(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • केशव निवृत्ती कासार

    केशव निवृत्ती कासार

    ठाणे शहरातील ख्यातनाम चित्रकारांपैकी एक नाव म्हणजे केशव निवृत्ती कासार. चित्रकलेतील आपल्या वेगळ्या शैलीनं समस्त कला वर्तुळात आपला वेगळा ठसा केशव कासार यांनी उमटवला. पॉटरी, सिरॅमिक, लॅंडस्केप, पेंटींग, टेराकोटा, शिल्पकला ही त्यांची वैशिष्ट्ये होत.<

      May 16, 2014


  • कवी मधुकर जोशी

    संगीतकार दशरथ पुजारी यांनी मधुकर जोशी यांची बरीचशी गीतं एच.एम.व्ही.त रेकॉर्ड केली होती. ती आठवण सांगताना संगीतकार दशरथ पुजारी आपल्या पुस्तकात म्हणतात त्यावेळी काही लोकांचा थोडासा गैरसमज झाला होता की, इतर इतके चांगले कवी असताना तुम्ही मधुकर जोशींचीच गाणी का घेता? त्यांना असं वाटणं स्वाभाविक होतं. त्यावेळचे एक नामवंत कवी मला म्हणाले, “पुजारी, तुमचे मधुकर जोशी हे ठरलेले कवी आहेत. तुम्ही दुसर्या कवीला संधी देत नाहीत. हा काय प्रकार आहे? मी एवढंच सागितलं, “प्रकार दुसरा-तिसरा काही नसून मला त्यांची गीतं आवडतात. त्यांचे शब्द साधे, सुटसुटीत, अर्थाला धरून- दादरा, केरवा, रूपकच्या मीटरमध्ये छान बसवलेले असतात. एका मात्रेचंही कमी-जास्त होत नाही. शिवाय काव्य पाहिल्याबरोबर जेव्हा संगितकाराला चाल चटकन सुचते ते काव्य फार चांगले, असे मी समजतो.” त्यांचं एक काव्य त्यावेळी फार लोकप्रिय होतं.

      April 21, 2022


  • सिने-अभिनेत्री किरण खेर

    १९८८ सालच्या पेस्तनजी ह्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या किरण खेर यांनी देवदास, हम तुम, वीर-झारा, फना, रंग दे बसंती, कभी अलविदा ना कहना, ओम शांती ओम इत्यादी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. त्यांचा जन्म १४ जून १९५५ रोजी झाला. १९८५ साली किरणने बॉलिवूड अभिनेता अनुपम खेर सोबत विवाह केला. २००९ मध्ये किरण खेरने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्या चंदीगड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आल्या. त्यांनी विद्यमान काँग्रेसचे खासदार पवनकुमार बन्सल व आम आदमी पार्टीची उमेदवार गुल पनाग ह्यांचा पराभव केला.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      June 23, 2018


  • विजया मेहता

    विजया मेहता यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ रोजी झाला.
    विजया मेहता या पूर्वाश्रमीच्या विजया जयवंत होत. जवळच्याच नात्यांतील नलिनी जयवंत, शोभना समर्थ व त्यांच्या कन्यका नूतन, तनुजा यांच्यामुळे मोहमयी हिंदी चित्रसृष्टीशी जवळचा संबंध येऊन देखील त्यांची भावनिक जवळीक मात्र सतत मराठी रंगसृष्टीशी राहिली. मा.दुर्गा खोटे यांचा मुलगा हरीन खोटे यांच्याशी विवाह झाल्यावर देखील हिंदी चित्रपटांच्या मायाजालामध्ये न गुरफटण्याचा निर्णय त्यांनी कायम ठेवला हे पहाता ‘आपल्या मराठी रंगभूमीचे नशीब बलवत्तर‘ असेच म्हणावयास हवे. साठ सत्तरच्या दशकांत तेंडुलकर, खानोलकर, एलकुंचवार व इतर समकालीन संवेदनक्षम नाटककारांची, नाट्यक्षेत्रातील तत्कालीन प्रचलित रुढींना सुरुंग लावून आणि प्रमाण मानल्या गेलेल्या प्रस्थापित संकेतांची चौकट नाकारुन वा प्रसंगी धुडकावून देऊन प्रयोगशीलतेला प्राधान्य देणारी, नवनवीन नाटकेएकांकिका ‘रंगायन‘ वा अन्य माध्यमांतून मंचावर आणण्यात बाईंचा आणि त्यांच्या जोडीने अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, माधव वाटवे, कमलाकर सारंग, श्रीराम लागू या त्यांच्या सहकाऱ्यांचा अत्यंत मोलाचा वाटा होता. ‘रंगायन‘ संस्था व त्या अनुषंगाने एक चोखंदळ प्रेक्षकवर्ग सुध्दा उभारुन प्रायोगिक एकांकिकानाटकांची चळवळ त्या काळात त्यांनी दहाबारा वर्षे जोमाने चालवली. सतत काहीतरी नवीन करण्याचा देण्याचा ध्यास घेतलेल्या मा.विजया मेहता प्रायोगिक समांतर रंगभूमीने त्या काळात अक्षरशः झपाटल्या गेल्या. मात्र पुढे दुर्दैवाने जेव्हा ‘रंगायन‘ अंतर्गत बेबनाव मतभेदांमुळे फुटली तेव्हा प्रायोगिकतेच्या चौकटीतच कायम रहाण्याच्या विचारांचे गाठोडे ओझे ऊराशी न बाळगता व्यावसायिक रंगभूमीवर सुध्दा तितक्याच ताकदीने व उत्साहाने त्या परत कार्यरत झाल्या व स्थिरावल्या. वैयक्तिक जीवनात सुध्दा, लग्नानंतर अवघ्या पाच वर्षांतच पदरात दोन लहान मुलं असताना पतिनिधनाचा प्रचंड आघात सोसून व त्यामुळे आयुष्याला मिळालेली विलक्षण कलाटणी पचवून, बाई न खचता परत कंबर कसून उभ्या राहिल्या. पुढे कालौघात फरोख मेहता यांच्याशी पुनर्विवाह करुन त्या पुनश्च स्थिरस्थावर झाल्या. ‘श्रीमंत‘, ‘मादी‘, ‘एक शून्य बाजीराव‘, ‘अजब न्याय वर्तुळाचा‘, ‘पुरुष‘, ‘बॅरिस्टर‘, ‘महासागर‘, ‘हमीदाबाईची कोठी‘, ‘वाडा चिरेबंदी‘, ‘हयवदन‘, ‘सावित्री‘ अशी अनेक लक्षणीय नाटकेएकांकिका तसेच ‘पेस्तनजी‘, ‘रावसाहेब‘, ‘स्मृतिचित्रे‘ अशा अनेक लक्षवेधी चित्रकृती बाईंच्या रेखीव बांधीव दिग्दर्शनाने फुलल्या फुलवल्या. केवळ अर्थकारणाच्या म्हणजेच ‘गल्ल्याच्या गणिता‘च्या दृष्टीने पाहिल्यास यातील बरीचशी चांगलीच तरली तरारली फोफावली असली तरी क्वचित काही बुडाली फसली देखील. मात्र यातील प्रत्येक कृतीवर आपला असा एक वैशिष्ठ्यपूर्ण कलात्म ठसा उमटवून दिग्दर्शनाच्या क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व बाईंनी निश्चितच प्रस्थापित केले. बाईंनी स्वतःची अशी एक स्वतंत्र पठडी वा घराणं निर्माण केलं. मराठी नाट्यक्षेत्रातील आजचे अनेक आघाडीचे व प्रथितयश कलाकार त्या काळात बाईंच्या हाताखाली हळूहळू जडतघडत गेले. विक्रम गोखले, उषा नाडकर्णी, नाना पाटेकर, रिमा लागू, भक्ती बर्वे, प्रदीप वेलणकर, सुकन्या कुलकर्णी, उदय म्हैसकर, नीना कुलकर्णी अशा अनेक अभिनय निपुण कलाकारांची एक अख्खी नवीकोरी फळी त्यांच्या कुशल दिग्दर्शकीय हातातून तयार झाली. ‘संध्याछाया‘ मधील परदेशस्थ पुत्राच्या विरहाने झुरणारी प्रेमळ कुटुंबवत्सल नानी असो वा ‘बॅरिस्टर‘ मधील केशवपन केलेली आलवण नेसलेली भावनेच्या कोंड माऱ्याने घुसमटणारी मावशी असो किंवा ‘हमीदाबाईची कोठी‘ मधील कोठी संस्कृतीतील गायकी परंपरेचा ऱ्हास असहाय्यपणे पहाणारी हमीदाबाई असो अथवा ‘वाडा चिरेबंदी‘ मधील पति निधनानंतर कोसळणारी नाती व वाड्याचं ढासळणारं गतवैभव पचवणारी विधवा आई असो बाईंनी मात्र समोर हाती आलेल्या भूमिकेला केवळ न्याय आणि संपूर्ण न्यायच दिला. गोळीबंद संवादफेक, हवा तो परिणाम नेमका साधण्यासाठी संवादांतील लयीवर आणि प्रसंगी शब्दविरामांवर देखील दिलेला भर, चेहऱ्यावर पसरलेले अस्सल हावभाव आणि अचूक देहबोली यातून व्यक्तिरेखा नेमकी पकडून प्रत्ययकारक पणे जिवंत उभी करण्याकडे त्यांचा कटाक्ष दिसून येतो. भारत सरकारने १९८७ मध्ये मा.विजया मेहता यांना ‘पद्मश्री‘ प्रदान करुन त्यांच्या रंगकार्याचा यथोचित गौरव केला. याचबरोबर त्यांना ‘संगीत नाटक अकादमी पुरस्कार‘, ‘कालिदास सन्मान‘, ‘तन्वीर सन्मान‘, ‘विष्णुदास भावे सुर्वणपदक‘, महाराष्ट्र शासनाचा ‘नटवर्य प्रभाकर पणशीकर पुरस्कार‘, ‘नाट्यदर्पण पुरस्कार‘, चतुरंग प्रतिष्ठानाचा ‘जीवनगौरव पुरस्कार‘, ‘रावसाहेब‘मधील भूमिकेसाठी राष्ट्रीय फिल्म पारितोषिक, एसएनडीटी विद्यापीठाची डॉक्टररेट, इचलकरंजी मराठी नाट्य संमेलनाध्यक्षपद असे अनेक सन्मान किताब मानमरातब मिळाले आहेत ‘झिम्मा : आठवणींचा गोफ‘ हे मा.विजया मेहता यांचे आत्मचरित्रपर पुस्तक त्यात त्यांच्या या प्रतिभेचीप्रगल्भतेची चुणूक पुन्हा एकदा दिसून येते. १९५१ सालापासून ते आजतागायत नाटकासाठी रंगभूमीसाठी आयुष्य वेचलेल्या बाईंच्या आणि रंगभूमीच्याही अनेक स्थित्यंतरांतून घडलेल्या रंगयात्रेचा हा सफरनामा या पुस्तकात आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 3, 2017


  • नाट्यअभिनेते डॉ. केशवचंद्र मोरेश्वर ऊर्फ दाजी भाटवडेकर

    दाजी भाटवडेकर मूळचे मुंबईचे. त्यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात दाजींचे आजोबा मुंबईतील एक प्रख्यात डॉक्टर होते. त्याकाळी त्यांना मुंबईचे महापौरपदही मिळाले होते. त्यांचे घराणे संपन्नत असले तरी घरांत धार्मिक आणि संस्कृती जपणारे वातावरण होते.दर एकादशीला घरात कीर्तन आणि भजनाचा कार्यक्रम होत असे. दर पंधरवड्याला होणार्या असल्या कार्यक्रमातील नाट्याचा आणि कथानकांचा दाजींच्या मनावर खोल परिणाम झाला. ते कीर्तनकार बुबांच्या आवाजाची आणि बोलण्याच्या ढंगाची हुबेहूब नक्कल करीत असत. भरदार आवाजाची देणगी मिळालेल्या दाजींनी संगीत नाटकांत भूमिका करायला सुरुवात केली.

    दाजींच्या दुर्दैवाने पुढे मराठी संगीत रंगभूमीला उतरती कळा लागली. संभाषणात नाटकी अभिनिवेशाने बोलण्याच्या जागी वास्तव शैलीने बोलायची पद्धत पडू लागली. मग दाजींनी आपला मोहरा संगीत रंगभूमीकडे वळवला. दाजी स्वतः उच्चशिक्षित आणि संस्कृत नाटकांचे गाढे अभ्यासक असल्याने त्यांना संस्कृत रंगभूमीची चळवळ सुरू करायला फारशी अडचण पडली नाही.. मुंबईच्या ब्राह्मण सभेत त्यांनी १९५० ते १९८० या काळात दर वर्षाला एक नवे संस्कृत नाटक रंगभूमीवर आणले. कालिदास महोत्सवाच्या काळात दाजींनी ’अभिज्ञान शाकुंतल’ या संस्कृत नाटकाचा प्रयोग भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अन्य सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीत सादर करून वाहवा मिळवली. संस्कृत नाटकांनाही पुढे प्रेक्षक मिळेनासे झाले. मात्र, ही नाटके सादर करताना काय काय अनुभव आणि अडचणी आल्या यावर दाजींनी लिहिलेला प्रबंध मुंबई विद्यापीठाने स्वीकारून त्यांनी डॉक्टरेट दिली.

    दाजींच्या संस्कृत रंगभूमीवरील योगदानाबद्दल भारतरत्न महामहोपाध्याय डॉ. पां. वा. काणे यांनी त्यांच्या एका ग्रंथातील परिशिष्टात खास उल्लेख केला आहे. मराठी रंगभूमीबरोबरच इंग्रजी, संस्कृत आणि हिंदी रंगभूमीवरही त्यांनी काम केले. दाजी भाटवडेकर यांचे २६ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    दाजी भाटवडेकर यांचा अभिनय असलेली नाटके आणि त्यातील त्यांची भूमिका
    एकच प्याला (सुधाकर), कृष्ण द्वीप (हिंदी), दुर्गा (जिवाजीराव), मानापमान (लक्ष्मीधर, विलासधर), मृच्छकटिक (शकार), बॉर्न येस्टरडे (इंग्रजी, दिग्दर्शक - हर्बर्ट मार्शल), भाऊबंदकी (तुळोजी, राघोबा, सखाराम बापू), भावबंधन (घनश्याम, धनेश्वर, मोरू), म्युनिसिपालिटी (पांडोबा), लग्नाची बेडी ( कांचन, गोकर्ण, तिमिर), शारदा ( कांचनशेट, भद्रेश्वर), संशयकल्लोळ (फाल्गुनराव, वैशाखशेठ), सौभद्र (बलराम)
    स्वयंवर (रुक्मी).

      December 26, 2017


  • विख्यात समालोचक विल्यम मॉरिस तथा बिल लॉरी

    बिल लॉरी हे भक्कम आणि अतिशय चिवट फलंदाज होते. रॉबर्ट ‘बॉबी’ सिम्पसन आणि बिल लॉरी या सलामीच्या जोडीने एक काळ गाजवला. लॉरी नंतर कर्णधार झाले.

      February 11, 2022


  • हरिवंश राय बच्चन

    हरिवंश राय बच्चन यांनी १९३८ मध्ये अलाहाबाद विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम. ए केले आणि १९५२ पर्यंत अलाहाबाद विद्यापीठात नोकरी केली. त्यांचा जन्म २७ नोव्हेंबर १९०७ रोजी झाला. १९५२ मध्ये इंग्लंड मध्ये कैम्ब्रिज विश्वविद्यालय येथे अभ्यास करण्यास गेले. परत आल्यावर भारत सरकारने नियुक्त केले. १९२६ मध्ये हरिवंश राय यांनी श्यामा यांचेशी लग्न केले.त्यांच्या निधना नंतर १९४१ मध्ये, बच्चन यांनी सूरी यांचेशी विवाह केला. हरिवंश राय बच्चन काही काळ मानद राज्यसभा चे सदस्य होते. हरिवंश राय बच्चन यांना १९७६ मध्ये पद्मभूषण पुरस्कार मिळाला होता. १९६९ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. हरिवंश राय बच्चन यांच्या सुरवातीच्या काळातील 'उमर ख़ैय्याम' ही कविता खूप प्रसिद्ध झाली. प्रसिद्ध 'मधुशाला' ही 'उमर ख़ैय्याम' ने प्रेरित होऊन लिहलेली आहे. 'मधुशाला' मुळे हरिवंश राय बच्चन यांना खूप प्रसिद्धी मिळाली. मा.हरिवंश राय बच्चन यांचे १८ जानेवारी २००३ मध्ये निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    हरिवंश राय बच्चन यांचे काही इतर काव्य संग्रह.
    मधुबाला, मधुकलश, निशा निमंत्रण, एकांत संगीत, सतरंगिनी, विकल विश्व, खादी के फूल, सूत की माला, मिलन, दो चट्टानें व आरती और अंगारे
    'मधुशाला' च्या काही काव्य पंक्ती.
    मदिरा पीने की अभिलाषा ही बन जाए जब हाला,
    अधरों की आतुरता में ही जब आभासित हो प्याला,
    बने ध्यान ही करते-करते जब साकी साकार, सखे,
    रहे न हाला, प्याला, साकी, तुझे मिलेगी मधुशाला।। ।

    सुन, कलकल़ , छलछल़ मधुघट से गिरती प्यालों में हाला,
    सुन, रूनझुन रूनझुन चल वितरण करती मधु साकीबाला,
    बस आ पहुंचे, दुर नहीं कुछ, चार कदम अब चलना है,
    चहक रहे, सुन, पीनेवाले, महक रही, ले, मधुशाला।। ।

    जलतरंग बजता, जब चुंबन करता प्याले को प्याला,
    वीणा झंकृत होती, चलती जब रूनझुन साकीबाला,
    डाँट डपट मधुविक्रेता की ध्वनित पखावज करती है,
    मधुरव से मधु की मादकता और बढ़ाती मधुशाला।।।

    हरिवंश राय बच्चन

      January 19, 2017


  • अभिनेते जीवन

    जीवन यांना १९३५ साली आलेल्या ‘रोमांटिक इंडिया’ या चित्रपटातून एंट्री मिळाली. त्यांनी ‘सुहाग’, ‘नसीब’, ‘चाचा भतीजा’, अफसाना’, ‘स्टेशन मास्टर’, ‘अमर अकबर एंथनी, नागिन, शबनम, हीर-रांझा, जॉनी मेरा नाम, ‘धरम-वीर’ अशा चित्रपटात कामे केली. जीवन यांनी ६० ते ८० च्या दशकात अनेक चित्रपटात चरित्र अभिनेत्याची कामे केली. जरी त्यांनी व्हिलन ची कामे केली, त्यात त्यांनी विनोदी भाव आण्याचे प्रयत्न केले.

      June 10, 2022


  • नाटककार आणि पटकथाकार मधुसूदन कालेलकर

    नाटककार, कथाकार आणि पटकथाकार म्हणून सर्वांना परिचित असलेलं नाव म्हणजे मधुसूदन कालेलकर. त्यांची पटकथा असलेले एकाहून एक दर्जेदार चित्रपट यशस्वी होऊ लागले आणि सिद्धहस्त पटकथा लेखक म्हणून त्यांचा लौकिक झाला. एका मागोमाग एक असे त्यांचे ७५ पेक्षा जास्त चित्रपट प्रदर्शित झाले. चित्रपटाबरोबर प्रेक्षकांची आवड ओळखून त्यांनी विपूल नाट्यलेखन केले.

      March 23, 2019


  • प्रख्यात दूरदर्शन निर्मात्या डॉ. किरण चित्रे

    डॉ.किरण चित्रे या माहेरच्या किरण तासकर. डॉ.किरण यांचा जन्म अहमदनगरचा. बालपण शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर येथे व महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालय मुंबईत झाले. डॉ.किरण चित्रे यांना प्रसारण क्षेत्रांत खूप जण मानतात. किरण चित्रे या निर्मिती सहाय्यक ते सहाय्यक संचालक एवढ्या पदापर्यंत विविध स्तरांवर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर गेली ३३ वर्ष कार्यरत होत्या.

      June 26, 2021