जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहन पर्यंत आणि सचिनदेव बर्मनपासून राहुलदेव बर्मनपर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना होता. याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत अमीन सायानी यांची पर्सनॅलिटी फुलली.‘जी-हाँ बहनो और भाइयो’.. म्हणत सुरुवात करणारी त्यांनी शैली निर्माण केली. नंतर त्यांनी अनेक कार्यक्रम सुध्दा निवेदित केले.
February 29, 2024
माई मंगेशकर या मूळच्या धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील थाळनेर गावच्या होत. लता मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही त्यांची अपत्ये होय.
June 16, 2022
हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात काही अशा युती झाल्या ज्यांनी सिनेमाचा इतिहास कायमचा बदलून टाकला. अशीच एक अभूतपूर्व जुळणी म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि दिग्गज संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी. १९७० आणि १९८० च्या दशकात जेव्हा अमिताभ बच्चन चित्रपटसृष्टीत संघर्ष करत होते आणि नंतर जेव्हा त्यांनी सुपरस्टारपद गाजवले, तेव्हा त्यांच्या पडद्यावरील व्यक्तिमत्त्वाला संगीताची खरी ताकद कल्याणजी-आनंदजी यांनीच दिली. आनंदजी आणि अमिताभ बच्चन यांच्यात केवळ व्यावसायिक संबंध नव्हते, तर अतिशय कौटुंबिक आणि आदराचे नाते होते. अमिताभ बच्चन जेव्हा जेव्हा गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी जात, तेव्हा ते सर्वात आधी आनंदजींच्या पत्नीचे पाय छूकर आशीर्वाद घेत असत, इतकी आपुलकी त्यांच्यात होती.
August 2, 2026
ध्येयनिष्ठा, कलाप्रेम, अथक परिश्रम करण्याची वृत्ती, जिद्द, अभ्यासूपणा, नम्रता, सामाजिक जाणीव, आई-वडील-भावंडे आणि गुरू यांच्यावरील प्रेम, निष्ठा, आदर आणि कृतज्ञता इत्यादी गुणांनी माणूस घडतो; मोठा होतो. पद्मजा फेणाणी यांच्या मध्ये हे सारे गुण आहेत.
July 5, 2022
चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला.
April 20, 2022
मूळच्या महाराष्ट्रीय व मराठी असलेल्या भानुमती अण्णासाहेब राजोपाध्ये आणि सध्या भानू अथय्या या नावाने ओळखल्या जाणार्यार प्रसिद्ध महिला वेशभूषाकार. त्यांचा जन्म २८ एप्रिल १९२९ रोजी कोल्हापुर येथे झाला.कोल्हापूर येथे जन्मलेल्या लहानपणापासूनच रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्या मुळे त्यांनी मुंबई येथील जे. जे. स्कूल ऑफ़ आर्ट्स मध्ये प्रवेश घेतला व गोल्ड मेडल घेऊन पदवी प्राप्त केली. हिन्दी चित्रपटाचे गीतकार व कवि सत्येन्द्र अथय्या यांच्या बरोबर लग्न झाले व त्या भानुमती राजोपाध्येच्या भानू अथय्या झाल्या. त्यांना लहानपणापासूनच गांधीजींचे रेखाचित्र काढण्याची प्रचंड आवड होती. त्यामुळेच त्यांना रिचर्ड अॅडटनबरो यांच्या 'गांधी' (१९८२) या आंतरराष्ट्रीय चित्रपटासाठी कॉश्चूम डिझाईन करण्याची संधी मिळाली.
देशाला पहिला ऑस्कर मिळवून देणाऱ्या भानू अथय्या यांचा ऑस्कर प्रवास थक्क करणारा आहे. भानू अथय्या या १९५१ पासून भारतीय चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. त्यांनी कामिनी कौशल या अभिनेत्रीसाठी पहिला कॉश्चूम डिझाइन केला होता. 'श्री ४२०' मधील अभिनेत्री नादिरा यांच्या साठी "मुड़-मुड़ के ना देख..." या गाण्यासाठी केलेला गाऊन ने नवीन ओळख दिली. अभिनेत्रा साधना यांच्या सलवार-कमीजचे डिजाईन हे भानु अथय्या यांचे असायचे.ज्याची जादू ७० च्या दशकात फॅशन म्हणून ओळखली गेली. भानु अथय्या या अश्या ड्रेस डिजाइनर आहेत की, ज्याचे कपडे त्या पात्रात च्या भूमिकेत जातात.
भानु अथय्या यांनी १३० हून अधिक चित्रपटात गुरुदत्त, यश चोपड़ा, राज कपूर, आशुतोष गोवारिकर, कॉनरेड रूक्स और रिचर्ड एटेनबरो यांच्याबरोबर काम केले आहे. 'सी.आई.डी.' , 'प्यासा' , 'चौदहवी का चाँद', और 'साहब बीबी और ग़ुलाम' ,'रेशमा और शेरा' या चित्रपटानी भानु अथय्या यांना एक नवीन ओळख मिळाली. मा.भानु अथय्या यांनी 'गाइड' मध्ये वहीदा रहमान, 'ब्रह्मचारी' मध्ये मुमताज', सत्यम् शिवम् सुंदरम्' या चित्रपटातील झीनत अमान हिचाही कॉश्चूम भानू यांनीच डिझाइन केला होता. गुलज़ार यांच्या 'लेकिन' या चित्रपटासाठी भानू अथय्या सर्वोच्च ड्रेस डिजाइनर अवार्ड मिळाले होते. भानु अथय्या यांनी 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर' या चित्रपटासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. भानु अथय्या यांनी’ सीरियल्स व नाटकासाठी पण ड्रेस डिजाइन केले आहे. भानु अथय्या यांनी आपल्या जीवनावर 'द आर्ट ऑफ़ कॉस्ट्यूम डिज़ाइन' या नावाने एक पुस्तक पण लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
श्री ४२० मधील गाणे.
https://www.youtube.com/watch?v=R3D3YNmg-Ak
गाईड मधील गाणे.
https://www.youtube.com/watch?v=_i493uN6YHk
सत्यम् शिवम् सुंदरम् मधील गाणे.
https://www.youtube.com/watch?v=BdU3qP5EYoY
April 28, 2017
मुंबईतील श्री. गाडगे महाराज मिशनच्या धर्मशाळा असोत, वा मेळघाटातील कुपोषणग्रस्त मुलांसाठी अन्नदान, कृष्ठरोग्यांची सेवा असो वा गाडगेबाबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्यासाठीचे अन्नदान... अमरावतीच्या नागरवाडीचे बापूसाहेब देशमुख यांचे अशा विविध क्षेत्रातील सेवाकार्य गेली ४० वर्षे अखंड सुरु आहे. वंचितांची सेवा करा रे, हा संत गाडगेबाबांचा संदेश त्यांनी अंगात भिनवला आहे.
वंचितांच्या सेवेचा पाईक
July 24, 2015
मिर्ज़ा असद-उल्लाह बेग ख़ां उर्फ “ग़ालिब” हे एक प्रसिद्ध फारसी आणि उर्दू कवी होते. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १७९७ रोजी झाला. ते सुधारक वृत्तीचे, सर्व धर्मांना समान मानणारे, कर्मठ नसलेले, नमाज न पढणारे, रोजा न ठेवणारे, कलेचे आसक्त, रसिक व्यक्ती होते. गालिब केवळ चार वर्षांचे असतांना त्यांचे वडील वारले म्हणून आजोबा आणि काकांनी पालनपोषण केले. लहानपणी त्यांनी इस्लामचे धडे घेतले, फारसी भाषा शिकले. मा.मिर्झा गालिब हे थोरल्या बाजीरावांची पत्नीे मस्तानी हिच्या वंशात जन्माला आले होते.
गालिब यांनी फारसी भाषेत लिखाण काम सुरू केले. त्यांच्या साहित्यात जीवनाचे गंभीर तत्वज्ञान त्यांनी मांडले. वयाच्या ११व्या वर्षापासून गालिब शेर लिहीत होते. जीवनाच्या झळा सोसून मिर्झा गालिब यांनी त्या सुंदर करून काव्यातून मांडल्या. त्यांनी एकूण १८,००० च्या वर शेर फारसी भाषेत रचले. पुढे मित्रांच्या आग्रहाखातर त्यातीलच १०००-१२०० शेर त्यांनी उर्दू भाषेत लिहिले. मा.गालिब यांनी कधी कोणताही उद्योग-धंदा केला नाही. मित्रांच्या आणि नातेवाईकांच्या सहकार्याने ते राहत. त्यांना स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याची गरज वाटली नाही. उत्तर मोगल काळातील राजांच्या, उमरावांच्या दरबारी जाणेही त्यांना आवडत नसे. ते म्हणत माझ्या कविता माझ्या मृत्यूनंतरही अजरामर राहणार असल्याने माझे नाव आपोआपच सर्वत्र पसरणार.
गालिबच्या काव्यावर मीर आणि आमीर खुसरो यांच्या रचनांचा प्रभाव होता. साहित्य निर्मिती करताना केवळ चौकट मोडून चालत नाही. त्यात तितकी ताकदही असावी लागते. गालिबने परंपरेला नावीन्याची झालर लावली. अभिजात सौंदर्याची बूज राखायला शिकवले. घराण्यातच सैनिकी पार्श्वभूमी असल्याने गालिबमध्ये बंडखोरीचे बीज होते. मिर्झा गालिब यांच्यावर हिंदीत १९५४ साली एक चित्रपट निघाला होता व दुसरा १९८८ साली दूरचित्रवाणीसाठी बनवला होता. पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शक सोहराब मोदी तर दुसर्याा चित्रपटाचे दिग्दर्शक गुलझार होते. मिर्झा गालिब यांचे निधन १५ फेब्रुवारी १८६९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
मिर्झा गालिब यांच्या काव्यातल्या सुप्रसिद्ध पंक्ती
काबां किस नूर से जाओगे गालिब, शर्म तुमको मगर नहीं आती
दिल-ए-नादाँ तुझे हुआँ क्या आखि़र इस दर्द की दवा क्या है
नुक्ताचीं है ग़म-ए-दिल उस को सुनाये न बने
ये नथी हमारी किस्मत कि विसाल-ए-यार होता
हजारो ख्वाईशें ऐसी के हर ख्वाईश पे दम निकलें
हैं और भी दुनियामें सुखन-वर बहुत अच्छे, कहते हैं कि गालिब का अंदाज-ए-बयाँ और
December 27, 2017
जेष्ठ निरुपणकार व समर्थ संप्रदायाचे श्रद्धास्थान दत्तात्रय नारायण उर्फ अप्पासाहेब धर्माधिकारी यांचा जन्म १४ मे १९४६ रोजी झाला. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घराण्यात चारशे वर्षेपासुन समाजप्रबोधनाच्या कार्याची वंशपरंपरा आहे. त्यांच्या घराण्याचे मूळचे आडनांव ‘शेंडे’असे होते. त्यांच्या भूतकाळातल्या आठव्या पिढीतील पूर्वज गोविंद चिंतामण शांडिल्य ऊर्फ शेंडे हे धर्मजागृतीचे काम स्वेच्छेने करायचे.
May 14, 2019
ठाणे शहरातील विख्यात लेखक व कवी अशी ख्याती असलेल्या गणेश ताम्हणे यांचा अलिबाग सारख्या निसर्गरम्य गावी जन्मल्यामुळे निसर्गाबद्दल विशेषतः कोकणातील फुललेल्या निसर्गाबद्दल त्यांना वाटणारी अभिरूची त्यांच्या लेखनातून वाचकांच्या मनात उत्तमरित्या उमटलेली आहे. त्यांनी आजवर नियतकालिकांमधून व मासिकांमधून विपूल प्रमाणात लेखन केले असून “सुमन”, “भारत सेवक” अशा प्रथितयश मासिकांचे सहसंपादकपद, तसेच “बालविश्व” या लहान मुलांच्या नाजुक भावविश्वावरती अलगद प्रकाश टाकणार्या मासिकाचे संपादकपद त्यांनी भुषविलेले आहे. “भग्न बासरी”, “रेंगाळणारे सुगंध”,“कोकणाची पाऊलवाट” अश्या निरनिराळ्या विषयांवरती अत्यंत रोचक व लक्षवेधी शैलीने लिखाण केल्यामुळे ते रसिकांच्या साहित्य आठवणींमध्ये ते कायमचे कोंदले गेलेले आहेत. कोकणाची “पाऊलवाट” हे त्यांचे थेट कोकणातल्या दाट वनराईमध्ये वाचकांना घेवून जाणारे व साधेपणाच्या एका वेगळ्याच विश्वाची सफर करून आणणारे त्यांचे आत्मचरित्रपर पुस्तक, विशेष गाजले होते. कोकण संस्कृतीमध्ये, पुस्तक वाचून झाल्यानंतरही सर्वांना आणखी काही क्षण रेंगाळायला लावणार्या या पुस्तकामध्ये आपल्याला त्यांचे बालपण, ए.सी.सी. कंपनीमध्ये नोकरी करत असताना त्यांना आलेले अनुभव, भारताचा स्वातंत्र्यलढा, जीवनविषयक त्यांचा ऐकुण दृष्टीकोन, १९२२ पासूनचे ठाणे, आदींचा तपशील संदर्भवार स्पष्ट होतो. ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दत्ताजी ताम्हणे यांनी देखील आपल्या वडिलांकडून म्हणजेच गणेश ताम्हणें कडून देशासाठीच्या योगदाना बद्दलचे मोलाचे धडे घेतले असल्यामुळे ते देखील सामाजिक कार्यात यशस्वी होऊ शकले . ठाण्यातील मराठी साहित्यपरंपरेचे नियोजनबध्द संवर्धन करण्याच्या हेतूने स्थापन झालेले शारदा मंडळ, मराठी ग्रंथसंग्रहालय, कथामाला मध्यवर्ती मंडळ आणि राष्ट्र सेवा दल अशा संघटनांमध्ये पदाधिकारी म्हणून त्यांनी बहुमूल्य योगदान दिले होते. ठाणे पालिकेचे दोन वेळा निर्वाचित सदस्य म्हणून ते निवडून आल्यामुळे त्यांच्या व्यक्तित्वाला राजकीय किनारदेखील लाभलेली होती. पण मूळचा पिंड साहित्यिकाचा असल्यामुळे राजकारणात ते विशेष रमू शकले नाहीत.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti