जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
रजनीकांत यांची स्टाईल, अभिनय याला कुणीच टक्कर देऊ शकत नाही. आतापर्यंत त्यांनी सुमारे १५० हून अधिक चित्रपटात काम केले आहे. रजनीकांत यांनी फिल्मी इंडस्ट्रीतील नुकतीच आपल्या करिअरची यशस्वी ४३ वर्षे पूर्ण केली आहेत.
July 20, 2022
१९७२ पासून चंद्रकांत मेहेंदळे यांनी आपल्या नाट्य कारकिर्दीला सुरुवात केली होती. गॉसिप ग्रुप या विजय बोंद्रे यांच्या संस्थेशी ते जोडले गेले. या संस्थेच्या अनेक नाटकांसाठी त्यांनी काम केले. अभिनय, पटकथा, दिग्दर्शन यावर त्यांनी प्रभुत्व मिळवले. त्यानंतर ते विनय आपटे यांच्यासोबत त्यांच्या गणरंग या संस्थेत कार्यरत होते. विनय आपटे आणि त्यांची मैत्री होती. चंद्रकांत मेहेंदळे यांनी अरूण साधू यांच्या कादंबरीवर आधारित बहिष्कृत नाटक लिहिले. हे नाटक त्यावेळी लोकप्रिय झाले.
April 30, 2022
२२ जून १८९७. पुण्यात प्लेगची साथ सुरु असताना घराघरात घुसून आमच्या आया बहिणींच्या इभ्रतीवर हात टाकणाऱ्या रँड नावाच्या नराधमाचा चाफेकर बंधूनी वध करुन त्याला यमसदनी धाडले होते.
June 22, 2021
कवी प्रदीप यांचे खरे नाव रामचंद्र द्विवेदीं. त्यांचा जन्म ६ फेब्रुवारी १९१५ रोजी बडनगर येथे झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हिमांशु राय आणि देविका रानी यांच्या बाँबे टॉकीजची सूत्रे शशधर मुखर्जींच्या हातात गेली. शशधर मुखर्जी हे प्रतिभा पारखण्यात उस्ताद होते. त्यांनी कवी प्रदीपांना आमंत्रित करून त्यांच्याकडून किस्मत, कंगन, बंधन, झूला आदी चित्रपटांची गीते लिहवून घेतली. ब्रिटिशांच्या चित्रपट समीक्षण मंडळाच्या डोळ्यात धूळ फेकणारे प्रदीप यांचे दूर हटो ये दुनियावाले, हिदुस्तान हमारा है हे किस्मत चित्रपटातले गीत तुफान गाजले.
प्रदीप याच्या रचनांत देशभक्ती आणि देशवासीयांमधे जागृती निर्माण करण्याची तळमळ होती. त्यांच्या स्वदेशावरील प्रेमापोटी त्यांनी असंख्य देशभक्तिपर गीते आणि कविता रचल्या. त्या कविता वाचून अनेकजणांचे रक्त उसळत असे. परकीय भारतात त्यांना आपल्या कवितांसाठी सतत अटकेची भीती वाटे. त्यांना अटक टाळण्यासाठी काही वेळा भूमिगत व्हावे लागले होते. कवी प्रदीप यांनी कबीर आणि गालिब यांचे साहित्य वाचले होते. तसेच शैलेंद्र आणि साहिर लुधियानवी यांच्या काव्याशी ते चांगले परिचित होते. पण प्रदीप यांचा पिंड अस्सल भारतीय होता.
भारत-चीन युद्धाच्या सुमारास २६ जानेवारी १९६३ रोजी लता मंगेशकरांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर गायलेल्या त्यांच्या ऐ मेरे वतन के लोगो या गीताने भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यांत पाणी आणले होते. ऐ मेरे वतन के लोगो हे गाणे जेव्हा कवी प्रदीप यांना सुचले तेव्हा ते माहीमच्या फुटपाथवर होते. तिथे एक सिगारेटचे रिकामे पाकीट उचकलून उलगडले आणि त्याच्या पाठकोऱ्या भागावर हे गाणे लिहिले. कवी प्रदीप यांच्या कवितांची पाकिस्तानात नक्कल होत असे.
‘दे दी हमें आज़ादी बिना खड्ग बिना ढाल’ ये गीत पाकिस्तान्यांना इतके आवडले की पाकिस्तानी चित्रपटात ते, ‘यूं दी हमें आज़ादी कि दुनिया हुई हैरान, ए कायदे आज़म तेरा एहसान है एहसान’ असे रूपांतरित होऊन आले. त्याच प्रकारे, ‘आओ बच्चों तुम्हें दिखाएं झांकी हिन्दोस्तान की’चे पाकिस्तानात ‘ आओ बच्चो सैर कराएं तुमको पाकिस्तान की’ असे झाले. १७०० गाणी लिहिणाऱ्या प्रदीप यांना १९९७ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला होता. कवी प्रदीप यांचे ११ डिसेंबर १९९८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
कवी प्रदीप यांची काही गाजलेली गाणी
अब तेरा सिवा कौन मेरा कृष्ण कन्हैया (किस्मत)
आओ बच्चों तुम्हे दिखाएँ झाँखी हिंदुस्तान की (जागृति, गायकः प्रदीप)
आज आशिया के लोगों का काफिला चला (काफिला)
आज मौसम सलोना सलोना रे (झूला)
आज हिमालय की चोटी से फिर हमने ललकारा है, दूर हटो दुनिया वालो ये हिंदुस्तान हमारा है (चित्रपट : किस्मत)
इन्सान का इन्सान से हो भाई चारा (पैगाम)
ऊपर गगन विशाल (मशाल)
ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख मे भरलो पानी (गीत)
ओ अमीरों के परमेश्वर (पैगाम)
कान्हा बजाये बांसरी और ग्वाले... (नास्तिक)
गगन झन झना रहा (नास्तिक)
चना जोर गरम बाबू (बंधन)
चल चल रे नौजवान (बंधन)
चल मुसाफिर चल (कभी धूप कभी छाँव)
चलो चले माँ (जागृति
देख तेरे संसार की हाल क्या हो गयी भगवान, कितना बदल गया इन्सान (नास्तिक, गायक: प्रदीप)
धीरे धीरे आ रे बादल, धीरे धीरे आ (किस्मत)
पपीहा रे, पपीहा रे, मेरे पियासे (किस्मत)
February 6, 2019
कवी मायदेव म्हटले की, कवितांची आवड असणाऱ्या जु्न्या पिढीतील वाचकांना हटकून आठवणार ती त्यांची 'गाइ घरा आल्या' ही सुंदर कविता. त्यांचा जन्म २६ जुलै १८९४ रोजी झाला. सकाळी चरायला गेलेल्या गाई संध्याकाळी घरी आल्या तरी गाई राखायला गेलेला 'वनमाळी' मात्र काही घरी आलेला नसतो.
कातरवेळ उलटते, रात्रही होते, तरी वनमाळी न आल्यामुळे आईच्या जिवाची जी उलघाल होते, तिचे वर्णन मायदेव यांनी या कवितेत अतिशय साध्या-सोप्या शब्दांत केले आहे. ही कविता हीच मायदेव यांची ओळख होती. १९२९ साली त्यांनी ती लिहिली.
१९१५ ते १९२९ या कालखंडात त्यांच्या हातून ज्या कविता लिहून झाल्या, त्या सर्व कविता 'भावतरंग' या संग्रहात वाचायला मिळतात. 'गाइ घरा आल्या' ही कविता याच संग्रहात आहे.
कवी मायदेव रविकिरण मंडळातील कवींचे म्हणजे, माधवराव पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन, यशवंत, गिरीश, श्री. बा. रानडे आदींचे समकालीन कवी. गंभीर विचारवृत्तीच्या; तसेच बालांसाठीच्या विपुल कविता मायदेव यांनी लिहिल्या. त्या काळी लहान मुलांमध्ये मायदेव यांच्या बालकविता विशेष आवडीच्या असत. कवी वनमाळी या टोपणनावानेही ते साहित्यक्षेत्रात परिचित होते.
'काव्यमकरंद', 'भावतरंग', 'भावनिर्झर', 'सुधा', 'भावविहार' हे त्यांचे काव्यसंग्रह; तर 'बालविहार', 'किलबिल', 'शिशुगीत', 'क्रीडागीत' हे बालगीत संग्रह प्रसिद्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि भा. रा. तांबे यांच्या कवितांचेही संपादन मा.मायदेव यांनी केले होते. मा.मायदेव यांचे ३० मार्च १९६९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मायदेव यांची गाइ घरा आल्या कविता
.............................
गाइ घरा आल्या
.............................
गाइ घरा आल्या । घणघण घंटानाद
कुणीकडे घालू साद । गोविंदा रे? ।। १ ।।
गाइ घरा आल्या । धूळ झाली चहूंकडे
घनश्याम कोणीकडे । माझा गेला? ।। २।।
गाइ घरा आल्या । वासरे हंबरती ।।
कुणीकडे बालमूर्ती । कृष्ण माझा? ।।३।।
गाइ घरा आल्या । ब्रह्मानंद वासरांना
काय करू माझा कान्हा । चुकला का? ।।४।।
गाइ घरा आल्या । घोटाळती पाडसांशी
हाय! नाही हृषीकेशी । माझ्यापाशी ।।५।।
गाइ घरा आल्या । पाडसास हुंगीतात
माझा मात्र यदुनाथ । दुरावला! ।।६।।
गाइ घरा आल्या । आंवरेना मुळी पान्हा
राहणार भुका तान्हा । वासुदेव ।।७।।
गाइ घरा आल्या । दूध वाहे झुरूझुरू
माझ्या जीवा हुरूहूरू । मुकुंदाची ।।८।।
गाइ घरा आल्या । दूधवाट राहियेली
कुणी माझा वनमाळी । गुंतवीला ।।९।।
गाइ घरा आल्या । झाली बाई कातरवेळ
आजुनी का घननीळ । ये ना घरा? ।।१०।।
गाइ घरा आल्या । लावियेली सांजवात
बाळा दामोदरा रात । झाली न का? ।।११।।
गाइ घरा आल्या । पाल चूकचूक करी ।
राख अंबे माझा हरी । असे तेथे ।।१२।।
July 29, 2017
धूमकेतू म्हटलं की, आपल्याला लगेच आठवतो तो ‘हॅले’ चा धूमकेतू. या धूमकेतूचं नाव एडमंड हॅले या प्रसिद्ध शास्त्रज्ञाच्या नावावरून दिलं गेलं. १६८२ साली हॅले यांनी हा धूमकेतू बघितला आणि त्याचा अभ्यास केला.
November 8, 2021
…… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असे जाहिरातीमधून प्रसिद्ध होताच नाट्यगृहे हमखास ‘हाऊस फुल्ल’ होत व त्यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने डेंटीस्ट होते. त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे.
September 14, 2017
मराठी संतकवियित्री परभणी जिल्हातील गंगाखेड येथे जन्म. माता लहानपणीच वारल्यामुळे बापाने तिला पंढरपुरास दामाशेटीच्या घरी ठेवले आणि तेथेच ती लहानाची मोठी झाली. चंद्रभागेच्या वाळवंटात नामदेवास ती सापडली, अशी हि एक आख्यायिका आहे. पूढे नामदेवास आपले सर्वस्व मानून नामयाची दासी जनी या नावाने ती वावरली ती शेवटपर्यत अविवाहित होती.
जनाबाईने सु. साडेतीनशे अभंग लिहिले. तिच्या नावावर हरिश्चदाख्यात, प्रल्हादचरित्र कृष्णजन्म बाळकीडा,थालीपाक द्रौपदीस्वंयवर वगैरे स्फुट काव्यग्रंथही आढळतात. विठ्ठलाची ती अतिशय उत्कटतेने व तन्मयतेने भक्ती करीत असल्याचे तिच्या अभंगात दिसून येते तिची काव्यरचना साधी रसाळ आणि अंतःकरणाचा ठाव घेणारी आहे.
March 12, 2015
दिप्ती नवल यांच्या वडिलांना न्यूयॉर्कमध्ये नोकरी मिळाल्यावर त्या आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेला गेल्या. त्यांचा जन्म ३ फेब्रुवारी १९५७ रोजी अमृतसर येथे झाला. न्यूयॉर्कच्या सिटी युनिव्हर्सिटीतून दिप्ती नवल यांनी शिक्षण घेतले. खरे तर अभिनेत्री होणे हे दीप्ति नवल यांचे लहानपणापासूनचे स्वप्न होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दीप्ति यांनी आपल्या आई-वडिलांकडे ही इच्छा बोलून दाखवली. पण दीप्ति नवल यांच्या वडिलाची इच्छा तिने एक मोठी चित्रकार बनावी, अशी होती. वडिलांच्या इच्छेखातर त्यांनी पेन्टिंग आणि अभिनय या दोन्ही कला जोपासण्याचा निर्णय घेतला. कॉलेजचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दीप्ति ने न्यूयॉर्कमध्येच एका रेडिओ स्टेशनवर काम सुरु केले. यावर हिंदी कार्यक्रमही यायचे. यानंतर तिने अॅडक्टिंग आणि फिल्ममेकिंगचा कोर्स केला. यापश्चात दीप्तिला भारतात येण्याची संधी मिळाली आणि याच काळात दीप्तिने अभिनयक्षेत्रात पाऊल ठेवले. श्याम बेनेगल यांच्या ‘जुनून’ या चित्रपटापासून दीप्ति नवल यांनी आपल्या करीयरची सुरवात केली. दीप्ति नवल ‘जुनून’मध्ये ती केवळ दोन तीन दृश्यांत दिसल्या. त्यामुळे त्याची फार दखल घेतली गेली नाही. पण १९७९ मध्ये ‘एक बार फिर’मधील दीप्ति नवल यांना या चित्रपटासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. दीप्ति नवल यांनी आपल्या करिअरमध्ये जवळपास ६० चित्रपटांमध्ये अभिनय केला. ‘चश्मे बहादूर’,‘अनकही’,‘मैं जिंदा हू’,‘कमल’ असे तिचे चित्रपट प्रचंड गाजले. केवळ अभिनयच नाही तर लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन या क्षेत्रातही त्यांनी काम केले. ‘थोडा सा आसमान’ या टीव्ही मालिकेची पटकथा दीप्ति नवल यांची होती. शिवाय या मालिकेची दिग्दर्शकही त्यांनी केले होते.
चित्रकार या नात्याने अनेक मोठ्या चित्रप्रदर्शनात त्यांची पेन्टिंग झळकल्या. कवयित्री म्हणून १९८३ मध्ये त्यांचा ‘लम्हा लम्हा’ हा कविता संग्रह प्रकाशित झाला. २००४ मध्ये ‘ब्लॅक विंड अॅेण्ड अदर पोयम्स’ हा तिचा दुसरा कवितासंग्रह प्रकाशित झाला. याशिवाय २०११ मध्ये एक लघूकथा संग्रहही आला. त्यांच्या प्रकाशित पुस्तकां मध्ये 'लम्हा-लम्हा' हे पुस्तक प्रसिध्द आहे. १९८४ मध्ये प्रकाश झा यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. तेव्हा त्यांची भेट दीप्ति नवलशी झाली. यानंतर प्रकाश झा यांनी दीप्तिला घेऊन ‘दामुल’ हा चित्रपट बनवला. हा चित्रपट सुपरहिट ठरला. येथून दोघांमध्ये प्रेम बहरले. यानंतर दीप्ति व प्रकाश झा विवाहबंधनात अडकले. हे लग्न १७ वर्षे चालले. या दोघांना दोन मुलेही आहेत. मुलगा प्रियरंजन झा आणि मुलगी दिशा झा. प्रकाश व दीप्ति यांनी २००२ मध्ये घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर दीप्ति प्रख्यात शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचा मुलगा विनोद पंडित यांच्या जवळ आली. दोघांनी लग्नाचा निर्णयही घेतला होता. पण त्याचपूर्वी विनोद यांचे निधन झाले. सध्या दीप्ति नवल मानसिकदृष्ट्या दुर्बल लोकांच्या आजाराबद्दल जनजागृतीचे काम करतात. 'जलियावाला बाग' सिनेमामधून सुरू झालेल्या दीप्ती नवल यांच्या फिल्मी करिअरचा प्रवास आजही सुरू आहे. 'यारियां' सिनेमात दीप्ती यांनी अभिनय केला आहे. जानेवारी २०१४ मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात दीप्ती यांनी गर्ल्स होस्टेलच्या वॉर्डनची भूमिका साकारली होती.या सिनेमापूर्वी त्या २०१३ मध्ये 'बीए पास'आणि'औरंगजेब'सिनेमातसुध्दा दिसल्या होत्या. 'महाभारत 3D'या अॅनिमेटेड सिनेमा मधील 'कुंती 'पात्राला त्यांचा आवाज देण्यात आला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 3, 2019
दिपाली सय्यद म्हणजेच दिपाली भोसले लग्ना नंतर ती दिपाली सय्यद झाली. तिचा जन्म १ एप्रिल १९७८ रोजी पाटणा, बिहार येथे झाला. सुरवातीपासुनच एक अभिनेत्री होण्याचे तिचे स्वप्न होते. दिपाली सय्यदचे बालपण मुंबईत गेले. दिपालीने नालंदा विद्यापीठातुन फाईन आर्ट्सची पदवी संपादन केलेली आहे. अभिनय क्षेत्रातील तिचा प्रवास मालिकांमधुन सुरु झाला. बंदीनी, समांतर या तिच्या अभिनय कारकिर्दीतील सुरवातीच्या मालिका. त्यानंतर अनेक चित्रपट, मालिका, शोज, नाटक, टिव्ही शोज, जाहिराती यातुन ती सातत्याने झळकत राहिली.
दिपाली जाऊ तिथे खाऊ, चश्मेबहाद्दर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या चित्रपटांमधील तिच्या भुमिकांसाठी विशेष करुन ओळखली जाते. मात्र तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता जत्रा चित्रपटातील ये गो ये मैना.. या गाण्यातून मिळाली. करायला गेलो एक, लाडी गोडी, होऊन जाऊ दे, मला एक चानस हवा, ढोलकीच्या तालावर, वेलकम टु जंगल, हे मिलन सौभाग्याचे, माझ्या नवर्याची बायको, उचला रे उचला, काय करु न कसं करु, दुर्गा म्हंत्यात मला, काळशेकर आहेत का ?, मास्तर एके मास्तर, मुंबईचा डबेवाला, सासु नंबरी जावई दस नंबरी हे तिचे तिने अभिनय केलेले इतर चित्रपट. तर दुर्वा, अफलातुन या हिंदी मालिकांमधुनही ती चमकली आहे. याशिवाय तिने आतापर्यंत पाच सहा भोजपुरी चित्रपटातून भूमिका साकारल्या आहेत.
३१ मे २००८ रोजी दिपाली दिग्दर्शक बॉबी खान यांचेबरोबर विवाहबध्द झाली असुन लग्नानंतरचे तिचे नांव सोफीया जहांगीर सय्यद असे आहे. दिपालीने अहमदनगर मतदार संघातुन सन २०१४ मध्ये निवडणुक लढवलेली होती. दिपाली सय्यदने नगर जिल्ह्यातील “गुंडेगाव ” या ठिकाणी ‘दिपाली सय्यद-भोसले फाऊंडेशन’च्या माध्यमातून वृद्ध आणि अनाथ मुलांसाठी आश्रम उभारले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
April 1, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti