(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चंद्रशेखर परांजपे

    श्री. चंद्रशेखर पी. परांजपे हे ठाणे येथील ठाणे भारत सहकारी बॅंकेचे संचालक आहेत.

      March 5, 2015


  • जेष्ठ अभिनेत्री प्रिया राजवंश

    प्रिया राजवंश यांचे खरे नाव वीरा सिंह. शालेय शिक्षण सिमल्यातलंच. शाळेत असताना त्यांनी अनेक इंग्रजी नाटकांत अभिनय केला होता. वनविभागात कंजरवेटर म्हणून काम करत असताना प्रिया राजवंश यांच्या वडिलांना संयुक्त राष्ट्र संघाच्या वतीने ब्रिटनमध्ये पाठवण्यात आले होते. प्रिया राजवंश सुद्धा त्यांच्याबरोबर लंडनला गेल्या होती. त्यांचा जन्म १९३७ रोजी सिमला येथे झाला.तेथे गेल्यानंतर त्यांनी रॉयल अकॅडमी ऑफ ड्रामेटिक आर्ट्स या प्रसिद्ध इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळवला.

    चेतन आनंद हे त्यांच्या’हकीकत’ या सिनेमासाठी नवीन चेह-याच्या शोधात होता. हिंदी चित्रपटसृष्टीत युद्धपट निर्माण करण्यात चेतनला स्वारस्य होते. त्यामुळे या कथेला सूट होईल अशी नायिका ते शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रिया राजवंश यांचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्यांनी थेट तिच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून तो विभक्त झाला होता. जीवनातील एकाकीपणामुळे तो बेचैन होता. ‘हकीकत’ हा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. प्रिया राजवंश यांनी केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतन आनंद यांना मदत केली. त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही. ‘हकीकत’ रिलीज झाला. त्याने बॉक्स ऑफिसवर तुफान कल्ला केला. प्रिया राजवंश रातोरात बिग स्टार झाल्या. १९५० मध्ये चेतन आणि देवआनंदने मिळून ‘नवकेतन’ सुरु केली होती. पण ते यश देव आणि नवकेतनच्या नावावर नोंदवले गेले. त्यामुळे स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्याने ‘हिमालया फिल्म्स’ सुरु केली. चेतनची एक खास टीम होती, जाल मिस्त्री, कैफी आझमी आणि मदनमोहन ! या टीममध्ये आता प्रिया राजवंश यांचे नाव सामील झाले. चेतनने हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश यांना रोल दिले. ‘हकीकत’नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. ‘हकीकत’नंतर प्रिया राजवंश यांना अनेक ऑफर आल्या. मात्र त्यांनी केवळ चेतन आनंद यांच्यासोबतच काम करणे पसंत केले. तिने इतर मोठ मोठे बॅनरचे चित्रपटही नाकारले. यामुळे तिच्या सिनेमांची संख्या मोजकीच राहिली. ‘हकीकत’नंतर १९७० मध्ये ‘हीर रांझा’, १९७३ मध्ये ‘हिंदुस्थान की कसम’ आणि ‘हंसते जख्म’, १९७७ मध्ये ‘साहेब बहादुर’, १९८१मध्ये ‘कुदरत’ आणि १९८५मध्ये ‘हाथों की लकीरें’ या सिनेमात प्रिया राजवंश होत्या. ‘हिंदुस्तान की कसम’मध्ये तर प्रिया राजवंश यांची ताहिरा आणि मोहिनी अशी दुहेरी भूमिका होती. प्रिया राजवंश यांचे निधन २७ मार्च २००० रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 28, 2017


  • सूत्रसंचालक व लेखक डॉ. सुनील देवधर

    डॉ. सुनील देवधर यांनी आकाशवाणीत ३८ वर्षे काम केले. ते आकाशवाणी पुणे केंद्रातून सहायक संचालक पदावरून निवृत्त झाले. त्यांचा निवेदक ते सहायक संचालक या पदापर्यंतचा प्रवास एका हळव्या मनाचा कवी, कलाकार म्हणून जितका परिचित आहे, तितकेच त्यांची कणखर व्यक्ती म्हणूनही वेगळी ओळख आहे.

      July 27, 2024


  • लेगस्पीनर माजी कर्णधार अनिल कुंबळे

    कुंबळेची जिद्द, त्याचा करारीपणा मैदानावर सातत्याने दिसून यायचा. त्याने आपल्या फिरकीने भल्या भल्या फलंदाजांना खेळपट्टीवर नाचवले आहे. पाकिस्तानी खेळाडू तर हे कधीही विसरणार नाहीत.

      February 7, 2022


  • चित्रपट ‘साहित्यिक दिग्दर्शक’ दिनकर द. पाटील

    जवळपास पन्नास चित्रपटांचे दिग्दर्शन व शंभराहून अधिक चित्रपटांचे लेखन इतके प्रचंड काम करणारे मा.दिनकर पाटील हे मराठीतील एकमेव ‘साहित्यिक दिग्दर्शक’ असावेत. त्यांना ग. दि. माडगूळकर पुरस्कार, जनकवी पी. सावळाराम पुरस्कार आणि व्ही. शांताराम पुरस्कार असे मानाचे पुरस्कार लाभले. चित्रपट महामंडळाच्या ‘चित्रभूषण पुरस्कारा’चेही ते मानकरी होते.

      September 26, 2019


  • अभिनेत्री नंदिता पाटकर

    नंदिता पाटकर एक मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेत्री आहेत. नंदिता यांनी मुंबईतील रुपारेल कॉलेजमधून पदवी पूर्ण केली. त्यांनी सुरुवातीला आरजे आणि व्हॉईस आर्टिस्ट म्हणून काम केले आहे.नंदिता या झी मराठी वरील माझे पति सौभाग्यवती या मराठी मालिकेत त्यांनी अभिनय केला होता.

      March 1, 2024


  • दूरदर्शनच्या प्रतिभावंत वृत्तनिवेदिका वासंती वर्तक

    प्रसार माध्यमांमध्ये राहूनही स्वत: प्रकाशझोतात न राहता इतरांना प्रकाशझोतात आणण्याचा प्रयत्न वासंती ताईंनी सतत केला व करीत असतात. शेकडो जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालन त्यांनी केले आहे. विशेषत: साहित्य विषयक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन करण्यात त्यांना विशेष आवड आहे.

      March 20, 2022


  • प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

    प्रा. डॉ. प्रकाश खांडगे हे लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार व लेखक आहेत. प्रा. प्रकाश खांडगे हे मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे समन्वयक आहेत.

      July 23, 2017


  • प्रा. प्रदीप ढवळ

    एखाद्या व्यक्तिचं कर्तुत्व आणि त्यांची आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा ही त्याला एका अशा पदावर नेऊन ठेवते जिथे तो माणूस यशाच्या मागे लागत नाही तर यश त्याच्या मागे लागतं. पण त्यावेळी देखील यशापशाची पर्वा न करता आपल्या कामात, त्या कामाच्या धुंदीतच जगायला त्याला आवडतं.

      May 23, 2014


  • गायक पं. जितेंद्र अभिषेकी

    जितेंद्र अभिषेकींचे मूळ आडनाव नवाथे. पण मंगेशाला अभिषेक करण्याचा अधिकार त्यांच्याकडे आला अन् ते अभिषेकी बनले.

      September 21, 2021