जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
२०१९ मध्ये लिओनेल मेसी सर्वात श्रीमंत फुटबॉलपटू ठरला आहे. २०१९ मध्ये कमाई मध्ये अर्जेंटीनाचा फुटबॉलर लियोनेल मेस्सी प्रथमच पोर्तुगालच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला मागे टाकून पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने गेल्या वर्षभरात तब्बल ८८१.७२ कोटी (१२.७ कोटी डॉलर) एवढी कमाई केली.
June 27, 2022
आज काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांची पुण्यतिथी. कवी सुधांशु यांचे १८ नोव्हेंबर २००६ ला निधन झाले.
कवी सुधांशु यांचा जन्म ६ एप्रिल १९१७ रोजी झाला. त्यांनी आध्यात्मिक (प्रामुख्याने दत्तविषयक) आणि मुलांसाठीची अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.
१९३७ पासून सुधांशु यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. त्यांच्या कविता किर्लोस्कर, स्त्री, मनोहर आदी मासिकांतून प्रसिद्ध होत होत्या. या कवितांचे पुढे पुस्तकरूपाने संग्रह झाले. मराठी कवी कुंजविहारी यांनी ह. न.जोशी यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले. कवी सुधांशु यांच्या गीत दत्तात्रयाचे कार्यक्रम श्रीक्षेत्र औदुंबर येथे पहिल्यांदा, नंतर मिरजेच्या अण्णाबुवा मठात आणि नंतर इतर अनेक ठिकाणी झाले. भारत गायन समाजात आणि नंतर अन्यत्र पुण्यात झालेल्या कार्यक्रमांना मास्टर कृष्णराव, श्री (ना.र.)मारुलकरबुवा, संजीवनी खेर आदी संगीतज्ज्ञांबरोबरच पंडित महादेवशास्त्री जोशी, भा.द. खेर, सरदार आबासाहेब मुजुमदार यांसारख्या रसिक साहित्यिकांची उपस्थिती होती. या दत्तगीतांचे गायक सांगलीचेच बाळ कारंजकर होते. तबल्याची साथ रामभाऊ चिपळूणकरांनी केली होती.
कवी सुधांशु यांनी आयुष्यभर खादीचे कपडे घातले. त्यांच्या अंगावर सतत एक शाल असे. सुधांशूंनी भारताच्या १९४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी तंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वत:ला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. १९६० मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५ पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला.
कवि सुधांशु दत्ताचे पुजारी होते आणि ते पौरोहित्यही करीत. औदुंबर येथे सदानंद साहित्य मंडळाची स्थापना करून कवी सुधांशूंनी १९३९ पासून ग्रामीण मराठी साहित्य संमेलन भरविण्यास सुरुवात केली. दरवर्षी मकर संक्रातीला होणाऱ्या या औदुंबर ग्रामीण साहित्य संमेलनाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील साहित्यरसिक येतात, व आजही अध्यक्ष आणि फाजिल मानपानांविना हे संमेलन पार पडते. १९७४ मध्ये त्यांना ‘पद्मश्री’ किताब मिळाला होता.
कवी सुधांशु यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. आर. एन. पराडकर आणि माणिक वर्मा यांनी गायलेली त्यांची गाणी अजून लोकांच्या मनात आहेत. ‘दत्त दिगंबर दैवत माझे’, ‘देव माझा विठू सावळा’ या गीतांचे कवी कवी सुधांशुच.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
November 19, 2016
सखाराम विनायक आपटे यांनी यंत्रशास्त्राच्या मूलतत्वांवरील पुस्तक, तसेच “वाहती वीज़” हे पुस्तक लिहून शास्त्रीय परिभाषेचा पाया रुंदावण्याचे काम केले.
१८ जुलै १९७४ रोजी त्यांचे निधन झाले.
Sakharam Vinayak Apte
November 7, 2017
जोगवा ह्या २००९ सालच्या मराठी चित्रपटामधील भूमिकेसाठी मुक्ताचे कौतुक झाले व तिला ह्यासाठी काही पुरस्कार देखील मिळाले. आपल्या वैविध्यपूर्ण आणि सहज अभिनयाने मुक्ताने रसिकांच्या मनात प्रेमाचे स्थान मिळवले आहे. टेलिव्हिजन, सिनेमा आणि नाटक अश्या तिन्ही माध्यमांवर जबरदस्त पकड असणार्या अत्यंत मोजक्या अभिनेत्यांमध्ये मुक्ताचे स्थान अग्रक्रमावर आहे.
July 16, 2021
साहित्य मीमांसक, कवी आणि एक विचारवंत म्हणून रा. श्री. जोगांची ओळख आहे. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात गडहिंग्लज या गावी १५ मे १९०३ रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद बाजी जोग हे संस्कृतचे गाढे अभ्यासक होते. रा. श्री. जोग यांचे शालेय शिक्षण पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधून झाले.
February 4, 2010
नित्यानंद मांडके हे भारतामधील एक सुप्रसिध्द हृद्यरोगतज्ञ होते. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया केल्यानंतर ते खर्या अर्थाने प्रकाशात आले असले तरीही त्याआधीसुध्दा अनेक अशक्यप्राय वाटणार्या शस्त्रक्रिया त्यांनी त्यांच्या जादुभर्या बोटांनी यशस्वी करून दाखविल्या आहेत. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४८ मध्ये पुण्यात झाला. बारावी पर्यंतचे शालेय शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी बी. जे. वैद्यकिय महाविद्यालयात प्रवेश मिळवला व याच महाविद्यालयात त्यांना त्यांची उर्वरित आयुष्याची सोबतीण मिळाली. शालेय व महाविद्यालयीन जीवनातसुद्धा डॉक्टर नितु हे अतिशय हुषार व कुशाग्र बुध्दीचे विद्यार्थी म्हणून सर्वांना परिचीत होते.
July 27, 2011
आपल्या चित्रपटांच्या माध्यमातून पाटील यांनी गावरान विषय, सामाजिक प्रश्न तसंच वास्तवता मांडली. ‘सावरखेड-एक गाव’ , ‘जोगवा’, ‘७२ मैल एक प्रवास’, ‘पांगिरा’, ‘सनई चौघडे’, ‘ऑक्सिजन’, ‘ब्लाईंड गेम’; असे वैविध्यपूर्ण विषय दिग्दर्शित करुन प्रेषकाचं पुरेपूर मनोरंजन होईल याची खात्री घेतली.
March 13, 2014
दुहेरी, दुर्वा, राधा ही बावरी, तू भेटशी नव्याने, अहिल्याबाई होळकर या मालिकांमधून त्या घराघरात पोहोचल्या होत्या. ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेमध्ये त्या रावणाच्या आईची, कैकसीची भूमिका करत होत्या. अरुंधती, उंच माझा झोका, असंभव या मालिकांमधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या होत्या.
June 21, 2022
कमलाबाई ओगले यांच्या पाककला कृतींवरच्या ‘ रुचिरा‘ हे पुस्तक १९७० च्या सुमारास आले. हे पुस्तक किर्लोस्करांनी प्रकाशित केले. या पुस्तकामुळे कमलाबाई ओगले या सर्वच स्तरांत अतिशय लोकप्रिय झाल्या. त्यांना परीक्षक म्हणून पूर्वीपेक्षा जास्त बोलावणी येऊ लागली.
केंद्रीय मंत्री शंकरराव चव्हाण, आबासाहेब खेबुडकर — कुलकर्णी, दुर्गाबाई भागवत, शांता शेळके, मोहिनी निमकर,अशा अनेक नामवंतांच्या हस्ते त्यांचे कित्येक सत्कार झाले. मुंबईच्या एस.एन.डी.टी. विद्यापीठात त्यांनी वर्ग घेतले. त्यांनी पृथ्वीची ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी दोन्ही टोके गाठली. ऑस्ट्रेलियात तर त्यांना तीनदा बोलावणी आली. या दोन्ही खंडांत त्यांनी तेथल्या भारतीय आणि स्थानिक स्त्रियांना विविध पदार्थांची प्रात्यक्षिके दाखवली. ऑस्ट्रेलियात शिरा करतांना तूप उपलब्ध नव्हते, तर त्यांनी चक्क तेलावर शिरा करून दाखवला! तोही तितकाच स्वादिष्ट झाला होता.
या पुस्तकात महाराष्ट्रीय पदार्थांप्रमाणेच काही तमिळी, पंजाबी, गुजराती आणि बंगाली पाककृतींचा समावेश केला आहे. त्याचप्रमाणे हे पुस्तक मराठी भाषेचे कुंपण ओलांडून कानडी भाषेतही गेले. विद्यामूर्ती सत्यनारायण यांनी भाषांतर केलेल्या कानडी पुस्तकाचे भाग्य मराठी पुस्तकाप्रमाणेच बलवत्तर आहे. या पुस्तकाची हिन्दी, इंग्लिश आणि गुजराती भाषांतही भाषांतरे झाली आहेत. ‘फास्ट फूड ‘ पद्धतीच्या पाक कृती असलेल्या या ‘ रुचिरा ‘ चा दुसरा भागही प्रसिद्ध झाला. एखाद्या लोकप्रिय गाण्याप्रमाणे हे पुस्तक घराघरांत पोचले. हे पुस्तक पुढच्या पिढींतील मुलींना / सुनांना ही आपले पुस्तक वाटते. दोन लाख प्रतींचा खप गाठल्यावर ‘ दोन लाख सुनांची एकच आई ‘अशी caption या पुस्तकाच्या blurb वर दिली गेली होती; ती नि:संशय समर्पक होती. या Blurb ला प्रा. मं. वि. राजाध्यक्षांनी ‘ वेष्टण लेख ‘ असा प्रतिशब्द सुचवला होता..
कमलाबाई ओगले यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१३ रोजी झाला. २० एप्रिल १९९९ रोजी त्यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / प्रकाश चान्दे
April 23, 2021
अच्युत बर्वे यांची अनुभवसृष्टी ही स्वतंत्र आणि स्वयंभू होती. त्यांची कथातंत्रावरची पकड असामान्य होते. त्यांचा मानवी स्वभावाचा अभ्यासही मनोवैज्ञानिकालाही नवीन वाटेल, असे होते.
April 16, 2022
Copyright © 2025 | Marathisrushti