार विजय कुलकर्णी यांच्या चित्रांची मुंबई, दिल्ली, कोलकत्ता, गोवा, चेननई, कोचीन शहरांत प्रदर्शने भरली. अमूर्त चित्रशैलीने सुरुवात करणारे कुलकर्णी यांनी वळणावर मात्र अजिंठा चित्रशैलीचा अभ्यास सुरु केला व पुढील ३५ वर्षे याच चित्रशैलीने त्यांची ओळख बनविली.

    अजिंठा स्कूल

      July 24, 2015


  • अभिनेत्री व कवयित्री स्पृहा जोशी

    मराठीत मोजक्याच अभिनेत्री अशा आहेत ज्या बालरंगभूमीवरून आल्या आहेत. त्यांचा जन्म १३ ऑक्टोबर १९८९ रोजी झाला. स्पृहा जोशी ही त्यातीलच एक अभिनेत्री आहे. ती गेल्या अनेक वर्षांपासून नाटक आणि मालिकांमध्ये कामे करत आहे. बालमोहन विद्या मंदिरमधून तिने शालेय शिक्षण केले. स्पृहा जोशी हिला मानाचा समजला जाणारा बालश्री पुरस्कार २००३ साली मिळाली होता. अनेक एकांकिकांमध्ये तिने उत्तम भूमिका साकारल्या आणि अनेक पारितोषिकेदेखील पटकावली. प्रसिद्ध दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या ‘चिरायू’ या लघुपटातही स्पृहाने काम केले होते. स्पृहा पहिल्यांदा टीव्हीच्या पडद्यावर आली ती ‘दे धमाल’ या मालिकेमुळे. तेव्हा ती शाळेत असली तरी तिने साकारलेली हुशार मुलगी आजही अनेकांच्या स्मरणात आहे. तिने लिहलेल्या ‘चांदणचुरा’ या काव्यसंग्रहासाठी तिला कवी ‘कुसुमाग्रज’ हा पुरस्कार मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच ‘लोपामुद्रा’ हा तिचा दुसरा काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात आला.

    प्रामुख्याने मराठी मालिकांमध्ये काम करणारी स्पृहा झी मराठी वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’, ‘उंच माझा झोका’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ व ‘एका लग्नाची तिसरी गोष्ट’ इत्यादी मालिकांमध्ये चमकली. उंच माझा झोका’मध्ये रमाबाई रानडेंची तिने साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहिली आहे. याव्यतिरीक्त तिने पैसा पैसा, लॉस्ट अॅाण्ड फाउड, बायस्कोप ‘मोरया’, ‘मायबाप’, आणि 'पेईंग घोस्ट' या चित्रपटांमध्येही काम केले आहे. भक्ती बर्वे, स्मिता पाटील, नीना कुलकर्णी, सुहास जोशी, रसिका जोशी, मुक्ता बर्वे यांच्यासारखं काम आपल्यालाही करता यावं अशी स्पृहाची इच्छा आहे. एक अभिनेत्री आणि कवयित्री असण्यासोबतच स्पृहा जोशीला आता एक नवी ओळख मिळत आहे. स्पृहा आता एक गीतकारही झाली आहे. स्पृहाने काही सिनेमांसाठी गीतलेखन सुद्धा केलं आहे. त्यामुळे ती एक गीतकार म्हणूनही लोकप्रिय होत आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      November 8, 2017


  • जेष्ठ गायिका मुबारक बेगम

    हमारी याद आयेगी’ या चित्रपटातील ‘कभी तनहाईयो में’ आणि १९६५ मधील ‘खूनी खजाना’ या चित्रपटातील ‘ए दिल बता हम कहाँ आ गये’ या गाण्यांनी मुबारक बेगम यांना अमाप लोकप्रियता मिळवून दिली.

      July 18, 2017


  • दिग्दर्शक यशवंत पेठकर

    पेठकरांच्या कामाच्या पद्धतीवर खूश होऊन मुंबईच्या प्रकाश पिक्चर्सच्या विजय भट्ट यांनी पेठकरांना मोठा मोबदला देऊन मुंबईला आणले व ‘शादी की रात’ हा हिंदी चित्रपट त्यांच्या हातात दिला. त्यात गीता बाली, रेहमान, अरुण यांसारखे आघाडीचे कलाकार होते. सुधीर फडके यांनी त्यांना ‘रत्नधर’ हा आपला चित्रपट दिला. चित्रपट उत्कृष्ट जमला होता, पण भागीदारांच्या भांडणामुळे तो प्रदर्शित होऊ शकला नाही. ‘अपराधी’चा नायक असणाऱ्या राम सिंग यांनी पेठकरांना ‘सौ का नोट’ हा आपला चित्रपट दिग्दर्शनासाठी दिला. त्यात गीता बाली, करण दिवाण, बेगमपारा हे कलाकार होते.

      April 28, 2022


  • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर

    लक्ष्मण रामचंद्र पांगारकर

      December 15, 2010


  • भालजी पेंढारकर

    भालचंद्र गोपाल पेंढारकर म्हणजेच भालजी पेंढारकर यांचे काही प्रमुख व उल्लेखनीय चित्रपट म्हणजे “थोरातांची कमळा”, “तांबडी माती”, “साधी माणसं”, “मराठा तितुका मेळवावा”, “छत्रपती शिवाजी’, “मोहित्यांची मंजुळा”, “घरची राणी’, “स्वराज्याचा शिलेदार”, “कांचनगंगा” ,”महाराणी येसुबाई” ,”बाल शिवाजी”, “प्रीत तुझी माझी” आणि “शिलंगणाचे सोने’

      November 25, 2013


  • गीतकार शांताराम नांदगावकर

    "हृदयी वसंत फुलताना' यांसारखी सतत ओठावर खिळणारी गाणी देऊन रसिकांना उत्साहात ठेवणारे गीतकार म्हणून कवी शांताराम नांदगावकर यांची ओळख होती. त्यांचा जन्म १९ आक्टोबर १९३६ रोजी झाला.सहज आणि सुंदर शब्दांची गुंफण असणाऱ्या आणि मनाचा ठाव घेणारी गीते देणारे ज्येष्ठ गीतकार शांताराम नांदगावकर.

    मूळचे कोकणातील नांदगावचे असलेल्या शांताराम नांदगावकर यांचे शालेय शिक्षण दादरच्या शिरोडकर हायस्कूलमध्ये झाले. 'पाहिले न मी तुला', 'प्रथम तुला वंदितो', 'ही नव्हे चांदणी', 'दाटून कंठ येतो', आदी त्यांची गीते विशेष गाजली. अष्टविनायक,'नवरी मिळे नवर्याला', 'बनवा बनवी', पैजेचा विडा आदी मराठी तसेच हिंदी चित्रपटांसाठी त्यांनी गीतलेखन केले होते. श्रोत्यांच्या ओठावर खेळतील अशा सहजसुंदर काव्यरचना हे त्यांचे वैशिष्ट्य होते. चित्रपटगीतांबरोबरच बालगीते, भावगीते व लोकगीतेही आणि भक्तीगीतेही लिहिली. 'ससा तो ससा' हे बालगीत आजही मुलांना वेड लावते.

    शब्दांमधून जग आणि जगाची रीत उभी करण्याची मोठी ताकद त्यांच्यात होती, परंतु दुर्दैवाने त्यांच्या बहराचा काळ हा मराठी चित्रपट गीत-संगीताच्या दृष्टीनं अधोगतीचा होता. त्यामुळे अनेकदा ‘बिनडोक’ सिच्युएशन्ससाठी गाणी लिहिण्याचं ‘व्यावसायिक काम’ त्यांना करावं लागलं; तरीही जेव्हा केव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा त्यांनी गीतकार म्हणून आपल्या क्षमतेचा प्रत्यय आणून दिला. गीतकार म्हणून त्यांचा प्रवास भावगीताच्या प्रांतात सुरू झाला, तेव्हा चित्रपटसृष्टीत ग.दि.मा., सुधीर फडके, राम कदम, जगदीश खेबुडकर ही समीकरणे ऐन भरात होती. त्यानंतरच्या पंधरा वर्षांत सर्व काही बदलले. या दरम्यान नांदगावकर यांनी भावगीतांच्या प्रांतात मुशाफिरी केली. ‘रामप्रहरी राम गाथा’सारखे त्यांचे गाणे पूर्वसूरींशी आणि मराठी भक्तीगीतांच्या सुरेल परंपरेशी नाते सांगणारे होते. याच दशकात सांस्कृतिक अभिरुची सांधा बदलत होती.

    अर्थवाही शब्द, भाषेचा डौल, कल्पनांची भरारी हे सर्व एका विशिष्ट वर्गाच्या सांस्कृतिक अभिरुचीसाठी लिहिले जात होते. हा पांढरपेशा मध्यमवर्ग विस्तारला तसा मराठीतील गीत, संगीत, चित्रपट, नाटक या सगळ्यांचाच बाज बदलला. १९८० नंतरचा जवळपास दोन दशके मराठी चित्रपट उथळ पाण्यात गटांगळ्या खात होता. शांताराम नांदगावकर नेमके याच काळात गीतकार म्हणून वावरत होते. १९७९ साली ‘अष्टविनायक’ या चित्रपटात गाणी लिहून नांदगावकर खऱ्या अर्थानं ‘मेन स्ट्रिम’मध्ये आले. परंतु, त्यांनी चित्रपटाबाहेर जशी गाणी लिहिली, उदाहरणार्थ, ‘सजल नयन नितधार बरसती’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात’ तशी त्यांना चित्रपटात लिहिण्याची संधी क्वचितच मिळाली.

    एक आठवण नांदगावकरांची.
    १९९५-९६ च्या सुमारास ‘तू सुखकर्ता’ चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठीची पत्रकार परिषद होती. चित्रपटाचे गीतकार शांताराम नांदगावकर पार्टीला आपल्या सूनबाईला घेऊन आले होते आणि प्रत्येकाकडे ते तिच्या आवाजाचं कौतुक करत होते. त्या चित्रपटात बहुधा तिने एक गाणे गायले होते. त्यांच्या प्रसन्न मूडमध्येच त्यांना कोणीतरी विचारले, ‘तुमचा चष्मा डोळ्यांवर कधीच नसतो, तो कायम कपाळाच्याही वर डोक्यावर असतो. असं का?’ नांदगावकर मिश्किल हसले आणि म्हणाले, ‘कवी नेहमी डोक्याने जगाकडे पाहतो, त्यामुळे मी केवळ लिहिताना चष्मा डोळ्यांवर सरकवतो. एरवी जगाकडे पाहताना तो डोक्यावर ठेवतो.’ गमती गमतीत ते एक मोठे सत्य सांगून गेले होते.

    ‘अष्टविनायक’नंतर सचिनच्या बऱ्याच चित्रपटांची गाणी त्यांनी लिहिली आणि संगीतकार अनिल अरुण सोबत त्यांची ‘वेव्हलेंग्ध’ चांगलीच जुळली, परंतु ‘धुमधडाका’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ नंतर सचिन- महेश- अशोक- लक्ष्या यांची लाट आली. त्यात गीत संगीताला फार वाव नव्हता. त्यातल्या त्यात सचिनच्या काही चित्रपटांत त्यांना बरी गाणी देता आली. ‘गंमत जंमत’साठी किशोरकुमार यांना मराठी गाणे द्यायचे ठरले, तेव्हा मराठीतल्या ‘ळ’चा उच्चार करता येत नाही आणि ‘च’चा उच्चार आपण ‘च्य’ असा हिंदी पद्धतीने करतो, असे कारण सांगून ते गाण्यासाठी राजी होईनात. पण ही अडचण आव्हान म्हणून स्वीकारत नांदगावकर यांनी, ‘प्रिये, जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’ अशी सोपी शब्दरचना केली आणि किशोर कुमार यांनी धमाल उडवून दिली. गाणं अतिशय लोकप्रिय झालं. मात्र बऱ्याचदा ‘दोन रुपये दे मला, खर्चाला पानसुपारीला.’ असे शब्द जोडण्याची व्यावसायिक मजबुरी शांताराम नांदगावकर यांना स्वीकारावी लागली. १९९६ नंतर ते हळूहळू यापासून दूर गेले. अनेकदा प्रथितयश गीतकार बहुजनांच्या गीत- संगीतापासून फटकून राहतात, परंतु मुळातच निर्भय स्वभावाच्या नांदगावकरांनी स्वत:ला कधी अशा चौकटींमध्ये बंदिस्त केले नाही. त्यामुळे एका बाजूला ‘दलितांचा राजा भीमराव माझा.. त्यानं माणसाला माणुसकी दावली’ अशी गाणी लिहिताना दुसरीकडे सुनील गावस्करच्या खासगी अल्बमसाठी शब्द पुरवत तितक्याच उत्साहाने ‘हे जीवन म्हणजे क्रिकेट, राजा हुकला तो संपला’ असे खेळाचे तत्त्वज्ञान सांगून गेले.

    क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी म्हटलेले, 'या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला...?' हे गीतही त्यांचेच. मा.शांताराम नांदगावकर १९८५ मध्ये शिवसेनेतर्फे विधान परिषदेवर निवडून गेले होते. शांताराम नांदगावकर यांचे ११ जुलै २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. विकीपीडीया

    शांताराम नांदगावकर यांची काही गाणी
    पहिले ना मी तुला
    रजनीगंधा
    रुपेळी वाळूत
    हरी नाम मुखी रंगते
    श्रीरंग सावळा तु

      November 1, 2017