(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जेष्ठ निर्माते जी. पी. सिप्पी

    आज १४ सप्टेंबर.. आज जेष्ठ निर्माते मा.जी. पी. सिप्पी यांची जयंती.

    जन्म १४ सप्टेंबर १९१५

    सिप्पी यांचा जन्म पाकिस्तानातील सिंध प्रांतात असलेल्या हैदराबाद येथे १९१५ मध्ये झाला होता. भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनात त्यांनी विद्यार्थी दशेत भाग घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून त्यांना तुरूंगातही जावे लागले होते. त्यानंतर ते वकिल झाले. सतरंजी विक्रेत्यांपासून सुरूवात करणा-या सिप्पी यांनी १९५५ मध्ये चित्रपट कारर्कीदीला सुरूवात केली. शोले, सीता और गीता, सागर, शान या सुपरहिट चित्रपटांची निर्मिती सिप्पी यांनी केली. शोले या अजरामर चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांचे नाव चिरंतन रसिकांच्या लक्षात राहिल. मा.जी. पी. सिप्पी यांचे २५ डिसेंबर २००७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      September 14, 2016


  • गोविंद बल्लाळ देवल

    बेळगाव येथे असतांना गोविंद बल्लाळ देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १८५५ चा. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले.

    मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. १९१३ साली देवल बाल गंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले. तेव्हांच त्यांचा उत्तम नट म्हणून लौकिक झाला. कांहीं दिवस सरकारी नोकरी केल्यानंतर ती कायमची सोडून ते नाटयवाङ्मयांत भर घालूं लागले. किर्लोस्करांच्या खालोखाल नाटयकवि म्हणून यांचें नांव पुढें येऊन ब-याच नाटक मंडळ्यांनां यांच्या नाटकांवर गबर होतां आलें. देवलानीं एकंदर संगीत व गद्य मिळून सात नाटकें लिहिलीं आहेत दुर्गा मृच्छकटिक, विक्रमोर्वशीय, झुंजारराव, शापसंभ्रम, संगीत शारदा, आणि संशयकल्लोळ. मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे. यांपैकीं पहिलीं तीन संस्कृत नाटकांचीं व शेवटलीं इंग्रजी नाटकांचीं रूपांतरें होत.

    शारदा नाटक कायतें एकच त्यांचें स्वत:चें व तत्कालीन समाजांत क्रांति करून सोडणारें नाटक होतें जरठ तरुणी विवाह हा या नाटकाचा सामाजिक विषय असून नाटककारानें आपल्या कवित्वानें तो उत्कृष्ठ रंगविला आहे. त्यामुळें बराच काळ महाराष्ट्रीयांच्या मनावर याचा पगडा बसला होता. गोविंद बल्लाळ देवल यांचे १४ जून १९१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

      June 14, 2017


  • ज्येष्ठ संगीतकार-गायक सुधीर फडके ऊर्फ बाबूजी

    बाबूजी यांचे मूळ देवगडच्या भूमीत आहे यावर नव्या पिढीचा विश्वासच बसत नाही, पण ते पूर्णसत्य आहे. त्यांचा जन्म २५ जुलै १९१९ रोजी कोल्हापूर येथे झाला. आजही त्यांचे घर वाडा-फणसे या गावात अस्तित्वात आहे. त्यांचे आजोबा फणसे येथून कोल्हापूरला गेल्यावर तेथेच स्थानिक झाले.

    बाबूजींचे वडील विनायक हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखले जायचे. गायन आणि वादनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतले. त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनाने त्यांना संगीताचे शिक्षण मध्येच सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावे लागले.

    कोल्हापूर सोडून मुंबईत आणि नंतर उत्तर भारतात दोन वर्षे दौरा करून त्यांनी मैफलींमध्ये सादरीकरण केले. यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा व कलांचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा वापर बाबूजींनी आपले संगीत खुलविण्यासाठी केला. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची एक नावाजलेला गायक व संगीतकार म्हणून ओळख झाली.

    एचएमव्ही सोबत १९४१ मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील गीते त्या काळात खूपच गाजल्याने सुधीर फडके यांना खूप प्रसिद्धी मिळाली. स्वत: गायक, गीतकार असल्याने पुढे प्रभात चित्रपट संस्थेच्या माध्यमातून १९४६ मध्ये ते संगीतकार म्हणून उदयास आले. जुन्या पिढीतील पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी २९ मे १९४९ ला त्यांचा विवाह झाला. पुणे येथे संपन्न झालेल्या विवाहात त्यांनी स्वत:च्या लग्नात मंगलाष्टके म्हटल्याचे सांगितले जाते.

    कवी न. ना. देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून ‘सुधीर’ असे नामकरण केले. मा.सुधीर फडके यांनी सुमारे ११० चित्रपटांना तर सुमारे २० हिंदी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय अनेक भावगीते, भक्तिगीते आणि मराठी लावण्यांना त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजविले आहे.

    बाल गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे अशा अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कोंदणात बसविले आहे.

    गायक-संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले मा.सुधीर फडके यांच्यात एक चांगला अभिनेताही दडलेला होता. त्यांचे सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्वीह ठरले होते. हिंदी चित्रपटातील भाभी की चूडिया या चित्रपटाचे 'ज्योती कलश छलके' हे पहाटगाणं आजही रसिकमनाचा ठाव घेते. पहली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेले 'खुश है जमाना आज पहली तारीख है' हे गीत रेडियो सिलोनवरून आजही पहिल्या तारखेला वाजत आहे.

    संगीतकार खय्यामही त्यांच्या संगीताच्या मधुरतेने प्रभावित झाले होते. पण महाराष्ट्राच्या घराघरात बाबूजी जाऊन पोचले ते 'गदिमां'च्या गीत रामायणामुळे. या रामायणातील ५६ गीतांसाठी त्यांनी दिलेले संगीत आणि केलेले गायन एक वेगळाच प्रयोग आहे. त्यांनी गीत-रामायणाचे देश-विदेशात १८०० हून अधिक कार्यक्रम केले. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळविलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्या काळी ठरला होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले होते.

    स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी तात्याराव तथा विनायक दामोदर सावरकर यांच्यावरचा ‘वीर सावरकर’ चित्रपट बनविण्यासाठी त्यांनी कूपन्स विकून आणि कार्यक्रम करून निधी गोळा केला होता. त्यांनी दिलेल्या संगीत सेवांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात स्वामी हरिदास सन्मान, सूरसिंगार सांसद पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कारांचा समावेश आहे.

    अमेरिकेतील ‘इंडिया हेरीटेज फाऊंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. ‘हा माझा मार्ग एकला’ या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक १९६३ मध्ये पं. नेहरूंच्या उपस्थितीत राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारले. तर १९९१ साली राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय ‘दिनानाथ संगीत पुरस्कार’ व राज्यशासनाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ व ‘सह्याद्री स्वररत्न पुरस्कार’ त्यांना लाभले.

    सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 29, 2017


  • दादा जेपी वासवानी

    साधू वासवानी मिशनचे संस्थापक, सिंधी समाजाचे आध्यात्मिक गुरू हा लौकिक परिचय असलेले दादा जे. पी. वासवानी यांनी शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात अनमोल योगदान दिले. त्यांचा जन्म २ ऑगस्ट १९१८ रोजी पाकिस्तानमधील सिंध प्रातांतील हैदराबाद येथे झाला. जे. पी. ऊर्फ जशन पहलाजराय वासवानी असे त्यांचे मूळ नाव. आध्यात्मिक गुरू साधू वासवानी यांचे ते पुतणे होते.

    साधू वासवानी यांच्यासमवेत १२ नोव्हेंबर १९४८ रोजी दादा भारतामध्ये आले. ‘इंडियन डायजेस्ट’ आणि ‘ईस्ट अँड वेस्ट सिरीज’ या मासिकांचे संपादन करणाऱ्या दादांनी १९६२ ते १९७६ या कालावधीत सेंट मीरा कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम पाहिले. २५ नोव्हेंबर १९८६ या साधू वासवानी यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून ‘शाकाहार दिन’ ही चळवळ दादांनी सुरू केली. दादा जे. पी. वासवानी यांनी शाकाहारासाठी देश-विदेशात प्रचार केला. जे. पी. वासवानी हे अविवाहित होते. त्यांचे भौतिकशास्त्रात त्यांनी एमएस्सीपर्यंतचे शिक्षण झाले होते. त्यानंतर एल.एल.बी.चीही पदवी संपादन केली होती.

    दादा जे. पी. वासवानी यांच्या आयुष्याचा सारांश 'प्रेम' या शब्दात होते. लहानपणाासून त्यांच्यात सेवा आणि दयेचा अंकुर विकसित झाला होता. अत्यंत बुद्धिमान अशी त्यांची ख्याती होती. केवळ सतराव्या वर्षी त्यांनी एमएस्सीची पदवी प्रथम क्रमांकाने संपादित केली होती. भौतिकशास्त्रातील प्रबंधांची त्यावेळचे नोबेल विजेते सर व्ही. व्ही. रामन यांनी प्रशंसा केली होती. वासवानी यांचे इंग्रजी; तसेच सिंधी या भाषांवर प्रभुत्व होते. ते सतत वाचन व मननात मग्न असत. जगातील प्रख्यात लेखकांच्या पुस्तकांतील परिच्छेद ते आपल्या भाषणांतून नेहमी सांगत असत. दादांची राहणी साधी होती.

    अंगात पांढरा शर्ट, पायजमा, पांढरी शाल आणि पायात साधी चप्पल. हसरा चेहरा आणि चमकदार डोळे, मोठे कान ही दादांच्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये होती. दिलखुलास हास्य आणि अंगभूत समयसूचकतेने ते इतरांची मने जिंकून घेत. हसताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद जणू ओसंडून वाहात असे.

    दादा जे. पी. वासवानी यांनी साधू वासवानी मिशनतर्फे अनेक सामाजिक कार्यांना प्रारंभ केला. त्यांनी स्त्री शिक्षणाला प्राधान्य दिले होते. सेंट मीरा स्कूल व कॉलेज सुरू केले. त्यांनी इंग्रजी, सिंधी भाषेत सुमारे १९० पुस्तके लिहिली. देशभरात १८ शाळा काढल्या, तर पुण्यात इनलॅक्स बुधरानी हे हॉस्पिटल; तसेच शांती क्लिनिकदेखील सुरू केले.

    विदेशी भाषेत त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. जगातील अनेक नामांकित नेत्यांसह धर्मगुरू त्यांना भेटून त्यांच्याशी संवाद साधत असत. त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दादा जे. पी. वासवानी यांचे १२ जुलै २०१८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      August 2, 2021


  • सुप्रसिद्ध नाटककार मो. ग. रांगणेकर

    मो.ग.रांगणेकर यांनी अनेक नाटके लिहिली , दिग्दर्शित केली. त्यांनी संगीत अमृत , अलंकार , आले देवाजीच्या मना. संगीत आशीर्वाद , कन्यादान , संगीत कुलवधू , लिलाव , भेटला दिली ओसरी , हेही दिवस जातील हे नाटक त्यांनी सहलेखक म्ह्णून वसंत सबनीस आणि ग.दि . माडगूळकर याना घेऊन केले. अशी त्यांनी अनेक नाटके लिहिली .

      April 10, 2021


  • लेखक विश्वास पाटील

    इतिहासाशी पूर्ण प्रामाणिक राहून व त्याचे नवे पैलू शोधून मांडणारा लेखक अशी त्यांची प्रतिमा आहे. सुभाषबाबूंच्या चरित्राचा एवढा व्यापकपणे शोध घेणारी कादंबरी खुद्द बंगालीतही नाही.

      November 28, 2021


  • अण्णा हजारे

    ज्येष्ठ समाजसेवक किसन बाबूराव हजारे उर्फ अण्णा हजारे यांचा जन्म १५ जून १९३७ भिंगार, अहमदनगर जिल्हा येथे झाला. अण्णा हजारे यांचे वडील बाबूराव हजारे तेथील आयुर्वेद आश्रम औषधशाळेत मजूर होते. बाबूरावांचे वडील ब्रिटिश फौजेत सैनिक होते. किसन यांना सहा लहान भावंडे होती व कुटुंबाची परिस्थिती हलाखीची होती. त्याच्या आत्याने किसनची देखभाल करण्याचे ठरवले व शिक्षणासाठी त्या त्याला मुंबईला घेऊन गेल्या. सातवीपर्यंत शिकल्यावर घरात मदत व्हावी म्हणून किसनने शिक्षण सोडून नोकरी शोधण्यास सुरुवात केली.

      June 15, 2021


  • रहस्यकथा सम्राज्ञी अगाथा ख्रिस्ती

    अगाथा ख्रिस्तीच्या कथा-कादंबऱ्यांतील रहस्याची उकल जशी शेवटपर्यंत होत नसे, तसेच त्यांच्यातील खुनाचे तपशील विलक्षण जिवंत, वास्तवाधिष्ठित असत. हाणामारी वा पिस्तुलबाजी टाळून, तिच्या कादंबऱ्यांतील अनेक मृत्यू विषप्रयोगाने होत. १९६१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या तिच्या ‘पेल हॉर्स’मध्ये खून ‘थेलियम’ या विषाद्वारे झाल्याचे दाखविण्यात आले होते.

      January 12, 2022


  • रतन साळगावकर ऊर्फ हंसा वाडकर

    चित्रपटसृष्टीतील पहिली ग्लॅमरस नायिका म्हणजे हंसा वाडकर. त्यांचा जन्म २४ जानेवारी १९२४ रोजी झाला. सौंदर्य, नृत्य आणि अभिनय या तिन्ही आघाड्यांवर परिपूर्ण असणाऱ्या या नायिकेनं दोन दशकं गाजविली. हंसाबाईंनी आपल्या कारकिर्दीत मोजकेच चित्रपट केले. परंतु, त्यातील त्यांच्या भूमिका आणि पडद्याबाहेरच्या बेफाम वागण्यानं त्या प्रेक्षकांच्या सदैव लक्षात राहिल्या. हंसाबाईंचं आयुष्य एवढं जबरदस्त होतं की श्यायम बेनेगलांच्या विख्यात दिग्दर्शकाला त्यांच्यावर "भूमिका'सारखा चित्रपट बनविण्याची इच्छा झाली.

    हंसाबाईंचा जन्म मुंबईतल्या एका सुखवस्तू कुटुंबात झाला. त्यांचं मूळ नाव रतन साळगावकर. नृत्य-संगीताची त्यांच्या घरी परंपराच होती. रतनच्या आजी बयाबाई साळगावकर या चांगल्या गायिका होत्या. रतनवरचं पितृछत्र तिच्या लहानपणीच हरवलं. तेव्हा रतनला तिच्या आई आणि आजीनं वाढवलं. रतनला संगीत आणि नृत्याचे धडे देण्यासाठी तिच्या आईनं त्या काळातले मोठमोठे उस्ताद आणि गवई यांना पाचारण केलं होतं. परंतु रतनचा सूर त्यांच्याशी काही जुळला नाही. उस्ताद घरी आले की रतन एकतर घरातून पळ काढे किंवा कुठं तरी लपून बसे. तेव्हा बयाबाईंनीच आपल्या नातीच्या जडणघडणीची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्या स्वतः रतनला शिकवायला लागल्या. गाण्यातली एक ओळ किती वेगवेगळे भाव दाखवून गाता येते, याचं प्रशिक्षण त्यांनी रतनला दिलं. रतन आपल्या आजीला "जीजी' या नावानं हाक मारीत असे. मराठी-हिंदीबरोबरच इंग्रजी भाषेवरही त्यांनी प्रभुत्व मिळवलं. काही काळातच रतन तयार झाली आणि वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी तिला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मामा वरेरकर या चित्रपटाचे लेखक होते. या चित्रपटासाठी रतन साळगावकरचं "हंसा वाडकर' असं नामकरण झालं. त्या काळात चित्रपटसृष्टीबाबत कोणी फारसं चांगलं बोलत नसे. त्यामुळे या क्षेत्रातील आपल्या प्रवेशाचे चटके आपल्या कुटुंबीयांना बसू नयेत, या विचारानं रतननं आपलं नाव आणि आडनाव दोन्हीही बदललं. अर्थात हे नाव पुढं आयुष्यभरासाठी त्यांच्याशी जोडलं गेलं. तो काळ असा होता, की मुलींची लग्न १५व्या- १६व्या वर्षी होत. चित्रपटसृष्टीत कारकीर्द घडविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणाऱ्या हंसाबाईंना समाजाच्या या रूढीपुढं नमावं लागलं. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि इथून त्यांच्या वादळी आयुष्याची सुरवात झाली. हंसाबाईंना अभिनेत्री म्हणून पहिल्यांदा नाव मिळवून दिलं ते "प्रभात'च्या "संत सखू' चित्रपटानं. या चित्रपटामधील संत सखूची अतिशय सोज्ज्वळ भूमिका हंसाबाईनं मोठ्या ताकदीनं साकारली होती. या भूमिकेच्या अगदी विपरीत भूमिका त्यांनी व्ही. शांताराम आणि बाबूराव पेंटर यांचं संयुक्त दिग्दर्शन असलेल्या "लोकशाहीर राम जोशी' या चित्रपटामध्ये साकारली. या चित्रपटात त्यांनी बया या तमासगिरीणीची व्यक्तिरेखा वठवली होती. "...सुंदरा मनामंदी भरली... हवेलीत शिरली... जरा नाही ठरली... मोत्याचा भांग....' या रामजोशींच्या काव्यानं आणि हंसाबाईंच्या ठसक्याशनं बहार आणली. या दोन्ही भूमिकांमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर होतं. परंतु आपल्या अदाकारीनं हंसाबाईनं हे अंतर पुसून टाकलं. गोरा वर्ण, सतेज कांती, हसरे, टपोरे डोळे, सडसडीत बांधा आणि या जोडीला अभिनयाची लाभलेली देणगी... सात दशकांपूर्वीच्या त्या मराठी चित्रपटसृष्टीतल्या अप्सरा होत्या.

    "रामजोशी' चित्रपट सुपरहिट ठरला आणि हंसाबाईंना व्ही. शांताराम, गजानन जागीरदार, राजा परांजपे, राजा ठाकूर, भालजी पेंढारकर यांच्यासारख्या श्रेष्ठ दिग्दर्शकांकडे काम करण्याची संधी त्यांना मिळाली; मात्र अंगभूत गुणवत्ता, प्रचंड लोकप्रियता मिळूनही ती "कॅश' करण्याची कल्पकता हंसाबाईंना दाखविता आली नाही. या काळात त्यांनी "रामशास्त्री', "धन्यवाद', "पुढचं पाऊल', "मी तुळस तुझ्या अंगणी', "नायकिणीचा सज्जा', "सांगत्ये ऐका' यांसारखे मोजकेच चित्रपट केले. त्याला मुख्य कारण ठरलं ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामधील संकटं. पतीबरोबरील मतभेदांमुळे त्यांनी एका क्षणी घर सोडलं आणि पुढं त्यांचं सगळंच आयुष्यच भरकटत गेलं. याचा विपरीत परिणाम त्यांच्या कारकिर्दीवर झाला. आपल्या आयुष्यातील वैयक्तिक घडामोडींना कारकिर्दीपासून दूर ठेवण्यात त्यांना अपयश आलं. त्यामुळे चांगल्या भूमिका मिळण्याची संधी असूनही तिचा लाभ त्यांना उठवता आला नाही. चित्रपटसृष्टीतील ग्लॅमर जगतामध्ये वाहवत जाण्याची कारणमीमांसा त्यांनी "सांगत्ये ऐका' या आपल्या आत्मचरित्रात केली आहे. "चित्रपटसृष्टी म्हणजे एक जाळं आहे. या जाळ्यात जो अडकला त्याची सुटका नाही,' असा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. तो खरा की खोटा हा वादाचा विषय आहे. मात्र ग्लॅमर जगतामध्ये कलावंत जोपर्यंत प्रकाशझोतात आहे, तोपर्यंतच त्याचं सर्व काही सुरळीत सुरू असतं. एकदा हा प्रकाशझोत गेला की तो विस्मृतीच्या गर्तेत जातो. हंसाबाईंच्या उत्तरायुष्यात असंच काहीसं घडलं.

    संकटं आली की ती एकट्यानं येत नाहीत, याचा अनुभव हंसाबाईंना आला. वैयक्तिक आयुष्यातील घसरण आणि कारकीर्द उतरणीला असतानाच त्यांना कर्करोगासारख्या दुर्धर आजारानं गाठलं. या आजाराने त्यांचं पूर्ण खच्चीकरण झालं. मुंबईतल्या ग्लॅमरस जगातून बाजूला होत त्या विश्रांतीसाठी बराच काळ महाबळेश्वारला जाऊन राहिल्या होत्या. एक काळ त्या प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या. त्यांच्या आजूबाजूला चित्रपटसृष्टीतील नामवंतांची गर्दी होती. स्टुडिओबाहेर त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी असायची. परंतु ती गर्दी आता पांगली होती. एकटेपणा त्यांना अगदी असह्य झाला होता. आजारातून बरे होऊन पुन्हा कारकीर्द घडविण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हा लावण्यसूर्य जो ढळला तो ढळलाच. तो पुन्हा तेजोमय झाला नाही. आपल्या आयुष्याची बेरीज-वजाबाकी "सांगत्ये ऐका' या आत्मचरित्राद्वारे लिहून ठेवली. त्यानं फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर एके काळी खळबळ उडवून दिली होती. हे आत्मचरित्र "अभिनेत्री की आपबीती' या शीर्षकानं हिंदी भाषेतही प्रसिद्ध झालं. या आत्मचरित्रावर वाचकांच्या उड्या पडल्या. चित्रपटसृष्टीतील नामवंतांचंही त्याकडे लक्ष गेलं. विख्यात लेखक-दिग्दर्शक श्यााम बेनेगल यांनाही त्याची भुरळ पडली आणि त्यांनी हंसाबाईंच्या चरित्रावर बेतलेला "भूमिका' चित्रपट निर्माण केला. तोदेखील विलक्षण गाजला आणि या चित्रपटात हंसाबाईंची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या स्मिता पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
    हंसाबाईंच्या आयुष्यात वादळी घडामोडी घडल्या नसत्या तर आज त्यांना चित्रपटसृष्टीत खूप वेगळं स्थान मिळालं असतं. परंतु, तसं घडणारं नव्हतं. कारण हंसाबाई म्हणजे एक शापित सौंदर्य होतं. हंसा वाडकर यांचे निधन २३ ऑगस्ट १९७१ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ :- मंदार जोशी /विकिपिडीया

      January 25, 2017


  • कूचिपूडि, भरतनाट्यम् नर्तकी मल्लिका साराभाई

    मल्लिका साराभाई या नर्तकी मृणालिनी साराभाई व वैज्ञानिक विक्रम साराभाई यांची कन्या. त्यांचा जन्म ९ मे १९५४ रोजी झाला. समांतर सिनेमा पासून आपल्या करीयरची त्यांनी सुरवात केली. मल्लिका साराभाई यांनी पीटर ब्रुक यांचे नाटक महाभारत मध्ये द्रोपदी ची भूमिका केली होती. याच नाटकावर नंतर चित्रपट बनवला गेला होता. मल्लिका साराभाई यांनी भारतात व परदेशात अनेक कार्यक्रमात भाग घेतला आहे. मल्लिका साराभाई यांनी हर्ष मन्दर यांच्या पुस्तकावर आधारित अनसुनी या नाटकाची पटकथा लिहिली आहे. मल्लिका साराभाई या दर्पणा अकादमी ऑफ आर्टस् (अहमदाबाद) च्या निदेशक आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      May 10, 2017