जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शांता आपटे हिचा त्यावेळी इतका प्रचंड दबदबा होता की तिच्यासमोर दत्ताजी जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना दरदरून घाम फुटला व त्यांनी कॅमेऱ्या्समोरून एकदम पळ काढला. ते काम मग संकलन विभागात काम करणाऱ्या अनंत माने यांनी केलं.
December 30, 2021
प्रो.बी आर.देवधर यांच्याकडे शास्त्रोक्त संगीत शिकलेल्या अरुण पौडवाल यांनी एस.डी.बर्मन ,कल्याणजी आनंदजी ,लक्ष्मीकांत प्यारेलाल ,बाप्पि लाहिरी, आर.डी.बर्मन यांच्याकडे अॅकॉर्डीयन वादन केले. संगीत संयोजन करताकरता अरुण पौडवाल यांनी १९७१ मधे संगीतकार म्हणून आशा भोसले यांच्या आवाजात एक ध्वनिफीत केली.''ओटीत घातली मुलगी विहीणबाई ''गदिमांनी केलेली हि विहीण पारंपारिक होती पण नवेपण घेऊन आली होती.''हरीनाम मुखी रंगते''हे गोड भक्तीगीत तसेच ''रुपेरी वाळूत माडांच्या बनात'',''येऊ कशी प्रिया''हि गीते आधुनिक वाद्यवृंद आणि सुंदर चाली यामुळे तरुणाईत विशेष लोकप्रिय झाली.
ससा तो कसा हे बालगीत,सूर सनईत नादावला सारखे गंभीर प्रकृतीचे गीत,गंधित धुंदीत होऊनी सजणा सारखे उडत्या चालीचे गाणे त्यांनी दिले. तसेच आपली पत्नी अनुराधा पौडवाल यांना ''डोळ्यावरून माझ्या उतरून रात्र गेली ''हे गझल सदृश गीत आणि ''रसिका मी कैसे गाऊ गीत''हि दादरा तालातील गीते अरुण पौडवाल यांनी दिली. एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली. या जोडीने मराठी चित्रपट संगीताचा चेहरा-मोहरा बदलवुन टाकला, मराठी भावगीत पाश्चात्य वाद्यांनी, कुशल वाद्यवृंदाच्या ताफ्यात सजविले, अनेक चित्रपटांना उत्तम संगीत दिले.
मराठी चित्रपटसृष्टीत अनिल-अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
अनिल मोहिले आणि अरुण पौडवाल या जोडगोळीने यानंतरही अनेक अप्रतिम गाणी दिली. शब्द-सुरांवर जबरदस्त हुकुमत असलेल्या या संगीतकार जोडीने अनेक हिट गाणी दिली आहेत. निर्माते शरद व सचिन पिळगावकर यांच्या चित्रपटातील अनिल-अरुण यांनी संगीतबद्ध केलेल्या सर्वच गीतांनी गोल्डन व सिल्व्हर ज्युबिली साजरी केली आहे. संगीतात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या या संगीतकारांच्या गीतांची जादू आजही आहे. अरुण पौडवाल यांचे १ नोव्हेंबर १९९१ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 13, 2017
गाईड चित्रपटासाठी १९६५ साली नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाले , तर २००२ साली दादासाहेब फाळके अवॉर्ड मिळाले .त्यांनी निर्माता , अभिनेता , डायरेक्टर , नवकेतन फिम्सचा सहनिर्माता अशा अनेक प्रकारे काम केले.
December 18, 2021
कवी, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक, विचारक, प्राध्यापक,म्हैसूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांचा जन्म २९ डिसेंबर १९०४ रोजी झाला. महाकवी, राष्ट्रकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वचिंतक, समीक्षक, विज्ञाननिष्ठ अशा अनेक अंगांनी कुवेंपु यांचा कन्नड साहित्य आणि कर्नाटकावर प्रभाव पडलेला दिसून येतो.
कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील माळेनाड क्षेत्रातील कुप्पळ्ळा गावी एका प्रतिष्ठित, सुसंस्कृत कन्नड भाषिक घरात त्यांचा जन्म झाला. पुटप्पांचे व्यक्तिमत्त्व देखणे, प्रभावी होते. राहते घर, भरपूर शेतीवाडी, अशा सधन, समृद्ध कुटुंबात त्यांचा जन्म झाला. १९१८ मध्ये हायस्कूलच्या शिक्षणासाठी ते म्हैसूरला आले. या शहरी वातावरणात, शाळेपेक्षा ते सार्वजनिक वाचनालयातच जास्त वेळ रमत. इंग्रजी वाचनाने ते विलक्षण प्रभावित झाले. या काळातच त्यांनी शेक्सपीअरपासून टॉलस्टॉयपर्यंत, सगळ्या महान साहित्यकारांच्या साहित्याचे पारायण केले. रामकृष्ण परमहंस आणि विवेकानंद यांच्या जीवनाचाही परिचय झाला.
वर्डस्वर्थ हा त्यांचा आवडता कवी. याच शालेय वर्षांमध्ये ‘कुवेंपु’ यांनी इंग्रजीत काव्यरचना करायला सुरुवात केली. इंग्रजीबरोबर कन्नड साहित्याचे अनेक ग्रंथ त्यांनी वाचायला सुरुवात केली. व्यासांचे ‘महाभारत’ त्यांच्या अत्यंत आवडीचे महाकाव्य होते. शालेय शिक्षणानंतर त्यांनी ऐच्छिक विषय म्हणून ‘विज्ञान’ घेतले आणि ‘तत्त्वज्ञान’ विषयात बी.ए. केले. एम.ए. झाल्यावर म्हैसूर विद्यापीठात ते कन्नड शिकवू लागले. १९५५-५६ मध्ये ते महाराजा कॉलेजचे प्राचार्य होते. १९५६-६० या कालावधीत ते म्हैसूर विद्यापीठाचे कुलगुरू होते. या सर्व शैक्षणिक प्रवासात त्यांचे काव्यलेखन सुरू होते.
भारतीय ज्ञानपीठाचा १९६७ चा सर्वश्रेष्ठ साहित्य पुरस्कार डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांना त्यांच्या ‘श्रीरामायण दर्शनम्’ या कन्नड महाकाव्यासाठी प्रदान करण्यात आला होता. १९३५ ते १९६० या कालावधीत भारतीय भाषेतील प्रकाशित सर्जनात्मक साहित्यातील सर्वश्रेष्ठ साहित्यकृतीबद्दल देण्यात आला. १९६७चा ज्ञानपीठ पुरस्कार, गुजराती लेखक उमाशंकर जोशी यांच्यासह विभागून देण्यात आला होता. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांचे ११ नोव्हेंबर १९९४ साली निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
December 29, 2018
बाबूभाई मिस्त्री हे भारतीय चित्रपटातील स्पेशल एफ़ेक्ट्स जनक होते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. आपल्या हिंदू संस्कृतीतील ‘पौराणिक’ ग्रंथातील प्रत्येक कथेचा पाया हा चमत्कारावरच रचला गेला आहे. देवांचे अवतार, प्रकटदृश्ये, त्यांची दैवीरूपे हा सर्व भाग काल्पनिक असला तरीही त्याला मूर्तरूप दिलं ते ‘बाबूभाई मिस्त्रीं’नी.
February 15, 2024
राहुल देशपांडे हा मराठी शास्त्रीय संगीतसृष्टी मधील एक ताजा व भावपुर्ण आवाज.
July 27, 2011
मराठीतले उत्तम संकलक राजा ठाकूर व एक यशस्वी दिग्दर्शक राजा ठाकूर यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२३ रोजी झाला. राजा ठाकूर यांचे वडील नोकरी निमित्त मुंबईला आले आणि पोलिस खात्यात नोकरीला लागले. नोकरीतल्या बढतीमुळे वडिलांची वारंवार तालुक्याच्या ठिकाणी बदली होई. वडील पोलिसात असूनही रसिक होते. गंधर्व कंपनीची नाटके ते आवर्जून पाहत. तालुक्याच्या ठिकाणी नाटकं आली तर मालकाला व नटवर्गाला ते घरी जेवायला बोलावत.
अडीअडचणीला मदत करीत. राजा ठाकूरांची नाटकाची व नाट्यसंगीताची आवड लक्षात घेऊन वडिलांनी त्याला रत्नागिरीला खेळ करीत असलेल्या ‘देशबंधू नाटक मंडळी’त स्वत: नेऊन पोचवले. ही घटना १९४० सालची. दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. १९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं. राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. त्यांनी राजाला तार करून बोलावून घेतलं व त्याच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं- ‘बलिदान’. १९४७च्या ‘बलिदान’पासून ते १९५३पर्यंत सुमारे १५ चित्रपटांचं संकलन राजानं केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम संकलक म्हणून नाव मिळवलं. संकलक राजा ठाकूर हे दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे घनिष्ठ सहकारी होते. छायाचित्रकार बाळ बापट आणि संकलक राजा टाकूर हे राजाभाऊ परांजप्यांचे डावे-उजवे हात होते.
बाळ बापट व राजा ठाकूर हे वेळ मिळेल तेव्हा पुण्यातील कॅम्प एरियात असण्याऱ्या ‘वेस्टएन्ड’, ‘एम्पायर’, ‘कॅपिटल’ अशा चित्रपटगृहांमध्ये जाऊन इंग्रजी चित्रपट बघत. त्यातील कथेचे नावीन्य, तंत्राची ताकद त्यांना आवडे. फ्रँक काप्रा, बिसी वायलर, हिचकॉक या दिग्गज दिग्दर्शकांबद्दल ते वारंवार बोलत. मा.राजा ठाकुरांनी संकलक म्हणून नाव कमावलं. परंतु त्यांच्या मनात एक ‘प्रतिभावंत’ कल्पक दिग्दर्शक दडला होता. १९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. दिग्दर्शक म्हणून राजा ठाकूरांची अनेक वैशिष्ठ्ये होती.
राजा ठाकुरांचे वाचन चांगले होते. मराठी व इंग्रजीतील उत्तमोत्तम पुस्तके वाचण्याचा त्यांना नाद होता. त्यामुळेच त्यांच्या सर्वच चित्रपटांच्या कथा सकस होत्या. उत्तम साहित्यिकांकडून त्यांनी पटकथा-संवाद लिहून घेतले. त्यात ग. दि. माडगूळकर, ग. रा. कामत, मधुसूदन कालेलकर, शं. ना. नवरे, राम केळकर, पु. भा. भावे, सुरेश खरे, रणजित देसाई अशी मंडळी होती. यातील शं. ना. नवरे, पु. भा. भावे, सुरेश खरे, राम केळकर व रणजित देसाई यांना त्यांनीच आग्रह करून पटकथा-संवाद लेखक बनवले. ठाकुरांच्या चित्रपटांचे मूळ कथा लेखक दत्त रघुनाथ कवठेकर, अरविंद गोखले, चिं. वि. जोशी, पं. महादेव शास्त्री जोशी, द. ग. गोडसे, बाबुराव अर्नाळकर, वसुंधरा पटवर्धन, व. पु. काळे, ग. वा. बेहेरे असे ख्यातकीर्त साहित्यिक होते.
मराठी चित्रपटसृष्टीत त्याकाळी तमाशा, लावणी, पाटील व कुर्हाटड यांचा वापर करणार्या ग्रामीण चित्रपटांची चलती होती. पण राजा ठाकूर त्या वाटेला गेले नाहीत. त्यांच्या चित्रपटांपैकी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ आणि ‘रंगल्या रात्री अशा’ या दोन्ही चित्रपटांचं कथानक जरी तमाशाप्रधान असलं तरी तिथे चाळांचा किंवा लावण्यांचा उपयोग गल्ल्यासाठी केला नव्हता. किंबहुना या चित्रपटात उपेक्षित कलावंतांचं अंतरंग उलगडून दाखवण्याची राजा ठाकुरांची तळमळच अधिक जाणवते. मानवी भावना आणि माणसांची आपापसातील साधी वाटणारी पण गुंतागुंतीची नाती हा ठाकुरांचा लाडका विषय होता.
राजा ठाकुरांनी सामाजिक चित्रपट दिले. पण त्याबरोबर ‘गजगौरी’सारखा पौराणिक, ‘राजगडचा राजबंदी’सारखा ऐतिहासिक, ‘गोरा कुंभार’सारखा संतपट आणि ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ व ‘रंगल्या रात्री अशा’सारखे थोडा तमाशा दाखवणारे चित्रपट दिले. ‘बिरबल माय ब्रदर’सारखा इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करणारे ते पहिले मराठी दिग्दर्शक होते. याच चित्रपटानं त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचं दार खुलं केलं. राजाभाऊंच्या मराठी चित्रपटांनी अनेक पारितोषिके मिळवली होती पण रौप्यमहोत्सव साजरा केला नव्हता. मात्र ‘जखमी’ने अनेक ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा केला. ‘जखमी’नंतर ‘रईसजादा’ हा हिंदी चित्रपट राजा ठाकुरांनी करायला घेतला. पण त्यांच्या यशाला कुणाचीतरी दृष्ट लागली. हा चित्रपट त्यांच्या हयातीत पुरा होऊ शकला नाही.
राजा ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सहा वेळा उत्कृष्ट चित्रपटाचा व सहा वेळा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या तंत्रज्ञालाही अनेक पुरस्कार मिळाले. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एकटी’ व ‘मुंबईचा जावई’ या चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. शांत स्वभावाचे राजा ठाकूर साहित्यिक, कलावंत नट, यांच्यात रमत. त्यांचा सुसंस्कृतपणा बोलण्यात व आचरणातून दिसत असे. मा.राजा ठाकूर यांचे २६ जुलै १९७५ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट/ मधू पोतदार
November 26, 2018
बोल्ड अभिनेत्री रेहाना सुलतान यांचा जन्म १९ नोव्हेंबर १९५० रोजी अलाहाबाद येथे झाला. बॉलीवूडमध्ये बहाई समाजाचे अगदी मोजके कलावंत आहेत, त्यातली एक रेहाना सुलतान यांचा जन्म एका सुखवस्तू कुटुंबात झाला. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर रेहाना सुलतान यांनी पुण्यातले एफटीआय मध्ये प्रवेश घेतला. रेहाना सुलतान या पहली नटी होत्या की ज्या FTII हून पास झाल्या व ज्यांना लगेचच चित्रपटात लीड रोल मिळाला होता. तिथे शिकत असतानाच त्यांना ब्रेक मिळाला १९६७ मधल्या विश्वनाथ अयंगारच्या ‘शादी की पहली सालगिरह’ या चित्रपटात बोल्ड सीन मुळे त्या गाजल्या. यावेळी त्यांचे वय फक्त सतरा वर्षाचे होते. १९७० च्या पूर्वार्धात राजिंदरसिंह बेदींना त्यांच्या बोल्ड कथेवर सिनेमा बनवायचा होता आणि त्यांची सहनायिका रेहाना यांच्या रुपात सापडली. याच सुमारास बी.आर.इशारांनी तिला ‘चेतना’त घेतले होते.
'मैंने इतने नंगे मर्द देखे हैं कि मुझे अब कपड़े पहनने वाले मर्दों से नफरत होने लगी है'
'चेतना' चित्रपटातील या डायलॉगमुळे रेहाना सुलतान चर्चेचा विषय ठरल्या होत्या. या सीनमध्ये रेहाना लाल साडीमध्ये बेडवर झोपलेली दाखविण्यात आलेली आहे. हातात व्हिस्कीची बॉटल आहे आणि लाजत ती ग्राहकांना आपल्याकडे येण्यास खुणावत आहे. त्यावेळी चेतना चित्रपटाचे पोस्टरही त्याच्या बोल्डनेसमुळे फार प्रसिद्ध झाले होते.
इशारांनी फक्त अठ्ठावीस दिवसात याचे शुटींग पूर्ण केले. यातलं मुकेशचं ‘मै तो हर मोड पर तुझको दुंगा सदा…’ हे गाणं आजही लोकप्रिय आहे. हे दोन्ही चित्रपट पडले. पण रेहाना सुलतान यांना या दोन चित्रपटांमुळे तसेच रोल ऑफर होऊ लागले.
१९७२ मध्ये आलेल्या एन.एन.सिप्पी यांच्या ‘हारजीत’ या चित्रपटात रेहाना यांच्या बरोबर हिरो अनिल धवन होता. हा सणकून आपटला. १९७३ मध्ये रेहाना वेद राहीच्या ‘प्रेमपर्वत’मध्ये झळकल्या. ‘ये दिल और उनकी निगाहोंके साये’ हे अप्रतिम गोड गाणं यात होतं. हा ही चित्रपट फ्लॉप ठरला. त्यामुळे रेहाना यांना काम मिळणं बंद झाले. पंजाबी चित्रपटातही त्यांनी काम करून पाहिलं; पण तिथेही तिच मागणी होती, तिनं कपडे उतरवण्याची ! १९८४ मधे आपल्यापेक्षा सोळा वर्षांनी मोठ्या असणाऱ्या, आपल्याला ब्रेक देणाऱ्या बी.आर.इशारांशी रेहाना विवाहबद्ध झाल्या. त्यांचा संसार टिकला. मात्र इंडस्ट्रीत तिला टिकता आलं नाही. नाही म्हणायला याच वर्षी विजय आनंदच्या शबाना आझमी अभिनित ‘हम रहे ना रहे’ने त्यांना पुन्हा एकदा मोठी संधी मिळाली पण त्यालाही अपयशाचे तोंड पाहावे लागले. बघता बघता रेहाना यांचे करिअर संपुष्टात आले. तर बी.आर.इशारांनी जवळपास पस्तीस चित्रपटांचे दिग्दर्शन करूनही ब्लॉकबस्टर हिट त्यांच्या वाट्याला आली नाही. २०१२ मध्ये बी.आर.इशारा यांचे निधन झाले आणि रेहाना यांच्या रोजीरोटीचा प्रश्न उद्भवला. पतीच्या निधनानंतर मात्र त्या कोलमडून गेल्या. गाठीला जवळ पैसाअडका नाही, उपजीविकेचे साधन नाही. सुधीर मिश्रा यांनी त्याच्या ‘इन्कार’मध्ये रेहाना यांना घेतलं. गंमत म्हणजे हाही चित्रपट सेक्सुअल हरासमेंटवर आधारित होता पण हाही चित्रपट फ्लॉप ठरला. रेहाना सुलतान यांना 'दस्तक' या चित्रपटा साठी बेस्ट एक्ट्रेस कैटेगरी मध्ये नेशनल अवॉर्ड मिळाला होता. सध्या रेहाना यांना सिने एंड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन (CINTAA) तर्फे प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत केली जातेय.
रेहाना यांनी मध्यंतरी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘त्यावेळी ती केवळ टाईप्ड अॅक्ट्रेस बनली होती. दर्शकांना ती केवळ सेक्स सिम्बॉल म्हणूनच पसंत होती. निर्मात्यांना फक्त बाथटब आणि पावसात भिजण्याच्या भूमिका ऑफर केल्याने तिला संताप होत असे’. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणाऱ्या एका चांगल्या अभिनेत्रीचे हे हाल कशामुळे झाले ? पडद्यावर सतत वेश्या साकारल्यामुळे ! लोकांची तिच्याविषयी नेहमीच इच्छा राहिली की तिने नेहमीच चद्दरबदली चित्रपटात कपडे उतरवत राहावेत. इतर नायिका साकारतात तशा सामान्य भूमिका तिने साकारून पहिल्या पण लोकांना त्या रुचल्या नाहीत. भरीस भर तिचा नवराही अशाच विस्कटलेल्या नात्यांवर चित्रपट करत राहिला. त्यामुळे दोन्ही अंगाने या अभिनेत्रीचे नुकसान होत गेले. आता तिचे वय झालेले आहे, या वयात तिला न्यूड पाहावं अशी कोणाची इच्छा असणार नाही. आता कमबॅकच्या प्रतिक्षेत असलेल्या रेहानाला वाटते की, या भूमिका तिने साकारल्या नसत्या तर तिचे करिअर नीट उभे राहिले असते आणि कदाचित तिनेही नाव कमावले असते. रेहाना असेही सांगते की, ‘तिचे नाव रेहाना सुल्ताना होते पण तिच्या Sultana मधील अखेरचा ‘A’ तिने सेन्सॉरला दान करून टाकला जो तिच्या जीवावर उठला. त्यामुळे ती सुलताना न राहता रेहाना सुलतान होऊन राहिली.’ वरवर हा विनोद वाटतो पण यात कारुण्याची झाक आहे जी एका व्यक्तीच्या कारकिर्दीची माती करून गेली. रेहाना सुलतान यांचे इतर चित्रपट 'हार-जीत', 'प्रेम पर्वत' , 'किस्सा कुर्सी का'.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / समीर गायकवाड
'चेतना' चित्रपट
https://www.youtube.com/watch?v=NLnLa-BKojE
https://www.youtube.com/watch?v=_-Wd1Dg1vvY
November 19, 2018
२०१४मध्ये आलेला ‘अस्तु’ हा विस्मरणाच्या आजारावर आधारित चित्रपट होता. यातली प्रा. चक्रपाणींची भूमिका डॉ. मोहन आगाशे यांनी सुंदर साकारली आहे. एकूणच हा चित्रपट म्हणजे अविस्मरणीय असा अनुभव आहे. यातली इरावती हर्षेची भूमिकाही पाहण्यासारखी आहे. ‘अस्तु’ चित्रपट चांगला असला, तरी सुरुवातीला तो मर्यादित ठिकाणीच प्रदर्शित झाला. पुढं त्याला अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर काही संस्थांनी ‘क्राउड फंडिंग’ करून तो पुन्हा प्रदर्शित केला.
May 31, 2022
आज हिंदी चित्रपटसृष्टीतील २०१६ पर्यंत ६१७ चित्रपटांसाठी सर्वाधिक ३,४०० गाणी लिहिल्याबद्दल ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव नोंदले गेलेले ख्यातनाम गीतकार #समीर_अंजान_पांडे ऊर्फ शीतल पांडे ऊर्फ #समीर यांचा वाढदिवस.
March 1, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti