जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मिशी ठेवणार्या एका कालाकराने हॉलीवूडमधे प्रवेश केला. तीन वर्षात ऑस्कर नामांकन व तीन गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळवले. पहिल्या हॉलीवुडपटात उत्कृष्ट दिग्दर्शकाबरोबर व प्रसिद्द नटासोबत काम करून त्याने आपली भूमिका अजरामर केली. हाताने पत्र लिहीण्याच्या व पोस्टमने पत्र पोचवण्याच्या काळात, त्याला आलेल्या प्रेमपत्रांची व मागण्यांची संख्या होती एक महिन्यात ३०००! सुरुवातीची कारकीर्द इजिप्त मधे अरेबिक चित्रपटात घडवलेला व पुढे इंग्रजी येत असल्याच्या गुणावर हॉलिवुड्चा झालेला हा थोर कलाकार म्हणजे ‘ओमर शरीफ’. तरुणींच्या दिलाची धडकन ‘ओमर शरीफ’.
February 11, 2020
शिक्षण जेमतेमच होते. झोपण्यासाठी छत नव्हते का पोटाला अन्न नव्हते . तरीपण त्यांनी प्रथम स्वतःलाच शिकवले, वाचायला-लिहावयाला शिकले.
August 28, 2021
अजय सरपोतदार यांचे पुण्यातील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलमध्ये शालेय शिक्षण झाले. १९७६ साली दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुण्यातील बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्समधून १९८१ मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयात पदवी मिळवली. त्यांचा जन्म १६ ऑक्टोबर १९६० रोजी झाला. चित्रपट क्षेत्रात मात्र त्यांनी दहावीच्या परिक्षेनंतर म्हणजे १९७६ मध्ये काम करायला सुरवात केली. सहायक निर्मिती व्यवस्थापक म्हणून ते काम करू लागले. त्यानंतर ते हॉलिवूड तसेच बॉलीवूडच्या चित्रपटांसाठी जाहिरात आणि प्रसिद्धीच्या कामाकडे वळले. प्रसिद्धी प्रमुख म्हणून हाताळलेला "वो सात दिन' हा त्यांचा पहिला चित्रपट. आपल्या या अनुभवाला शिक्षणाची जोड असावी या हेतूने अजय सरपोतदार यांनी मुंबईच्या के.सी. कॉलेज ऑफ मॅनेजमेंटमधून व्यवस्थापन शास्त्राचे शिक्षण घेतले. तसेच जाहिरात आणि जनसंपर्क विषयात पदव्युत्तर पदविका प्राप्त केली. त्यांनी सुमारे ५०० चित्रपटांच्या प्रसिद्धीचे काम केले. याशिवाय २०० जाहिरातपट, कॉर्पोरेट फिल्म्स, माहितीपट तयार केले.
टाटा मोटर्स या नामांकित कंपनीसाठी सरपोतदार यांनी अनेक जाहिराती आणि माहितीपट (डॉक्युयमेंटरी) तयार केले. अजय सरपोतदार यांनी आपल्या विविधांगी कारकिर्दीत हैदराबाद येथील जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटीत अनेक वर्ष वरिष्ठ निर्माते म्हणून जबाबदारी सांभाळली. मराठीबरोबरच प्रादेशिक वाहिन्यांचे काम त्यांच्याकडे देण्यात आले होते. आपले वडिल विश्वा स सरपोतदार आणि आजोबा नानासाहेब सरपोतदार यांच्या पावलावर पाऊल टाकत चित्रपट क्षेत्रात काम करू लागलेले अजय सरपोतदार १९९५ मध्ये "पैंजण' या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात उतरले. आजोबा नानासाहेब सरपोतदार यांनी १९१९ साली स्थापन केलेल्या आर्यन फिल्म कंपनीचे त्यांनी पुनरूज्जीवन केले. या कंपनीच्या बॅनरखाली सरपोतदार यांनी अलिकडेच कोटींचे बजेट असलेल्या उलाढाल या चित्रपटाची निर्मिती केली होती. बॉलिवूडमधील चित्रपटांच्या तोडीसतोड असे तांत्रिक पाठबळ वापरून हा चित्रपट तयार करण्यात आला होता. त्याचे चित्रिकरण मॉरिशसमध्ये करण्यात आले.
"उलाढाल' प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रेक्षकांच्या प्रतिसाद मिळत असतानाच तिसऱ्याच आठवड्यात मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे या चित्रपटाला चांगलाच फटका बसला. निर्माते, दिग्दर्शक आणि वितरक असलेल्या अजय सरपोतदार यांची जुलै २००५ मध्ये अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. यशवंत भालकर यांनी राजीनामा दिल्यानंतर सरपोतदार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर जानेवारी २००९ मध्ये फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाच्या खजिनदारपदी सरपोतदार यांची फेरनिवड करण्यात आली.
मॉरिशस सरकारच्या मॉरिशस फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या संस्थेचे व्यावसायिक राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. अजय सरपोतदार यांनी मॉरिशसमध्ये झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट महोत्सवाचे यशस्वीरित्या आयोजन केले. मुंबई आणि हैदराबादच्या धर्तीवर पुण्यातही फिल्मसिटी असावी अशी त्यांची इच्छा असल्याने अजय सरपोतदार यांनी हडपसर परिसरात फिल्मसिटीसाठी जागा मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. अजय सरपोतदार यांचे ३ जुन २०१० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
June 3, 2017
संजीव हे इंडियन सुपर लीगमधील एटीके फुटबॉल क्लबचे मालक आहे. २००९-२०१० मध्ये त्यांची ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन (AIMA) चे अध्यक्ष म्हणून निवड झाली. याशिवाय ते IIT खरगपूरचे अध्यक्ष देखील आहेत. २००१ मध्ये कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजचे अध्यक्ष होते. सर्वात तरूण वयात त्यांनी ही जबाबदारी पार पाडली होती.
January 29, 2022
हिराबाई पेडणेकर यांच नाव आज विस्मृतीत गेले आहे. हिराबाई यांना साहित्याची फार आवड होती. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८८५ रोजी सावंतवाडी येथे झाला. हिराबाई यांनी आपलं सातवीपर्यंतच शिक्षण पूर्ण झाल्यावर साहित्याचे धडे घेण्यासाठी खाजगी शिकवणी लावली. साहित्य आणि मराठी भाषेची आवड असल्यामुळे अल्पावधीतच त्यांनी मराठी भाषेत प्रभुत्व प्राप्त केले. मराठी साहित्याचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. मराठी वगळता बंगाली, हिंदी आणि इंग्लिश या भाषांचाही अभ्यास हिराबाई यांनी केला.
हिराबाई या चांगल्या गायिका होत्या. त्यांना गायनकला आणि नृत्यकला अवगत होती. हिराबाई यांच्या प्रतिभेमुळे तत्कालीन अनेक आघाडीच्या नाटककारांनी त्यांच्या कार्याची दखल घेतली. हिराबाई या कविता लिहीत. त्यांच्या कविता तेव्हाच्या आघाडीच्या मराठी साप्ताहिकात प्रसिद्ध झाल्या. मनोरंजन आणि उद्यान या दोन प्रसिद्ध साप्ताहिकात हिराबाईंच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. दरम्यान त्यांची "माझे आत्मचरित्र" ही लघुकथा प्रसिद्ध झाली आणि त्या प्रसिद्धीच्या शिखरावर पोहचल्या. त्यांच पाहिलं नाटक "जयद्रथ विडंबन" हे १९०४ मध्ये प्रकाशित झाल. हे एक संगीत नाटक होत. या नाटकातील पदे तत्कालीन टीकाकारांनी उचलून धरली. त्यांचं दुसर नाटक "दामिनी" हे १९१२ मध्ये प्रसिद्ध झालं.
हे नाटक केशवराव भोसले यांच्या ललितकलादर्श या कंपनीने रंगमंचावर आणले. अशाप्रकारे हिराबाई या पहिल्या महिला नाटककार बनल्या. सुनिता देशपांडे यांच्या लेखानानुसार तत्कालीन संगीत नाटकसृष्टीवर हिराबाई यांचा मोठा प्रभाव होता. त्या पुढे लिहीतात की कोल्हटकर आणि गडकरी यांनी वेळोवेळी नाटक संगीतबद्ध करताना हिराबाई यांची मदत घेतली. हिराबाई यांचा एवढा प्रभाव वाढला होता की एका नाटककाराने त्यांच्या जीवनाला समोर ठेऊन नाटक लिहीले आणि नायिकेचे पात्र उभे केले. हिराबाई यांच्या संगीत नाटकातील योगदानाची दखल फारशी घेतली गेली नाही. हिराबाई पेडणेकर यांचे निधन १८ ऑक्टोबर १९५१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :-इंटरनेट
November 2, 2017
भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने उडवून एक नवा इतिहासच रचला.
May 4, 2023
सयाजी शिंदे यांना खऱ्या अर्थे नाव आणि ओळख मिळाली ती रामगोपाल वर्मा याच्या “शूल’ या चित्रपटातील बच्चू यादवच्या भूमिकेमुळे. बिहारमधील हे पात्र सयाजी शिंदे यांनी इतक्या चांगल्यारीतीने वठवले, की देशभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
January 13, 2022
मौलाना ... हसरत मोहानी!
संपूर्ण स्वातंत्र्य मागणारी भारत देशातील पहिली व्यक्ती! साहित्य निर्मीतीतून समाजाला योग्य दिशा दाखवून ब्रिटिशांवर कोरडे ओढण्यासाठी अनेकदा कारावास भोगणारे कदाचित एकमेव शायर!
सर्वात आधी "संपूर्ण स्वराज्या"ची मागणी करणार्यांचपैकी एक. त्यांचा जन्म १ जानेवारी १८७५ रोजी हसवा गावी (जि. फत्तेपूर) झाला. टिळकांच्या मतासारखी मागणी असलेला. लोकमान्य टिळकांचे खास समर्थक. मा.हसरत मोहानी यांचे बालपण आजोळी म्हणजे मोहाना (जि. उन्नाव) येथे गेल्याने त्यांनी कवितेत टोपणनाव घेताना मोहानी हे आडनाव लावले. ते १९0३ मध्ये बी.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. हल्लीच्या भाषेत सांगायचे तर महाविद्यालयात ते टॉपर होते. त्यांना चालून आलेली सेशन जजची नोकरी केवळ इंग्रजांची आहे म्हणून त्यांनी ठोकरली. पुढच्याच वर्षी त्यांनी ‘उर्दू-ए-मोअल्ला’ हे मासिक सुरू केले. काँग्रेस पक्षाच्या एका अधिवेशनात ते सामील झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत रामप्रसाद बिस्मिलही होते. १९0८ मध्ये एकाचा लेख त्यांनी छापला आणि इंग्रजांची नाराजी ओढवून घेतली. लेखकाचे नाव न सांगितल्याने इंग्रजांनी तुरुंगात टाकले. ४५ किलोच्या बेडया त्यांना घातल्या जायच्या. कधी उलटे टांगले जायचे. रोज २0 किलो गहू दळायची शिक्षा होती. हसरत थकत तेव्हा बासरी वाजवत. इकडे ते दळत तर घरी खायला काही नसल्याने त्यांची पत्नी, निशात उन्नीसा, लोकांची दळणे दळून घर चालवीत होती. ते संपूर्ण स्वातंत्र्य (आझादी-ए-कामिल) मिळण्याच्या बाजूचे होते. सुभाषचंद्र बोस यांचे ते सर्मथक होते.
मुस्लीम लीगच्या सभेत जीनांची त्यांची कायम जुंपायची. भरसभेत पंडित मदनमोहन मालवीय, सरदार पटेल, बॅ. जीना या सर्वांना एवढेच काय महात्मा गांधी यांनाही धारेवर धरण्यात त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मदत केल्याबद्दल गांधीजींवर त्यांनी जाहीर टीका केली. पण मोहानींचे भारतप्रेम इतके होते की त्यांच्यावर कोणीही रागावले नाही. भारतात कम्युनिस्ट पक्ष स्थापनेत त्यांचा खारीचा का होईना पण वाटा होता. हे आजच्या किती कम्युनिस्टांना माहिती आहे तेच जाणे. हसरत यांना अनेकदा तुरुंगाची हवा खावी लागली. त्यांच्या ७७१ पैकी ३८३ गझला तेथेच निर्माण झाल्या. त्यांनी पहिली गझल वयाच्या १२व्या वर्षी लिहिली. १८७५ साली उत्तर प्रदेशातील 'मोहान' या गावी जन्माला आलेल्या हसरत यांनी शिक्षणात विलक्षण प्रगती दाखवली. त्यानंतर अलीगढ विद्यापीठात पुढील शिक्षण घेतले. मात्र त्यांची खरी ओळख 'उर्दू शायर' म्हणण्यापेक्षाही स्वातंत्र्यसैनिक अशीच रास्त आहे. मौलानांना कारावासात अनेकदा टाकण्यात आले.
दुसर्याद वेळेसच्या कारावासात तर अपरिमित हाल त्यांना सहन करावे लागले. खरे तर हालअपेष्टा प्रत्येकच कारावासात होत्या कारण सक्तमजूरी दरवेळेसच मिळायची. दिवसदिवसभर चक्की पिसावी लागायची. त्यांचे शरीर इतके भक्कम नव्हते की त्यांना ते सहन होईल. पण पर्याय नव्हता. मग मारहाण व्हायची. हंटरचे फटके पडायचे. त्यातच एखाद्या कैद्याने स्वतः केलेले काम वाढीव दाखवण्यासाठी यांचा आटा चोरला किंवा थोडासा जरी आटा जमीनीवर पडला तर वेगळी मारहाण व्हायची. त्यांच्या शरीरावर या मारहाणीच्या अनेक जखमा होत्या. मौलानांचा आणखीन जास्त अपमान करण्यासाठी त्यांना विशिष्ट प्रकारचे कपडे देण्यात आले जे अत्यंत टाकाऊ स्वरुपाचे व रफ होते. मात्र मौलानांनी तेही सहन केले. एकच स्टीलचे भांदे देण्यात आले ज्याचा वापर दिवसातील प्रत्येक गोष्टीसाठी करावा लागायचा. तेही त्यांनी सहन केले. त्यांना एक जाडेभरडे कांबळे फक्त देण्यात यायचे निजण्यासाठी!
अतीव हालात काढलेल्या या प्रदीर्घ कालावधीत मौलानांच्या मनातून भौतिक इच्छा नष्ट होऊ लागल्या. त्यांच्यातील खमकेपणा व स्वातंत्र्याची आस तेजःपुंज होऊ लागल्या. त्याग झळाळू लागला. कोणत्याही भौतिक वासना राहिल्या नाहीत. आणि सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे कारावासात त्यांनी निर्माण केलेले साहित्यच सर्वाधिक व सर्वोत्कृष्ट ठरले. ब्रिटिश सरकारने एकदा त्यांना सक्तमजूरी व दंडही ठोठावला. अर्थातच, त्यांच्याकडे पैसेच नसल्यामुळे त्यांना दंड भरता आला नाही. मग सरकारने त्यांची शायरीची पुस्तके. जी मौलानांच्या मते त्यांच एकमेव पुंजी होती, ती अत्यंत अल्प किंमतीत विकून तो दंड वसूल करून त्यांचा आणखीन अपमान केला. मौलानांचे शायरीला सर्वात मोठे योगदान म्हणजे एकीकडे वझीर सारख्या शायरांची उथळ आणि काल्पनिक शायरी प्रसवत असताना आणि दुसरीकडे दागसारख्यांची जबान बयानची आणि काहीशी हझलीश शायरी प्रसवली जात असताना, मौलाना यांनी शायरीला पुन्हा एकदा नावलौकीक मिळवून दिला. मौलाना हसरत मोहानी हे कृष्णभक्त व टिळकभक्त पण होते.
हसरत मोहानी एकदा मित्राच्या घरी गेले होते. जेवण वगैरे झाले. रात्री मित्राने झोपायला अंगणातली खाट दिली. थंडी मी म्हणत होती; पण मित्राचाही नाइलाज होता. घर लहान. उबदार ब्लँकेट दिले. सकाळी उठून मित्र पाहतो, तर काय हसरतसाहेब कुडकुडत, पोटात पाय घेऊन झोपलेले. मित्राने त्यांना उठविले आणि विचारले, ‘‘हे काय, मी छान ब्लँकेट दिले होते. तरीही तुम्ही....’’ हसरत म्हणाले, ‘‘मित्रा, ते विदेशी ब्लँकेट कसे घेऊ? मी टिळकांचा भक्त आहे ना!’’ हसरत यांची टिळकभक्ती अशी होती. त्यांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेला एक शेर वाचला तरी ही भक्ती कळते. ते म्हणतात - मग्मून न हो खातिरे-हसरत के तिलकतक पैगामे वफा बादे सहर लेके गयी है (हसरत तू नाराज होऊ नकोस. प्रभातकाळच्या वायूने तुझा संदेश टिळकांपर्यंत नेला आहे.)
टिळकांवर एवढी भक्ती का? तर त्याचे उत्तर ते देत अस्तकी की, टिळकांइतका सडेतोड आणि निर्धाराचा मनुष्य माझ्या पाहण्यात आला नाही. लोकमान्यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा हसरत म्हणाले होते - मातम न हो क्यों भारत में बपा दुनिया से सिधारे आज तिलक बलवंत तिलक, महाराज तिलक, आझादी के सरताज तिलक मौलाना हसरत मोहानी कट्टर धार्मिक होते., पण राजकारणात त्यांचे गुरू होते टिळक आणि तुरुंगात त्यांच्या सोबत होती कृष्णाची बासरी. कृष्णावर त्यांनी अनेक ठुर्मयांही लिहिल्या. जशी ही ठुमरी पाहा-
मनमोहन श्याम से नैन लाग
निसदिन सुलग रही तन आग
मौलाना यांची शायरी ही दैनंदीन शब्दात, दैनंदिन जीवनातील संदर्भांसहीत मनातील भावभावनांना अत्यंत प्रभावीपणे व्यक्त करते. त्यांच्या शायरीची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे साधेपणा, प्रामाणिकपणा आणि सूक्ष्म भावना प्रकट करू शकण्याची हातोटी!
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है हमको अबतक आशिकीका वो जमाना याद है
व
खूब-रुयोंसे यारियाँ न गई या दोन्ही गुलाम अलींनी मशहूर करून टाकलेली गझल्स हसरत मोहानी यांच्या आहेत. दिलकी बेइख्तियारियाँ न गई हसरत मोहानी यांची खूप मोठी साहित्यनिर्मीती उपलब्ध आहे. स्वतःचा काव्यसंग्रह, गालिबचा अनुवाद, काव्यातील महत्वाचे घटक, याशिवाय त्यांनी अनेक लेख लिहीले. पाकिस्तानात त्यांच्या नावाने एक लायब्ररी व उपक्रमही आहे. हसरत मोहानी यांचे निधन १३ मे १९५१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / प्रदीप निफाडकर
खूब-रुयोंसे यारियाँ न गई.
https://www.youtube.com/watch?v=RiH6UECmc3s&feature=youtu.be
चुपके चुपके रात दिन आसूं बहाना याद है.
https://www.youtube.com/watch?v=bCvtKpEsg1g
हसरत मोहांनींचे काही इतर शेर:
=========================================
उनके खत की आरझू है उनके आमद का खयाल
किस कदर फैला हुवा है कारोबारे इन्तझार
=====================================
कुछ समझमे नही आता कि ये क्या है 'हसरत'
उनसे मिलकर भी न इजहारे तमन्ना करना
=====================================
जी मे आता है के उस शोखे-तगाफुल केशसे
अब न मिलिये फिर कभी और बेवफा हो जाइये
======================================
तेरी मैफिलसे उठाता गैर मुझको, क्या मजाल
देखता था मै तुने भी इशारा कर दिया
इश्कने उसको सीखा दी शायरी
अब तो अच्छी-फिक्रे ‘हसरत’ हो गई
May 13, 2019
एकापेक्षा अधिक परिचितांचे आकस्मिक मृत्यू एकाच दिवशी घडावेत हा कुयोग अलीकडच्या काळात परवाच्या मंगळवारी दुसऱ्यांदा घडून आला. दीनदयाळ शोध संस्थानचे संस्थापक नानाजी देशमुख आणि रा. स्व. संघाचे भूतपूर्व बौद्धिक विभाग प्रमुख डॉ. श्रीपती शास्त्री गेले तेव्हा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात पहिल्यांदा, आणि ज्येष्ठ गायक कै. सुधीर फडके यांच्या पत्नी ललिता फडके आणि ज्येष्ठ पत्रकार वि. ना. देवधर यांचे निधन झाले तेव्हा दुसऱ्यांदा.
देवधर लोकसत्ता परिवाराला जवळचे होते, कारण ज्येष्ठ सहसंपादक या नात्याने त्यांनी आपल्या वृत्तपत्र कारकीर्दीतली काही वर्षे ‘लोकसत्ता’त व्यतीत केली होती. देवधर तसे मूळचे पुण्याचे, शालेय शिक्षण सुरू असतानाच त्यांचा वृत्तपत्र व्यवसायाशी संबंध आला तो वृत्तपत्राचे गठ्ठे पोचवण्याच्या निमित्ताने. लेखनाची आवड असल्याने आणि श्री. म. माटे यांच्याकडे लेखनिक म्हणून उमेदवारी केली असल्याने लेखणीला आणि भाषेला जे वळण लागले होते, त्याच्याच आधाराने देवधर बातमीदारीत आले. ‘दैनिक भारत’ आणि ‘केसरी’त त्यांनी बातमीदारी सुरू केली आणि त्याच अनुभवावर मुंबईतून ‘महाराष्ट्र टाइम्स’ सुरू होताच देवधर तिथे रुजू झाले.
आर्थिक आणि राजकीय विश्लेषण ही देवधरांच्या बातमीदारीतली खासियत राहिल्याने काही काळ मुंबईत विधिमंडळाचे आणि नंतर दिल्लीत संसदेचे रिपोर्टिग त्यांनी केले. ‘राजधानीतून’ हे त्यांचे दिल्लीच्या बातमीदारीविषयीचे लेखन गाजले. त्याने दिल्लीच्या बातमीदारीचा एक नवा पायंडा पाडला. देवधर राजकीय विश्लेषण जेवढे निष्पक्षपणे आणि मार्मिक करीत, तेवढेच ते पडद्यामागच्या घटनांवर, बातमीमागच्या बातमीवर तिरकस आणि खोचक शैलीत लिहीत. ‘भेळ-शहाळी’ हे त्यांचे सदर त्यामुळेच अनेकांच्या स्मरणात राहिले. आणीबाणी उठताच देवधर ‘महाराष्ट्र टाइम्स’ सोडून पुण्याच्या ‘तरुण भारत’मध्ये संपादक म्हणून रुजू झाले.
अवघ्या पाच वर्षांच्या तिथल्या कारकीर्दीत त्यांनी आपल्या समर्थ लेखणीने जनसामान्यांवर ‘तरुण भारत’चा वेगळाच ठसा उमटवला. देवधर हिंदुत्ववादी होते, पण त्यांचे हिंदुत्व हिंदुत्ववादी विचारधारेबाहेरच्या वाचकालाही मोहित करीत राहिले. देवधर हिंदुत्वाच्या विचारधारेत वाढले, आपल्या विचारांशी, निष्ठांशी आयुष्यभर घट्ट राहिले, त्या विचारधारेतल्या मुखंडांनी त्यांची अवहेलनाही केली. स्वाभाविकपणेच त्यांच्याशी मतभेदही झाले, पण तरीही त्यांनी ध्येयवादावरची अतूट निष्ठा मात्र ढळू दिली नाही. विचारधारेचे, चळवळीचे पुरस्कर्तेपण त्यांनी जपले, पण ते जपताना बातमीचे, लेखणीचे पावित्र्य कुठेही कमी होऊ दिले नाही. सरकारी सवलती उपटणे, बातमीच्या पाटय़ा टाकणे, गोट गाठणे, कार्बन कॉपी जर्नालिझम करणे या वाटांना देवधरांची पत्रकारिता जाणे शक्यच नव्हते.
अभ्यासू वृत्ती जोपासत, व्यासंगाची सवय राखत, बातमीचे पावित्र्य जपत देवधरांनी, पत्रकारिता धर्माचे पालन केले. पत्रकार संघटनांमध्येही देवधरांनी काम केले. देवधरांची पत्रकारिता गतिमान होती, अष्टावधानी होती. निवृत्तीनंतरही देवधर पत्रकारितेतच सक्रिय राहिले आणि अन्य वृत्तपत्रांकरिता स्तंभलेखन, अग्रलेख लेखन करीत राहिले. प्रकृतीने साथ दिली असती तर पत्रकारितेच्या अध्यापनाबरोबरच नव्या पिढीतील पत्रकारही ज्ञानी, कृतिशील आणि बहुआयामी बनावेत यासाठी ते कार्यरत राहिलेले दिसले असते.
यशवंतराव चव्हाणांच्या एका पत्रकार परिषदेत केवळ त्यांना आलेल्या दूरध्वनीवरून देवधरांनी शोधून काढलेली यशवंतराव चव्हाण संरक्षणमंत्री होणार असल्याची बातमी, त्यांच्या निरीक्षण, विश्लेषण क्षमतेचे कौशल्य दाखवणारी ठरली होती. ती बातमी देणारे ते पहिलेच मराठी पत्रकार ठरले होते. पत्रकार परिषदेदरम्यान आलेला तो दूरध्वनी सुरू असताना देवधरांनी टिपलेले चव्हाणांच्या मुद्रेवरचे भाव, चव्हाणांनी दूरध्वनीवरूनच दिलेली मोघम उत्तरे, त्यांची देहबोली, त्यांच्या बोलण्यात आलेला ‘संरक्षण’ हा एकमेव शब्द यावरूनच देवधरांनी बेधडकपणे यशवंतराव संरक्षणमंत्री होऊ घातले असल्याचा अंदाज वर्तवला होता आणि तो अचूक ठरला होता. अशी अचूक निष्कर्षशक्ती असणाऱ्या देवधरांनी नुकतेच ८१ व्या वर्षांत पदार्पण केले होते.
प्रकृती साथ देत नव्हती, पण प्रकृती अशी एकाएकी दगा देईल असेही वाटत नव्हते, अशा क्षणीच त्यांचे जाणे झाले आहे. ते खचितच धक्का देणारे आहे.
September 26, 2018
ब्रोकरेज फर्म्स' राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय व्यापारात महत्त्वाची भूमिका बजावतात आणि आजकालच्या बिझनेस युगात सर्वांनाच त्यांची गरज असते. 'ब्रोकरेज बिझनेस' हा सचोटीने, कायद्याच्या चौकटीत राहून चोखपणे करता येतो हे जाणणार्या लोकांची संख्या मात्र कमीच असेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील व्यापारातील एक आघाडीचा मालवाहतूक व्यावसायिक कंपनीसमूह म्हणून ओळखल्या जाणार्या, मुंबईच्या आणि मराठी मालक असलेल्या 'एटीसी ग्रुप'चे व्यवस्थापकीय संचालक शंतनू भडकमकर यांची 'इंन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम्स ब्रोकर्स असोसिएशन' ('आयएफसीबीए') या संघटनेच्या अध्यक्षपदी झालेली निवड ही सर्व मराठी माणसांना अभिमानास्पद वाटेल यात शंका नाही.
मुंबई विद्यापीठाची 'बी.एस्सी.' पदवी मिळविल्यानंतर भडकमकरांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेतील 'हार्वर्ड बिझनेस स्कूल'ची (बोस्टन) 'ओनर्स प्रेसिडेन्ट्स मॅनेजमेन्ट', 'रूल नाइन' (कस्टम्स एक्झॅमिशन क्वॉलिफाइड), 'फेडरेशन ऑफ इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन' या परीक्षा उतीर्ण केल्या. वडील श्रीराम मोरश्वर भडकमकर यांनी १९५७ साली मुंबईत स्थापन केलेल्या 'इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डिंग' व्यवसायाची सूत्रे शंतनू यांनी १९८१ साली हाती घेतली.
आजमितीला १० कंपन्यांचा विस्तार असलेला 'एटीसी ग्रुप' देशातील एक प्रमुख 'फुल सर्व्हिस इन्टरनॅशनल फ्रेट फॉरवर्डर' म्हणून ओळखला जातो. 'डोअर टू डोअर इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स'मध्ये 'एटीसी'चे स्पेशलायझेशन आहे. शंतनू भडकमकर यांनी 'इन्टरनॅशनल फेडरेशन ऑफ कस्टम ब्रोकर्स असोसिएशन'चे मॅनेजिंग डायरेक्टर, 'काऊन्सिल ऑफ सप्लाय चेन मॅनेजमेन्ट प्रोफेशनल्स'च्या भारतीय शाखेचे अध्यक्षपद, 'फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन्स इन इंडिया'चे अध्यक्षपद, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीचे उपाध्यक्षपद, 'असोसिएशन ऑफ मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर्स इन इंडिया'चे उपाध्यक्षपद आणि 'चायना इन्टरनॅशनल लॉजिस्टिक्स प्रोफेशनल नेटवर्क'चे उपाध्यक्षपद अशा विविध जबाबदार्या चोखपणे पार पाडल्या आहेत व पाडत आहेत.
'एटीसी ग्रुप'च्या व्यवसायाचा व्याप देशभरातील १५ शहरांतील २० कार्यालयांद्वारे सांभाळला जात असून, युनायटेड स्टेट्समध्ये एक 'ओव्हरसीज ऑफिस' कार्यरत आहे. 'मराठी माणूस व्यवसाय, उद्योगात मागे असतो, त्याला बिझनेस कळत नाही' असे म्हणणे आता इतिहासजमा झाले.
(संदर्भ : महाराष्ट्र टाईम्समधील नोंद हे सदर)
August 9, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti