(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • एका जिद्दीचा प्रवास

    स्त्रियांना वर्ज्य असणार्‍या क्षेत्रातच एखादी स्त्री पाय रोवून उभी असेल तर नवल वाटेल ना! आज प्रत्येक क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत. त्याचप्रमाणे मर्चंट नेवीसारख्या कठीण समजल्या जाणार्‍या क्षेत्रात तरी महिला मागे कशा राहतील? या क्षेत्रात कामगिरी केलेल्या रेश्मा मुरकर या तरुणीचा हा जिद्दीचा प्रवास आपण अनुभवूया.

    p-34264-reshma-murkarएकतर आकाशात उडायचं किंवा पाण्यातून प्रवास करायचा अशी रेश्माची स्वप्नं होती. या स्वप्नांना साकार करण्यासाठी केवळ जिद्द लागते. जिद्दीशिवाय खडतर स्वप्न साकार करणं कठीणच. त्यातही सर्वसामान्य घरात जन्मलेल्या महिलांना तर ते त्याहून कठीण. लहानपणापासूनच विविध क्षेत्रांत आपलं नाव उमटवणा-या रेश्माला एका अशा क्षेत्रात काम करायचं होतं जिथे स्त्रियांनी जाण्याचं स्वप्नही पाहिलं नसेल.

    बारावी झाल्यावर नक्की कोणतं क्षेत्र निवडायचं याविषयी तिच्या मनात खलबतं सुरू होती. खरं तर तिला पायलट व्हायचं होतं. मात्र त्यावेळेस पायलटसाठी तिला प्रवेश मिळाला नाही. मात्र तिने हिरमुसून न जाता एका वेगळ्या करिअरचा शोध घेत राहिली. याच शोधात असताना र्मचट नेवीविषयी माहिती सांगणा-या व्याख्यानाबद्दल तिला कळलं. र्मचट नेवी हे क्षेत्र रेश्माला वेगळं वाटलं, त्यामुळे हे व्याख्यान ऐकण्याची तिची इच्छा झाली. व्याख्यानात या क्षेत्राविषयी तिने ऐकलेली माहिती तिला फार आवडली.

    काहीतरी आव्हानात्मक, कठीण, अशक्य करण्याची तिची धडपड या र्मचट नेवीच्या करिअरमुळे पूर्ण होणार होती. त्यामुळे आता याच क्षेत्रात तिला जाण्याची इच्छा झाली. या क्षेत्रात आल्यावर स्वत:चं वैयक्तिक आयुष्य लांब होतं. घरच्यांपासून वर्षानुवर्षे दूर राहावं लागतं. अथक परिश्रम आणि अभ्यास करावा लागतो. लहानपणापासून खेळ, नृत्य अशा गोष्टींमध्ये अव्वल असणारी रेश्मा आता मरिन क्षेत्रात जाऊ पाहत होती. आपली मुलगी इतरांच्या पावलांवर पाऊल न ठेवता स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण करतेय हे तिच्या पालकांना जाणवलं आणि त्यांनीही तिच्या या निर्णयाचं स्वागत केलं.

    मुळातच अभ्यासू विद्यार्थी असल्याने प्रत्यक्ष शिक्षणाला सुरुवात करण्याआधी तिने या क्षेत्रात येणा-या सर्व गोष्टी तपासल्या. म्हणजेच शिक्षण झाल्यावर नोकरी कशी मिळते, पगार किती असतो, सर्वात वरची पोस्ट कोणती? त्यासाठी किती अभ्यास लागतो? त्या अभ्यासाला किती वर्षे जातात? या सा-या गोष्टींची खातरजमा करून तिने अभ्यासाला सुरुवात केली.

    या मुलाखतीत ती बोलताना तिने सांगतिलं की, ‘मला एकतर आकाशात उडायचं होतं किंवा पाण्यावर राहायचं होतं. वस्तुत: जमिनीवर नसतानाही तिचे पाय आजही जमिनीवरच आहेत. वयाच्या अवघ्या २८व्या वर्षी ती र्मचट नेवीमध्ये चिफ ऑफिसर आहे. नेहमीच्या मार्गावर चालून, १० ते ५ नोकरी करून घर-संसार सांभाळायचा एवढया माफक अपेक्षा मुलींच्या असतात. मात्र या अपेक्षांना छेद देत आपण मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे असं तिला वाटतं.

    या क्षेत्रात काम करण्याविषयी आणि काम करताना आलेल्या अडचणींविषयी तिला विचारलं असता ती म्हणाली की, ‘मुळातच या क्षेत्रात आजही पुरुषांची मक्तेदारी फार आहे. शिवाय आपल्या या क्षेत्रात महिलांनी प्रवेश करावा अशी काही लोकांची इच्छाही नसते. पुरुषांच्या समुदायात राहून त्यांच्यासोबत मिळून-मिसळून काम करणं फार कठीण आहे. त्यांच्यात समरस होण्यासाठीच फार वेळ लागतो. कठीण काम असल्यामुळे महिलांना एखादं काम जमणारच नाही अशी समजूत पुरुषांमध्ये असते. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करून त्यांचा विश्वास संपादन करणं सर्वप्रथम काम मानलं जातं. आपल्या सहका-यांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रत्येकीला मानसिक, शारीरिक आणि भावनिकदृष्टया सक्षम राहणंही तितकंच गरजेचं आहे.’ पुढे ती म्हणाली, ‘शिपमध्ये असल्यामुळे निसर्गातले अनेक चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहेत. सूर्य क्षितिजाला जाताना त्याचा होणारा लालबुंद रंग म्हणजे नैसर्गिक जादूच वाटते. असे विविध निसर्गातील चमत्कार नेहमी अनुभवता आले.’

    ‘जेव्हा मी पहिल्यांदाच बोर्ड-शिपवर गेले तेव्हा प्रत्येक ऑफिसर मला एकच प्रश्न विचारत होते की, का तू र्मचट नेव्हीमध्ये यायचं ठरवलंस? या निर्थक प्रश्नांमुळे मी कधीकधी खूप डिस्टर्ब व्हायचे, शिवाय माझ्यातला आत्मविश्वासही कमी व्हायचा. आजही महिलांना त्यांना आवडत्या क्षेत्रात जाण्यासाठी जर कष्ट पडत असतील तर महिलांनी केवळ चूल आणि मूल याच संकल्पनेत रमायचं का?’ असं ती म्हणते.

    ‘र्मचट नेवीमध्ये करिअर करण्याचा माझा निर्णय किती चुकीचा आहे असं काहींनी मला येथे जाणवून दिलं. मात्र या टिपिकल संकल्पनेतून मला समाजाला बाहेर काढायचं होतं. कालांतराने माझं काम पाहून माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर विश्वास ठेवला. पुरुषांप्रमाणे मीही काम करू शकते, असं त्यांना जाणवलं आणि अल्पावधीतच माझे वरिष्ठ माझ्यावर विश्वासाने काम सोपवू लागले. र्मचट नेवीमध्ये पुरुषांची मक्तेदारी आहे हे सिद्ध करण्यासाठी दुसरं उदाहरण द्यायचं झालंच तर मी जेव्हा तिकडे रुजू झाले त्यावेळेस माझ्या मापाचे युनिफॉर्म तिथे उपलब्धच नव्हते,’असं रेश्मा सांगत होती.

    रुळलेल्या वाटेवरून न जाता स्वत:ची वेगळी वाट निर्माण करणं खरं तर फार अवघड काम आहे. वेगळी वाट धरणा-या महिलांच्या आयुष्यात अनेक संकटंही येतात; मात्र ती संकटं दूर सारून त्यातूनही नवा दृष्टिकोन साधून जी स्त्री नैया पार करते तिलाच आजची खरी सक्षम स्त्री म्हणायला हवं, त्यामुळे रेश्मा मुरकरही त्यापैकीच एक आहे. आज ती र्मचट नेवीमध्ये चीफ ऑफिसर पदावर आहे.

    विचार केला नसेल अशा सुख-सुविधा तिच्या पायाशी लोळतायत. या सा-या यशामागे तिच्या आई-वडिलांनी तिला मोलाची साथ दिली म्हणून ती पुढे जाऊ शकली असं ती अभिमानाने सांगते. खेळ, कला आणि अभ्यास अशा सा-या गोष्टींचा यथासांग मेळ घालत तिने तिची सारी स्वप्नं पूर्ण केलीत. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात रेश्माने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली हे आजच्या महिला दिनाच्या दिवशी सांगणं म्हणजे फार कौतुकाची गोष्टच ठरेल ना!

    -- स्नेहा कोलते

      April 6, 2017


  • मयुरेश शिर्के

    मयुरेश शिर्के हे नाव माध्यम क्षेत्राशी विशेषत: “श्राव्याशी” जोडलं गेलं असून, रेडिओ, दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील व्हि.ओ. (व्हॉईस ओव्हर) तसंच डबिंग शी निगडीत आहे. मुंबई आकाशवाणी केंद्रावर मयुरेश शिर्के यांनी हंगामी निवेदक व आर.जे. (रेडिओ जॉकी) म्हणून काम केलेलं आहे.

      August 23, 2013


  • गजानन नीळकंठ गुप्ते

    पनवेल मधील स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेले श्री. गजानन नीळकंठ गुप्ते हे त्या वेळच्या प्रसिद्ध व नावाजलेल्या कै. नीळकंठ गुप्ते यांचे चिरंजीव.

      June 1, 2010


  • अभिनेत्री, निर्माती, दिग्दर्शक व नृत्यदिग्दर्शक फराह खान

    फराह खानने आजवर अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शन केले असून चार चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांचा जन्म ९ जानेवारी १९६५ रोजी झाला.
    २०१२ सालच्या शिरिन फरहाद की तो निकल पडी ह्या चित्रपटामध्ये तिने नायिकेची भूमिका केली होती.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 11, 2017


  • भारताचा खेळाडू प्रवीण अमरे

    प्रवीण आम्रे हे १९९१ ते १९९४ भारतीय क्रिकेट संघाकडून खेळले. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९६८ रोजी झाला. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळीप्रमाणेच रमाकांत आचरेकरांचा शिष्य असलेल्या अमरेंची कारकीर्द फार मोठी ठरली नाही. ११ कसोटीत एका शतकासह ४२५ धावा त्यांनी केल्या. ३७ वनडे खेळताना मात्र प्रवीण अमरे यांना शतक ठोकता आले नाही.

    आय.पी.एल.मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रवीण अमरे यांनी काम केले आहे. त्यांच्या पुढील मोसमासाठी सहाय्यक प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी निवड समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 14, 2021


  • मे.पुं रेगे म्हणून प्रसिद्ध असलेले पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मेघश्याम पुंडलिक रेगे

    मे.पुं रेगे म्हणून प्रसिद्ध असलेले पश्चिमी तत्त्वज्ञानाचे व्यासंगी मेघश्याम पुंडलिक रेगे यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. मे.पुं रेगे हे व्यवसायाने 'तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांची महाराष्ट्रातील अव्वल दर्जाचे विचारवंत आणि तत्त्वज्ञ म्हणून ख्यातकीर्त होते. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्टय़े होती. महाराष्ट्राच्या तत्त्वज्ञानिक आणि वैचारिक क्षेत्रात आपला निर्वविाद ठसा उमटवलेल्या मोजक्या अभ्यासकांमध्ये रेगे यांचा समावेश होतो.

    भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते. त्यांनी महाराष्ट्राला कुठलाही नवीन विचार दिला नाही, विचार कसा करावा याविषयीही त्यांनी काही सांगितले नाही; पण त्यांनी गंभीर लेखनासोबत ‘विश्वकोश’, ‘नवभारत’ यांचे प्रत्यक्ष काम करून आपल्या चिंतनशील प्रकृतीला क्रियाशीलतेचीही जोड द्यायची असते, या विसाव्या शतकातील ज्ञानपरंपरेचा वारसा सक्षमपणे चालवला.

    मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत त्यांनी विपुल लेखन केले. त्यांनी मराठी भाषकांना पश्चिमी तत्त्वज्ञान परंपरेचा मुक्तपणे परिचय करून दिला. पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास हा त्यांचा पश्चिमी तत्त्वज्ञानाचा ग्रंथ ज्यांनी वाचला असेल त्यांना याची खात्री पटेल. भारतीय दर्शने, पश्चिमी तत्त्वज्ञान व इतर आशियाई परंपरेचा व्यासंग ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांनी काही काळ ‘नवभारत’ आणि ‘क्वेस्ट’ या मासिकांचेही संपादन केले. ‘नवभारत’मध्ये त्यांनी संपादकीय, लेख, पुस्तक परीक्षणे अशा विविध स्वरूपांचे लेखन केले.

    त्याचबरोबर तत्त्वज्ञानावरील पाठय़पुस्तकांचेही लेखन केले. ‘इहवाद आणि सर्वधर्मसमभाव’, ‘विवेक आणि न्याय : आधुनिक महाराष्ट्रातील प्रबोधनपर्व’, ‘विवेकवाद, विज्ञान आणि श्रद्धा’, ‘स्वातंत्र्य आणि न्याय’, ‘िहदू धार्मिक परंपरा आणि सामाजिक परिवर्तन’ ही त्यांची स्वतंत्र पुस्तके आहेत, तर ‘पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास’ या पुस्तकात नावानुसार पाश्चात्त्य नीतिशास्त्राचा इतिहास आहे. रेगे यांचे ‘मर्मभेद’ हे संपादित पुस्तक त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाले. मे.पुं. रेगे हे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष होते. मे.पुं रेगे यांचे २८ डिसेंबर २००० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 24, 2019


  • वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे

    झुणकाभाकरफेम समतानंद अनंत हरी गद्रे यांना नाटिका संप्रदायाचे प्रवर्तक मानले जाते. वार्ताहर, लेखक, नाटककार व थोर समाजसुधारक अनंत हरि गद्रे यांचा जन्म १६ ऑक्टोबर १८९० रोजी झाला.

      November 5, 2017


  • बॉलिवूडची एक उत्कृष्ट अभिनेत्री विद्या बालन

    बॉलिवूडची 'उलाला गर्ल' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. तिचा जन्म १ जानेवारी १९७८ रोजी झाला.विद्या बालन लहानपण मुंबई मध्ये गेले. तिला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

    एकदा तिने माधुरी दीक्षितला टीव्हीवर 'तेजाब' सिनेमातील 'एक दो तीन' या गाजलेल्या गाण्यावर डान्स करताना बघितले आणि तेव्हाच निश्चय केला, की ती अभिनेत्रीच होणार. विद्या डान्स आणि गायन शिकली. मात्र विद्याने अभिनेत्री व्हावे, अशी तिच्या पालकांची इच्छा नव्हती. मात्र पालकांच्या इच्छेविरुद्ध कॉलेजमध्ये गेल्यानंतर विद्या अभिनय करायला लागली. सिनेमात पदार्पण करण्यात अपयशी ठरलेल्या विद्याने जाहिरातीत काम करण्यास सुरुवात केली. 'हम पांच' या टीव्ही शो मिळेपर्यंत तिने खूप संघर्ष केला. समाजशास्त्रमध्ये मास्टर डिग्री मध्ये करण्यापूर्वी तिने जवळपास ९० जाहिरातीत काम केले होते. समाजशास्त्रमध्ये एम.ए केल्यानंतर विद्याला मोहन लाल यांच्या मल्याळम सिनेमात ब्रेक मिळाला. परंतु मोहन लाल आणि दिग्दर्शक यांच्यामध्ये वाद झाला आणि सिनेमाचे शूटिंग थांबवण्यात आले. मोहन लाल आणि दिग्दर्शक कमालने त्यापूर्वी आठ सुपरस्टार सिनेमे दिले होते, म्हणून या वादासाठी विद्या बालनला दोषी ठरवण्यात आले. त्यानंतर विद्याने जेवढे मल्याळम सिनेमे साइन केले होते, त्यामधून तिला काढून टाकण्यात आले.

    त्यामुळे विद्या स्वतःला कमनशिबी समजू लागली होती. विद्याला नंतर प्रदीप सरकारने त्यांच्या एका अल्बमसाठी साइन केले. 'यूफोरिया' हा त्याकाळचा गाजलेला अल्बम होता. विद्याने नैराश्य बाजुला सारुन या अल्बममध्ये काम केले आणि तिला नशीबाची साथ मिळाली. प्रदीप सरकारने तेव्हा तिला सांगितलं होते, की 'मी तुझ्यासोबत एक सिनेमा बनवेल.' यामुळे विद्याचा आत्मविश्वास वाढला. त्यांच्या वचनाच्या आधारे सरकारने तिला 'परिणीती' सिनेमासाठी साइन केले.'परिणीती'नंतर विद्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. या सिनेमात तिने उत्कृष्ट अभिनय केला. पहिल्याच सिनेमासाठी विद्याला अनेक पुरस्कार मिळाले आणि विद्या बॉलिवूडच्या उत्कृष्ट अभिनेत्रींमध्ये सामील झाली. परिणीतासाठी विद्याला २००५ मध्ये सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर विद्याने 'मुन्ना भाई MBBS', 'कहानी', 'द डर्टी पिक्चर', 'कहानी' यांसारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले आणि प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. साऊथ इंडियन असूनदेखील विद्याचे बंगालसोबत खास कनेक्शन आहे. तिला बंगालीत बोलायला आवडते.

    प्रथम सलग चार वर्षे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवण्याचा विक्रम तिने केला आहे. विद्याची प्रत्येक भूमिका एक नवीन ठसा उमटवते. प्रेक्षकांना तिची प्रशंसा करायला भाग पाडणारा तिचा अभिनय सर्वांनाच आकर्षित करतो. परंतु विद्याला हे यश इतक्या सहजासहजी मिळालेले नाहीये. यासाठी तिने खूप मेहनत केली. ४० स्क्रिन टेस्ट, १७ मेकअप शूट दिल्यानंतर तिला 'परिणीता' मिळाला होता. विद्या बालनने ‘एक अलबेला’ या मराठी चित्रपटात काम केले आहे. ‘द डर्टी पिक्चर’, ‘कहानी’ सारखे चित्रपट विद्या बालनने केले तेव्हा त्या भूमिका साकारण्याचं धाडस कोणी केलं नव्हतं. विद्याने ते आव्हान पेललं, आणि साहजिकच तिला ‘हिरो’ हे बिरुद चिकटलं. तिथून पुढे येताना या बदलाचा चेहरा असलेल्या विद्याला लोक ‘लेडी आमिर खान’ म्हणू लागले आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2018


  • अमेरिकन सिनेमाचा आद्य महापुरुष सेसिल डमिल

    मेल अँड फीमेल, डायनामाइट, दी बकॅनिअर, नॉर्थवेस्ट माउंटेड पुलिस, दी किंग ऑफ किंग्ज, दी ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ – असे त्याचे सिनेमे प्रसिद्ध आहेत.

      January 21, 2022


  • मराठीतील नाटककार, कवी, अभिनेते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर

    बाळ कोल्हटकर यांना नऊ अक्षरांचा नाटककार म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २५ सप्टेंबर १९२६ रोजी सातारा येथे झाला. बाळकृष्ण हरी तथा बाळ कोल्हटकर म्हणजे नाटयसृष्टीतला एक मानबिंदू. मा.बाळ कोल्हटकर यांचे शिक्षण जेमतेम सातवीपर्यंतच झाले. लहानपणापासून नाटकांची अतिशय आवड. तसेच लेखनाचीही आवड होती. त्यामुळे लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी त्यांनी "जोहार" हे आपले पहिले नाटक लिहिले.

    १९४७ पर्यंत ते रेल्वेत नोकरी करत होते. त्यानंतर लेखनासाठी आणि रंगभूमीसाठी त्यांनी आपले पुढील आयुष्य वाहून घेतले. त्यांनी लिहिलेली नाटकं ही भावनाप्रधान आणि कौटुंबिक अशी असत. त्यांच्या नाटकातील प्रसंग भले बेतलेले असोत थोडेसे अती भावनिक असोत पण सामान्य प्रेक्षकांना अश्रु पुसायला लावत. त्यांची बरीच नाटकं अतिशय लोकप्रिय झाली. व्यवसायिक रंगभूमीसाठी त्यांनी नाटकं लिहिली होती तरी प्रत्येक नाटकातून काही मूल्य जपली होती. "दुरितांचे तिमिर जावो" या नाटकांचे पंधराशे प्रयोग, 'वाहतो ही दुर्वाची जुडी' या नाटकाचे चौदाशे प्रयोग, मुंबईची माणसे' याचे जवळपास दोन हजाराच्या वर तर 'एखाद्यांचे नशीब' या नाटकांचे हजारावर प्रयोग झाले. यावरुन नाटककार म्हणून लोकांनी त्यांच्यावर किती प्रेम केले याची साक्षच पटते.

    बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर विभागात १९५९ ते १९७२ या काळात वास्तव्यास होते. त्यांनी खेर विभागातील प्रसिद्ध हेरंब मंदिरात 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'वेगळं व्हायचंय मला', अशी काही प्रसिद्ध नाटकं लिहिली तसेच सीमेवरुन परत जा, लहानपणा देगा देवा, देव दीनाघरी घावला, देणाऱ्याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचे दार, इत्यादी त्यांची गाजलेली नाटके. त्यांच्या 'वाहतो ही दुर्वांची जुडी', 'दुरितांचे तिमीर जावो', 'वेगळं व्हायचंय मला', अशा नाटकांनी तर गर्दीचे विक्रम रचले. त्यांनी एकंदर ३० हून अधिक नाटके लिहिली. शहरी मध्यमवर्गीय नाटकांबरोबरच कोल्हटकरांनी काही पौराणिक व ऐतिहासिक विषयही हाताळले. 'देव दीनाघरी धावला', 'सीमेवरून परत जा', 'शिवराय कवि भूषण' ही नाटकेही गाजली.

    कोल्हटकर उत्तम कवी होते. त्यामुळे त्यांच्या नाटकांत पदेही असत. 'आई तुझी आठवण येते,' व 'निघाले आज तिकडच्या घरी' ही गाणी नाट्यगृहांत प्रेक्षकांना हमखास रडवीत असत. पंडित कुमार गंधर्व व वाणी जयराम यांच्या आवाजातील 'ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, भेटीत तुष्टता मोठी' हे प्रेमद्वंद्वगीत अजरामर झाले. कुमार गंधर्वजींच्याच आवाजातील भूपाळी 'ऊठी ऊठी गोपाळा' आजही सकाळी ऐकू येते. मा.कोल्हटकरांच्या नाटकांच्या शीर्षकांचे एक वैशिष्टय होते की 'एखाद्याचं नशीब', 'आकाशगंगा' असा अपवाद सोडला तर त्यांच्या ३१ पैकी बहुतेक नाटकांची शीर्षके नऊ अक्षरी आहेत. सर्वसामान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटूंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकेही लिहिली.

    प्रेक्षकांना जे हवे, जे आवडते ते त्यांनी रंगभूमीवर उभे केले. ते उभे करताना कथानकाची सुसूत्रतेनी बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषितवजा टाळी घेणारी काही वाक्ये याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करुन नाटकं यशस्वी केली. नाटककारांच्या बरोबरीने ते रंगभूमीचे उत्कृष्ट नटही होते. त्यांनी केलेल्या भूमिका अतिशय गाजल्या त्या आजही लोकांच्या आठवणीत जशाच्या तशा आहेत. मा.बाळ कोल्हटकर यांचे ३० जून १९९४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      October 3, 2017