जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
पंडितांच्या बहुतेक कविता मुक्तच्छंदात्मक आहेत. गावड्यांच्या कोकणीत लिहिलेल्या त्यांच्या काही कवितांत जोष-जोम आहे. गरीबदुबळ्यांवर होणाऱ्या अन्यायाला ते आपल्या काव्यातून वाचा फोडतात, गोमंतकाचे सृष्टिसौंदर्य मोठ्या कौशल्याने वर्णितात, तर कधीकधी हळुवारपणे आपल्या प्रेमकाव्यातून विरहाची व्यथाही व्यक्त करतात. संपन्न शब्दभांडार, सहजसुंदर व परिणामकारक शैली, प्रतिमांचा मनोहर विलास, विचारांची घार व भावनेची उत्कटता यांमुळे त्यांच्या काव्याला एक आगळेच वैशिष्ट्य प्राप्त झाले आहे.
April 6, 2022
१९३२ मध्ये आलेला ‘ श्यामसुंदर ‘ हा शाहू मोडक यांचा पहिला चित्रपट खूपच गाजला मुंबईच्या थिएटर मध्ये सतत २७ आठवडे चालून रोप्यमहोत्सव करणारा तो अखंड भारतातील पहिला चित्रपट होता. त्यात शाहू मोडक यांनी गायलेले ‘ भावे वरिता गोसेवेला ‘ हे गीत खूपच गाजले
August 9, 2021
त्यांनी १९७४ मध्ये रेल्वे कामगारांसाठी लढा दिला. मुंबईत कामगारांसाठी लढा देताना मुंबई बंद करून दाखवली होती. आणीबाणीच्या काळात त्यांनी सरकारविरोधात रान उठवले होते. त्यांना शोधण्यासाठी सरकारने जंग जंग पछाडले होते. मात्र जॉर्ज यांनी वेशांतरे करून लढा सुरूच ठेवला होता. २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली होती.
January 29, 2022
व्ही शांताराम यांनी १९४२ साली प्रभात फिल्म कंपनी सोडल्यावर दामले-फत्तेलाल यांचे सहकारी दिग्दर्शक राजा नेने यांनी रामशास्त्री चित्रपट हा हिंदी-मराठी दिग्दर्शित केला.
June 25, 2022
बंदिशकार पं. बबनराव हळदणकर तथा श्रीकृष्ण हळदणकर यांचा जन्म २७ सप्टेंबर १९२७ रोजी झाला. पं. हळदणकर यांनी संगीतविषयक संशोधन आणि लेखनही केले होते. आग्रा घराण्याचे गायक आणि बंदिशकार म्हणून पंडित बबनराव हळदणकर यांची ओळख होती. मा.हळदणकरानी ५० वर्षांहून अधिक काळ शास्त्रीय गायनाने संगीतप्रेमींना मंत्रमुग्ध केले. रस पिया हे त्यांचे टोपणनाव होते. ते नव्वदीच्या वयातही संगीताची साधना करत असत. हळदणकरांनी सुरुवातीला मोगूबाई कुर्डीकरांकडून जयपूर/अत्रौली घराण्याची तालीम घेतली. त्यानंतर पुढे त्यांनी खादिम हुसेन खाँसाहेबांकडून आग्रा घराण्याची तालीम घेतली. त्यांनी आग्रा घराण्याची डौल आणि लयकारी स्वीकारली. १९५९ पासून ते खादिम हुसेन खाँसाहेबांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३पर्यंत हळदणकर त्यांच्या सहवासात राहिले. १९६०च्या दशकापासून हळदणकरांनी आग्रा घराण्याच्या गायकीतला डौल आणि त्यातील परिपक्वता प्रेक्षकांपुढे मांडली.
आग्रा घराण्यातील गायकांची ध्रुपद धमाराशी बांधिलकी असते तसेच नोमतोम आलापाने ते राग मांडतात. हळदणकर आपल्या दरबारी, मियाँकी तोडी, मलुहा केदार वगैरे रागांतील चीजांमधून नोमातोम आलाप मांडत असत. बबनराव हळदणकर हे एखाद्या चांगल्या तबलजीच्या साथीत लयकारीचे अनेकरंगी आविष्कार ऐकवत असत. ख्याल गाताना मनोवृत्तीचे आणि सादरीकरणाचे गांभीर्य ठेवतात आणि आग्रा गायकीचा बोजदारपणा किंवा भारदस्तपणा ते ही गायकी मांडत असत.
हळदणकर आग्रा घराण्याचे भाष्यकार म्हणून चाळीसहून अधिक वर्षे ख्यात होते. आग्रा घराणे हे ध्रुपद गायकीशी जोडलेले आहे. विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत या घराण्यास बरीच प्रसिद्धी होती. त्यानंतरही आग्रा गायकीची सौंदर्यस्थळे जाणून घेऊन ती महाराष्ट्रातील हळदणकर बंगालमधील विजय किचलू यांनी मांडली. हळदणकरांनी गोवा कला अकादमी, खैरागढचे संगीत विद्यापीठ तसेच अन्यत्रही संगीताचे अध्यापन केले.. रागांच्या प्रमाणीकरणावरही त्यांनी काम केले. पं. हळदणकर यांचा खूप मोठा शिष्यपरिवार आहे. अरुण कशाळकर, वृंदा मुंडकूर, देवकी पंडित, डॉ. राम देशपांडे, विश्वजीत बोरवणकर हे हळदणकरांचे शिष्य आहेत. भारतात आणि अमेरिकेत हळदणकरांचे संगीताचे अनेक कार्यक्रम झाले. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘हृदयेश संगीतसेवा' पुरस्कार, कलकत्त्याच्या आय.टी.सी संगीत रिसर्च अकादमीचा पुरस्कार असे पं. बबनराव हळदणकर यांना अनेक पुरस्कार मिळाले होते.
पं. बबनराव हळदणकर यांचे १८ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.
बंदिशकार पं. बबनराव हळदणकर यांचे ग्रंथलेखन
जुळू पहाणारे दोन तंबोरे
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०७१३३
संदर्भ. इंटरनेट
November 18, 2018
किर्लोस्करांच्या शाकुंतल नाटकात ‘शकुंतला’, सौभद्र नाटकात ‘सुभद्रा’ व रामराज्यवियोग नाटकात ‘मंथरा’ या भाऊरावांच्या स्त्रीभूमिका अतिशय लोकप्रिय झाल्या. ‘सुभद्रे’ची भूमिका तर त्यांनी १८८३ ते १८९७ या चौदा वर्षांच्या काळात अखंडपणे केली. महाराष्ट्रातील घराघरांतून त्यांच्या नावाचा उल्लेख आत्मीयतेने ‘भावड्या’ असा होऊ लागला.
February 3, 2022
(१९१८-१९९०)
काही काळ संघाचे पुर्ण वेळ प्रचारक म्हणून काम केलेल्या देवलांनी म्हैसाळ ‘जिल्हा सांगली‘ येथे अस्पृश्यांच्या पुनर्वसनासाठी मोलाचे काम केले. श्री विठ्ठल संयुक्त सहकारी शेती संस्था स्थापन करून दलितांच्या शेतीला उत्तेजन दिले. त्यांची कर्जापासून सुटका केली व त्यांना स्वयंपुर्ण बनविले शासनाने त्यांना दलित मित्र पुरस्काराने गौरवले.
March 11, 2015
(1902-1971)
यांचे पूर्ण नाव भाऊराव कृष्णराव गायकवाड. दलित समाजातील तळमळीचे कार्येकर्ते. स्वातंत्र्य लढयात आणि दलितांच्या अनेक आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग. रिपब्लिकन पक्षाचे खुप वर्षे काम केले. त्या पक्षाचे माजी अध्यक्ष. अनेक वर्षे आमदार आणि खासदार म्हणून अनुभव. प्रबुध्द भारत या नियतकालिकाच्या संपादनात सहभाग. डॉ. आंबेडकर बरोबरीने बौध्द धर्माचा स्वीकार.
March 11, 2015
पंडित उल्हास कशाळकर यांचे शिक्षण M.A.(L.L MUSIC). त्यांचा जन्म १४ जानेवारी १९५५ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी येथे झाला.कशाळकरांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडे झाले. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या त्याच्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांच्याकडून मिळाले. नागेश कशाळकर हे उल्हास लहान असताना त्यांना ग्रामोफोनवर वेगवेगळ्या गायकांनी गायलेल्याक भीमपलास, यमन, शुद्ध कल्या ण या रागांच्यार बंदिशी एकवत असत. त्याेचे संस्कार उल्हास कशाळकर यांच्याुवर होत असत. त्यांच्या वडिलांनी वेगवेगळ्या नावाजलेल्याा गायकांच्या गाण्यांशी उल्हास यांची ओळख करून दिली. सोबत त्या पैकी कुणाकडून कोणता गुण आत्मासात करावा याचे स्वातंत्र्यही दिले. मा.उल्हास कशाळकर यांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताच्या अभ्यासास सुरुवात केली. उल्हाास कशाळकर यांना 'बालगंधर्व नाट्यसंगीत स्पसर्धे'त भरघोस यश मिळाले. त्यामुळे त्यांचे नाव ज्याच्या त्याच्यां तोंडी झाले. हा मुलगा नाट्यसंगीत क्षेत्रात भरीव कामगिरी करेल असे भाकित अनेकांनी वर्तवले. कशाळकर यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाल्याकनंतर त्यांची राम मराठे यांच्यांकडे आग्रा घराण्या ची तालिम सुरू झाली. राम मराठे हे उत्तम ख्यामल गायक होते. कशाळकर यांनी त्यांच्याकडे विशेष करून ख्याल गायकीचे धडे घेतले. त्या नंतर त्यांनी गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळवली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर तथा बापुराव पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे. उल्हास कशाळकरांनी दूरदर्शन व आकाशवाणीवर अनेक कार्यक्रम केले असून आकाशवाणीच्या ठाणे येथील केंद्रात त्यांनी १९८३ ते १९९० च्या दरम्यान काम केले. त्यांनी १९९३ मध्ये कोलकाता येथील आय. टी. सी. संगीत संशोधन अकादमीत आचार्यपद स्वीकारले. ते तिथे ग्वाल्हेर घराण्याच्या गुरूपदावर कार्यरत आहेत. त्यांची ग्वाल्हेर घराण्यासोबत आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकूमत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिष्य झाले आहेत व तयार होत आहेत ही महाराष्ट्राला अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यांनी राम देशपांडे, ओंकार दादरकर व शशांक मकतेदार असे शिष्य घडवले आहेत. मा.कशाळकर यांना २०१० साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा.उल्हास कशाळकर यांना पाच भाऊ असून सगळे गायक आहेत. त्यामपैकी अरूण हे आग्रा घराण्या्चे सुप्रसिद्ध गायक आहेत, तर विकास हे संगीततज्ञ आहेत. कशाळकरांच्यार पत्नी संजिवनी कोलकाता आकाशवाणीत असिस्टंट स्टेशन डायरेक्टर पदावर कार्यरत आहेत. संमिहन कशाळकर हा मुलगा. तो वडिलांकडेच गाणे शिकत असून कोलकात्याला एस.आर.ए.मध्येू शिष्यवृत्ती धारक आहे. मा.उल्हास कशाळकर अखिल भारतीय पातळीवरील ‘क्रिटिक असोसिएशन’च्या मानाच्या पुरस्काराने गौरवले गेले आहेत. त्यां ना संगीत नाटक अकादमी पुरस्कार २००८ साली प्राप्ता झाला होता. त्यांनी आजपर्यंत भारतात व परदेशांतील अनेक मोठ्या संगीत महोत्सवांत भाग घेतला असून, ते ऑस्ट्रेलियामधील बहुसांस्कृतिक महोत्सवात २००६ मध्ये, तर अॅमस्टरडॅम - भारत महोत्सवात २००८ मध्ये सहभागी झाले होते. त्यांच्या गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या आहेत. मा.सुरेश तळवलकरांच्या तबलासाथीचे व उल्हास यांच्या गाण्याचे अद्वैत आहे. उल्हास याच्या गाण्याच्या प्रवासात तळवलकरांचा सहभाग मोठाच. सुरेश तळवलकर म्हणतात,“काही वर्षांपूर्वी उल्हासचे गाणे ऐकून लोक वाहवा म्हणायचे. आता आहाहा म्हणतात. दोन शब्दांतील फरक रसिकांना ठाऊक आहे. भारतीय अभिजात संगीत काळाबरोबर झेपावले आहे आणि कशाळकर हे त्याचेच निदर्शक आहेत.”
उल्हास कशाळकर यांची वेबसाईट www.ulhaskashalkar.com
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. थिंक महाराष्ट्र / मकरंद वैशंपायन
January 16, 2017
धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार उत्तम गाणाऱ्या, ज्यांना ‘ठुमरीक्वीन’ असेही म्हटले जात असे त्या विदुषी गिरिजादेवी यांचे वडील उत्तम हार्मोनियम वादक होते व ते संगीताच्या शिकवण्या घेत असत. त्यांचा जन्म ८ मे १९२९ रोजी वाराणसी येथे झाला. त्यांच्याकडून गिरिजादेवींनी गाण्याचे धडे घेतले. वयाच्या पाचव्या वर्षापासून गायक व सारंगी वादक सर्जू प्रसाद मिश्रा यांच्याकडून त्या ख्याल व टप्पा शिकल्या. गायनाबरोबर वडिलांनी त्यांना अनेक भाषा, मर्दानी खेळ हेही सर्व शिकवले. त्यामुळे त्या बहुश्रुत झाल्या, साहित्याच्या जाणकारही झाल्या.
वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी एका चित्रपटात भूमिका केली व आपले संगीत शिक्षण त्यांनी श्री चंद मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू ठेवले. गिरिजादेवींनी १९४९ मध्ये अलाहाबाद आकाशवाणी केंद्रावर आपला पहिला संगीत कार्यक्रम केला. त्यांनी अशा प्रकारे बाहेरचे कार्यक्रम करण्यास त्यांच्या आई व आजीचा विरोध होता. तेव्हाच्या समजुतीनुसार उच्चवर्गीय स्त्रिया गाण्याचे सार्वजनिक कार्यक्रम करत नसत. गिरिजादेवींनी त्या कोणतेही खासगी संगीत कार्यक्रम करणार नाहीत हे मान्य केले.
१९६० पर्यंत त्या आपले गुरू श्री चंद मिश्रा यांच्याकडे शिकत होत्या. १९४९ मध्ये त्यांचा अलाहाबाद रेडिओवर पहिला जाहीर कार्यक्रम झाला, त्यानंतर १९५१ मध्ये आराह, बिहार येथे पहिली जाहीर मफल झाली. १९९० च्या दरम्यान बनारस हिंदू विद्यापीठात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. आपला सांगीतिक वारसा जपण्यासाठी संगीत अध्यापन करून अनेक नवीन विद्यार्थ्यांना तयार करताना गिरिजादेवींनी २००९ पर्यंत आपले संगीत दौरे चालू ठेवले होते. गिरीजा देवी यांनी बनारसचं स्पेशल पान खाल्लं की त्यांच्या गळा खुलून जात असे. तोंडात अस्सल बनारसी पान ठेवून, त्या बनारसी पानापेक्षाही अधिक रंगतदार अशी विदुषी गिरिजादेवींची ठुमरी, चती, ख्यालही ऐकण्याचे भाग्य अनेकांना मिळाले आहे. त्या एका मुलाखतीत म्हणल्या होत्या, 'आमच्या घरी सर्वचजण पान खायचे. त्यामुळे मलाही वयाच्या दहाव्या वर्षापासून पान खायची सवय लागली. हळूहळू ती वाढली. 'इतर गायक-गायिका गाताना गळा खुलावा म्हणून गरम पाणी किंवा कॉफी घेतात, पण माझ्या या खास बनारसी मेघाई पानाच्या रसामुळे माझा गळा खुलतो.'
गिरिजादेवी बनारस घराण्याच्या परंपरेत गातात आणि त्या परंपरेतील पूरबी अंग शैलीच्या ठुमरीचे सादरीकरण करत असत. त्यांची सुरेलता उच्च दर्जाची होती. कजरी, चैती, होरी, ख्याल गायकी, टप्पा, लोकसंगीत अशा विविधांगी व उपशास्त्रीय गायन प्रकारांवर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. आवाजाचे वेगवेगळे लगाव, व्हॉइस मोडय़ुलेशन्सचा वापर यांमुळे सूक्ष्म स्वरस्थाने लागतात, ती लोकसंगीतातून आल्याने आजकाल तर फारच अभावाने ऐकण्यास मिळतात. त्यांच्या ठुमरीची लय संथ होती. ख्यालासारखी भारदस्तपणे त्यांच्या ठुमरीची बढत असे संथ बोलबनावांनंतर माफक हरकती मुक्र्या त्या घेत असत. कल्पनाविलास भरपूर, पण भावदर्शन संयमित अशी त्यांची ठुमरी सजत असे. वेधक, माफक आणि रागाला साजेसे असे रागमिश्रण त्या करत असत. उदा.- भरवी ठुमरीत त्या बिलासखानी तोडीचे मिश्रण करतात. धृपद, ख्याल, टप्पा, ठुमरी- दादरा, चती, कजरी, होरी, सावनी, झूला हे सर्व प्रकार त्या उत्तम गात असत.
पं. सामता प्रसाद, किशन महाराज, उस्ताद अल्लारखाँ, झाकीर हुसन अशा सर्व कसलेल्या तबलजींबरोबर त्या गायल्या होत्या. सवाई गंधर्व महोत्सवातल्या त्यांच्या मैफलीं गाजल्या होत्या. वाग्गेयकार आणि मैफलींखेरीज त्यांचे इतरही काम महत्त्वाचे आहे. लोकगीतांचे अनेक प्रकार आता हळूहळू नष्ट होत चालले आहेत असे त्यांना वाटत असे, म्हणूनच अठराव्या शतकात काशीमध्ये होणाऱ्या ‘गुलाबबारी’ गान महोत्सवासारख्या काही जुन्या परंपरा त्यांनी पुनरुज्जीवित केल्या होत्या. त्यात भारतरत्न भीमसेन जोशी, विदुषी शोभा गुर्टू अशा किती तरी मोठय़ा कलाकारांनी आपले गायन पेश केले होते. आपल्या समकालीन कलाकारांविषयी गिरिजादेवी अत्यंत आदराने बोलत असत. त्यांचे स्वतचे कर्तृत्व मोठे असून त्या नम्रपणे म्हणत असत की, ठुमरी म्हटलं की तीत सिद्धेश्वरीदेवींसारखी कोणी श्रेष्ठ नाही.
गुरू म्हणूनही त्यांची कारकीर्द भरीव आहे. कोलकात्याच्या संगीत रिसर्च अकादमीत दोनदा त्या गुरू म्हणून नियुक्त झाल्या होत्या. ठुमरीशिवाय श्रीचंद मिश्रांकडून शिकलेले गुल, बत, नक्ष, रुबाई, छंद- प्रबंध, धारू असे प्रकारही आपल्या शिष्याना शिकवले होते. आता अस्तंगत होत जाणारा गानप्रकार जागता ठेवण्याचे आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्याचे महत्त्वाचे कार्य त्यांनी केले. त्यातील गायकी, अलंकरण, भावदर्शन, लयभाव, सूक्ष्म स्वरदर्शन, आवाजाचे लगाव हा भारतीय संगीताचा अमूल्य ठेवाही जपला जात असे. आपल्या शिष्यांना त्या सांगत असत घरकाम करताना, चहा करताना, भाजी कापताना, टेबल सजवताना राग, अलंकार, पलटे, बंदिशी गुणगुणणे सतत चालू ठेवावे.त्यांचा हा वारसा त्यांच्या शिष्या शुभा जोशी, धनश्री पंडित राय, अश्विनी टिळक, शुभा मुद्गल या जपत आहेत. भारत सरकारने १९७२ मध्ये पद्मश्री पुरस्कार, १९८९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार,२०१६ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच ‘द न्यू ग्रोव्ह ऑफ म्युझिक’ मध्ये त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख आहे.
तानसेन सन्मान, गुजरात सरकारचा ताना- रीरी पुरस्कार, अनेक संस्थांकडून डी लिट्., संगीत नाटक अकादमीची फेलोशिप आणि पुरस्कार, कोलकात्याचा डोव्हर लेन म्युझिक फेस्टिव्हलचा संगीत सन्मान पुरस्कार, दिल्ली सरकारकडून लाइफ टाइम अचीव्हमेंट अॅवॉर्ड असे किती तरी पुरस्कार मिळाले होते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti