(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर

    चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर "भूमिका'सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.

    हंसाबाईंचा जन्म मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. रतनवरचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं. तेव्हा रतनला तिच्या आई आणि आजीनं वाढवलं. रतनला संगीत आणि नृत्याचे धडे देण्यासाठी तिच्या आईनं त्या काळातले मोठमोठे उस्ताद आणि गवई यांना पाचारण केलं होतं. परंतु रतनचा सूर त्यांच्याशी काही जुळला नाही. उस्ताद घरी आले की रतन एकतर घरातून पळ काढे किंवा कुठं तरी लपून बसे. तेव्हा बयाबाईंनीच आपल्या नातीच्या जडणघडणीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या स्वतः रतनला शिकवायला लागल्या. गाण्यातली एक ओळ किती वेगवेगळे भाव दाखवून गाता येते, याचं प्रशिक्षण त्यांनी रतनला दिलं. रतन आपल्या आजीला "जीजी' या नावानं हाक मारीत असे. मराठी-हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकरचं "हंसा वाडकर' असं नामकरण झालं. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत कोणी फारसं चांगलं बोलत नसे. त्यामुळे या क्षेत्रातील आपल्या प्रवेशाचे चटके आपल्या कुटुंबीयांना बसू नयेत, या विचारानं रतननं आपलं नाव आणि आडनाव दोन्हीही बदललं. अर्थात हे नाव पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडलं गेलं. तो काळ असा होता, की मुलींची लग्न १५व्या- १६व्या वर्षी होत. चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हंसाबाईंना समाजाच्या या रूढीपुढं नमावं लागलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरवात झाली. हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते "प्रभात'च्या "संत सखू' चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती. या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या "लोकशाहीर राम जोशी' या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. "...सुंदरा मनामंदी भरली... हवेलीत शिरली... जरा नाही ठरली... मोत्याचा भांग....' या रामजोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्याशनं बहार आणली. या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी... सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या.

    "रामजोशी' चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंना व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली; मात्र अंगभूत गुणवत्ता, प्रचंड लोकप्रियता मिळूनही ती "कॅश' करण्याची कल्पकता हंसाबाईंना दाखविता आली नाही. या काळात त्यांनी "रामशास्त्री', "धन्यवाद', "पुढचं पाऊल', "मी तुळस तुझ्या अंगणी', "नायकिणीचा सज्जा', "सांगत्ये ऐका' यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं. पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडलं आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडींना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे चांगल्या भूमिका मिळण्याची संधी असूनही तिचा लाभ त्यांना उठवता आला नाही. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी "सांगत्ये ऐका' या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. "चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही,' असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. तो खरा की खोटा हा वादाचा विषय आहे. मात्र ग्लॅमर जगतामध्ये कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात आहे, तोपर्यंतच त्याचं सर्व काही सुरळीत सुरू असतं. एकदा हा प्रकाशझोत गेला की तो विस्मृतीच्या गर्तेत जातो. हंसाबाईंच्या उत्तरायुष्यात असंच काहीसं घडलं.

    संकटं आली की ती एकट्यानं येत नाहीत, याचा अनुभव हंसाबाईंना आला. वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं. मुंबईतल्या ग्लॅमरस जगातून बाजूला होत त्या विश्रांतीसाठी बराच काळ महाबळेश्वारला जाऊन राहिल्या होत्या. एक काळ त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यांच्या आजूबाजूला चित्रपटसृष्टीतील नामवंतांची गर्दी होती. स्टुडिओबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु ती गर्दी आता पांगली होती. एकटेपणा त्यांना अगदी असह्य झाला होता. आजारातून बरे होऊन पुन्हा कारकीर्द घडविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हा लावण्यसूर्य जो ढळला तो ढळलाच. तो पुन्हा तेजोमय झाला नाही. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी "सांगत्ये ऐका' या आत्मचरित्राद्वारे लिहून ठेवली. त्यानं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एके काळी खळबळ उडवून दिली होती. हे आत्मचरित्र "अभिनेत्री की आपबीती' या शीर्षकानं हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. या आत्मचरित्रावर वाचकांच्या उड्या पडल्या. चित्रपटसृष्टीतील नामवंतांचंही त्याकडे लक्ष गेलं. विख्यात लेखक-दिग्दर्शक श्यााम बेनेगल यांनाही त्याची भुरळ पडली आणि त्यांनी हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला "भूमिका' चित्रपट निर्माण केला. तोदेखील विलक्षण गाजला आणि या चित्रपटात हंसाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
    हंसाबाईंच्या आयुष्यात वादळी घडामोडी घडल्या नसत्या तर आज त्यांना चित्रपटसृष्टीत खूप वेगळं स्थान मिळालं असतं. परंतु, तसं घडणारं नव्हतं. कारण हंसाबाई म्हणजे एक शापित सौंदर्य होतं. हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- मंदार जोशी /विकिपिडीया

      January 25, 2017


  • जेष्ठ संगीतकार रवी

    तोंडात पटकन रुळतील आणि गुणगुणता येतील, अशा चाली देणे ही रवि शंकर शर्मा ऊर्फ रवी यांची खासियत होती. आपल्या सोप्या आणि गोडवा राखणाऱ्या संगीताने रवी यांनी स्वतःची ओळख निर्माण केली होती.

      March 3, 2018


  • तबलावादक पद्मश्री पंडित विजय घाटे

    विजय घाटे यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला शिकण्यास सुरवात केली. त्यांचा जन्म १८ ऑक्टोबर १९६४ रोजी मध्यप्रदेशातील जबलपूर येथे झाला. १२ व्या वर्षी त्यांनी तबलामधील विशारद पदवी मिळविली होती. वयाच्या १६ व्या वर्षी ते मुंबईत आले आणि बारा वर्षांहून अधिक काळ तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांच्या कडे गुरुकुल पध्दतीत शिक्षण घेतले. वयाच्या १६ व्या वर्षीही ते आपल्या चमकदार एकल म्हणजेच सोलो तबला वादनाने प्रसिद्ध झाले. विजय घाटे हे काही कलाकांरपैकी एक आहे जे गायन, वाद्य आणि नृत्य या तीनमध्ये निपुण आहेत.

    विजय घाटे यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान, उस्ताद विलायत खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अमजद अली खान, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित बिरजू महाराज, पंडित जसराज, उस्ताद शाहिद परवेझ आणि अनेक मान्यवर कलाकारांच्या सोबत साथ केली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय कलाकार प्रसिद्ध संगीत जेथ्रॉटेल सारख्या प्रसिद्ध संगीतकारांसोबत आणि जॉर्ज ड्यूकेस, अल्जेर्यु, रवी कॉलतारिन यांच्या सारख्यांना साथ दिली आहे. तसेच विजय घाटे यांनी गिसॉन्टी, लॅरी कॉरीयेल, जॉर्ज ब्रुक्स इ. त्यांनी लुई बॅंक, शंकर महादेवन, हरिहरन, शिवमणी या सुप्रसिद्ध भारतीय संगीतकारांसोबत काम केले आहे. विजय घाटे यांनी कर्नाटकी फ्युजन मध्ये डॉ. सुब्रायमॅनियम, विद्याभवन विनायकम, एम.एस गोपालकृष्णन व यू. श्रीनिवास यांच्या बरोबरही काम केले आहे. विजय घाटे नेदेरलंड मधील रॉटरडॅम मधील आर्ट कॉट्स युनीव्हसीटीत व्हिजीटींग फॅकल्टी म्हणून काम करतात.

    विजय घाटे यांनी पॅरिस येथे १९८४ साली भारत-फ्रांस फेस्टिव्हल, १९८५ साली भारत फेस्टिव्हल रशिया येथे, राष्ट्रपती भवन येथे आणि भारत भवन येथे भारतीय महोत्सव येथे आपल्या तबला वादनाची प्रतीभा दाखवली होती. ते सवाई गंधर्व संगीत महोत्सव, हरवलाभा संगीत महोत्सव, तानसेन समारोह, गुनीदास संमेलन, उस्ताद अखिलिया खान संगीत समारोह, कालिदास महोत्सव, खजुराहो महोत्सव, विष्णु दिगंबर संगीत उत्सव महोत्सवामध्ये आपले उत्कृष्ट तबला वादन प्रदर्शित करत असतात. विजय घाटे यांनी तालचक्र नावाचा एक ट्रस्ट स्थापन केला असून तो तरुण आणि नवीन कलाकारांसाठी व्यासपीठ पुरवते आणि आर्थिक दुर्बल घटकांमध्ये संगीतकारांना मदत करते. या ट्रस्टने अनुभवी संगीतकारांकडून संगीत कार्यशाळा आयोजित करण्याची आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल वातावरणात असलेल्या संगीतकार व संगीत शिक्षकांसाठी पेन्शन योजना सुरू करण्याची योजना आखली आहे. तालाचक ट्रस्ट शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांना प्रोत्साहित करतो.

    विजय घाटे यांनी 'विजय' नावाचा आपला अल्बम प्रसिद्ध केला आहे. विजय घाटे यांना पं. जसराज पुरस्कार, सरस्वती बाई राणे पुरस्कार, डॉ. वसंतराव देशपांडे पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. भारत सरकारने त्यांचा २०१४ मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      November 1, 2017


  • चरित्रकार सुमती देवस्थळे

    आज २७ डिसेंबर आज चरित्रकार सुमती देवस्थळे यांचा जन्म २७ डिसेंबर १९२७ रोजी झाला. सुमती देवस्थळे यांची अत्यंत अभ्यासपूर्ण आणि लालित्यपूर्ण भाषेत सर्वच चरित्रं अत्यंत लोकप्रिय झाली होती. टॉलस्टॉय एक माणूस, मॅक्झिम गॉर्की, छाया व ज्योती, एक विचारवंत (मार्क्स), अल्बर्ट श्वाइत्झर, सप्तर्षी आणि अरुंधती अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. सप्तर्षी आणि अरुंधती या पुस्तकात त्यांनी आठ प्रतिभावंतांच्या चरितकथा मांडल्या. टॉलस्टॉय एक माणूस यात टॉलस्टॉयचे चरित्र लिहिताना.

    विश्वशांतीचा मार्गदर्शक, अलौकिक प्रतिभासंपन्न साहित्यिक, दीन-दुबळ्यांचा कैवारी, सत्याचा उपासक, अभिनव प्रयोग करणारा शिक्षणशास्त्रज्ञ, अविरतपणे आत्मशोधनात मग्न असणारा, विश्वबंधुत्वाचा संदेश देणारा, शांतीने प्रतिकार करा असा आग्रह धरणारा टॉलस्टॉय एकीकडे दिसतो. तर दुसरीकडे 'वॉर ऑण्ड पीस'सारखे युद्धविरोधी लिखाण लिहिलेला, मात्र तरुणपणी स्वत: आघाडीवर राहून लढलेला, गरिबांचा कळवळा असला तरी कुटुंबाचे हाल नको,या सबबीखाली जमीनदारी थाटात राहणारा, वेगवेगळ्या क्षेत्रांत शिरुनही त्यात सातत्य न टिकवणारा, संयमाचा मंत्र सांगूनही स्वत: विषयासक्त असणारा असा टॉलस्टॉय आहे असे त्यांनी दाखवून दिले.

    सुमती देवस्थळे यांचे २२ जानेवारी १९८२ रोजी निधन झालं.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 27, 2018


  • कृषी कर्मयोगी दादासाहेब बोडके

    सोलापुर जिल्ह्यातील अनगर गावातील दादासाहेब बोडके हे एक कर्तबगार शेतकरी आहेत. अल्पशिक्षित असले तरी शेतीच्या विद्यापीठात पीएच.डी शोभतील असे दादांचे कर्तृत्व आहे. त्यांनी आपल्या शेतीत असंख्य प्रयोग केले. अनेक पिकांची लागवड केली. शेडनेट, पॉलीहाऊस आदी तंत्रे आत्मसात केली.

      October 26, 2015


  • ज्येष्ठ अभिनेते जयराज

    पी. जयराज यांनी हिंदी, मराठी, गुजराथी चित्रपटात कामे केली बोलपटाच्या काळात त्यांनी उर्दू आणि इंग्रजी भाषेमधील चित्रपटात कामे केली. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर १९०९ रोजी झाला. पी. जयराज यांनी १७० हून अधिक चित्रपट मध्ये कामे केली.

    व्ही.शांताराम, पृथ्वीराज कपूर, मोतीलाल यांच्या बरोबर पी. जयराज यांनी कामे केली. त्यांनी मोहर, माला, प्रतिमा,राजघर,सागर अशा चित्रपटांचे दिग्दर्शन पण केले. १९८० साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पी.जयराज यांचे निधन ११ ऑगस्ट २००० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      August 11, 2017


  • मोटर शर्यतीतील गतीची सम्राज्ञी शर्ले मलडावनी

    मी गतीचे गीत गाई’ हे बाबा आमटे यांच्या एका गीतासारखे बोल रक्ताच्या थेंबाथेंबात जागवतच शर्ले मलडावनी हिचा अमेरिकेत जन्म झाला असावा! लहानपणी हायस्कूलमध्ये शिकत असतानाच न्यूयॉर्कमधील शेनेक्टॅडी (Schenectady) येथील रस्त्यांवरील शर्यतीत आपल्या गावातील मुलांबरोबर शर्ले दांडगाईने वागत असे.

      December 19, 2023


  • गुरुनाथ नारायण धुरी

    “ग्लोरिया”, “समुद्रकविता”, “लालकोवळा काळोख” हे त्यांचे कवितासंग्रह, तर “आदिकाळोख” हा ललितगद्य लेखांचा संग्रह ही त्यांची ग्रंथसंपदा. त्यांची कविता गूढ, चिंतनात्मक व जीवनाच्या सखोल जाणिवेची असल्याचा समीक्षकांचा अभिप्राय आहे.

      November 7, 2017


  • ज्येष्ठ अभिनेते, नाटय़निर्माते शफी इनामदार

    शफी इनामदार यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शन यावर आपल्या चतुरस्र् अभिनयाचा ठसा उमटविला. त्यांचा जन्म २३ ऑक्टोबर १९४५ रोजी झाला.त्यांनी विजेता पासून आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात केली आणि अर्ध सत्य हा त्यांचा शेवटचा चित्रपट. ये जो है जिंदगी या दूरदर्शन मालिकेत पण त्यांनी प्रभाव दाखवला. मा.भक्ती बर्वे ह्या शफी इनामदार यांच्या पत्नी. त्यांचे काही यशस्वी चित्रपट कुदरत का कानून, जुर्म,सदा सुहागन, प्रेम ८६. शफी इनामदार यांचे १३ मार्च १९९६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 15, 2017


  • सरदार आबासाहेब मुजुमदार

    आबासाहेब मुजुमदार हे स्व तः उत्ताम सतारवादक होते. तंतूवाद्यावर त्यांंची हुकूमत होती. ते केवळ पाच मिनीटांत तंबोरा लावत असत. ब्रिटीश कालावधीत ते फर्स्ट क्लास सरदार होते. त्या काळात सरदार, इनामदार, जहागिरदार या सर्वांचा मतदार संघ होता. आबासाहेब मुजुमदार त्यााचे प्रतिनिधित्वी करत.

      February 1, 2022