जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
मेंडोलिन आणि यू. श्रीनिवास ही काही वेगळी नावं नव्हती एवढं त्यांच्यात जीवैक्य होतं. मैफलीत यू. श्रीनिवास आपल्या बोटांच्या नाजुक करामतीतून मेंडोलिनमधून अशी काही जादुई सुरावट निर्माण करायचे की, रसिकांसमोर सुरांचं एक अनोखं मायाजाल विणलं जायचं.
March 1, 2024
वयाच्या पाचव्या वर्षी बाळकृष्णाला त्याची मातोश्री निधन पावल्याने, इचलकरंजी येथील त्याचे चुलते विष्णुभट यांच्याकडे भिक्षुकी शिकण्यासाठी पाठविण्यात आले.
July 11, 2022
तुकारामांचे अभंग इंग्रजीत नेऊन त्यांना ‘ग्लोबल’ करणारे लेखक दिलीप पुरूषोत्तम चित्रे अर्थात ‘दि.पु.’,, दिलीप चित्रेंच्या मराठी आणि इंग्रजी कवितांची भारतीयच नव्हे; तर आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली.
August 18, 2019
लोकशिक्षणाचा मार्ग पसंत असलेल्या रघुनाथरावांनी सतत सत्तावीस वषे एकाकी लढत दिली, लैंगिगकतेपवषयी मूलगामी विश्लेलेषण केले. एका अर्थी रघुनाथराव कर्वे हे ‘सुधारक’कार आगरकरांचे एकटेच वारस होते.
July 20, 2022
जुन्या काळातील चित्रपट छायालेखक पांडुरंग सातू नाईक यांना आल्हाददायकता, कल्पकता व वास्तवता ही वैशिष्ट्ये असलेले चित्रपट छायालेखक म्हणून ओळखले जायचे.
July 5, 2022
भारतरत्न हा आपल्या देशातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. साहित्य, कला, विज्ञान, सार्वजनिक सेवा इत्यादी विविध क्षेत्रांत असामान्य कामगिरी करणार्या व्यक्तीला हा पुरस्कार देऊन गौरविले जाते.
September 28, 2010
तुकडोजी महाराजांचा वारसा घरात असल्याने त्या संस्काराने मार्ग दाखविला आणि 'आपुलकी' चा जन्म झाला. कम्पयुटर क्षेत्रात करिअर असतानाही वर्धा जिल्ह्यातील अभिजीत फाळके यांनी शेतकर्यांना स्वावलंबी बनविण्याचा निर्धार केला. केवळ आर्थिक मदत नव्हे, तर त्यांना अवजारे पुरविणारी 'अॅग्रो टुल बॅंक' सारखी कल्पना राबविली. हे काम सचिन तेंडुलकरलाही थक्क करुन गेलं...
अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख पुढील पानावर वाचा.
अभिजीत फाळके यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला 'आपुलकी' चे उड्डाण हा लेख वाचा.
September 7, 2015
दलित चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते आणि लेखक, विचारवंत प्रा. अरुण कांबळे हे आघाडीचे आक्रमक दलित नेते म्हणून समस्त महाराष्ट्राला परिचित असलेले दलित पॅंथरचे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य होते.
July 27, 2017
त्यांना मराठी माणसानी डोक्यावर घेतली ती त्यांची अजरामर भूमिका होती ‘ नटसम्राट ‘ या नाटकातील ‘ सरकार ‘ ची म्हणजे कावेरी ची भूमिका.
September 1, 2021
गीतकार इन्दीवर यांचे खरे नाव श्यामल बाबू राय, इन्दीवर यांना लहान पणा पासून लेखक, संगीत आणि गायन लेखन याची आवड होती. त्यांचा जन्म १५ ऑगस्ट १९२४ रोजी झाला. बाबू भाई मिस्त्री यांच्या चित्रपट 'पारसमणि' मधील इन्दीवर यांची गाणी गाजली.
निर्माता-दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या चित्रपटात मा.इन्दीवर गाणी लिहिली. 'उपकार' मधील "क़स्मे वादे प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या..." ही गाणी काय किंवा 'पूरब और पश्चिम' मधील "दुल्हन चली वो पहन चली" और "कोई जब तुम्हारा हृदय तोड़ दे" ही गाणी तर अजून ही अवीट वाटतात मा. इन्दीवर यांनी संगीतकार जोड़ी कल्याणजी-आनंदजी च्या बरोबर "छोड़ दे सारी दुनिया किसी के लिये...", "चंदन सा बदन..." और "मैं तो भूल चली बाबुल का देश..." अशी सुंदर गाणी लिहिली आहेत.
राकेश रोशन यांच्या चित्रपटात इन्दीवर यांनी सदाबहार गाणी लिहिली. 'कामचोर', 'ख़ुदग़र्ज', 'खून भरी मांग', 'काला बाज़ार', 'किशन कन्हैया', 'किंग अंकल', 'करण अर्जुन' व 'कोयला' या राकेश रोशन यांच्या चित्रपटातील गाणी मा.इन्दीवर यांनी लिहिली. त्यांच्या या गाण्या मुळे राकेश रोशन यांचे चित्रपटातील गाणी आज आपण आठवणीने ऐकतो. विजय आनंद यांच्या 'जॉनी मेरा नाम' या चित्रपटातील "नफ़रत करने वालों के सीने में...", "पल भर के लिये कोई हमें..." ही गाणी मा.इन्दीवर यांचीच.
मनमोहन देसाई यांच्या 'सच्चा-झूठा' या चित्रपटातील "मेरी प्यारी बहनिया बनेगी दुल्हनियां..." हे इन्दीवर यांचे गाणे आज ही लग्नात वाजवले जाते. 'सफ़र' या चित्रपटातील इन्दीवर यांचे "जीवन से भरी तेरी आंखें..." व "जो तुमको हो पसंद..." ही गाणी तर लाजबाब.
१९७५ मध्ये 'अमानुष'या चित्रपटासाठी इन्दीवर यांना 'फ़िल्म फेयर पुरस्कार' मिळाला. इन्दीवर यांनी ३०० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी गाणी लिहिली. २७ फेब्रुवारी १९९७ मा.इन्दीवर यांचे निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
इन्दीवर यांनी लिहीलेली काही गाणी
दिल ऐसा किसीने मेरा तोडा
फुल तुम्हे भेजा है खत में
गरजत बसरत
जिंदगी का सफर
चंदन सा बदन
जो तुमको हो पसंद
मधुबन खुशबु देता है
एक तु जो मिला
पास बैठो तबीयत बहेल जायेगी
एक बार तु कहदे
इस दिल मे बसा था प्यार तेरा
ओठों से छु लो तुम
कोई जब तुम्हारा
दिल एैसा किसीने
August 15, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti