(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पखवाज वादक गोविंद भिलारे

    तालयोगी पं. सुरेश तळवलकर यांच्याकडे गुरुशिष्य परंपरेमध्ये त्यांनी शिक्षण घेतले होते. भिलारे यांनी भारतभरात वेगवेगळ्या सुप्रसिद्ध संगीत महोत्सवांमध्ये पखवाज सोलो वादन केले होते, तसेच त्यांनी पंडित जसराज, राहुल शर्मा, उल्हास पं. कशाळकर अशा दिग्गजांना साथ दिली होती.

      June 8, 2022


  • आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या गायिका डॉ. वीणा सहस्रबुद्धे

    उत्तम मैफिल कलाकार तसेच अध्यापन, वाग्गेयकार म्हणून डॉ. वीणा सहस्रबुद्धे लोकप्रिय होत्या.

      December 14, 2016


  • प्रसिद्ध अभिनेत्री बेबी नंदा

    भावुक डोळे, साधारण सौंदर्य व ओठांखाली असलेला तीळ, ठेंगणी मुर्ती असं व्यक्तीमत्व असलेल्या व आपल्या उत्साहाने भारलेल्या बेबी नंदा यांनी अनेक दशकं चित्रपट सृष्टी गाजवली. त्यांचा जन्म ८ जानेवारी १९४१ रोजी कोल्हापूर येथे झाला. बेबी नंदा या मराठी चित्रपट सृष्टीतले एकेकाळचे आघाडीचे दिग्दर्शक निर्माते असलेल्या मास्टर विनायक यांच्या कन्या. मा.बेबी नंदा यांचे मूळचे नाव रेणुका विनायक कर्नाटकी. मास्टर विनायक यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्यावर घराची जबाबदारी आली. त्यासाठी त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून काम सुरू केले. १९५० सालाच्या आसपास आलेल्या ‘जग्गु’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले. बालपण संपल्यानंतर त्यांनी बहिणीच्या वगैरे भूमिका केल्या. त्यांचा या पर्वातला त्यांचा पहिला चित्रपट होता ‘तुफान और दिया’. यात बहिण भावाच्या नात्याची एक विलक्षण कथा व्ही शांताराम यांनी मांडली होती. यातल्या बहिणीच्या भूमिकेने सर्वांचेच लक्ष बेबी नंदा यांच्याकडे गेले. त्या पाठोपाठ १९५७ साली आलेल्या ‘भाभी’ या चित्रपटामधली त्यांची भूमिकाही विशेष गाजली. या भूमिकेसाठी त्यांना पहिल्यांदाच सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते. ‘काला बाजार’ या देवआनंद यांच्या चित्रपटातली त्यांची भूमिकाही अशीच गाजली होती. त्या पाठोपाठ आलेल्या ‘धूल का फुल’ या चित्रपटातही त्यांनी एक लहान भूमिका केली होती. नायिका म्हणून बेबी नंदा यांचा पहिला चित्रपट होता तो एल व्ही प्रसाद यांचा ‘छोटी बहन’. हा चित्रपट तुफान गाजला. या चित्रपटाने त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणून लगेच प्रस्थापित केले. त्याच वर्षी ‘हम दोनो’ या चित्रपटात त्यांनी देव आनंद यांच्या पत्नीची भूमिका केली. ‘अल्ला तेरो नाम..’ या गाण्याच्या वेळचा तिचा अभिनय आजही अनेकांना आठवत असेल. १९६० साली आलेल्या ‘आचल’ या चित्रपटासाठी बेबी नंदा यांना पहिल्यांदाच फिल्मफेअरचा सहाय्यक अभिनेत्रीसाठीचे नामांकन मिळाले होते. बेबी नंदा यांनी अनेक अभिनेत्यांबरोबर काम केले असले तरी शशी कपूर बरोबरची त्यांची जोडी विशेष गाजली. ‘चार दिवारी’ व ‘मेंहदी लगी मेरे हाथ’ या त्यांच्या चित्रपटांना बॉक्स ऑफीसवर चांगलेच यश मिळाले. त्य़ांच्या काही चित्रपटांना प्रेक्षकांनी स्विकारलेले नसले तरी १९६५ साली आलेल्या ‘जब जब फुल खिले’ या चित्रपटाने या जोडीला मोठं यश मिळवून दिलं. बेबी नंदा यांची काश्मिरी वेषातली छबी अनेक रसिकांच्या मनात घर करुन गेली. या सिनेमातली सगळी गाणी गाजली असली तरी ‘ये समा..’ या गाण्यातला त्य़ांचा अभिनय विशेष गाजला. याच वर्षी आलेल्या ‘गुमनाम’ या चित्रपटातला बेबी नंदा यांचा अभिनयही विशेष गाजला. ‘इत्तेफाक’ या कोणतेही गाणे नसलेल्या चित्रपटातली राजेश खन्ना बरोबरची त्यांची भूमिकाही चांगलीच गाजली. मनोज कुमार यांचा ‘शोर’ या चित्रपटात त्यांनी भूमिका केली. त्यानंतर त्यांनी नायिका म्हणून ‘छलिया’, ‘नया नशा’ अशा काही चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. या चित्रपटांना योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळे त्यांनी नायिका म्हणून काम करणे थांबवले. ‘आहिस्ता आहिस्ता’ या चित्रपटात पद्ममिनी कोल्हापुरे च्या आईच्या भूमिकेत त्यांनी चरित्रभूमिकांद्वारे पुनरागमन केले. ‘मजदूर’ व ‘प्रेमरोग’ या चित्रपटातल्या भूमिकांनंतर त्यांनी चित्रपट संन्यास घेतला. १९९२ साली दिग्दर्शक मनमोहन देसाई यांच्याशी नंदा यांचा साखरपुडा झाला. मात्र, त्यानंतर मनमोहन देसाई यांचे अपघाती निधन झाले. नंदा आयुष्यभर अविवाहितच राहिल्या. नंदा यांचे निधन २५ मार्च २०१४ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 8, 2017


  • चित्रकार आणि अभिनेते चंद्रकांत मांडरे

    चंद्रकांत मांडरे यांचे मूळ नाव गोपाळ मांडरे. त्यांचा जन्म १३ ऑगस्ट १९१३ रोजी झाला. वडिलांचं इंग्लिश टोप्या व अत्तर विकण्याचं दुकान होतं. या व्यवसायाव्यतिरिक्त चंद्रकांत यांचे वडील नाटक-चित्रपटांचे शौकीन होते. बाबूराव पेंटर यांच्या "गजगौरी' मूकपटात त्यांनी धृतराष्ट्राची भूमिका साकारली होती. १९३१ मध्ये सांगलीत "बलवंत चित्रपट कंपनी' सुरू झाली होती. तिथे पडदे रंगविण्याचं काम चंद्रकांत यांना मिळालं.

    पगार होता दरमहा पंधरा रुपये. परंतु, ही कंपनी बंद पडल्यामुळे चंद्रकांत यांची नोकरी गेली. परंतु, इथं एक विलक्षण गोष्ट घडली होती. ज्योतिषाचा अभ्यास असणाऱ्या दीनानाथांनी चंद्रकांत यांचा हात बघून त्याचं भविष्य उज्ज्वल असल्याचं भाकीत केलं. ते पुढं काही वर्षांनी खरं ठरलं. बाबूराव पेंटरांनी चंद्रकांत यांना पहिले काम दिले. शेतकऱ्याचं आखूड धोतर, बंडी असा वेष त्यांच्या अंगावर चढविण्यात आला आणि त्याची सवय व्हावी म्हणून तब्बल महिनाभर तो तसाच ठेवण्यात आला. याचाच परिणाम म्हणजे "सावकारी पाश' या चित्रपटामधील चंद्रकांत यांचा अभिनय.

    गोपाळाचं "चंद्रकांत' असं नामकरण करण्यात विख्यात दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांचा पुढाकार होता. "राजा गोपीचंद' या हिंदी चित्रपटासाठी भालजींनी चंद्रकांत यांची निवड केली होती. या चित्रपटासाठी गोपाळऐवजी "चंद्रकांत' हे नाव लावण्यात आलं. "सावकारी पाश' या मूकपटात शेतकऱ्याच्या मुलाचं जे काम शांतारामबापूंनी केलं, ते बोलपटात चंद्रकांत यांना करायला मिळालं. "सावकारी पाश' हा पहिला वास्तववादी चित्रपट आणि त्यात काम करण्याची संधी चंद्रकांतना लाभली.

    "थोरांताची कमळा' या चित्रपटासाठी घोडेस्वारी शिकले. व्ही. शांताराम यांनी "शेजारी' चित्रपटावेळी बैलगाडी चालवण्याची तसेच बैलांच्या मधोमध चालून त्यांना शेतावर नेण्याची प्रॅक्टियस कित्येक दिवस चंद्रकांतना करायला लावली. "छत्रपती शिवाजी' चित्रपटाच्या वेळी भालजींनी चंद्रकांतना विविध शिवचरित्रं वाचायला दिली. पन्हाळ्यावरून कडेकपारीवरून घोडदौड करायला लावली.

    व्ही. शांताराम यांच्या "शेजारी' या चित्रपटापासून चंद्रकांत "प्रभात'मध्ये पूर्ण वेळ नेकरी करू लागले आणि त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी-मराठी निर्माता, दिग्दर्शकांकडे पौराणिक, ऐतिहासिक, कौटुंबिक, ग्रामीण, सामाजिक अशा शंभराहून अधिक चित्रपटांतून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. "युगे युगे मी वाट पाहिली', "पवनाकाठचा धोंडी', "संथ वाहते कृष्णामाई' या चित्रपटांसाठी त्यांना पुरस्कार लाभले. "खंडोबाची आण' या चित्रपटासाठी त्यांना सातव्या राज्य चित्रपट महोत्सवात उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार लाभला.

    "रामराज्य' चित्रपटातील चंद्रकांतनी साकारलेला राम तर निव्वळ अविस्मरणीय ठरला. "स्वयंवर झाले सीतेचे'मध्ये तर ते रावण झाले होते. रामापासून रावणापर्यंतचा "ग्राफ' टिपणारा हा एकमेव कलावंत. केवळ सर्वसामान्य प्रेक्षकांनीच "रामराज्य' या चित्रपटाला डोक्यारवर घेतलं नाही तर महात्मा गांधींनाही हा चित्रपट आवडला होता. म. गांधी यांनी पाहिलेला हा एकमेव चित्रपट. अमोल पालेकरांचा "बनगडवाडी' हा चंद्रकांत यांनी केलेला शेवटचा चित्रपट.

    चंद्रकांत हे नुसता अभिनय करीत नसत. ते त्या व्यक्तिरेखेशी एकरूप होऊन जायचे. "भरतभेट' चित्रपटामध्ये रामाची भूमिका करताना चंद्रकांत यांचे सगळे अंग उघडे असे. चेहरा आणि शरीराचा रंग एकसारखा दिसावा यासाठी त्यांनी सगळ्या शरीराला मेकअप केला होता. मांडरे यांनी बोलपटाच्या आरंभकाळापासून चित्रपटांतून कामे केली. चित्रपटाच्या झगमगत्या दुनियेत काम करत असूनही आपलं पहिलं प्रेम असणाऱ्या चित्रकलेची सोबत त्यांनी कधीच सोडली नाही.

    निसर्ग हाच श्वाहस मानून चित्रकलेची आराधना करणारे ते एक मनस्वी कलावंत होते. जलरंग हे त्यांचे आवडते माध्यम होते. पारदर्शक जलरंगातील निसर्ग चित्रणाबरोबर पावडर शेडिंग या लोप पावत चाललेल्या कलेला त्यांनी संजीवनी दिली. स्वतः चित्रीत केलेली ३५० ते ४०० चित्रे तसेच राहता बंगला त्यांनी १९८४ मध्ये राज्य शासनाच्या स्वाधीन केला. त्यावेळी या चित्रांची किंमत ३० लाख रुपये होती आणि बंगल्याची किंमत वेगळीच. या त्यांच्या दातृत्वातूनच कोल्हापूर येथे "चंद्रकांत मांडरे कलासंग्रहालया'ची उभारणी झाली. या संग्रहालयातील चंद्रकांत यांनी काढलेलं केर्ली येथील चंद्रबिंबाचं चित्र अप्रतिम आहे. ते पाहताना हुबेहूब पौर्णिमेच्या चंद्रकिरणांचा भास होतो.

    चित्रकलेल्या वर्गांमध्ये ते विद्यार्थ्यांना निसर्गचित्रणे तसेच पावडरशेडिंग ही लुप्त होत असलेली कला विनामूल्य शिकवीत असत. चंद्रकांत यांनी रेखाटलेली चित्रं पाहिली की आदर्श निसर्गचित्र कसं असावं याची जाणीव होते. त्यांच्या कुंचल्यानं काश्मीलरपासून ते कन्याकुमारीपर्यंतचा निसर्ग कॅनव्हासवर रेखाटला. कोल्हापुरातल्या मातीत ते रमले होते. याचे प्रत्यंतर त्यांनी रेखाटलेल्या गुलमोहोराचे झाड आणि गुऱ्हाळाच्या चित्रावरून येतं. आपले धाकटे बंधू सूर्यकांत यांच्यावर चंद्रकांत यांचा भारी जीव होता. चित्रपटसृष्टीत आणि बाहेरही या दोघांची जोडी "राम-लक्ष्मण' नावानं ओळखली जायची.

    चंद्रकांत मांडरे यांचे निधन १७ फेब्रुवारी २००१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. मंदार जोशी

    चंद्रकांत मांडरे यांचे उल्लेखनीय चित्रपट :- युगे युगे मी वाट पाहिली, पवनाकाठचा धोंडी, संथ वाहते कृष्णामाई, थोरातांची कमळा, छत्रपती शिवाजी, मीठभाकर, सांगत्ये ऐका, मोहित्यांची मंजुळा, धन्य ते संताजी धनाजी, खंडोबाची आण, बनगरवाडी

      August 13, 2017


  • सुरेल गायिका सुरैय्या

    सुरैया हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या एका स्वप्निल, सुरेल काळाचं मोरपंखी प्रतीक होतं. त्यांचा जन्म १५ जून १९२९ रोजी झाला. लहानपणी शाळेच्या सुट्टीत सुरैय्या अनेक गाण्यांच्या कार्यक्रमात भाग घेत असे. अशाच एका सुट्टीत ती आपले मामा (एम. हुजूर) यांच्याबरोबर सुभाष स्टुडिओ मध्ये शुटिंग पहायला गेली होती. एम. हुजूर हे चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्याचे काम करत असत. तेव्हा सुभाष स्टुडिओ मध्ये 'ताजमहल' चे शुटींग सुरू असताना एका बाल कलाकाराची आवश्यकता होती. दिग्दर्शक नानुभाई वकिल यांनी सुरैय्याचं नाव सुचवलं आणि ते पात्रं तिथे रंगून शॉट ओके सुद्धा झाला. गायिका म्हणून वर येण्यासाठी सुरैय्याला संगितकार नौशाद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले.. अशाच एका बालगीत कार्यक्रमात गाताना त्यांनी तिचं गाणं ऑल इंडिया रेडिओवर ऐकलं आणि तिच्याकडून आपल्या 'शारदा' या चित्रपटात अभिनेत्री मेहताबसाठी "पंछी जा, पीछे रहा है बचपन मेरा उसको जा के ला.....'' हे गाणं गाऊन घेतलं ... सुरैय्या त्यावेळी अवघी १३ वर्षांची होती, पण तिचा परिपक्व आवाज तिच्यापेक्षा वयाने कितीतरी मोठ्या असलेल्या मेहताबला मात्रं तंतोतंत सूट झाला. १९४३ ते १९४६ च्या दरम्यान सुरैय्याने अनेक चित्रपटांत सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम केले... त्यातले विशेष उल्लेखनिय म्हणजे अनमोल घडी, फूल, दर्द इ. पण अभिनेत्री म्हणून पहीली संधी तिला मिळाली ती 'तदबिर' या सिनेमात.

    सुरैय्याने अनेक गाणी सुद्धा गायली, परंतू के. एल. सहगल यांच्या बरोबरच्या 'परवाना' या चित्रपटातल्या ४ सोलो गाण्यांनी तिची खरी ओळख "गायिका-अभिनेत्री" अशी नव्याने करून दिली. ४० आणि ५० च्या दशकात सुरैय्या या प्रचंड लोकप्रिय अशी गायिका/अभिनेत्री होत्या. देव आनंदबरोबरची सुरैय्याची जोडी त्याकाळी भरपूर गाजली. एका चित्रपटाच्या शुटिंगच्या वेळी बोट उलटण्याच्या दृश्यात देव आनंदने तिचे प्राण वाचवले, एकिकडे हिंदी चित्रपटसृष्टीतील इतर अनेक मान्यवर आणि दिग्गज मंडळी सुरैय्याशी लग्नं करण्यास उत्सुक असूनही, दुसरीकडे देव आनंद बरोबरच्या प्रेमभंगानंतर सुरैय्याने कधीही विवाह न करण्याचा निर्णय घेतला. १९४९- ५० च्या दरम्यान सुरैय्याचे चित्रपट भरपूर गाजले आणि ती सर्वात जास्त मानधन घेणारी नायिका बनली.. प्यार की जीत, बडी बहन, दिल्लगी हे ते चित्रपट.. असं म्हणतात की बॉलिवूडमध्ये तरूण्-तरूणिंच्या हृदयाचा ठेका सर्वात जास्त चुकवणारा अभिनेता म्हणजे राजेश खन्ना, पण त्याच्या तोडीचंच वेड नव रूणाईमध्ये त्याकाळी सुरैय्यानेही निर्माण केलं होतं. तिच्या 'शमा' या चित्रपटातील गाणी गाजली. सुरैय्याचा शेवटचा चित्रपट म्हणजे रूस्तम सोहराब. सुरैय्या यांचे ३१ जानेवारी २००४ यांचे निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      June 15, 2018


  • चितळे उद्योगसमुहाचे युवा मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रनील चितळे

    चितळे ग्रुपचा अवघ्या ३१ वर्षांचा तरुण सी.ई.ओ. इंद्रनील गेली दहा वर्षे या ग्रुपचा कारभार पाहत आहे. चव, दर्जा आणि विश्वास या त्रिसूत्रीला पुढे नेत त्यात स्वतःच्या इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट स्किल्सची भर टाकून त्याने आपल्या एक दशकाच्या कारकिर्दीतील ग्रुपची उलाढाल (टर्नओव्हर) दुपटीहून अधिक वाढवली, शिवाय खाद्य पदार्थ टिकवण्याच्या क्षेत्रात नवनवे प्रयोग करून पुण्याची बाकरवडी अमेरिकेत पोहोचवली आणि वर्ष-वर्ष टिकवली.

      April 28, 2022


  • ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले

    ‘संगीत सुवर्णतुला’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘जावयाचे बंड’, ‘चमकला ध्रुवाचा तारा’, ‘जयजय गौरीशंकर’ ही संगीत नाटकं लोकप्रिय झालीच पण ‘साक्षीदार’, ‘अमृत झाले जहराचे’, ‘मदनाची मंजिरी’, ‘स्वरसम्राज्ञी’ ही त्यांची पाश्चात्य कृतीवर आधारित असलेली संगीत नाटकं.

      September 26, 2021


  • भारतीय फिरकीपटू इरापल्ली प्रसन्ना

    प्रसन्ना यांनीच भारताला परदेशी भूमीवरचा आपला पहिला टेस्ट सिरीज विजय न्यूझीलंडमध्ये मिळवून दिला. त्या सिरीजमध्ये त्यांनी एकूण २४ विकेटस काढल्या होत्या. कारकिर्दीतल्या १०० विकेट्सचा टप्पा गाठायला त्यांना अवघ्या २५ मॅच लागल्या. तो देखील एक विश्वविक्रम ठरला होता, जो पुढे त्यांचा वारसदार समजल्या जाणाऱ्या आर. अश्विनने पन्नास वर्षांनी मोडला.

      May 27, 2022


  • सतिश मोडखळकर

    प्रत्येक कलावंत हा तोंडाने नाही तर त्याच्या कलेतून बोलत असतो. त्याच्या तत्वांना, भावनांना, व आयुष्यभर जोपासलेल्या स्वप्नांना तो कलेच्या सौंदर्यामध्ये घोळवत असतो, मुर्तरूप देत असतो, त्यांना एका अर्थाने जीवंतच करत असतो. खळबळलेला समुद्र जसं आपल्या मनातलं वादळ व्यक्त करण्यासाठी लाटांचा आधार घेतो, त्याप्रमाणे कलावंत आपल्या कलेतून ही तळमळ रसिकांसमोर मांडत असतो. पायामधील पैंजण ज्याप्रमाणे हळुवार वाजुन पावलं कुठे चालली आहेत याची जाणीव करून देतात, त्याप्रमाणे कलाकाराच्या मनाचा थांगपत्ता हा त्याच्या कलेच्या अविष्कारामधून केवळ दर्दी रसिकांनाच लागु शकतो.

      July 19, 2011


  • भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई

    भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार विक्रम साराभाई यांचा जन्म १२ ऑगस्ट १९१९ रोजी झाला.

    विक्रम साराभाई यांचे वडील हे एक उद्योगपती होते. शिवाय ब-याच राजकीय व्यक्तिंशी त्यांचे संबध असल्याने त्या लोकांचे (रविंद्रनाथ टैगोर, जवाहरलाल नेहरू, सरोजनी नायडू , महात्मा गांधी) त्यांच्या घरी जाणे-येणे होते. त्यामुळे खरंतर विक्रम साराभाईंना उद्योग क्षेत्रात अथवा राजकारणात जम बसवण्यासाठी पोषक वातावरण होते. पण त्यांच्या नशिबात काही वेगळेच लिहले होते आणी ते संपूर्ण भारत देशाचे नशीब बदलणारे असे काहीतरी होते. त्यांच्या आई सरलादेवी यांनी आपल्या ८ मुलांच्या शिक्षणासाठी स्वत:ची माँटेसरी पद्धतीची शाळा काढली होती. या शाळेतच यूरोपातून आलेल्या शिक्षकांद्वारे विक्रम साराभाईंचे शिक्षण झाले. त्यांना लहानपणापासूनच गणित आणि भौतिक शास्त्र हे विषय विशेष आवडीचे होते. आपले १२ वी पर्यंतचे शिक्षण आटपून १९३७ साली पुढील शिक्षणासाठी ते कैंब्रिज विश्वविद्यालय येथे शिकायला गेले. पण दुसरे महायुद्ध सुरु झाल्याने ते भारतात परत आले व त्यांनी बंगलोर मधील ‘इंडियन इंस्टीट्यूट आफ साइंस’ मध्ये नोबेल पुरस्कार विजेते सर सी.वि.रमण यांच्या मार्गदर्शनाखाली 'कोस्मिक किरणा'वर संशोधन केले. १९४२ साली त्यांनी भरतनाटयम, कुचिपुडी या नृत्यकलेत पारंगत असलेल्या प्रसिद्ध नृत्यांगना मा.मृणालिनी साराभाई यांच्याशी विवाह केला. त्यांना कार्तिकेय आणी मल्लिका ही दोन अपत्ये झाली. १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर ते ब्रिटनमध्ये परत गेले. १९४७ साली त्यानी ‘कास्मिक रे इंवेस्टिगेशन इन ट्रापिकल लैटीट्यूड्स’ वर संशोधन करून पी.एच.डी. पदवी मिळवली. आणि त्याच वर्षी मायदेशी परत आले. ११ नोव्हेंबर १९४७ ला अहमदाबादला Physical Research Laboratory ची स्थापना केली हे त्यांचे पहिले पाउल. पुढे जाऊन अवकाश संशोधनात त्यांनी जे कार्य केले त्याबद्दल काही सांगायला नकोच. केरळजवळील थुंबा हे ठिकाण लॉन्च पेड़साठी निश्चित झाले होते कारण हे ठिकाण मैग्नेटिक इक्वेटर लाइन (चुंबकीय भूमध्य रेखा) च्या अगदी जवळ होते. पण त्या ठिकाणी शंभरेक घरे आणि एक चर्च होते. आणि ते लोक तिथून बाजुला हटण्यास तयार नव्हते. त्या जागेच्या भौगोलिक आणि वैज्ञानिक महत्वामुळे त्या जागेसाठी केरळ सरकारची मदत मागितली गेली पण केरळ सरकारही ती जमीन मिळवण्यात अपयशी ठरले. मग एके दिवशी स्वत: विक्रम साराभाई त्या चर्चच्या फादर कड़े गेले आणि त्यांना सगळे पटवून दिले. आणि काय चमत्कार दुस-याच दिवशी फादर आणि तिकडचे लोक तिथून बाजूला होण्यास तयार झाले. पुढे तिथे 'थुंबा रॉकेट लौन्चिंग स्टेशन' ची स्थापना केली गेली. २१ नोव्हेंबर १९६५ ला तिथून पहिल्या रॉकेटचे प्रक्षेपण केले गेले. पुढे या केंद्राला संयुक्त राष्ट्रने अंतरराष्ट्रीय केंद्र म्हणून मान्यता दिली. हा चमत्कार घडवणारे ते विक्रम साराभाईच. म्हणूनच की काय पुढे या केंद्राला विक्रम साराभाई स्पेस सेंटर असे नाव दिले गेले. इंग्लंडच्या प्रयोगशाळेत संशोधन करणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. वसंत गोवारीकर यांना भारताच्या मोहिमेत सहकार्य करण्याचं आवाहन करून डॉ. विक्रम साराभाई यांनी भारतात आणलं होतं. ''ब्रिटनप्रमाणे वातानुकुलित लॅब्ज आणि ऑफिससारख्या सोयी आम्ही देऊ शकणार नाही, पण बसायला एक टेबल, खुर्ची आणि एक कपाट नक्कीच देऊ शकतो'', असं म्हणून डॉ. साराभाईंनी देशापुढील आव्हानही स्पष्ट केलं होतं. कारण त्यावेळी संशोधनासाठी विशेष बजेट वैगेरे नव्हते. डॉ. विक्रम साराभाई यांनी शास्त्रज्ञांना स्वप्न दाखवलं, नवी दिशा दिली. खंबीर नेतृत्व हाही त्यांचा एक व्यक्तिविशेष. डॉ. अब्दुल कलाम यांनीही आपल्या अग्निपंख या आत्मचरित्रात साराभाई यांच्या नेतृत्व गुणाचे कौतुक केले आहे. ते स्वप्न पाहायचे आणि ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी हवी ती मेहनतही घ्यायचे. त्यांचे व्यक्तिमत्व आणि कार्य त्यांच्या सहका-यांसाठी नेहमीच एक प्रेरणा स्रोत ठरले आहे. त्यांनी त्यांच्या सहका-यांना एक वेगळी दृष्टी दिली. अंतराळ संशोधनात बजावलेल्या मोलाच्या कामगिरीसाठी इंटरनॅशनल अस्ट्रोनॉमिकल युनियनतर्फे भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार ठरलेल्या अश्या डॉ. विक्रम साराभाई यांचे नाव चंद्रावरील मोठ्या विवरांना देण्यात आल आहे. (भारताच्या अणुऊर्जा तंत्रज्ञानातील जनक डॉ. होमी भाभा आणि नोबेल पारितोषिक विजेते सी. व्ही. रामन यांचीही नावे चंद्रावरील विवरांना दिली गेली आहेत.) डॉ. विक्रम साराभाई यांच्या अथक परिश्रमानंतरच १९६९ साली भारतीय अवकाश संशोधन संस्थेची (इस्त्रो) स्थापना झाली. आईआईएम अहमदाबादच्या स्थापनेतही डॉ. विक्रम साराभाई यांची मुख्य भूमिका होती. होमी भाभा यांच्या मृत्यु नंतर ते १९६६ मध्ये परमाणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष झाले. अनेक आंतरराष्ट्रीय संस्थांची अध्यक्षपदे त्यांच्याकडे होती. अवकाश संशोधनाबरोबरच त्यांनी टेक्स्टटाईल, फार्मासिटिकल, अणुऊर्जा, कला या क्षेत्रातही विशेष कामगिरी केली आहे. त्यांनी स्थापन केलेल्या ATIRA (Ahmedabad Textile Industry’s Research Association) ने आधुनिक वस्त्रोद्योगाचा पाया रचला. फार्मासिटिकल उद्योगात सर्वप्रथम इलेक्ट्रोनिक डाटा प्रोसेसिंग आणि रिसर्च टेक्निकचा वापर त्यांनीच केला. Electronics Corporation of India Limited (ECIL),Uranium Corporation of India Limited (UCIL) अशा अनेक संस्थांची स्थापना त्यांनी केली. १९७५ मध्ये जो पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला, त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली गेली होती. आर्यभट्टच्या सफल संक्षेपणानंतर अनेक उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केले गेले. ज्यासाठी श्री.साराभाई यांची नेहमीच आठवण केली जाते. कारण या सगळ्या यशामागे साराभाई यांचे अथक परिश्रम, दूरदृष्टि आणि खंबीर नेतृत्व ह्यांचा मोलाचा वाटा आहे. डॉ.विक्रम साराभाई यांना सन १९६६ साली भारत सरकारचा पद्मभूषण आणि १९७२ साली मरणोत्तर पद्मविभूषण हा पुरस्कार भारत सरकारतर्फे देण्यात आला.

    विक्रम साराभाई यांचे ३१ डिसेंबर १९७१ रोजी निधन झाले. आपल्या समूहाकडुन मा.विक्रम साराभाई यांना आदरांजली.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 1, 2017