(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पंडित जवाहरलाल नेहरु

    कार्यकाळ : १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४

    स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरु यांची ओळख आहे. त्यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ रोजी अलाहाबाद येथे झाला. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान आणि स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे ते लोकप्रिय नेते होते. ७ फेब्रुवारी १९१६ रोजी वयाच्या २६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला. सन १९१७ साली त्यांना इंदिरा प्रियदर्शिनी हे कन्यारत्न प्राप्त झाले. त्यांचे शालेय शिक्षण घरीच खासगी शिकवणीद्वारे घेण्यात येत असे. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे हॅरो येथे शिक्षणानिमित्त गेले. केंब्रीज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान या विषयाची पदवी घेतली. १९१२ साली भारतात परतल्यानंतर त्यांनी सामान्य राजकारणात प्रवेश केला. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना स्वातंत्र्यसंग्रामाबाबत विशेष रुची होती. त्यामुळे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आपसूकच खेचले गेले. सन १९१२ साली बंकीपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या विशेष अधिवेशनात त्यांची प्रमुख उपस्थिती होती. १९१९ साली होमरुल चळवळीचे अध्यक्षस्थानही त्यांनी भूषवले. सन १९१६ साली त्यांची महात्मा गांधी यांच्याशी पहिल्यांदाच भेट झाली. या भेटीने प्रभावित झालेल्या जवाहरलाल नेहरु यांनी त्यानंतर १९२० साली उत्तर प्रदेश राज्यातील प्रतापगड जिल्ह्यात पहिला किसान मोर्चा काढला. याच दरम्यान त्यांना असहकार आंदोलनामुळे दोन वर्षे कारावास भोगावा लागला. अल्मोरा कारागृहात त्यांनी आपले आत्मचरित्र पूर्ण केले. त्यांनी एकूण नऊ वेळा कारावास भोगला.

      April 29, 2017


  • हॉलीवूडची सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ग्रेटा गार्बो

    हॉलीवूडची सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री ग्रेटा गार्बो यांचे मूळ नाव ग्रेटा लूव्हिसा गस्टाव्हसॉन. ग्रेटा गार्बो यांचा जन्म १८ सप्टेंबर १९०५ रोजी स्वीडन मधील स्टॉकहोम येथे झाला.

    ग्रेटा गार्बो या वयाच्या चौदाव्या वर्षी पदवीधर झाल्या. वडिलांच्या मृत्यूनंतर घरच्या गरिबीमुळे त्यांना अनेक प्रकारची कामे करावी लागली. पुढे एरिक पेटशलर या दिग्दर्शक-अभिनेत्याशी तिची योगायोगाने गाठ पडली. त्याच्या प्रयत्नामुळेच त्यांनी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला.

    पीटर द ट्रॅम्प या चित्रपटात प्रथम त्यांनी १९२२ मध्ये काम केले. पुढे १९२२ ते १९२४ या कालावधीत स्टॉकहोम येथील रॉयल ड्रॅमॅटिक थिएटरमध्ये त्यांनी अध्ययन केले, याच काळात त्यांचा मॉरिटस स्टीलर या स्वीडिश दिग्दर्शकाशी परिचय झाला. त्यांनी ग्रेटा गार्बो यांना दि स्टोरी ऑफ गोस्टा बर्लिंग या चित्रपटात महत्त्वाची भूमिका दिली. याच वेळी तिचे मूळ नाव बदलून ग्रेटा गार्बो असे ठेवण्यात आले. १९२५ मध्ये त्या स्टीलरसमवेत अमेरिकेला गेल्या. अमेरिकेमध्ये ग्रेटा गार्बो यांनी मेट्रो गोल्डविन मेयर या कंपनीच्या २४ चित्रपटांतून काम केले. त्यांपैकी द टॉरंट (१९२६), फ्लेश अँड द डेव्हिल (१९२७), लव्ह (१९२७), वाइल्ड ऑर्किड्स (१९२९), अॅाना ख्रिस्ती (१९३०), माताहारी (१९३१), ग्रँड हॉटेल (१९३५), अॅाना कॅरेनिना (१९३५), कॅमिल (१९३७) व निनोत्‌च्‌का (१९३९) हे तिचे प्रमुख व नावाजलेले चित्रपट होत. त्यांतही द टोरंट हा तिचा पहिला अमेरिकन चित्रपट आणि अॅ२ना ख्रिस्ती हा तिचा पहिला बोलपट होता. टू फेसेड वुमन (१९४१) या चित्रपटानंतर ग्रेटा गार्बो चित्रपटक्षेत्रातून निवृत्त झाली.

    ग्रेटा गार्बोच्या भूमिकांमुळे चित्रपटातील स्त्रीभूमिका अधिक नैसर्गिक, प्रगल्भ व उज्ज्वल बनली. स्त्रीभूमिकांना एक प्रकारचा उच्च दर्जा प्राप्त झाला. आकर्षक शरीरयष्टी, पिंगट केस, निळसर डोळे, गूढ पण मधुर हास्य व अभिनयकुशलता या गुणांमुळे चित्रपटसृष्टीत त्यांना ‘डिव्हाइन गार्बो’ म्हणत असत. कॅमेऱ्यासमोर विलक्षण सहजतेने काम करण्याच्या तिच्या नैसर्गिक प्रवृत्तीचे दिग्दर्शकांनी व चित्रपटसमीक्षाकांनी विशेष कौतुक केले आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सर्वश्रेष्ठ चित्रपट अभिनेत्री म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

    बुद्धिमत्तेची चमक, विलोभनीय सौंदर्य आणि कलात्मक अलिप्तता या सर्व गुणांमुळे ती एक अनन्यसाधारण अभिनेत्री ठरली. गार्बो यांनी अवघ्या १९ वर्षे हॉलीवुड मध्ये काम केले. या दरम्यान त्यांनी एकूण २७ चित्रपटांमधे काम केलं. वयाच्या ३६ व्या वर्षी त्यांनी निवृत्ति पत्करली. निवृत्तीनंतर १९५१ मध्ये त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले. सुचित्रा सेन यांना आपल्या तत्वनिष्ठतेमुळे भारतीय 'ग्रेटा गार्बो' असे संबाधले जात असे.

    ग्रेटा गार्बो यांचे १५ एप्रिल १९९० निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      April 17, 2017


  • लेखक आणि पटकथालेखक य. गो. जोशी

    य.गो. जोशी (यशवंत गोपाळ जोशी) हे मराठीतील उत्तम लेखक आणि पटकथालेखक होते. ’अन्नपूर्णा’, ’वहिनींच्या बांगड्या’, ’शेवग्याच्या शेंगा’, ’माझा मुलगा’ या यशस्वी मराठी चित्रपटांच्या कथा आणि पटकथा य.गो. जोशींच्या होत्या..

      May 22, 2019


  • दिलीप पुरुषोत्तम चित्रे

    संत तुकारामांना इंग्रजीत नेणारे ज्येष्ठ साहित्यिक, प्रयोगशील कवी, वारकरी परंपरेचे अभ्यासक, चित्रपटकार व चित्रकार दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे बहुआयामी व्यक्तिमत्व होते.

      December 28, 2018


  • चिंतामणराव कोल्हटकर

    संगीतरंगभूमीवरील सुप्रसिद्ध मराठी गद्यनट आणि नाट्यनिर्माते अभिनेते चिंतामणराव कोल्हटकर जन्म १२ मार्च १८९१ रोजी झाला. चिंतामणराव कोल्हटकर यांचे वडील वर्तमानपत्र लेखक व उत्कृष्ट वक्ते होते. चिंतामणरावांच्या वयाच्या सातव्या वर्षीच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यांना नाटके वाचण्याची आणि करण्याची अतिशय आवड होती. ते महाराष्ट्र नाटक मंडळीत १९११ मध्ये दाखल झाले आणि पुढच्याच वर्षी ते ’भरत नाटक मंडळी’त गेले. १९१४ मध्ये ते ’किर्लोस्कर नाटक मंडळी’त आले आणि त्यांचा भाग्योदय झाला.

    १९१८ मध्ये त्यांनी दीनानाथ मंगेशकरांच्या भागीदारीत त्यांनी ’बलवंत नाटक कंपनी’ काढली. त्यानंतर त्यांनी नाट्यक्षेत्रात अनेक विविध भूमिका पार पाडल्या. अगदी होतकरू नटापासून सुरुवात करून मग प्रमुख भूमिका केल्या. १९३३ मध्ये चितामणरावांनी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली. त्यांची वसंतसेना या चित्रपटातली भूमिका गाजली. पुढे त्यांनी गंगाधरपंत लोंढे यांच्या ’राजाराम संगीत मंडळी’त प्रवेश केला आणि परत नाटकांतून कामे करायला सुरुवात केली. पुढे ते मो.ग. रांगणेकरांच्या ’नाट्यनिकेतन’ मध्ये गेले. अखेरीस त्यांनी 'ललित कला कुंज' नावाची स्वतःची नाटक मंडळी काढली. या कंपनीनेच पु.ल. देशपांडे यांना उदयास आणले. चिंतामणराव कोल्हटकरांनी मराठीबरोबरच हिंदी आणि उर्दू नाटकांतही भूमिका केल्या आहेत. पुण्यप्रभाव या नाटकातील त्यांच्या भूमिकेबद्दल त्यांचा मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. त्यांचे विविधढंगी काम पाहून जवाहरलाल नेहरूंमी त्यांना बहुरूपी म्हणून नावाजले होते. त्यामुळेच चिंतामणरावांनी आपल्या आत्मचरित्राला ’बहुरूपी’” हे नाव दिले आहे.

    जवळजवळ ५० वर्षे त्यांचा रंगभूमीवरील कलाकारांशी कधी नाटककार म्हणून, कधी नट म्हणून तर कधी दिग्दर्शक म्हणून संबंध येत गेला. जेष्ठ नट चित्तरंजन कोल्हटकर हे चिंतामणरावांचे सुपुत्र होते. चिंतामणराव कोल्हटकरांच्या भूमिकांनी गाजलेली नाटके : पुण्यप्रभाव, राजसंन्यास, भावबंधन वगैरे. 'वेड्यांचा बाजार' हे राम गणेश गडकरी यांचे अपूर्ण नाटक पुढे मा.चिंतामणराव कोल्हटकर यांनी पूर्ण केले.

    चिंतामणराव हे १९४६ साली अहमदनगर येथे भरलेल्या ३५ व्या, आणि इ. स. १९४९ मध्ये कोल्हापूर येथे भरलेल्या ३६व्या नाट्यसंमेलनांचे अध्यक्ष होते. मा.चिंतामणराव कोल्हटकर यांना रंगभूमीच्या सेवेबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते सुवर्णपदक देऊन शासनाने त्यांचा सन्मान केला. मा.चिंतामणराव कोल्हटकर यांचे २३ नोव्हेंबर १९५९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 12, 2018


  • ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर

    मंगेश तेंडुलकर हे अखेरपर्यंत कार्यरत असणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्व होते. मंगेश तेंडुलकर यांनी ९० हून अधिक व्यंगचित्र प्रदर्शन आयोजीत केली होती. स्वतःचा मृत्यू या विषयावरही त्यांनी व्यंगचित्रांची मालिका बनवली होती.

      November 15, 2021


  • संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता

    पूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत पंजाबी, बंगाली व हिंदी भाषिक संगीतकारांची मांदियाळी असताना वसंत देसाईंचा सन्माननीय अपवाद वगळता बहुसंख्य मराठी संगीतकारांनी इंग्रजी आद्याक्षरांचा आसरा घेत मराठीपण लपविण्याचा प्रयत्न केला. के. दत्ता (कोरगावकर) सी. रामचंद्र (चितळकर) दत्ताराम(वाडकर), सुधीर (फडके) यांसारख्या मराठमोळ्या संगीतकारांनी आपली आडनावे खुबीने लपवीत या क्षेत्रात मुसंडी मारली. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी के. दत्ता यांच्याकडे सहाय्यक संगीत दिग्दर्शकाचे काम केले होते. १९५४ साली के.दत्ता यांनी संगीत दिलेल्या 'रिश्ता' या चित्रपटातही लता मंगेशकर यांचे साजन से पहली बार, व तलत मेहमूद यांनी गायलेले 'वोही चांदनी है' ही गाणी त्या काळी गाजलेली होती. मा.के.दत्ता यांनी अनेक हिन्दी व मराठी चित्रपटाना संगीत दिले. काही चित्रपट, याद, बडी माँ, दामन, नादान, रिश्ता, चंद्रराव मोरे, सुखाचा शोध, गीता, गोरखनाथ, गोरा कुंभार, सूनबाई, महात्मा विदूर, हरिहर भक्ती, रायगडचा बंदी मा.के.दत्ता यांचे २३ डिसेंबर १९७९ रोजी निधन झाले.

    संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता यांचे मराठीसृष्टीवरील लेख.

    संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता (7-Jan-2017)

    संगीतकार दत्ता कोरगावकर उर्फ के.दत्ता (26-Dec-2017)

      May 4, 2022


  • लेखक, कवी, नाटककार, राम गणेश गडकरी

    ‘मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा।
    प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा।।

    असे अप्रतिम काव्य लिहिणारे गोविंदाग्रज. त्यांचा जन्म २६ मे १८८५ रोजी झाला. मुलासकट माणुसकीला, सिंधुसकट संसाराला, सद्गुणासकट सुखाला, जगासकट जगदीश्वराला या सुधाकराच्या निर्वाणीच्या निराशेतला अखेरचा प्रणाम, अशी नादमधुर भाषा लिहिणारे नाटककार मा.राम गणेश गडकरी! बाळकराम या टोपण नावाने विनोदी लेखन करणारे गडकरी! मा.राम गणेश गडकरी म्हणजे मराठी नाटय़- साहित्य क्षेत्रातला चमत्कारच आहे.
    गडकरी यांचे शालेय शिक्षण पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल व त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले.

    महाविद्यालयात शिकत असताना मित्राच्या ओळखीने गडकरी 'किर्लोस्कर नाटक मंडळी'त दाखल झाले. या किर्लोस्कर नाटक मंडळीने चालवलेल्या रंगभूमी नावाच्या मासिकातून, तसेच शिवराम महादेव परांजपे यांच्या काळ वृत्तपत्रातून व हरीभाऊ आपट्यांच्या 'करमणूक' नियतकालिकातून ते कविता, लेख लिहू लागले. कविताा व लेखांसोबतच ते नाट्यलेखनही करू लागले. गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत.त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. भावबंधन, एकच प्याला सारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे. राम गणेश गडकरी या नावाने नाटके लिहिणार्याि, गोविंदाग्रज नावाने काव्यलेखन करणार्याा या प्रतिभावंत साहित्यकाराने 'बाळकराम' या नावाने विनोदी लेखनही केले, सुरुवातीला 'मनोरंजन' नावाच्या मासिकात ' रिकामपणची कामगिरी' सारखे विनोदी लेखन ते करू लागले होते. तेंव्हा ते 'नाटक्या', 'सावाई नाटक्या' या टोपण नावांनी लेखन करत असत.'संपूर्ण बाळकराम' या पुस्तकात त्यांचे विनोदी लेखन संकलित केले गेले आहे. 'एकच प्याला', 'भावबंधन' या नाटकांमधील बळीराम व धुंडीराज यांच्यामार्फत त्यानी विनोद प्रकट केला आहे. गंभीर आशय आणि वैचारिक विवेचनाला विनोदाची झालर लावण्याची हातोटी त्यांना साधली होती. त्यांच 'ठकीच लग्न'ही खूप गाजल. आपल्या विनोदात गडकर्यांकनी अतिशयोक्ती तसेच वक्रोक्तीचाही वापर केला आहे. मा.गडकऱ्यांचे विनोदी लेखन त्यांच्या संपूर्ण बाळकराम ह्या पुस्तकात एकत्रितपणे मिळते. नाट्यछटेपासून ते संवाद आणि विडंबनापर्यंत विविध प्रकारांतून गडकऱ्यांनी विनोद हाताळला. संपूर्ण बाळकरामचे पानन्‌पान खरोखरीच उच्च अभिरुचीच्या हास्यरसाची निर्मिती करणारे आहे. पुढे त्यांतील काही लेखांचा संग्रह 'रिकामपणची कामगिरी' ह्या नावाच्या पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाला. मा.राम गणेश गडकरी यांचे २३ जानेवारी १९१९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 23, 2017


  • महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री  मनोहर जोशी

    शिवसेनेच्या इतिहासात मा.बाळासाहेबांप्रमाणेच मनोहर जोशी यांचे स्वतंत्र स्थान होते. शिवसेनेची स्थापना जून १९६६ मध्ये झाली. १९६७ एप्रिलमध्ये मनोहर जोशी यांनी पक्षसंघटनेत प्रवेश केला. तेंव्हापासून आजपर्यंत ५० वर्षांपेक्षा अधिक काळ शिवसेनेतील चढऊतारांचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते. नगरसेवक, महापौर, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते केंद्रात मंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष असा त्यांचा प्रवास आहे.

      March 1, 2024


  • दूरदर्शनवरील कल्पक निर्मात्या म्हणून ख्याती प्राप्त करणाऱ्या विजया जोगळेकर धुमाळे

    संगीत आणि सायकॉलॉजीमध्ये एम. ए. केलेल्या विजया जोगळेकर यांना १९७२ साली अनपेक्षितपणे दूरदर्शनवर नोकरी लागली आणि त्यांच्या आवडीचं विश्व नकळतपणे हाताशी आलं. ‘किलबिल’ या कार्यक्रमासाठी याकूब सईदना मदत करत असतानाच त्या या नोकरीत कायम झाल्या आणि त्यांच्या मनातल्या कल्पनांना जणू पंख फुटले.

      April 27, 2024