जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
कवि सूर्यकांत खांडेकर हे या मागील पिढीतील तसे नावारूपाला आलेले कवी. त्यांचा जन्म २ एप्रिल १९२६ रोजी झाला. कवि सूर्यकांत खांडेकर हे मितभाषी. म्हणजे वर्गात शिकविण्यापुरते बोलणारे असे शिक्षक. पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे कसदार कविता लिहिणारे कवी. त्या काळातील बहुतेक साऱ्या वाङ्मयीन नियतकालिकातून त्यांच्या कविता प्रकाशित होत असत. कालांतराने ते रयत शिक्षण संस्थेच्या कीर्ती महाविद्यालयात ते मराठीचे प्राध्यापक झाले. कवी मा.सूर्यकांत खांडेकर हे शाहीर पिराजीराव सरनाईक यांचे भाचे. त्यातूनच त्यांनी मराठी पोवाडा वाङ्मयाचा इतिहास लिहिला आणि बराच खडतर काळ गेल्यावर तो शिवाजी विद्यापीठाकडून प्रकाशित करण्यात आला. 'सावली' आणि 'पानफुल' ‘छुमछुम’ (बालकविता) हे त्यांचे रसिकांच्या पसंतीस उतरलेले काव्यसंग्रह. त्याच्या कविता बालभारतीच्या पुस्तकात पण आहेत. मा.सूर्यकांत खांडेकर यांनी पाच एक मराठी चित्रपटांना गाणीही लिहिली.
'या फुलाच्या गंधकोषी...' या एकाच गाण्याने ते सर्वत्र प्रसिद्ध झाले.
'सावली सूर्याची' हे आत्मकथन कवि मा.सूर्यकांत खांडेकर यांच्या पत्नी मा.अनुराधा खांडेकर यांनी लिहिले आहे. हे आत्मकथन आपणास एका काळातील एका नगरीची जशी सांस्कृतिक ओळख करून देते, तसेच ते आपणास एका सकस सहभावाची सात्विक ओळख करून देते. मा.सूर्यकांत खांडेकर यांचे १५ जून १९७९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
सूर्यकांत खांडेकर यांची काही गाणी
उतरली सांज ही धरेवरी
गोड तुझी बासरी श्रीहरी
त्या फुलांच्या गंधकोषी
सहज सख्या एकटाच
https://www.youtube.com/watch?v=R-exzGL7ouQ
https://www.youtube.com/watch?v=WEmY-HxMC7M
https://www.youtube.com/watch?v=1lQ_JvY7z4k
त्या फुलांच्या गंधकोषी. मा.सूर्यकांत खांडेकर यांचे हे गाणं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी गायलंय आणि संगीतही त्यांचंच आहे. कवी सूर्यकांत खांडेकर यांनी आपल्या या काव्यातुन मानवाच्या मनामध्ये परमेश्वराच्या अस्तित्वाचा शोध, अनंत काळापासुन सुरु आहे त्याचं अतिशय सुरेख वर्णन केले आहे. परमेश्वराचं हेच ते रूप असे मात्र कुणीही ठामपणे सांगत नाही, पण त्याचं अस्तित्व आपण सर्वजण मान्य करीत असतो. मग हा ईश्वर कुठे आहे, कसा आहे, कोणत्या रुपात आहे याचा शोध सर्वजण आपापल्या परीने घेत असतात.
त्या फुलांच्या गंधकोषी सांग तू आहेस का
त्या फुलांच्या गंधकोषी, सांग तू आहेस का
त्या प्रकाशी तारकांच्या, ओतिसी तू तेज का
त्या नभांच्या नीलरंगी होऊनी आहेस का
गात वायूच्या स्वरांनी, सांग तू आहेस का
मानवाच्या अंतरीचा प्राण तू आहेस का
वादळाच्या सागराचे घोर ते तू रुप का
जीवनी या वर्षणारा तू कृपेचा मेघ का
आसमंती नाचणारी, तू विजेची रेघ का
April 15, 2018
स्वतःच्या चालीबद्दल काटेकोर असणारा संगीतकार म्हणजे सलील चौधरी
November 22, 2016
चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू.. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी रसिकांच्या हृदयावर छाप पाडणारे दिग्गज अभिनेते म्हणजे दिलीप प्रभावळकर. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९४४ रोजी झाला. दिलीप प्रभावळकर यांचे शिक्षण मुंबईत झाले.
अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी प्रभावळकरांनी जैवभौतिक शास्त्रात पदव्यूत्तर शिक्षण घेतले. भाभा अॅटोमिक रिसर्च सेंटरमधून पदविकाही घेतली त्यांनंतर त्यांनी अनेक वर्षे एका फार्मा कंपनीत नोकरीही केली. हे काम करत असतानात त्यांनी बालनाट्यात भूमिका करायला सुरूवात केली. पण खरया अर्थाने त्यांचा रंगभूमीवरचा प्रवेश विजय तेंडूलकर लिखित ‘लोभ नसावा ही विनंती’ या नाटकातून झाला. या नाटकाचे प्रयोग मोजकेच झाले. पण त्यांच्या भूमिकेला रसिकांनी चांगली दाद दिली. त्यानंतर मात्र त्यांनी आपली नोकरी सोडून पूर्णवेळ या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला.
दरम्यानच्या काळात त्यांनी रत्नाकर मतकरी यांच्या नाटकात काम करण्यास सुरूवात केली. बाल रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यवसायिक रंगभूमी तसंच सिनेमा, दूरचित्रवाणी आणि लेखन अशा क्षेत्रांमध्ये आपला स्वत:चा ठसा दिलीप प्रभावळकरांनी उमटवला आहे. 'वासूची सासू', 'संध्याछाया', 'जावई माझा भला', 'घर तिघांचे हवे' या नाटकातील त्यांच्या भूमिका खूप गाजल्या.
वैशिष्ट्य म्हणजे या सर्व भूमिका वेगळ्या होत्या. . एक झूंज वाऱ्याशी, कलम ३०२ आणि नातीगोती यासारख्या नाटकांमधील गंभीर भूमिका प्रभावळकरांनी जीवंत केल्या. नाटकांसोबतच त्यांनी 'चिमणराव' या विनोदी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. दिलीप प्रभावळकर यांनी नेहमीच आपल्या अभियाने प्रेक्षकांच्या मनावर आधिराज्य गाजविले आहे. त्यांनी एक डाव भुताचा, एक होता विदुषक, आपली माणसं, पछाडलेला, छक्की माणसं, झपाटलेला असे अनेक चित्रपट मराठीत दिले आहेत. त्यांच्या "चौकट राजा', "रात्र आरंभ' या सिनेमातील अभिनयाचे विशेष कौतुक झाले.
दिलीप प्रभावळकरांचा आणखी एक पैलू म्हणजे ते एक चांगले लेखकही आहेत. त्यानी अनेक वृत्तपत्रातून स्तंभलेखनही केली आहे. विनोदी पुस्तकेही लिहिली आहेत. 'गुगली', 'हसगत' या त्यांच्या पुस्तकांना पुरस्कारही मिळाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
http://www.dilipprabhavalkar.com
August 4, 2017
धोंडुताई यांनी सुरवातीला जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचे भाचे नथ्थन ख़ाँ यांच्याकडे तीन वर्ष शिकल्या. त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली.
August 5, 2021
प्रदीप कबरे हे मुळातच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. अभिनेता म्हणून त्यांनी नाव कमावलं आहेच, पण लेखक म्हणूनही कामगिरी केली आहे. त्यांनी आत्तापर्यंत दोन नाटकं लिहिली आहेत. त्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९५६ रोजी झाला. तसंच अंदाजे अडीच हजार रेडिओ कार्यक्रम लिहिले आहेत. पाच हजारांहून अधिक रेडिओ कार्यक्रमांचं सादरीकरण केलं आहे. सहा-सात माहितीपटांचं लेखन केलं आहे. शंभरेक जिंगल्स लिहिल्यात. दोन चित्रपटांची कथा-पटकथा-संवाद लिहिले आहेत. एका चित्रपटासाठी गीतलेखनही केलं आहे.
कलाक्षेत्राची प्रदीप कबरे यांना सुरुवातीपासून आवड होती. कॉलेजमध्ये आल्यानंतर त्यांनी अभिनयाला सुरवात केली. कॉलेजमध्ये असताना त्यांनी ‘वेटिंग फॉर घासलेट’ ही पहिली एकांकिका केली होती. ती ‘आयएनटी’मध्ये सादर झाली होती. व या एकांकिकेसाठी ‘आयएनटी’चं सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पहिलं पारितोषिकही मिळालं होतं. त्याच सुमारास त्यांनी ‘कोंडी’ या पहिल्या व्यावसायिक नाटकातही काम केलं. ‘आयएनटी’ची निर्मिती असलेल्या या नाटकाचे दिग्दर्शक होते शंभू मित्रा. या नाटकात सतीश दुभाषी, गणेश सोळंकी वगैरे तगडी स्टारकास्ट होती. रमेश पवार यांनी पिसाट खुनी रामन राघवच्या जीवनावर ’वरचा कानून’ हे नाटक लिहिलं होतं. त्यामध्ये रामन राघवनची भूमिका अशोक सराफ करत होते. तर रमेश पवार इन्स्पेक्टरच्या भूमिकेत होते. प्रदीप कबरे यांनी या नाटकात हवालदाराची विनोदी भूमिका केली होती. व तेव्हाच प्रदीप कबरे यांच्या मनात आलेकी स्वत:ची नाटय़संस्था स्थापन करावी.
स्वत:ची नाटय़संस्था स्थापण्याचा विचार सुचला तरी तो लगेच अमलात आला नाही. कारण दरम्यानच्या काळात प्रदीप कबरे यांची अभिनय कारकीर्द जोरात धावू लागली होती. कमलाकर सारंग यांच्या ‘खोल खोल पाणी’, ‘सखारम बाईंडर’ आणि ‘जोडीदार’ या नाटकांत त्यांना भूमिका मिळाल्या. ‘माऊली प्रॉडक्शन’ची ‘कार्टी प्रेमात पडली’,‘ देखणी बायको दुस-याची’ आणि ‘दांडेकरांचा सल्ला’ ही नाटकंही त्यांच्या वाट्याला आली. बाळ कोल्हटकर लिखित ‘लहानपण देगा देवा’चं दिग्दर्शन त्यांनी केलं आणि याबद्दल कोल्हटकरांकडून दादही मिळवली. याच काळात सुधीर कवडी यांनी लिहिलेलं ‘बोल बाबी बोल’ हे नाटक प्रदीप कबरे यांच्या वाचनात आलं. यातली बॉबीची मध्यवर्ती भूमिका खूप सशक्त होती. प्रदीप कबरेंना ती आवडली, पण इतर कुठल्याही निर्मात्याने हे नाटक केलं असतं तर त्याने ती त्यांना दिली नसती. या बद्दल कबरे त्याचं कारण सांगताना म्हणतात, ‘‘त्यावेळी मी काही नावाजलेला नव्हतो. मला कुणाचं पाठबळ नव्हतं.
माझ्याकडे एखादा ग्रुप नव्हता. त्यामुळे ते मीच करायचं ठरवलं. तत्पूर्वी हे नाटक मी माझा मित्र कमलाकर सारंगला वाचायला दिलं. कमलाकर माझ्यामागे उभा राहील, अशी मला आशा होती. त्याने हे नाटक दिग्दर्शित करायचं कबूल केलं. आणि १९८७ मध्ये प्रदीप कबरे यांनी ‘गुरू प्रॉडक्शन’ची स्थापना केली. हे नाटक प्रेक्षकांना आवडलं. सुधीर कवडीला या नाटकाबद्दल त्यावर्षीचं राज्य सरकारचं सर्वोत्कृष्ट नाटय़लेखनाचं पारितोषिक मिळालं.’’
या नाटकाने कबरे यांना आर्थिक फायदा करून दिला नसला तरी लोकप्रियता भरपूर मिळवून दिली. त्यांच्या मध्यवर्ती भूमिकेचं कौतुक झालं. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी ‘धांदलीत धांदल’ या दुस-या नाटकाची निर्मिती केली. राजा मयेकर, शेखर विश्वासराव, सुषमा तेंडुलकर, प्रदीप पटवर्धन, विजय पाटकर यांच्या भूमिका या नाटकात होत्या. बाबा पार्सेकर, कमलाकर केळुसकर, गिरिधर मोरे, प्रदीप रांजणकर, उल्हास सुर्वे, शरद विचारे यांच्या साथीने ‘गुरू प्रॉडक्शन’ची वाटचाल सुरू राहिली. ‘मनात माझ्या’ हे ‘गुरू’चं तिसरं नाटक. ते कबरे यांनीच लिहिलेलं. ‘सेंड मी नो फ्लॉवर्स’ या इंग्रजी नाटकाचं ते रूपांतर होतं. या नाटकावरून ‘हाय मेरा दिल’ हे हिंदी नाटक आलं होतं. त्याच्या लेखकाकडून रीतसर परवानगी घेऊन कबरे यांनी त्याचं मराठी रूपांतर केलं होतं. स्मिता जयकरने या नाटकातून मराठी रंगभूमीवर पदार्पण केलं. ‘‘या नाटकाचे ५० प्रयोग झाले. आर्थिक गणित यावेळीही चुकलं तरी या नाटकाने मला बरंच काही शिकवलं. महत्त्वाचं म्हणजे या नाटकाने प्रदीप कबरे यांना अभिनेता, लेखक, दिग्दर्शक अशी तिहेरी ओळख दिली.’’
‘गुरू’च्या वाटचालीत ‘हँडस अप’ आणि ‘चाफा बोले हा’ ही दोन नाटकं महत्त्वाचा टप्पा ठरली. ‘हँडस अप’ नाटकाचे आजवर २५० हून अधिक प्रयोग झाले आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांनी या नाटकात भूमिका केल्या होत्या.
प्रदीप कबरे यांच्या ‘गुरू प्रॉडक्शन’ने आत्तापर्यंत नऊ नाटकांची निर्मिती केलीय.
‘गुरू प्रॉडक्शन’ ने अनेक नवोदित कलाकारांना रंगभूमीवर ब्रेक दिलाय. ‘एप्रिल फूल’ या नाटकातल्या सगळ्या कलाकारांचं ते पहिलंच नाटक होतं.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेल्या "मराठी नाट्य कलाकार संघा‘च्या अध्यक्षपदी प्रदीप कबरे यांनी काही काळ काम केले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 16, 2018
सुमारे ४०० वर्षांपूर्वी गोव्यातील सक्तीने ख्रिश्चन केलेल्या हजारो गावकऱ्यांचे शुद्धीकरण केले. या शुद्धीकरण आंदोलनात मामांचा सिंहाचा सहभाग होता. या घटनेचे सांगोपांग विवेचन करणारा ‘गोमंतक शुद्धीचा इतिहास’ हा ४०० पानांचा स्वतंत्र विस्तृत ग्रंथ मामांनी लिहिला. विशेष म्हणजे या ग्रंथाला, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची सुंदर प्रस्तावना लाभली.
April 6, 2022
कवी, कादंबरीकार, काव्यसमीक्षक नारायण केशव बेहरे यांचा जन्म ४ जुलै १८९० रोजी झाला.
July 14, 2017
हिंदी चित्रपट सृष्टीचा सन १९५० ते १९७० हा चित्रपट संगीताच्या दृष्टीने सुवर्ण काळ मानला जातो. या काळात अनेक प्रथितयश संगीतकारांनी अनमोल अशा गाण्यांची रसिकांवर अगदी बरसात केली. नुसते गाण्यांवर चित्रपट चालण्याचे ते दिवस होते. ज्येष्ठ संगीतकार रोशन यांनी याच काळात आपल्या सुमधुर गीतांची देणगी चित्रपट सृष्टीला दिली.
April 17, 2020
अभिनयने ‘ श्रीमंत दामोदर पंत ‘ ह्या चित्रपटापासून आपल्या अभिनयाच्या कारकिर्दीला सुरुवात केली. पुढे त्याने अकल्पित – एक सत्य कल्पनेपलिकडचे , थापाड्या हे चित्रपट केले.
August 12, 2020
प्रसिद्ध तबलावादक पं. सामताप्रसाद हे बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक.
June 20, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti