(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • अविस्मरणीय ‘बाळासाहेब ठाकरे’

    बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नसती तर मराठी माणसांचे आज अतोनात नुकसान झाले असते. शिवसेनेमुळेच महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती टिकून आहे ही वस्तुस्थिती आहे. ती कोणीही नाकारू शकत नाही, हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.’

      September 19, 2017


  • अशोक परांजपे

    दीनानाथ दलाल यांची चित्रे आणि अशोक परांजपे यांच्या काव्यपंक्ती असा सिलसिला अनेक दिवाळी अंकात सुरू असायचा. मुंबईत गिरगावातील झावबावाडीतील नॅशनल होस्टेलमध्ये अशोक परांजपे राहात. संध्याकाळी त्यांच्या गप्पा रंगत साहित्य संघाच्या कट्टय़ावर.

      June 21, 2022


  • भारताचे माजी राष्ट्रपती वराहगिरी वेंकटगिरी

    जगात सर्वात आधी एटीएम मशीनचा वापर २७ जून १९६७ ला बार्कलेज बँकेने केला होता. ही पहिली एटीएम मशीन लंडनच्या बार्कलेज बँकेच्या शाखेत लावण्यात आली. भारतात सर्वात पहिली एटीएम मशीन १९८७ मध्ये लावली गेली. हे पहिले एटीएम हाँगकाँग ॲ‍ण्ड शांघाई बँकिंग कॉर्पोरेशन (HSBC) ने मुंबईत लावले होते.

      June 28, 2022


  • कथालेखक, कादंबरीकार नागनाथ कोत्तापल्ले

    ‘मूडस्’ हा त्यांचा कविता संग्रह १९७६ साली प्रसिद्ध झाला. ‘कर्फ्यू आणि इतर कथा’, ‘संदर्भ’ हे दोन कथासंग्रह त्यानंतर प्रकाशित झाले. ‘कवीची गोष्ट’ आणि ‘सावित्रीचा निर्णय’ हे दीर्घकथा संग्रह सुद्धा गाजले.

      March 29, 2022


  • भजन गायक पुरुषोत्तमदास जलोटा

    वयाच्या चोविसाव्या वर्षी ते लखनौला गेले आणि व्यावसायिकरित्या गाण्यास सुरुवात केली.

      September 9, 2021


  • गायत्री अरविंद जोशी

    सौ. गायत्री अरविंद जोशी, पुर्वाश्रमीच्या जयश्री रानडे, यांचा जन्म एका संगीतप्रेमी कुटुंबामध्ये झाला. संगीताची आवड ही त्यांच्या मातुल घराण्याची उपजत देणगी आहे. त्यांचे मामा सुरमणी श्री. ए. के. अभ्यंकर यांच नाव सुपरिचित आहे.

      August 20, 2010


  • डॉ. रघुपती सहाय उर्फ फिराक गोरखपूरी

    फिराक गोरखपूरी हे जात्याच अती बुद्धीमान होते. त्यांच्या घरी काही पंडितांचा राबता असल्याने ती बीजे त्यांच्या मनात पुर्वीपासूनच पेरली गेलेली होती. आपल्या कॉलेज जीवनात त्यांनी वर्डस्वर्थ, टेनीसन, तुलसी, कबीर, मीरा यांच्या साहित्याचा प्रगाढ अभ्यास केला. स्वामी रामतीर्थ यांचे वेदान्तावरील, विवेकानंदांची अनेक भाषणे यांचा अभ्यास केला.

      April 27, 2024


  • अपर्णा मोहिले

    अपर्णा मोहिले १९८२-१९८३ या काळात त्या फिल्म सेन्सॉर बोर्डाच्या कार्यकारी अध्यक्षा होत्या. तसेच १९९७-९८ या काळात त्या महाराष्ट्र आणि गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल होत्या. ३१ ऑगस्ट २००२ ला त्या ३७ वर्षांच्या प्रशासकीय सेवेतून निवृत्त झाल्या.

      June 18, 2022


  • वाळू शिल्पकार सुदर्शन पटनायक

    वालुकाशिल्प बनवणाऱ्या कलाकारांमध्ये भारतातील एकमेव आणि जगातील अग्रणी म्हणुन आज सुदर्शनचं नाव घेतलं जातं. बर्लीनच्या किनाऱ्यावर झालेल्या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट वाळुशिल्पकारचा किताब त्याने २००८ मध्ये, स्पर्धेतील त्याच्या पदार्पणातच जिंकला आणि जगभर त्याचा दबदबा निर्माण व्हायला सुरूवात झाली. आज सुदर्शनकडून या कलेचे धडे घेण्यासाठी जगभरातल्या सगळ्या समुद्रकिनाऱ्यावरचे लोक येतात. त्यासाठी त्याने सुदर्शन सॅण्ड आर्ट ईन्स्टीट्युट देखील स्थापन केले आहे.

      April 15, 2022


  • एकनाथ सोलकर

    हेल्मेट, रिस्टबँड, नीकॅप आदी संरक्षणाची विविध आयुधे फारशी प्रचलित नसताना खेळपट्टीजवळ क्षेत्ररक्षण करणे हेच एक आव्हान समजले जाणाऱ्या काळात फॉरवर्ड शॉर्टलेगला उभे राहून क्षेत्ररक्षणावर कारकीर्द गाजविणारा खेळाडू म्हणून भारताचा एकनाथ सोलकर याचा नावलौकिक होता.

    त्यांच्या नावाने मुंबईत क्रिकेट प्रशिक्षण अकादमी सुरू करण्यात आली आहे, यानिमित्ताने या महान खेळाडूच्या स्मृती जाग्या होतात. ‘कॅचेस विन मॅचेस’ हे तत्त्व यशस्वी करून दाखविणाऱ्यांमध्ये एकनाथ हा अग्रेसर होता. बिशनसिंग बेदी, एरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर व एस. वेंकटराघवन या भारतीय फिरकी गोलंदाजांच्या यशात एकनाथचा मोठा वाटा होता. झेल हे निर्माण करावयाचे असतात. क्रिकेटमधील श्रेष्ठ फलंदाज खेळपट्टीवर खेळत असताना त्यांचे कोणतेही दडपण न घेता खेळपट्टीजवळच उभे राहून क्षेत्ररक्षण करण्यात एकनाथ हा माहीर होता. आता क्षेत्ररक्षणासाठी जॉन्टी ऱ्होड्ससारख्या महान क्षेत्ररक्षकांचा सल्ला भारतामध्ये घेतला जातो, मात्र ज्या काळात असे परदेशी प्रशिक्षक सहजपणे उपलब्ध नसताना एकनाथने आपले चापल्य, अचूकता आणि झेपावत क्षेत्ररक्षण करण्याची शैली याच्या जोरावर कारकीर्द गाजविली.

    मैदानावर मुख्य ग्राऊंड्समनचे काम करणाऱ्या धोंडू सोलकर यांचा एकनाथ हा मुलगा. पाच भावंडांमधील या एकनाथने शालेय जीवनातच क्रिकेट कारकीर्दीचा ध्यास घेतला होता. त्याच्याकडील गुणवत्तेमुळे त्याला संधी मिळण्यास अडचण आली नाही. त्याने १९६४ मध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर त्याने १९६५-६६ मध्ये लंडन स्कूल्सविरुद्धच्या सामन्यात भारताचे कर्णधारपद भूषविले. एक्की या नावाने लोकप्रियता मिळविलेल्या या खेळाडूस १९६९ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध हैदराबाद येथे कसोटी पदार्पणाची संधी मिळाली. जेमतेम आठ वर्षांच्या कसोटी कारकीर्दीत त्याने २७ कसोटी सामने खेळले. त्यामध्ये त्याने एक शतक व सहा अर्धशतकांसह १०६८ धावा केल्या. त्याने १८ बळी घेतले. या २७ कसोटींमध्ये त्याने ५७ झेल घेत कौतुकास्पद कामगिरी केली.

    १९७१ मध्ये भारतास इंग्लंडविरुद्ध ओव्हल येथे जो ऐतिहासिक कसोटी विजय मिळाला, त्या कसोटीत त्याने अ‍ॅलन नॉट याचा घेतलेला झेल खेळास कलाटणी देणारा ठरला. त्याने पूर्णपणे शरीर झोकून घेतलेल्या या झेलचे सर्वच प्रसारमाध्यमांनी मुक्तपणे कौतुक केले होते. एकाच वेळी फिरकी व द्रुतगती अशा दोन्ही प्रकारे गोलंदाजी करणारा तो जगातील सर्वोत्तम डावखुरा गोलंदाज होता. १९७५ मध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत वेंकटराघवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघात एकनाथचा समावेश होता. एक दिवसीय सामन्यांमध्ये त्याची कामगिरी फारशी चमकदार झाली नाही. त्याने एक दिवसीय सात आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. मुंबईकडून खेळताना एकनाथने प्रथम श्रेणीच्या १८९ सामन्यांमध्ये भाग घेतला. त्यामध्ये त्याने आठ शतके व ३६ अर्धशतकांसह ६८५१ धावा केल्या. त्याने २७६ बळी घेतले. ३८ धावांमध्ये सहा बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी होती.

    एकाच डावात पाच किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याचा पराक्रम त्याने दहा वेळा केला, तर एकाच सामन्यात दहापेक्षा जास्त बळी घेण्याची कामगिरी त्याने एकदा केली. प्रसिद्धिपराङ्मुख असलेला एकनाथ हा अजातशत्रू खेळाडू होता. जेवढी त्याने आपल्या नेत्रदीपक क्षेत्ररक्षणाच्या जोरावर कारकीर्द गाजविली, तेवढे त्याचे फारसे कौतुक झाले नाही. त्याचा फारसा सन्मानही कधी झाला नाही किंवा आपल्यासाठी गौरवनिधी सामना घ्यावा अशीही त्याने कधी विनंती केली नाही. वयाच्या अवघ्या ५७ व्या वर्षी त्याने या जगाचानिरोप घेतला. मात्र त्याचे नेत्रदीपक क्षेत्ररक्षण चिरकाल स्मरणात राहील.

      August 5, 2017