जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
हिंदी चित्रपटसृष्टीतील जवळजवळ ६० टक्के गाण्यात कावस, केरसी व बजी या लॉर्ड फॅमिलीचं योगदान आहे. एकट्या केरसीचीच पंधरा हजार गाणी आहेत.
October 31, 2017
कोशकार आणि तत्त्वज्ञ म्हणून प्रसिद्ध असलेले देविदास दत्तात्रेय वाडेकर यांचा जन्म २५ मे १९०२ साली सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात कुरोली या खेडेगावात झाला. त्यांचे वडील राहुरी येथे प्राथमिक शिक्षक होते. त्यामुळे प्राथमिक शिक्षण राहुरी येथे तर नगर येथे देविदास वाडेकर यांचे माध्यमिक शिक्षण झाले.
February 4, 2010
अतिशय ओघवत्या मराठीत ‘चेंडू टोलवला, पायचीत, त्रिफळाचीत, चौकार, षटकार, सीमापार, पंच’ अशा शब्दांची पेरणी करीत, खेळातील रोमहर्षक घटना तितक्याच रोमहर्षकतेने आवाजात चढ-उतार करीत ते सांगत.
July 11, 2022
बॉलीवूड मधील डान्स डायरेक्टरच्या यादीतलं अव्वल नाव म्हणजे सरोज खान. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १९४८ रोजी झाला. निर्मला किशनचंद साधू सिंग नागपाल हे सरोज खान यांचे खरे नाव. वयाच्या तिसऱ्या वर्षीच 'नजराना' या चित्रपटातून त्यांचं हिंदी चित्रपटसृष्टीत बालकलाकार म्हणून पदार्पण झालं होतं. या बालकलाकाराची कारकीर्द पुढे नृत्यक्षेत्रामध्ये बहरली. पुढे हा कलाकार ग्रुप डान्सर बनला. त्यानंतर असिस्टण्ट डान्सर आणि १९७४ ला त्यांनी 'डान्स मास्टर' म्हणून पहिल्या सिनेमाला कोरिओग्राफी केली. तो सिनेमा होता, 'गीता मेरा नाम'. तेव्हापासून ते आज पर्यंत त्यांनी अख्ख्या बॉलिवूडला आपल्या तालावर त्यांनी नाचवलं आहे.
कोरिओग्राफर सरोज खान मास्टरजी म्हणून ओळखल्या जातात. गेल्या ३६ वर्षांपेक्षा जास्त काळ सरोजजी इण्डस्ट्रीमध्ये आहेत. या काळात डान्सच्या फॉर्म्समध्ये, स्टाइलमध्ये खूप परिवर्तन झालं. आजच्या डान्स विषयी त्या एका मुलाखतीत म्हणतात, 'आजकालच्या डान्समध्ये काय झालाय हे आत्ता मी काय सांगणार.. ते सगळ्यांनाच दिसतंय. अलीकडे सगळे डान्स वेस्टर्न झालेत. त्यातले एक्सप्रेशन्स जाऊन केवळ कसरती आल्या आहेत. आपली संस्कृतीच आपण विसरतोय. मी कधी आयटम नंबर कोरीओग्राफ केले नव्हते का? पण त्यात अश्लीलता कधीच नव्हती.
माधुरीने 'तेजाब'मध्ये केलेला 'एक दो तीन'ला तुम्ही आयटम साँग म्हणू शकता. पण तो अश्लील नव्हता. आजही त्या गाण्यावर तुम्ही नाचता. इण्डस्ट्रीमध्ये जो काही बदल झालाय, तो हाच. पण एक नक्की की हे फार काळ टिकेल असं मला वाटत नाही. हिंदी सिनेसृष्टीमध्ये आजवर कित्येक नायिका आल्या. या नायिकांना जिथे कोरिओग्राफीचा स्पर्श झाला तिथे या नायिका बहरल्या. हिंदी इण्डस्ट्रीमधलं सरोज खान हे असं नाव आहे, की ज्यांनी या प्रत्येकीबरोबर काम केलंय. प्रत्येकीच्या नृत्याला बहर आणला. अर्थात या सर्वांमध्ये सरोजजींची लाडकी माधुरी आहे हे आपण जाणतोच. कारण माधुरी समोर असली की, त्यांना हवे ते प्रयोग नृत्यामध्ये करता येतात. त्यांची आवड थोडी बाजूला ठेवली, तरी त्या सर्वच नायिकांना त्या त्या गाण्यानुसार, नायिकेच्या कुवतीनुसार स्टेप्स देतात. जेणेकरून नाचाचा डौल आणि नायिकेची क्षमता कुठेही ढासळणार नाही.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
November 22, 2018
भास्करबुवा बखले हे मराठी हिंदुस्तानी संगीतपरंपरेतले गायक, संगीतकार होते..
December 15, 2010
नाट्यक्षेत्रात एक नावाजलेला रत्न म्हणजे दत्तात्रय घोसाळकर होय. आतापर्यंत त्यांच्या दत्त विजय प्रॉडक्शनच्या माध्यमातून १७ नाटके त्यांनी निर्माण केली त्यात आईचं घर उन्हाचं, यदाकदाचित, देहभान, तनमन तुझ्याविना, रामनगरी सारखे वेगळे विषय त्यांनी हाताळले.
May 23, 2014
सयाजी शिंदे यांना खऱ्या अर्थे नाव आणि ओळख मिळाली ती रामगोपाल वर्मा याच्या “शूल’ या चित्रपटातील बच्चू यादवच्या भूमिकेमुळे. बिहारमधील हे पात्र सयाजी शिंदे यांनी इतक्या चांगल्यारीतीने वठवले, की देशभर त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली.
January 13, 2022
चोडण येथील युवक उदय मांद्रेकर गेल्या सत्तावीस वर्षांपासून पक्षीप्रेमी, पर्यावरणप्रेमी, छायाचित्रकार, फिल्ममेकर्स यांना चोडण बेटाचे दर्शन करवून देण्याचे काम करतो. मांद्रेकर म्हणतात, आपल्याला यात कसलाच स्वार्थ नाही. परंतु जेव्हापासून आपल्याला या बेटाचे महत्व कळले आहे, तेव्हापासून एक जागरूक नागरिक या नात्याने आपण इथे येणाऱ्यांना पक्षी दर्शन करण्यास नेतो. त्यातून जे काही ही माणसं देतात, ते गोड मानून घेतो.
July 11, 2019
पाटील, (डॉ.) जगन्नाथ
कोल्हापूरच्या राधानगरी तालुक्यातील तिटवे या लहानशा गावातून डॉ. जगन्नाथ पाटील यांचा शैक्षणिक क्षेत्रातील जो प्रवास सुरू झाला, तो आता ‘एशिया पॅसिफिक क्वॉलिटी नेटवर्क’ (एपीक्यूएन) या आंतरराष्ट्रीय संस्थेचे अध्यक्ष या महत्त्वाच्या मुक्कामावर पोहोचला आहे. उच्चशिक्षण क्षेत्रातील गुणवत्तेचे मापन आणि गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न, अशा दुहेरी उद्देशाने किमान ४२ देशांत कार्यरत असलेल्या या संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे ऑस्ट्रेलियाच्या डॉ. अँटनी स्टेला यांच्याकडून गेल्याच आठवडय़ात डॉ. पाटील यांनी स्वीकारली आणि
‘युनेस्को अथवा जागतिक बँकेकडून वाढीव निधी मिळाला म्हणजे आपण वाढलो, असे होत नाही.. वाढीसाठी निराळा विचार करावाच लागेल’, अशा अर्थाचा संदेशही प्रमुखपदावरून दिला. इथवर मजल मारण्याइतका अनुभव गेल्या दहा-बारा वर्षांत त्यांनी कमावला आहे, हेही विशेष. शिवाजी विद्यापीठातून १९९४ साली बी.एस्सी. झालेल्या जगन्नाथ यांनी पुढे याच विद्यापीठात पत्रकारिता व संज्ञापनाचे (कम्युनिकेशन) शिक्षण घेतले. १९९६ मध्ये याच विद्यापीठातून पत्रकारितेतील मास्टर्स मिळवून त्यांनी पुढली पाच वर्षे शिक्षण-संज्ञापनातील पीएच.डी.साठी अभ्यास केला. यानंतरच्या काळात, शिवाजी विद्यापीठात सहायक कुलसचिव पदावर कार्यरत असताना देशभरच्या उच्चशिक्षण संस्थांचे मूल्यांकन करणाऱ्या ‘नॅक’मध्ये त्यांची नियुक्ती झाली. ‘नॅक’मध्ये आधी सहायक सल्लागार, मग उपसल्लागार आणि पुढे प्रादेशिक समन्वयक या नात्याने ते कार्यरत राहिले. या कार्यकाळात ५०० वर महाविद्यालयांच्या मूल्यांकनाचे समन्वयन त्यांनी केले. नॅकमधूनच ‘एपीक्यूएन’साठी काम करण्याची संधी त्यांना सात वर्षांपूर्वी पहिल्यांदा मिळाली. तेथे त्यांनी २००७ मध्ये मेलबर्न (ऑस्ट्रेलिया), क्वालालंपूर (मलेशिया) आणि हाँगकाँग येथे, शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता मूल्यांकनात विद्यार्थी-सहभाग कसा असू शकेल याच्या कार्यशाळा घेतल्या. जागतिक बँक, युनेस्को यांनी निधी दिलेल्या या प्रकल्पांवर काम करताना, कामाची प्रक्रिया अधिकाधिक प्रगत करण्यावर जगन्नाथ यांचा मोठा भर असे. महाराष्ट्रातील गावांतसुद्धा दर्जेदार उच्चशिक्षण मिळावे, अशी कळकळही डॉ. पाटील यांना आहे.
August 5, 2017
शाळेत असल्यापासूनच मराठीवर त्यांचं प्रेम जडलं आणि वयाच्या १४ व्या वर्षापासूनच ते कविता करू लागले. त्यांचा जन्म १० मार्च १९२९ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथे झाला. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज आणि बा. भ. बोरकर यांचा त्यांच्यावर खूप प्रभाव होता. परंतु, पाडगावकर एका साच्यात कधीच अडकले नाहीत. त्यांनी स्वतःची शैली निर्माण करून मराठी साहित्यात आणि रसिकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं. स्वतः प्रेमळ व्यक्ती, प्रेमळ प्राध्यापक असल्यानं प्रेमकवितेवर त्यांचं विशेष प्रेम होतं. पण, भावगीतं, बालकविता, निसर्गकविता, चिंतनशील कविताही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे केल्या होत्या. त्या सादर करण्याची त्यांची पद्धत तर अफलातून होती. पाडगावकर, विंदा करंदीकर आणि वसंत बापट या त्रयीनं ठिकठिकाणी काव्यवाचनाचे कार्यक्रम करून राज्याच्या कानाकोपऱ्यातील वाचकांना कवितेची गोडी लावली. सहजसोप्या शब्दांतून व्यक्त होणारे बोल आणि ओठांवर सहज रुळणाऱ्या कविता पाडगावकरांनी दिल्या. मंगेश पाडगांवकरांची कविता-गीतं म्हणजे मोगऱ्याची टपोरी फुलं. नियतीने पाडगांवकरांच्या प्रतिभेला कधीही धोका दिला नाही. त्यांचा हात सतत लिहिता ठेवला. आपल्या कवितेतली, गीतांतली आशयघनता सातत्याने टिकवलेला हा श्रेष्ठ कवी! त्यातल्या अनेक कवितांची गाणी झाल्यानं साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातील
पाडगावकरांचं योगदानही मोठं आहे. पाडगावकरांनी या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' असं म्हणत मराठी रसिकांना प्रेम करायला शिकवले, जगण्याचं बळ देणारे... 'अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती', अशा सहजसोप्या शब्दांत जीवनाचं सार सांगीतले. ते आपल्या कवीतांनी तरुणाईला प्रेमात पाडत असत. 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं', असं म्हणणारे 'पाडगावकर आजोबा' कॉलेजमधल्या मुला-मुलींचे मित्रच होऊन जायचे. भावकविता, भावगीते, बालगीते, संगीतीका, नाटय़काव्य, गझल, वात्रटिका, सामाजिक उपरोधपर कविता, बोलगाणी आणि विडंबन अशा विविध साहित्य प्रकारातून मा.पाडगावकरांनी वाचकांना समृध्द केले.
पाडगांवकर यांनी ‘कधी बहर, कधी शिशिर, परंतु दोन्ही एक बहाणे. या त्यांच्या गीताच्या ध्वनिमुद्रणाची सांगीतलेली आठवण. ‘सुधीर फडक्यांनी केलेले शब्दांचे उच्चार ही एक थरारून टाकणारी गोष्ट होती. शब्द माझेच होते. त्यामुळे मला तरी त्या शब्दांचं नावीन्य नव्हतं. पण सुधीर फडक्यांच्या आवाजात ते ऐकताना माझेच शब्द आता मला नव्याने भेटत होते. ‘बहर धुंद वेलीवत यावा’ या ओळीतील ‘बहर’ आणि ‘धुंद’ या शब्दांतून व्यक्त होणारी तारुण्यातल्या फुलण्याची धुंदी.. ‘हळूच लाजरा पक्षी गावा’ या ओळीतील पक्ष्याच्या गाण्यातून व्यक्त होणारं कोणाचंतरी ते कोवळं लाजरेपण.. ‘आणि अचानक गळून पडावी विखरून सगळी पानं’ या ओळीतील निराशा आणि आधीच्या दोन ओळींतील विरोधाचं नातं- हे सारं सुधीर फडके इतक्या विलक्षण उत्कटतेनं प्रकट करत होते, की त्यांच्या गायनातून माझी कविता नव्याने जन्म घेत आहे असं मला वाटलं.
मंगेश पाडगावकरांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. 'सलाम' या काव्यसंग्रहासाठी त्यांना १९८० मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता. महाराष्ट्रातील दर्दी रसिकांच्या मनात स्थान मिळवलेल्या पाडगावकरांना २००८ मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर, २०१३ मध्ये पद्मभूषण पुरस्कारानं त्यांचा गौरव करण्यात आला होता. २०१० मध्ये दुबईत झालेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. महाराष्ट्र टाइम्सनंही पाडगावकरांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरवलं होतं. मा. मंगेश पाडगावकर यांचे ३० डिसेंबर २०१५ रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मंगेश पाडगावकर यांचे कविता वाचन.
https://www.youtube.com/shared?ci=GhwamUyYrhQ
December 30, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti