जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
यशवंत देव म्हणजे शब्दप्रधान गायकी. त्यांचा जन्म १ नोव्हेंबर १९२६ रोजी झाला. त्यांच्या घरात वडिलांच्या रूपातच गाणे होते. तेच त्यांचे पहिले गुरू. देवांचे वडील विविध वाद्ये वाजवण्यात पटाईत होते पण त्यांतही तबल्यावर त्यांचे जास्त प्रेम होते. त्यांच्याचकडून देवांना तालाचे बाळकडू मिळाले. जी.एन जोशी आणि गजाननराव वाटवे ह्यांच्या शब्दप्रधान गायकीमुळेच यशवंत देव सुगम संगीताकडे वळले.
यशवंत देव यांचा प्रवास गाण्यातून कवितेकडे झाला. आजतागायत अनेक नाटके आणि चित्रपटासाठी गाणी लिहिली, संगीत दिले. त्याचप्रमाणे बालकविता, विडंबन, विनोदी काव्यप्रकारही लिहिले. यशवंत देवांनी हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज संगीतकार अनिल विश्वास यांना आपले गुरू मानले होते. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘ भावसरगम ’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्या द्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली. आचार्य रजनीश यांच्या लेखनाचा त्यांनी केलेला भावानुवादही रसिकांना आवडला.
यशवंत देव जसे एक संगीतकार आहेत तसेच ते एक उत्तम गायकही आहेत आणि त्याहीपुढे जाऊन ते एक अतिशय समर्थ असे कवीसुद्धा आहेत. त्यांनी रचलेली कैक गाणी ह्याची साक्ष देतील. जीवनात ही घडी अशीच राहू दे, श्रीरामाचे चरण धरावे दर्शन मात्रे पावन व्हावे, अशी धरा असे गगन कधी दिसेल का?, कोटि कोटि रूपे तूझी कोटी सूर्य चंद्र तारे, तू नजरेने हो म्हटले पण वाचेने वदणार कधी, प्रिया आज माझी नसे साथ द्याया, स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात, कुणी एकत्र नांदती कुणी दूर दहा हात, अशी ही दोन फुलांची कथा, एक शिवाच्या पदी शोभते एक शवाच्या माथा....अशी एकाहून एक सरस गाणी देवांनी रचलेली आहेत. ह्यातील काही चित्रपटांसाठी, तर काही भावगीत-भक्तिगीत म्हणून रचलेली आहेत. मा.यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते. चिंतनशील कलाकार असणारे यशवंत देव एका फार मोठय़ा सांगीतिक कालखंडाचे साक्षीदार आहेत. स्वत:सोबत अनेकांची कारकीर्द घडताना त्यांनी जवळून पाहिली आहे. १९५१ मध्ये ते सतारवादक म्हणून एच. एम. व्ही.त नोकरीला लागले.
लता मंगेशकर, वसंत प्रभू, पी. सावळाराम तसेच आशा भोसले यांची गाणी या काळात पुढे येत होती. हे सर्व देवांना जवळून बघायला मिळाले. एच. एम. व्ही. च्या नोकरीने देवांना अनुभवसमृद्ध केले. देव साहेबांनी मोजक्याच चित्रपटांना संगीत दिले. त्याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही खंत नाही. आपल्याला चित्रपट क्षेत्रात संगीत दिग्दर्शक म्हणून कामे अर्थात ज्या काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले त्यातली त्यांची कामगिरी चोख होती. त्याचा आनंदही त्यांना लाभला होता. म्हणूनच ‘जीवनात ही घडी अशीच राहू दे’ (‘कामापुरता मामा’- गीत व संगीत- यशवंत देव) हे लता मंगेशकरांच्या आवाजातलं अजरामर गीत जन्माला आलं. पुलंमुळे ते गीतकार झाले. ‘झालं-गेलं विसरून जा’ या चित्रपटाची गाणी विलक्षण गाजली.
एच. एम. व्ही.ने स्टाफ कमी केल्यामुळे देवांची नोकरी सुटली. दरम्यान, त्यांनी गाण्याचा क्लास सुरू केला. ते स्वत: खऱ्या अर्थाने गायक नाहीत. तरुणपणात फुटलेला आवाज कधीच सांधता आला नाही, असं ते स्वत:च सांगतात. त्यावर मात करण्याचे प्रयत्नही त्यांनी केले. त्यांच्या शिष्यवर्गातील एक नामवंत नाव म्हणजे प्रख्यात पाश्र्वगायिका सुमन कल्याणपूर. (तेव्हाच्या सुमन हेमाडी!) त्यांची देवांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘मधुवंतीच्या सुरासुरातून’, ‘श्रीरामाचे चरण धरावे’, ‘पक्षिणी प्रभाती चारियासी जाये’ ही गाजलेली गाणी त्यांनी गायली.
या गाण्यांना चाली लावताना आपली मन:स्थिती कशी होती, हेही देव विशद करताना म्हणतात, ‘गीताला सूर आपल्या डोक्यात शोधण्यापेक्षा त्या गीताच्या शब्दांतच ते दडलेले असतात हे जाणवलं. शब्दांतच सूर शोधायचे असतात हे सत्य विजेसारखं डोळ्यांसमोर आणि डोक्यात चमकलं!’’ म्हणूनच पुढच्या काळात देवांचं ‘जर कविता चांगली असेल तर त्यात चाल असतेच. मी ती फक्त शोधून काढतो!’ हे वाक्य फार गाजलं. ते नेहमी चांगल्या कवितेच्या शोधात असतात. यातूनच ‘शब्दप्रधान गायकीचे उद्गाते’ हे बिरूद त्यांना बहाल झालं. 'दिवस तुझे हे फुलायचे', 'पाऊस कधीचा पडतो', 'तिन्ही लोक आनंदाने', 'जीवनात ही घडी', 'क्षितिजावर खेळ विजेचा' अशा अनेक भावगीतांचे / चित्रपट गीतांचे / नाट्यगीतांचे संगीतकार, 'प्रिया आज माझी', 'स्वर आले दुरुनी', इ. गीतांचे कवी, 'शब्दप्रधान गायकी', 'रियाजाचा कानमंत्र', 'कृतज्ञतेच्या सरी', 'पत्नीची मुजोरी' अशा अनेक पुस्तकांचे लेखक मा. ‘प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव’ हे अशोक चिटणीस यांनी पुस्तक लिहिले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 12, 2017
९० च्या दशकात त्यांचे निवडणूक आयोगामध्ये इतके वजन होते की ‘भारतीय राजकारणी फक्त दोन गोष्टींना घाबरतात. एक म्हणजे देव आणि दुसरी म्हणजे टी.एन शेषन’ असं त्यांच्या बाबतीत म्हंटल जायचं !
December 15, 2021
कदम, रवी
महाधिवक्ता या महत्वाच्या घटनात्मक पदाची जबाबदारी राज्य शासनाची उच्च न्यायालयात बाजू मांडणे एवढीच नसते. न्यायप्रक्रियेस साह्य, न्यायमित्र, कायदेशीर तरतुदी आणि सत्य बाजू न्यायालयासमोर परखडपणे सादर करणे, या भूमिका त्यांना पार पाडाव्या लागतात.
शासनाची धोरणे व निर्णयांची न्यायालयात पाठराखण करीत असताना महाधिवक्ता म्हणून सरकारला कायदेशीर सल्ला देण्याचीही जबाबदारी असते. महाधिवक्ता रवी कदम यांनी आपल्या सात वर्षांच्या कार्यकाळात अनेक अडचणींना तोंड देत अतिशय कसोशीने हे सारे निभावून नेले. मुंबई उच्च न्यायालयातील महाधिवक्ता हे पद एच. एम. सिरवई यांच्यासारख्या ज्येष्ठ व नामांकित घटनातज्ज्ञाने १९७४ मध्ये तब्बल १७ वर्षे भूषविले. त्यांच्यानंतर सर्वाधिक काळ या पदावर राहण्याचा सन्मान कदम यांना मिळाला. कदम प्रसिध्दीमाध्यमांपासून नेहमी दूरच राहिले. ते आपल्या वर्तणुकीने किंवा वक्तव्याने कधीही वादग्रस्त ठरले नाहीत. बेधडक विधाने करणे त्यांच्या स्वभावातच नाही. मुख्यमंत्री बदलल्यावर महाधिवक्त्याने राजीनामा देण्याची प्रथा आहे. पण कदम यांनी विलासराव देशमुख, अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या तीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात काम केले. प्रथेनुसार त्यांनी राजीनामा दिला तरी नवीन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त करीत त्यांची जबाबदारी कायम ठेवली. त्यांनी या पदाचा कधीही राजकीय वापर होऊ दिला नाही. साधनशुचिता जपण्यासाठी त्यांनी शासकीय निवासस्थानही स्वीकारले नाही. कदम हे मुंबई विद्यापीठात १९८२ मध्ये एलएलबीला सर्वप्रथम आले होते. ट्रेडमार्क, पेटंट प्रकरणे हाताळण्यात त्यांचा लौकिक. गिरणजमिनींचा वाद, एन्रॉन, वनजमीन, डान्सबार बंदी, मुख्यमंत्र्यांविरुध्दची निवडणूक याचिका आदी प्रकरणांमध्ये त्यांनी शासनाची बाजू भक्कमपणे मांडली व निकाल शासनाच्या बाजूने लागले. बँकांच्या कर्जवसुलीच्या कायद्यासंदर्भातही (सिक्युरिटायझेशन अॅक्ट) त्यांनी काम केले. विधिमंडळाला हक्कभंग प्रकरणात सा केले. तब्बल ३० वर्षे मुंबई उच्च न्यायालयात वकिली केल्यावर आता सर्वोच्च न्यायालयात वकिली करण्याचा कदम यांचा मनोदय आहे.
August 5, 2017
भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाज सुधारक व निष्णात नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे नेते होते. लोकप्रियतेची पर्वा न करता प्रसंगी लोकप्रवाहाच्या विरूद्ध उभे राहून समाजाच्या हिताचे तेच ठामपणे सांगणारे डॉ. मुंजे यांचे व्यक्तिमत्त्व तडफदार होते. १२ डिसेंबर १८७२ मध्ये विलासपूर येथे त्यांचा जन्म झाला.
July 7, 2015
गिरणीवाला (काटखाँ), प्राणप्रतिष्ठा (खान), साक्षात्कार (पशुपती), महारवाडा (गुलखाँ), बुवाबाजी (वीरभद्रप्पा), सैरंध्री, कॉलेजकुमारी (कोंडिबा न्हावी), विठोबाची चोरी (दरोडेखोर), आय. सी. एस. (दगडय़ा), राजकुंवर (मराठा गडी), कारकून (कारकून), कॅप्टन (आचारी), सासुरवास (घरगडी) अशा १४ नाटकांमध्ये वसंत शिंदेंनी काम केले.
July 4, 2022
सतारवादनातील श्रेष्ठतम वादक रवि शंकर यांचा जन्म ७ एप्रिल १९२० रोजी झाला. रवि शंकर यांचे वडील श्याम शंकर विद्वान व कायदेतज्ज्ञ होते. त्यांचे पूर्ण बालपण वडिलांच्या गैरहजेरीतच गेले. त्यांची आई हेमाङ्गिनी यांनी त्यांचे पालन पोषण केले. थोरले भाऊ उदय शंकर हे विख्यात भारतीय नर्तक होते. ते पॅरिस येथे राहत.
१९३० साली रवि शंकर आईसोबत पॅरिस येथे गेले. त्यांचे आठ वर्षांचे शालेय शिक्षण तेथेच झाले. १९३८ साली, वयाच्या अठराव्या वर्षी रविशंकर यांनी उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडे शिक्षण सुरू केले. शिक्षणकाळात ते उस्ताद साहेबांचे वडील व आजचे प्रसिद्ध सरोदवादक अली अकबर खान यांच्याशी परिचीत झाले. त्यांनतर त्या दोघांनी अनेक ठिकाणी एकत्र जुगलबंदी केली. उस्ताद अलाउद्दीन खान यांच्याकडिल शिक्षण १९४४ पर्यंत चालले. १९३९ साली अमदावाद शहरात प्रथम खुली मैफल केली.
१९४५ सालापासूनच रविशंकराच्या साङ्गीतिक सृजनशीलतेचे भ्रमण इतर शाखांमध्येही सुरू झाले. त्यांनी बॅलेसाठी संगीत रचना व चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन सुरू केले. त्याकाळातील गाजलेले चित्रपट धरत्री के लाल व नीचा नगर या चित्रपटांचे संगीत दिग्दर्शन त्यांनी केले. इक्बाल यांच्या सारे जहासे अच्छा या गीतास त्यांनी दिलेले संगीत अतिशय लोकप्रिय ठरले. १९४९ साली रवि शंकर दिल्लीच्या ऑल इन्डिया रेडिओत संगीत दिग्दर्शक म्हणून रूजू झाले. याच काळात त्यांनी वाद्य वृन्द चेम्बर ऑर्केस्ट्रा स्थापन केला.
१९५० ते १९५५ सालात रवि शंकर यांनी सत्यजित राय यांच्या अपु त्रयी - (पथेर पांचाली, अपराजित व अपुर संसार) या चित्रपटांना संगीत दिले. यानंतर त्यांनी चापाकोय़ा , चार्ली व सुप्रसिद्ध गांधी चित्रपटांस संगीत दिले. १९६२ साली पन्डित रवि शंकर यांनी किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, मुंबई व १९६७ साली किन्नर स्कुल ऑफ म्युझिक, लॉस ऍन्जलेस स्थापन केली. रवि शंकर यांचे संगीत व्यक्तित्व दुमुखी होते. सतारवादक व संगीतकार अशी ती दोन रूपे होती. सतारवादक म्हणून ते परंपरावादी व शुद्धतावादी; पण संगीतकार म्हणून उन्मुक्तपणा अशा रूपात वावरत.
१९६६ साली त्यांनी प्रसिद्ध पाश्चात्य संगीतकार जॉर्ज हॅरि यांच्या सोबत जॅझ, अभिजात पाश्चात्य संगीत व लोकसङ्गीत अशा विविध प्रवाहांवर काम केले. १९५४ साली सोव्हिएत युनियनमधील मैफिल ही त्यांची पहिली आंतरराष्ट्रीय मैफिल. त्यानंतर १९५६ साली त्यांनी युरोप अमेरिकेत नेक कार्यक्रम केले. यात एडिनबर्ग फेस्टिव्हल, रॉयल फेस्टिव्हल हॉल अशा प्रतिष्ठेच्या मंचांचा समावेश आहे.
१९६५ साली बीटलसच्या जॉर्ज हॅरि यांनी सतार शिकण्यास सुरूवात केली. या काळात त्यांचे हॅरि यांच्याशी प्रस्थाप्त झालेले मैत्रीपूर्ण संबंध त्यांना आंतरराष्ट्रीय मंचांची पायरी चढवण्यास मदतभूत ठरले. जॉर्ज हॅरि हे रवी शंकरांचे पॉप जगतातील "मेन्टर" (पालक) मानले जातात. मा.रवि शंकर यांचे ११ डिसेंबर २०१२ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 10, 2019
संस्कृत व मराठी भाषा आणि व्याकरणाचे अभ्यासक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म २१ जून १८५६ रोजी झाला.
व्याकरणाची शिशुबोध, बालबोध व प्रौढबोध पुस्तके त्यांनी लिहिली आणि “मराठी भाषेची घटना”, “मराठी शब्दसिद्धी” असे ग्रंथही लिहिले.
“अलंकार विवेक”, “बालबोध व्याकरण”, “मराठी पद्य वाचन” आदी भाषाभ्यासाची, तर “लग्नविधी आणि सोहळे”, “धर्म आणि नीतिपर व्याख्याने” ही समाजविषयक पुस्तके त्यांनी लिहिली.
७ सप्टेंबर १९२७ रोजी त्यांचे निधन झाले.
# Joshi, Ramchandra Bhikaji (Sr)
December 9, 2016
हिराबाई बडोदेकर ख्याल, ठुमरी, मराठी नाट्य संगीत, भजन मध्ये तज्ज्ञ होत्या. त्यांचा जन्म १९ मे १९०५ रोजी झाला.
त्यांना लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते. त्यांच्या मैफिली अतिशय लोकप्रिय होत असत.त्यांचा गोड आणि नाजूक आवाज खूप लोकप्रिय होते.
हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचे काम केले. हिराबाई बडोदेकर यांनी सुवर्णा मंदिर, प्रतिभा, जनाबाई अशा अनेक चित्रपटात अभिनय केला. संगीत शिकवण्यासाठी संगीत विद्यालय, नूतन संगीत विद्यालय नावाने सुरू केले. हिराबाई ह्या फार लवकरच्या कारकिर्दीत रेकॉर्डिंग कलाकार झाल्या. ध्वनिमुद्रिकांच्या द्वारे आणि रेडिओवर नित्यनियमाने होणा-या कार्यक्रमांमुळे हिराबाई खूपच लोकप्रिय झाल्या. नाटयसंगीताच्या हिराबाईंच्या सुमारे ४८ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या, चित्रपटसंगीताच्या अवघ्या तीनच ध्वनिमुद्रिका निघाल्या. शास्त्रीय संगीताच्या सुमारे चाळीस ध्वनिमुद्रिका प्रकाशित झाल्या. तसेच 'राधेकृष्ण बोल', 'गिरीधर गोपाला',खमाज, 'पायोरे मैने' दुर्गा, 'चाकर राखोजी', यासारखी भजने आहेत. पाच ठुम-या आहेत तर, 'किस कदर है', 'या आकर हुआ मेहमान', या गझला आहेत.
हिराबाईंचा भैरवी हा आवडता राग होता. १९७० पर्यंत हिराबाईंच्या सुमारे १७५ ध्वनिमुद्रिका प्रसिध्द झाल्या. हिराबाई रेडिओवर प्रथम गायल्या, त्या १९२९ मध्ये रेडिओ सुरू होऊन त्यावेळी अवघी दोन वर्षे झाली हो. ती त्यानंतर त्यांचे कार्यक्रम सातत्याने रेडिओवर होऊ लागले. १९२९ पासून ते १९७३ मध्ये हिराबाई गायनातून निवृत्त हाईपर्यंत, म्हणजे जवळ जवळ ४५ वर्षे त्या रेडिओवरून गायल्या.
ध्वनीमुद्रिका आणि आकाशवाणी ही दोन प्रभावी माध्यमे उपलब्ध झाल्यामुळे हिराबाईंच्या सुरेल गीतांचा सुगंध दुरवर तर पसरलाच परंतू आजच्या पिढीत त्यांची गाणी रसिक आवर्जून ऐकतात.
हिराबाई बडोदेकर यांचे २० नोव्हेंबर १९८९ रोजी निधन झाले.
-- संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपिडीया
November 22, 2016
१९६१ साली त्यांची मुंबईच्या उच्च न्यायाधीशपदावर नियुक्ती झाली होती. २८ ऑगस्ट १९७२ रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशपदी यांची नेमणूक झाली.
July 19, 2022
श्याम फडके यांचे मुळ नाव दिगंबर त्र्यंबक फडके. त्यांचा जन्म ठाण्यामध्ये २६ सप्टेंबर १९३१ रोजी झाला. बी. एस्सी. व एम. एड. चं शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते डॉ. बेडेकर विद्यामंदिराचे काही वर्षे मुख्याध्यापक व ज्ञानसाधना विद्यालयाचे पहिले प्राचार्य होते.
८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे यजमानपद भुषविणार्या मराठी ग्रंथ संग्रहालय, ठाणे या संस्थेच्या कार्यकारिणीवर काही काळ त्यांनी अध्यक्ष म्हणून सुध्दा काम पाहिले. नाटक हा त्यांचा आवडीचा विषय असल्यामुळे सुरूवातीला त्यांनी नाटकांमधून कामे केली. त्यामुळे नाट्यलेखनाची आवड निर्माण झाली. सुरुवातीच्या काळात त्यांनी एकांकिका तसंच लहान मुलांसाठी विनोदी व समाजातील सर्वच स्तरावरील प्रेक्षकांसाठी नाटके लिहिली.
“एक होतं भांडणपुर”,“राजकन्या निलमपरी”,“हिमगौरी आणि सात बुटके”, यांसारखी त्यांनी लिहिलेली बाल नाटके लोकप्रिय ठरली. “आठ तासांचा जीव” हे एक सामाजिक नाटक, त्याव्यतिरीक्त “का असंच का?”, “अर्ध्याच्या शोधात दोन” या गंभीर नाटकांचे लेखन सुध्दा दिगंबरजींनी केले होते.
“काका किशाचा” हे विनोदप्रधान नाटक सुप्रसिध्द फार्स म्हणून खुप गाजले. तसंच “खोटे बाई, आता जा” हे त्यांचे नाटक नाटयप्रेमींच्या सदैव स्मरणात राहिल. काही काळ ठाण्यातील नाटयचळवळीशी शाम फडके यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध राहिलेले आहेत. हौशी नाटयचळवळीला प्रोत्साहन मिळावे यासाठी संग्रहालयाच्या सभागृहाचा उपयोग त्यांनी लघु नाटय थिएटरसारखा करून घेतला होता. चांदणे संमेलनासारखे रात्रभर साहित्यिक कार्यक्रम घडविणारे संमेलन काही वर्षे त्यांच्याच अध्यक्षतेखाली संग्रहालयाने साजरे केले आहेत.
लेखन: सागर मालाडकर
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti