(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • ख्यातनाम अभिनेत्री शर्मिला टागोर

    आज ख्यातनाम अभिनेत्री शर्मिला टागोर यांचा वाढदिवस.
    शर्मिला टागोर यांचा जन्म ८ डिसेंबर १९४६ रोजी हैदराबाद, आंध्र प्रदेश येथे झाला. एका हिंदू बंगाली कुटुंबात शर्मिला टागोर यांचे वडील गितेन्द्रनाथ टागोर एल्गिन मिल्स चे महाप्रबंधक होते. बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर यांनी वयाच्या १३ व्या वर्षापासून हिंदी सिनेमात अभिनयाला सुरुवात केली. १९५९ सत्यजीत रे यांच्या ‘अपुर संसार’ या चित्रपटा पासून आपले फिल्मी करियरची सुरवात केली. शर्मिला टागोर बॉलिवूड मध्ये अनेक ट्रेंड सुरु करणारी अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. सिनेमांत पहिल्यांदा बिकिनी शॉट देणारी पहिली अभिनेत्री म्हणूनसुध्दा त्यांना ओळखले जाते. १९६० मध्ये शर्मिला टागोर यांनी बिकनी घालून बॉलीवूड मध्ये हलचल उडवून दिली. मंसूर अली खान पत्तोडी व शर्मिला टागोर यांची प्रेम कहाणी १९५९ पासून होती या दोघांनी १९६८ च्या डिसेंबर मध्ये लग्न केले. असे सांगितले जाते की १९६७ मध्ये नवाब पत्तोडी यांची आई साजिदा सुल्तान शर्मिलाला भेटण्यासाठी मुंबईला गेल्या होत्या. तेव्हा शर्मिला यांचा बहुचर्चित 'एन इव्हिनिंग इन पेरिस' सिनेमा प्रदर्शित होणार होता. या शर्मिला यांनी बिकिनी परिधान केली होती. शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर मुंबईमध्ये ठिक-ठिकाणी लागले होते. शर्मिला यांना नवीब पत्तोडी यांच्या आई मुंबईला येणार याची माहिती मिळाल्यानंतर मुंबईच्या रस्त्यावर लागलेले बिकिनी पोस्टर्स काढून टाकण्यास सांगितले होते. शर्मिला यांना भिती वाटत होती, की हे पोस्टर्स पाहून नवाब पटौदी यांची आई नाराज होऊ नये. नवीब पत्तोडी व शर्मिला टागोर यांची जोडी त्या काळी बॉलिवुड ची एक आकर्षक और आदर्श जोडी मानले जात होते. लग्नानंतर शर्मिला टागोर यांनी आपले नाव आयशा सुलतान ठेवले. शर्मिला टागोर यांच्या आराधना या चित्रपटाला फिल्मफेयर सर्वश्रेष्ट अभिनेत्री अवार्ड व मासूस या चित्रपटाला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार ने सम्मानित केले. राजेश खन्ना व शर्मिला टागोर यांची जोडीला बॉलिवुडची सफल जोडी मानले जाते. दोघांनी ६ सुपरहिट चित्रपटामध्ये काम केले ते आराधना, सफर, अमर प्रेम, छोटी बहू, दाग और आविष्कार. शर्मिला टागोर सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष होत्या. या पदावर कार्यरत असताना आजच्या काळात होणा-या अंगप्रदर्शनावर त्यांनी चिंता व्यक्त केली होती. राजेश खन्ना यांच्यासोबत आराधना हा शर्मिला यांचा बहुचर्चित सिनेमा होता. बेशरम सिनेमात अमिताभ सोबत काम केले होते. शर्मिला टागोर यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्षपद भूषवले आहे. आज शर्मिला टागोर चित्रपटापासून लांब असल्या तरी सामाजिक कार्या मध्ये त्यांचे खूप काम आहे.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट.

      December 13, 2016


  • हास्य अभिनेता नूर मोहम्मद चार्ली

    स्टूडियो सिस्टम जेव्हा बंद होऊ लागली तेव्हा नूर मोहम्मद चार्ली हे ४० च्या दशकात पृथ्वीराज कपूर व दुर्गा खोटे यांच्या सारखे फ्री लान्सीग करू लागले होते एवढी त्यांना मागणी होती. एक काळ असा होता की नूर मोहम्मद चार्ली यांच्या नावावर चित्रपट चालत असे.

      June 30, 2022


  • एम.एस.सुब्बुलक्ष्मी

    जगप्रसिद्ध कर्नाटक संगीत गायिका, विष्णूसहस्रनाम गायनामुळे घराघरांत पोहोचलेल्या एम.एस.सुब्बुलक्ष्मी यांचा जन्म १६ सप्टेंबर १९१६ रोजी झाला. मदुराई षण्मुखावदिवू सुब्बुलक्ष्मी म्हणजेच एम. एस. सुब्बुलक्ष्मी व 'एमएस' नावाने ओळखल्या जाणार्याण सुब्बुलक्ष्मी यांचे मूळ नाव कुंजम्मा होते. आज भारतात व परदेशात अनेकांच्या घरात सकाळची सुरवात श्री. वेंकटेश स्तोत्राने होते याचे श्रेय मा.एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांना जाते. एक लहान भाऊ आणि बहीण अशी भावंड असलेल्या या देवदासीच्या मुलांचे बालपण मदुराईमधील प्राचीन अशा मीनाक्षी देवी मंदिराच्या परिसरात गेले. या मंदिराचा आर्थिक व सांस्कृतिक वारसा त्यांच्या आयुष्यावर कायम गारूड करून राहिला.

    एम. एस. यांची आजी उत्तम व्हायोलिन वाजवत असे, तर आई षण्मुगावादिवू वीणा वादनात पारंगत होती. त्यांचे वडिल वीणा वादक होते. आई व आजी अनेक सांगीतिक कार्यक्रम करत असल्याने, या सांगीतिक विश्वाची एम. एस. यांना फार जवळून ओळख होती. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचाही त्यांचा अभ्यास होता. संस्कृत आणि तेलुगू भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी पहिले ध्वनिमुद्रण केलं.

    १९२९ मध्ये तेरा वर्षाच्या असताना त्यांनी प्रतिष्ठेच्या मानल्या जाणा-या ‘मद्रास म्युझिक अकॅडमी’ मध्ये पहिला जाहीर कार्यक्रम केला. भजन व इतर उपशास्त्रीय संगीत प्रकारांत त्यांचा हातखंडा होता. ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणा-या सुब्बुलक्ष्मी या पहिल्या गायिका, इतकेच नव्हे तर ‘मॅगसेसे पुरस्कार’ मिळवणा-या संपूर्ण जगातल्या त्या पहिल्या भारतीय गायिका ठरल्या. देशविदेशात अनेक उत्तम कार्यक्रम त्यांनी सादर केले होते.

    २३ ऑक्तोबर १९६६ रोजी राष्ट्रसंघाचे माजी सचिव दिवंगत यू. थॅंट यांनी सुब्बलक्ष्मी यांना संयुक्त राष्ट्रसंघातर्फे गायन सादरीकरणाचे निमंत्रण दिले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या सुमधुर आवाजाने राष्ट्रसंघातील सदस्यांसह जगाला मोहित करून टाकले होते. पद्मभूषण, पद्मविभूषण, संगीत नाटक अॅरकॅडमी अवॉर्ड यांसारखे प्रतिष्ठेचे पुरस्कार त्यांना मिळाले होते. पं. नेहरूंनी मा.सुब्बुलक्ष्मी यांना‘क्वीन ऑफ म्युझिक’ म्हणून गौरवले.

    सुब्बुलक्ष्मी या महान कलाकारासोबतच त्या एक महान व्यक्तीही होत्या. एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे ११ डिसेंबर २००४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचे श्री. वेंकटेश स्तोत्र
    https://www.youtube.com/watch?v=1-VzQZowjBE
    व्यंकटेश स्तोत्र शब्द
    कौशल्या सुप्रजा राम ! पूर्व संध्या प्रवर्तते ,उत्तिष्ठ ! नारासर्दुला ! कर्तव्यं देवं अह्निकम . उत्तिश्ठोत्तिष्ठ ! मनोहर गोविंदा ! उत्तिष्ठ गरुडध्वजा ! उत्तिष्ठ कमलकान्त! त्रैलोक्यंमंगलम कुरु.

    मतससमस्तजगतमधुकैटभअरेह्वाक्सोविहारिणी ! मनोहर-दिव्यमूर्ते ! श्रीस्वामिनी ! श्रीतजनप्रिय -दानासिले ! श्रीवेंकटे सदायिते ! त्वसुप्रभातम त्वसुप्रभातम अरविन्द लोचने ! भवतु प्रसन्नमुख -चन्द्र मंडले ! विधि शंकरेन्द्र -वनिताभीर अर्चिते ! वर्सा सिला नाथ -दायिते ! दयनिधेअत्र्यदि - सप्तऋषयासमुपास्या संध्यामअक्सासिन्धु -कमलानी मनोहरनी, आद्यपदयुगम अर्चयितुम प्रपन्ना शेशाद्री -शेखर -विभो ! तव

      November 4, 2019


  • मदन तळदेवकर

    आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर इंजिनीयरिंगच्या क्षेत्रात संशोधन करून त्याचा उपयोग सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी करण्याची तळमळ अभावानेच दिसते. गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवण्यासाठीच उच्च शिक्षण घेण्याचा विचार अनेकजण करतात. पण ठाण्यात खोपट परिसरात राहणारा मदन तळदेवकर त्यास अपवाद ठरावा.

      June 4, 2011


  • मराठीतील बालवाङ्मफयाचे जनक विनायक कोंडदेव ओक

    १८८१ साली मुलांसाठी बालबोध या नावाचे एक मासिक काढून त्यातून त्यांनी चरित्रे, कविता, निबंध, शास्त्रीय विषयांवरील लेख इ. विविध प्रकारचे लेखन वैपुल्याने केले व मराठी बालवाङ्मलयाचा पाया घातला.

      February 25, 2022


  • टेबलटेनिस चॅम्पियन ममता प्रभू

    वयाच्या आठव्या वर्षी सुरू झालेला टेबल टेनिसचा खेळ अगदी सहज सोपा करत कॉमन वेल्थ स्पर्धेत रौप्यपदक, साऊथ एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक, दहा वेळा महाराष्ट्र राज्य चॅम्पियनशिपचा विक्रम आणि अशा अनेक स्पर्धांत बाजी मारत ममता प्रभू या जिद्दी खेळाडूने टेबल टेनिसच्या खेळात आपला वेगळा दराराच निर्माण केला. तिच्या या खेळाचा सन्मान ‘शिवछत्रपती’ या मानाच्या पुरस्कार देऊन करण्यातदेखील आला.

      October 26, 2018


  • नारायण गंगाराम सुर्वे

    नारायण सुर्वे यांनी आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणार्‍या, व असंख्य वेदना निमुटपणे सोसणार्‍या जनतेचे आयुष्यभर अगदी समर्थपणे प्रतिनिधीत्व केले.

      January 24, 2015


  • हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक

    हार्मोनिअम, ऑर्गन वादक आदित्य ओक यांचा जन्म २० डिसेंबर १९७७ रोजी झाला. आदित्य ओक हे वादन क्षेत्रातलं एक आघाडीचं नाव. हार्मोनिअम, ऑर्गन वादनात यांचा हातखंडा आहे. अनेक सिनेमांचं संगीत संयोजनही त्यांनी केलं आहे. खूप लहान वयात पं. गोविंदराव पटवर्धन या हार्मोनिअम वादन क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तीकडून शिकण्याचं भाग्य ओक यांना लाभलं. आदित्य ओक यांचे वडिल डॉ. विद्याधर ओक गोविंदरावांकडे शिकायचे. त्यांना शिकवायला दर शुक्रवारी ते घरी यायचे. वयाच्या दहाव्या वर्षांपासून पुढे आठ वर्षं आदित्य ओक यांना गोविंदरावांकडे प्रत्यक्ष शिकण्याची संधी मिळाली.

    पं. गोविंदराव पटवर्धन शिकवणीबद्दल आदित्य ओक म्हणतात,''बाबांच्या इच्छेमुळे मी पेटी शिकायला लागलो. वादनाच्या क्षेत्रातलं गुरुजींचं ज्ञान, त्यांची शैली, त्यांचा आवाका संपूर्ण जगाला माहितीये. पण शिक्षक म्हणूनही तितकेच श्रेष्ठ होते. त्यांनी मला शाळेत शिकवतात तसं पुस्तकी पध्दतीने कधी शिकवलंच नाही. ते स्वतः एखादी सुरावट पेटीवर वाजवून दाखवायचे. नाही समजली तर पुन्हा पुन्हा आपल्याला समजेपर्यंत वाजवून दाखवायचे. ती विशिष्ट सुरावटीची जागा त्यांच्यासारखी येईपर्यंत आपण वाजवायची. यामुळे एखादी जागा वाजवून बघायची सवय आपोआप लागली. पुन्हा पुन्हा वाजवायचा कधीतरी फारच कंटाळा यायचा, तेव्हा ते म्हणायचे - ''येईपर्यंत वाजव, म्हणजे कंटाळा निघून जाईल.'' यामुळे न कंटाळता रियाज करायची मला सवय लागली.

    माझं शिकण्यातलं कुतूहल कायम टिकून राहण्यात या सवयीचा भाग मोठा होता. एखादी सुरावट येईपर्यंत मला तिच्याविषयी कुतूहल वाटत राहायचं. बऱ्याचदा रात्री उशिरा ते संगीत नाटकाचा प्रयोग संपवून यायचे आणि त्यानंतर मला शिकवायचे. कधीकधी इतका उशीर व्हायचा की मला झोप अनावर होत असे. मी झोपायला जायचो तेव्हा त्याचं वादन सुरू असायचं. अपरात्री कधीतरी मला जाग यायची, तेव्हाही ते वाजवतच असायचे. त्यांना निद्रानाशाचा विकार होता. पण झोप येत नाही किंवा दमलोय म्हणून त्यांना नुसतंच रिकामं बसलेलं कधी पाहिल्याचं आठवत नाही. जेव्हा जेव्हा मला कंटाळा येतो, तेव्हा गुरुजींचं हेच रूप मी डोळयासमोर आणतो.''

    काही व्यक्तींनी हार्मोनिअमच्या क्षेत्रात स्वतःचं अढळ स्थान निर्माण केलंआणि त्या व्यक्तींचंच पुढे घराण तयार झालं, अशांपैकीच एक म्हणजे पं. गोविंदराव पटवर्धन आणि त्यांचे तिसऱ्या पिढीतले आपण वारसदार आहोत याचा अत्यंत अभिमान असल्याचं आदित्य ओक सांगतात. ''आपली शैली येणाऱ्या प्रत्येक पिढीकडे संक्रमित होत जाण्यातूनच पुढे घराणे तयार होतं. माझे बाबा डॉ. विद्याधर ओक, मी आणि आता माझी पुढची पिढी गोविंदराव पटवर्धन नावाच्या एका घराण्याचा वारसा पुढे नेत आहोत.''

    आदित्य ओक यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये उल्लेखनीय सहभाग नोंदवला आहे, तसंच अनेक चित्रपटांचं संयोजनही केलं आहे. 'बालगंधर्व'सारख्या चित्रपटाचं संगीत संयोजन केले आहे. हार्मोनिअम हे या वाद्याचे मूळ नाव असले तरी भारतात बाजा आणि महाराष्ट्रात पेटी या नावाने ते ओळखले जाते. या वाद्यांची जन्मकथा आदित्य ओक 'जादूची पेटी हा कार्यक्रम अतिशय रंजक पणे सादर करतात.
    आज अनेक विद्यार्थी आदित्य यांच्याकडे शिकायला येतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 20, 2018


  • डॉ. रमेश रासकर

    अमेरिकास्थित एमआयटी संस्थेतील प्राध्यापक व एमआयटी मीडिया लॅबमधील कॅमेरा कल्चर रिसर्च लॅबचे संचालक डॉ. रमेश रासकर यांनी मोबाईल कॅमेराचा खुबीने वापर करुन त्यापासून आयनेत्र, आयमित्र ही डोळे तसेव डायबेटिसच्या आजारांचे निदान करणारी यंत्रे बनविली. नाशिकमधून लहानाचे मोठे झालेल्या रमेश यांच्या संशोधनाचे भिंग यापेक्षा कितीतरी मोठे आहे. आज त्यांच्या नावावर अमेरिकेतील ५० पेटन्ट्सची नोंद आहे.

    कॅमेरा कल्चरची किमया

      July 24, 2015


  • गायक, अभिनेते संगीतकार पंकज मलीक

    पंकज मलीक ह्यांनी सुरुवातीच्या बंगाली आणि हिंदी चित्रपटांना संगीत दिले. हे रवीन्द्र संगीतात विशारद होते. त्यांचा जन्म १० मे १९०५ रोजी झाला. रवीन्द्र संगीताला शान्तिनिकेतन मधून लोकांच्या पर्यत पोहचवण्याचे श्रेय पंकज मलिक यांनाच जाते. रवीन्द्र टागोर यांचे पंकज मलिक हे लाडके होते. रवीन्द्र टागोर यांची एक कविता दिनेर शेषे घुमेर देशे ला पंकज मलिक यांनी संगीत दिले होते. ते रवीन्द्र टागोर यांना आवडले व त्यांनी हे गाणे पंकज मलिक यांना पी सी बरुआ यांचा चित्रपट मुक्ति मध्ये वापरण्यास परवानगी दिली. पंकज मलिक यांनी प्रथम न्यू थिएटर्ससाठी मूकपट व बोलपटात संगीत सहाय्य केले. रवींद्र संगीताचा खुबीने केलेला वापर व वाद्यवृंदाचा घसघशीत वापर हा त्यांचा विशेष होता. ते दशक म्हणजे सर्वकाही पंकज मलिक असेच होते. हिंदी गीतांमध्ये "टांगा ऱ्हीदम‘ आणण्याचा पहिला यशस्वी प्रयोग मलिक यांनीच केला. त्यानंतर तोच धागा इतर संगीतकारांनी पकडला. त्यांच्या ‘डॉक्टर’ ह्या चित्रपटातील गाणी सुमधुर आहेत. तो चित्रपट तर स्वतः पंकज मलिक ह्यांनी आपल्या संयत सुरेख अभिनयाने सजवला होता. या सिनेमामध्ये पंकज मलिक यांनी संगीत दिलेले व गायले ‘चले पवन की चाल’ या गाण्यामध्ये घोड्यांच्या टापांचा अतिशय सुंदर उपयोग त्यांनी केला होता. व ‘आई बहार आज आई बहार’ किंवा ‘कबतक निरास की अंधियारी’ ही गीते कमालीची सुंदर आहेत. सैगल यांची 'सोजा राजकुमारी' किंवा 'मैं क्या जानू' ही अजरामर गाणी पंकज मलिक यांनी संगीतबद्ध केलेली होती. पंकज मलीक यांना भारत सरकारने पद्मश्री व दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केला होता. पंकज मलिक हे कलकत्ता आकाशवाणीला पहिल्या पासून जोडलेले होते.

    पंकज मलिक यांच्या वर एक चरित्रपट सई परांजपे बनवला होता त्या बद्दल बोलताना सई परांजपे म्हणतात, पंकज मलिक या श्रेष्ठ संगीत दिग्दर्शकावर एक चरित्रपट मी प्रस्ताव मांडला. त्या वर्षी त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला होता, तेव्हा माझ्या प्रस्तावाला लगेचच मान्यता मिळाली. पण स्वत: पंकज मलिक या सिनेमासाठी मुळीच राजी नव्हते. किंबहुना, ते मुळात कुणाला भेटायलाच तयार नव्हते. त्यांना मनापासून हा सोपस्कार नको होता. भाव खाण्याचा त्यात लवलेश नव्हता. पण एकदा कशीबशी त्यांची भेट घेऊन, त्यांना रूपरेषा समजावून त्यांचे मन मी वळवू शकले. पुढचे सोपे होते. एकदा ‘हो’ म्हटल्यावर मग हवे ते सहकार्य आनंदाने द्यायला ते तयार झाले. त्यांचे घर केवळ शूटिंगसाठी नव्हे, तर ‘अड्डा’ म्हणून आमचे हक्काचे ठिकाण झाले. पंकजदा मला नेहमी ‘माय डियर सिस्टऽर’ अशी छान हाक मारीत. ते हाडाचे कलावंत होते. नट होते. झकासपैकी ‘शोमन’ होते. त्यामुळे त्यांच्या मुलाखती, त्यांचे किस्से बहारदार होत. मधे मधे ते गाणे गुणगुणत, एखादी नक्कल करीत, एखादा संवाद रंगवून सांगत. त्यांच्या गच्चीवर चित्रित केलेला एक प्रसंग : दादा कट्टय़ावर रेलून बसले होते. आठवणी सांगत होते. जवळच त्यांची पत्नी ऊन द्यायला कापडावर काही वाळवण पसरत होती. कॅमेरा चालू होता. बोलता बोलता दादा ‘दो नैना मतवाले’ हे त्यांचे प्रसिद्ध गाणे गाऊ लागले. आपल्या पत्नीकडे पाहत.. अगदी ‘आशिकाना अंदाजसे’! साठेक वर्षीय दीदींनी मग लटक्या रागाने असा काही मुरका मारला की बस्स! नॅशनल फिल्म अर्काइव्हज्कडून आम्ही पंकजदांच्या काही गाण्यांचे दुर्मीळ भाग मिळवले.

    ‘चलो पवनकी चाल’ इ. जुन्या गीतांचे चित्रण पाहणे-ऐकणे हा थरारक अनुभव होता. रायचंद बोराल हे प्रख्यात संगीत दिग्दर्शक न्यू थिएटरच्या संगीत विभागाचे प्रमुख होते. त्यांना बॉलीवूडच्या संगीताचे जनक मानतात. त्यांचा आणि दादांचा फार पूर्वीपासूनचा सहप्रवास. दोघांनी उभरत्या बंगाली सिनेसृष्टीत मोलाची कामगिरी केली होती. इतिहास घडवला होता. तेव्हा त्यांचे अनुभवाचे बोल पंकजदांच्या चरित्रपटासाठी अत्यावश्यक होते. पण अनेक वर्षांपासून दोघांमध्ये बेबनाव झाला होता. बातचीत बंद होती. तेव्हा या सिनेमात बोरालांच्या सहभागाविषयी ‘दुहेरी’ विरोध होता. मोठय़ा प्रयासाने दोघांची मने वळवून अखेर या धुरंधर संगीतकाराची सुंदर मुलाखत डबाबंद केली. हेमंतकुमारांच्या बाबतीतही तोच प्रकार. दोघांचा वर्षांनुवर्षे अबोला आणि म्हणून विरोध. पण एव्हाना मी समजूत घालण्यात तरबेज झाले होते. तेव्हा हाही तिढा मी सोडवला. मग हेमंतकुमार पंकज मलिक यांच्या योगदानाबद्दल अप्रतिम बोलले. एवढेच नाही, तर दादांनी बसवलेले एक गीतही गायले.पंकज मलिक नंतर जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते फाळके पुरस्कार घ्यायला पुढे झाले तेव्हा पाश्र्वसंगीत म्हणून मी त्यांचेच ‘आई बहार आई, आई बहार’ हे सदाबहार गाणे साऊंड ट्रॅकवर लावले. हा सिनेमा खरोखरच चांगला झाला होता. त्याला केवढे ऐतिहासिक आणि संग्राह्य़ मोल होते. अवघा काळ बोलका झाला होता. पण दुर्दैव! त्याचा दूरदर्शनवर आज मागमूसही उरलेला नाही. पंकज मलिक यांचे १९ फेब्रुवारी १९७८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- इंटरनेट

      May 10, 2017