जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
छायाचित्रकार, नाट्यनिर्माते, नाट्यदिग्दर्शक, प्रकाशयोजनाकार, नेपथ्यकार मोहन वाघ यांचा जन्म ७ डिसेंबर १९२९ रोजी झाला.
मोहन वाघ मूळचे कारवारचे. जे. जे. कला महाविद्यालयातील शिक्षण अर्धवट सोडलेल्या वाघांनी नंतर छायाचित्रकारिता सुरू केली. छायाचित्रणापासून करिअरची सुरूवात करणारे मोहन वाघ नंतर नेपथ्य, नाट्यदिग्दर्शक आणि नाट्यनिर्माते म्हणून नावारूपास आले. कमाल अमरोहींच्या पाकिजासाठी त्यांना डिझाईनचा राष्ट्रपती पुरस्कार मिळाला. नाटकाच्या प्रेमापोटी ते त्या कलेकडे वळले. अनेक नाटकांसाठी त्यांनी नेपथ्यरचना केली. त्यानंतर या कलेच्या प्रेमापोटीच त्यांनी चंद्रलेखा ही नाट्यसंस्था काढली. चंद्रलेखा हे खरे तर नाटककार वसंत कानेटकरांच्या मुलीचे नाव. त्यांनीच हे नाव वाघांना सुचवले आणि ही नाट्यसंस्था जन्माला आली. या संस्थेतर्फे त्यांनी अनेक दर्जेदार नाटके रंगभूमीवर आणली.
चंद्रलेखाची नाटके म्हणजे नेपथ्यापासून, कथा, सादरीकरण, कलावंत आणि अभिनय यांचा दर्जा असा अलिखित नियम होऊन बसला. ऑल दी बेस्ट ही एकांकिका पाहिल्यानंतर तिचे नाटकात रूपांतर करण्याचे व्यावसायिक धाडस त्यांनीच दाखवले आणि हे नाटक यशस्वीही करून दाखवले. या नाटकाच्या माध्यमातून संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, भरत जाधव, श्रेयस तळपदे हे कलावंत पुढे आले. दरवर्षी ३१ डिसेंबरला नवे नाटक आणण्याचा पायंडा पाडून तो त्यांनी कसोशिने पाळला. मोहन वाघांनी तब्बल ८३ नाटकांची निर्मिती केली. त्यांचे १५,६४७ एवढे प्रयोग केले, पण त्यांची फक्त १५ नाटकंच व्यावसायिकदृष्टय़ा यशस्वी ठरली. तरीही प्रत्येक कलाकाराला प्रयोगानंतर पाकीट द्यायलाच हवं, आजचं पाकीट उद्या द्यायचं नाही, हा त्यांचा नियम होता. नाटक चांगले पैसे मिळवून देवो अथवा नाही, पण त्यांनी कधीही कलाकारांना मानधनासाठी रखडून ठेवलं नाही. ही त्यांची शिस्त होती.
त्यातही रणांगण, स्वामी, बटाट्याची चाळ, ऑल द बेस्ट ही नाटके तुफान गाजली. प्रेमगंध, बहुरूपी आणि एक तिकीट सिनेमाचं ही नाटके तर उत्कृष्ट नेपथ्यामुळेही गाजली. नेपथ्यामुळे नाटक गाजविण्याचाही विक्रम मोहन वाघ यांनी प्रस्थापित केला. मोहन वाघांनी नवख्या कलाकारांना घेऊन केलेल्या ऑल दी बेस्ट नाटकाचे तीन हजारांवर प्रयोग झाले आहेत. भरत जाधव, अंकुश चौधरी, संजय नार्वेकर या सध्या मराठी सिनेसृष्टीत गाजणार्याआ नटांना मोहन वाघांनीच ऑल दी बेस्टमधून ब्रेक दिला. त्यांच्या गरूडझेप या नाटकाने मराठी रंगभूमीवर विशेष स्थान निर्माण केले. नाट्यपरिषदेने त्यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविले होते. लता मंगेशकर, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांचे ऋणानुबंध होते. बाळासाहेबांनी तर त्यांना कॅमेराही दिला होता. रंगमंचासोबतच त्यांनी कॅमेरा हे माध्यमही अतिशय समर्थपणे पेलले. फोटोग्राफीची अत्यंत आवड असणाऱ्या लतादीदींनी तर याचे धडे मोहन वाघ यांच्याकडून गिरविले.
दीदींसह असंख्य तारे-तारका आणि सुनील गावस्कर यांच्यासारखे क्रिकेटपटू मोहन वाघ यांना आपल्या जिव्हाळ्याच्या आप्तेष्टांपैकी मानत असत. पु.ल. देशपांडे, व्हि. शांताराम, बाळासाहेब ठाकरे, लता मंगेशकर या आणि अनेक विभुतींचे फोटो त्यांच्या कॅमेर्यााने टिपले. ते फोटो 'वाघांचे फोटो' म्हणून ओळखले जावेत असा त्यांचा ठसा त्यावर उमटलेला आहे. त्यांच्या या फोटोग्राफीबद्दल खुद्द लतादिदींनी त्यांना 'हे तर फोटोग्राफीतले लता मंगेशकर आहेत, अशी कौतुकफुले उधळली होती. मोहन वाघ यांच्यामुळेच मधुबाला, नर्गिस, वैजयंतीमाला या गाजलेल्या अभिनेत्रींची विलोभनीय छायाचित्रे लोकांसमोर येऊ शकली. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांचे जावई.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 7, 2017
पनवेल मधील स्वातंत्र्यलढ्यामध्ये भाग घेतलेले श्री. गजानन नीळकंठ गुप्ते हे त्या वेळच्या प्रसिद्ध व नावाजलेल्या कै. नीळकंठ गुप्ते यांचे चिरंजीव.
June 1, 2010
संदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत.
August 16, 2011
ना.घ. देशपांडे यांचे पूर्ण नाव नागोराव घन:श्याम देशपांडे. त्यांचा जन्म नागपंचमी च्या दिवशी झाला म्हणून नाव नागोराव ठेवण्यात आले असे म्हणतात. त्यांचा जन्म २१ ऑगस्ट १९०९ रोजी झाला.
May 10, 2019
‘अरण्यक’ हे नाटक त्यांनी पहिल्यांदा १९७४ मध्ये रत्नाकर मतकरींच्या बरोबर केले आणि वयाच्या ८४ व्या वर्षीही ते ह्या नाटकात तीच धृतराष्ट्राची भूमिका करत असत.
July 20, 2022
हिरवे तळ कोकण' लिहिणारे काटदरे हे अर्थातच कोकणातील होते. त्यांचा जन्म ३ डिसेंबर १८९२ रोजी झाला. पण त्यांचे बरेचसे आयुष्य नोकरीनिमित्त मुंबईत गेले. त्यांची नोकरी कस्टम खात्यात होती. माधव काटदरे यांनी केवळ निसर्गकविताच लिहिली, असे नाही. ऐतिहासिक कविताही त्यांनी विपुल लिहिली. छत्रपती शिवाजीमहाराज, शाहूमहाराज, सवाई माधवराव, मस्तानी अशा विविध व्यक्तिरेखा त्यांनी काव्यबद्ध केल्या. याशिवाय शिशुगीते, विनोदी कविताही त्यांच्या लेखणीतून झरल्या. काटदरे यांनीही गोविंदाग्रजांच्याच धर्तीवर बालकवी त्र्यंबक बापूजी ठोमरे, कविवर्य़ ना. वा. टिळक, गोविंदाग्रज, कवी विनायक आदी कविश्रेष्ठांवर कविता लिहून त्यांना नमन केलेले आहे. ऐतिहासिक कवितांमध्ये 'पानपतचा सूड', 'तारापूरचा रणसंग्राम', 'जिवबादादा बक्षी' या त्यांच्या कविता उल्लेखनीय आहेत. रवींद्रनाथ टागोर यांच्या काही कवितांचीही अतिशय प्रासादिक भाषांतरेही काटदरे यांनी केलेली आहेत.
काटदरे यांची रचना विलक्षण सुघड, सौष्ठववूर्ण आहे. मा.काटदरे यांची स्वतःची घाटदार रचना शैली होती. 'ध्रुवावरील फुले', 'फेकलेली फुले' हे त्यांचे संग्रह प्रसिद्ध आहेत अनुक्रमे १९१५ व १९२१ साली ते प्रकाशित झाले. 'हिरवे तळकोकण' ही कविता १९२१ साली लिहिलेली आहे. माधवांची कविता (१९३५) व गीतमाधव (१९४२) हेही त्यांच्या कवितांचे संग्रह आहेत. काटदरे यांच्या कवितेचा विशेष म्हणजे जुने अनेक सुंदर सुंदर शब्द ते कवितांमध्ये आवर्जून वापरत असत. वापरात नसलेले; पण नेमका अर्थ व्यक्त करणारे शब्द वापरण्याची त्यांची ही खुबी अनेक कवितांमधून आढळते. माधव केशव काटदरे यांचे ३ सप्टेंबर १९५८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 3, 2017
मजरुह सुलतानपुरी आणि एस. डी. बर्मन यांची जोडी चागलीच जमली होती त्यांनी अनेक हिट गाणी दिली. परंतु त्यांनी नौशाद , मदन मोहन , रोशन , रवि , शंकर जयकिशन , ओ . पी . नय्यर , उषा खन्ना , लक्ष्मीकांत-प्यारेलाल , अन्नू मलिक , आर. डी . बर्मन , राजेश रोशन , जतीन – ललित , लेस्ली लेज लेव्हीज , आनंद मिलिंद , आणि ए . आर. रहमान या संगीतकारांबरोबर गाणी केली. नीट पाहिले तर तीन-ते-चार पिढ्याबरोबर काम केले. संगीतकार बदलले , हिरो बदलले परंतु बदलत्या काळाबरोबर , लोकांबरोबर ते लिहीत राहिले. त्याशिवाय उत्तमोत्तम गजल त्यांनी लिहिल्या.
June 2, 2021
मराठी गद्य रंगभूमीचे जनक, लोकमान्य टिळकांचे सहकारी आणि नवाकाळ दैनिकाचे संस्थापक संपादक असलेल्या कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी झाला.
सांगली हायस्कूलमध्ये कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे शिक्षण झाल्यानंतर तेथेच कांही काळ ते शिक्षकही होते. कॉलेजमध्ये शिकत असतांना नाट्यवाङ्मयाचा सूक्ष्म अभ्यास केला. तत्वज्ञान हा त्यांचा खास विषय होता. `सवाई माधवरांचा मृत्यू `हे नाटक लिहून त्यांनी आपल्या नाट्यलेखनास प्रारंभ केला. काकासाहेब वकील व्हावे या उद्देशाने मुंबईस अभ्यासासाठी गेले होते. पण राजकीय जागृतीच्या शिक्षणाचा जनतेत प्रसार करण्याची कामगिरी सुशिक्षित तरुणांनी अवश्य केली पाहिजे असे काकांना वाटत होते. त्यामुळेच ते टिळकभक्त झाले. गौतमबुद्ध हा तत्वज्ञानावरील चरित्रपट प्रबंध विविध ज्ञानविस्तार मासिकांत प्रसिद्ध झाला. पुढे काका लो.टिळकांना भेटले. पहिल्या भेटीत काकांना केसरीसाठी लेख लिहण्यास त्यांनी सांगितले. १ सप्टेंबर १८९६ रोजी काकासाहेबांचा हा पहिला लेख अग्रलेख म्हणून टिळकांनी प्रसिद्ध केला. पहिल्याच लेखाला अग्रलेखाचा मान मिळाला. लेखाचा विषय होता.
राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता.
त्यानंतर केसरीच्या संपादकीय खुर्चीवर काका विराजमान झाले. त्यातूनच काकांचे जळजळीत देशप्रेम व सडेतोड विचार प्रगट होऊ लागले. सोलापुरात दुष्काळ निवरणाचे काही काळ गेले. तेथे त्यांनी लोकजागृतीचे काम केले. यामुळेच पुढे `कांचनगडची मोहना ` नाट्यकृती जन्माला आली. `कीचकवध ` हे अप्रतिम नाटक त्यांनी लॉर्ड कर्झनने केलेल्या फाळणीवर लिहिले. ते २३-२-१९०७ रोजी पुण्यात विजयानंद थिएटरमध्ये रंगमंचावर सादर झाले. ते ऑक्टोबर १९०८ मध्ये `मराठा ` चे संपादक झाले. १९१० साली कीचकवध नाटकावर बंदी आली. प्रेमध्वज, मानापमान, विद्याहरण, सत्वपरीक्षा इ. नाटके त्यांनी लिहिली. त्यांची नाटके समाज प्रबोधनाबरोबर जनजागृतीसाठीही होती. ते दोन वेळेला नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. मे १९०७ व जून १९१७. १९३३ साली एका साहित्यसंमेलनाचे ते अध्यक्षही झाले. १९२० साली त्यांनी केसरीचे संबंध तोडले. मुंबईस दैनिक `लोकमान्य ` च्या संपादकपदाची धुरा सांभाळू लागले. एप्रिल १९२३ साली स्वत:च्या संपादकत्वाखाली स्वत:चा `नवाकाळ ` दैनिकाची सुरुवात केली. १९३५ मध्ये मुंबईच्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सुलोचना संगीत मंडळाकडून `बायकांचे बंड ` नाटकाचा प्रयोग झाला. १९३८ मध्ये त्यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यांच्या प्रकृतीची विचारणा करण्यासाठी महात्मा गांधींनी त्यांची भेट घेतली. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर यांचे २६ ऑगस्ट १९४८ रोजी निधन झाले.
श्री.संजीव, वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विजय बक्षी
November 23, 2018
आज १ नोव्हेंबर.. शरद तळवलकर यांची जयंती. शरद तळवलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१९ झाला.
शालेय जीवनात म्हणजे पुण्याच्या भावे स्कूलमध्ये ऐनवेळेस रणदुंदुंभी नाटकातील शिशुपाल आणि साष्टांग नमस्कार या नाटकातील भद्रायु भाटकर ही पात्र त्यांनी अतिशय सुंदर रीतीने रंगविली होती. इथूनच त्यांच्या रंगभूमीच्या प्रवासाला सुरुवात झाली. छापील संसार नावाच्या पहिल्या व्यावसायिक नाटकात त्यांनी काम केले. हा अभिनयाचा छंद जोपासत असतांना त्यांनी मिलीटरी अकौंटस् मध्ये नोकरी केली. त्यावेळेस त्यांचे शिक्षणही सुरू होते. विनोदी अभिनेता म्हणून त्यांनी केलेला पहिला चित्रपट होता माझा मुलगा. तिथून सुरू झालेला विनोदी अभिनेत्याचा प्रवास शेवटपर्यंत सुरूच होता.
नाट्य आणि चित्रपट दोन्ही क्षेत्रात त्यांनी आपल्या अभिनयाचा प्रभाव पाडला होता. बालगंधर्वांसारख्या नटश्रेष्ठाबरोबर एकच प्यालातील रंगवलेली तळीरामाची भूमिका बालगंधर्वांच्या शाबासकीला पात्र ठरली. लग्नाची बेडी या नाटकातला गोकर्ण शरद तळवलकरांनी आपल्या ठसकेबाज शैलीत रंगवून अविस्मरणीय केला.
पुणे आकाशवाणी केंद्रावर नाट्यनिर्माते म्हणून केलेले त्यांचे कार्य मोलाचे होते. त्यांच्या काळातील नभोनाट्ये हा श्रोत्यांच्या आवडीचा विषय होता. कलाकार ही नाट्यसंस्था त्यांनी उभारली. भावबंधन मधील कामण्णा, अपराध मीच केला मधील गुप्तेकाका, दिवा जळू दे मधील गोळे मास्तर अशा अनेक नाटकांमधील अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. अप्पाजींची सेक्रेटरी आणि सखी शेजारीण या नाटकांतील त्यांच्या भूमिका हलक्या फुलक्या पण सबंध नाटक पेलून धरणार्या दमदार अशाच होत्या.
अतिशय बोलक्या चेहऱ्याचा हा विनोदी कलावंत ज्याला नाट्यसृष्टीत मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्काराने गौरविले गेले. शरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या. जावई विकत घेणे मधील म्हातार्याच्या भूमिकेचे आणि एकटीतील भूमिकेबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाचे पारितोषिक मिळाले होते.
शरद तळवलकर हे १९९२ मध्ये वाशी येथे भरलेल्या ७२ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते.
शरद तळवलकर यांचे निधन २१ ऑगस्ट २००१ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 1, 2016
शिल्पकार, चित्रकार, कवी, वास्तुशिल्पी अशा अनेक भूमिकांमध्ये साऱ्या जगावर अमिट ठसा उमटविणाऱ्या ‘मायकेल अँजेलो’ या कलावंताची ही रोमहर्षक कहाणी! डॉ. माधवी मेहेंदळे यांनी लिहिलेल्या आणि अमेय प्रकाशनतर्फे प्रसिद्ध झालेल्या ‘दैवी प्रतिभेचा कलावंत : मायकेल अँजेलो’ या पुस्तकातील हा संपादित अंश!
March 15, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti