(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • डॉ. मेधा गिरीश मेहेंदळे

    डॉ. मेधा मेहेंदळे हे आयुर्वेदिक औषध क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. तन्वी या ब्रॅन्डनेम खाली त्यांनी बनविलेली औषधे आज महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचली आहेत.

      May 3, 2014


  • भारतीय सिने-अभिनेत्री, निर्माती जूही चावला

    बॉलीवूडमध्ये नव्वदचे दशक गाजवणारी जूही चावला १९८४ सालची मिस इंडिया विजेती आहे. बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये तिची गणना होते. मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर जुहीने अभिनयामध्ये उतरायचे ठरवले. १९८६ सालच्या सल्तनत ह्या चित्रपटामधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९६७ रोजी झाला. त्यानंतर १९८८ साली आलेला आमिर खानसोबतचा कयामत से कयामत तक हा तिचा दुसरा चित्रपट प्रचंड यशस्वी झाला व जुही रातोरात सुपरस्टार बनली. तेव्हापासून तिने अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत व तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

    हिंदी खेरीज जुहीने तेलुगू, तमिळ इत्यादी भाषांमधील चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. अभिनयाखेरीज जुही चित्रपट निर्मितीमध्ये देखील कार्यरत आहे खळाळतं हास्य, चेहऱ्यावर एक हट के नटखटपणा आणि अभिनयातली जबरदस्त अदा. या गोष्टींमुळं या अभिनेत्रीनं एक काळ बॉलिवूडवर अक्षरश: राज्य केलं. जुही चावला ही बॉलीवूडची चुलीबुली अभिनेत्री म्हणुन सुध्दा ओळखली जाते.

    बॉ़लीवूडमध्ये जूही चावला आणि शाहरुख खान यांची मैत्री नावाजली जाते. दोघही खूप चांगले मित्र-मैत्रिण आहेत. आमीर- जूही चावलाच्या जोडीने काही सुंदर चित्रपट दिले आहेत. जूही-शाहरुखची जोडी चित्रपटसृष्टीतील एक हीट जोडी राहिली आहे. या दोघांनी राजू बन गया जेन्टलमॅन, डर, डुप्लीकेट, यस बॉस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. 'गुलाब गँग' या सिनेमातल्या तिच्या खलनायकी भूमिकेचंही कौतुक झालं. जुही चावलाने हॉलीवूडमध्ये काम केले आहे. द हंड्रेड फूट जर्नी या चित्रपटातून जुहीने केले आहे. त्यांनी जय मेहता या गुजराती उद्योगपतीशी त्यांनी १९९८ मध्ये विवाह केला आहे. "आयपीएल‘मधल्या कोलकता नाईट रायडर्स टीमची सहमालकी त्यांच्याकडे आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      November 13, 2018


  • मास्टर कृष्णराव तथा कृष्ण गणेश फुलंब्रीकर

    आपलं सगळं आयुष्य नाटकाला वाहिलेला, सर्वार्थाने रंगभूमी कलाकार म्हणजे मास्टर कृष्णराव. त्यांचा जन्म २० जानेवारी १८९८ रोजी झाला. त्यांना सुरुवातीचे संगीत शिक्षण बाबूराव फडके यांचेकडून मिळाले. कृष्णरावांचे वडील पंडित होते. त्यांच्या निधनानंतर, गरिबीच्या परिस्थितीत वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी कृष्णरावांनी नाट्यकला प्रवर्तक मंडळी या नाटक मंडळीत काम सुरू केले. कृष्णरावांची तब्येत नाजूक होती. आवाजातील गोडी, लवचीकपणा यांमुळे त्यांना काम मिळाले होते. ते 'संत सखू' नाटकात विठोबाची भूमिका करत असत. ह्याच नाटक मंडळीत त्यांचा परिचय सवाई गंधर्वांशीझाला व त्यांना नाटकातील गाण्यांसाठी सवाई गंधर्वांचे मार्गदर्शन लाभले. १९१० साली मास्टर कृष्णरावांनी पं. भास्करबुवा बखले यांचे शिष्यत्व स्वीकारले. आपल्या गुरूंच्या आग्रहास्तव मास्टर कृष्णरावांनी गंधर्व नाटक मंडळींत प्रवेश केला. ते बालगंधर्वांबरोबर मुख्य भूमिका करत असत. ह्या दरम्यान त्यांनी 'संगीत शारदा', 'संगीत सौभद्र', 'एकच प्याला' यांसारख्या अनेक नाटकांत स्त्री-भूमिकाही केल्या.

    गुरूंच्या निधनानंतर गंधर्व मंडळींच्या नाटकांसाठी संगीत रचना करण्याचे काम कृष्णरावांकडे आली. 'सावित्री', 'मेनका', 'संगीत कान्होपात्रा' यांसारख्या नाटकांना संगीत देताना कृष्णराव त्यातील अभिनेत्यांना मार्गदर्शन करत असत. बालगंधर्वही त्यांना गुरुस्थानी मानायचे. नंतरच्या काळात त्यांनी 'नाट्य निकेतन'साठी केलेल्या रचनांमुळे मराठी नाटकांमधील संगीताला एक वेगळी दिशा मिळाली. त्यांनी रचलेली 'कुलवधू', 'एक होता म्हातारा' यांमधील गाणी त्यांतील भाव, गेयता व शब्दसौंदर्यासाठी वाखाणली गेली. मा.कृष्णरावांनी 'धर्मात्मा', 'माणूस', 'गोपाळकृष्ण' यांसारख्या चित्रपटांनाही संगीत दिले. त्यांनी संगीत दिलेल्या प्रभात कंपनी निर्मित या व इतर अनेक चित्रपटांतील गाणी खूप गाजली. त्यांनी एकूण १९ चित्रपटांना संगीत दिले. त्यात अत्रे फिल्म्सच्या गाजलेल्या 'अमरज्योती' चित्रपटाचा समावेश आहे. त्यांनी 'भक्तीचा मळा' व 'मेरी अमानत' चित्रपटांत भूमिकाही केल्या. संगीत जलशांचे कार्यक्रम करण्यासाठी मास्टर कृष्णरावांनी १९२२ ते १९५२ दरम्यान भारतभर सातत्याने दौरे केले. त्यांच्या आवाजातील लवचीकता, माधुर्य व आकर्षकपणा यांचा प्रभाव जनमानसावर लगेच पडत असे. त्यांच्या कार्यक्रमांना सर्वसामान्यांबरोबरच रसिक, दर्दी श्रोत्यांची विशेष पसंती व उपस्थिती असे. ते दुर्मिळ आणि लोकप्रिय रागांबरोबरच ठुमरी, नाट्यगीत,भजन व चित्रपटगीतेही प्रभावीपणे सादर करत असत. तसेच नव्या शक्यता पडताळून पाहणे, नवे प्रयोग करणे ही त्यांची खासियत होती. त्यांनी रचलेले 'झिंजोटी' रागातील सामूहिकरीत्या गाता येण्यासारखे 'वंदे मातरम्' वाहवा मिळवून गेले. प्रसन्न, उठावदार व प्रभावी गायन शैलीने ते श्रोत्यांना मंत्रमुग्ध करत असत. त्यांनी गायलेल्या गाण्यांची व राग संगीताची ७८ आर. पी. एम. ध्वनिमुद्रणेही प्रकाशित केली गेली.

    अखेरच्या कालावधीत त्यांनी बंदिशी व नाट्यगीतांच्या सुरावटींसह रचना असलेली १९ पुस्तके प्रकाशित केली. संगीत रागदारीवरील, गायन व वादन शिक्षणाबद्दलच्या पुस्तकाचे १९४० ते १९७१ या काळात लिहिलेले 'रागसंग्रह' नामक सात खंड त्यांत समाविष्ट आहेत. वंदे मातरम हे गीत, ते बॅन्डवर वाजवता येत नाही या सबबीखाली राष्ट्रगीत केले नाही याचे त्यांना फार वाईट वाटले. वंदे मातरमला अनेकानेक विविध चाली लावून, त्यांतल्या काही बॅन्डवर वाजवता येतात हे दाखवण्यासाठी त्यांनी पंडित नेहरूंची भेट घेऊन त्यांना पटवून देण्याचा प्रयत्नं केला. पण नेहरूंनी आधीच जन गण मन निश्चित केले असल्याने मास्तर कृष्णरावांची सर्व मेहनत फुकट गेली.मसापतर्फे दर विषम वर्षी एका संगीतविषयक समीक्षकास मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर स्मृति पुरस्कार देण्यात येतो. मा.मास्टर कृष्णराव यांचे २० ऑक्टोबर १९७४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ ग्लोबल मराठी

      January 20, 2018


  • डॉ. सचिन पाटील

    कोल्हापूरजवळ वाढलेला एक तरुण केमिकल टेक्नॉलॉजीचे शिक्षण घेतो, नंतर मिशिगन विद्यापीठात पीएचडी करतो आणि आता अमेरिकेच्या वाइडनर विद्यापीठात स्मृतिभ्रंशावरील संशोधनाने जगाचे लक्ष वेधून घेतो. “अल्झायमर असोसिएशन” ची शिष्यवृत्ती मिळालेल्या मोजक्या विद्यार्थ्यांपैकी एक डॉ. सचिन पाटील यांची अमेरिकेत स्वत:ची प्रयोगशाळाही आहे.

    स्मृतीचे तल्लख रसायन

      July 24, 2015


  • अशोक रामचंद्र शिंदे

    श्री. अशोक रामचंद्र शिंदे हे गेली २५ वर्षे पत्रकारितेत असून त्यांनी `सांज लोकसत्ता', `नवशक्ती', `सकाळ', `अर्थनीती', `युगधर्म' अशा दैनिकांमधून पत्रकारितेच्या माध्यमातून वेगवेगळे विषय हाताळले असून त्याची दखल शासकीय स्तरावरून वेळोवेळी घेण्यात आली आहे. ते भारतीय पत्रकार संघ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ, मुंबई मराठी पत्रकार संघ आदी संस्थांशी संलग्न आहेत तसेच महाराष्ट्र शासनाचे अधिस्वीकृतीधारक पत्रकारदेखील आहेत. नागपूर येथून प्रकाशित होत असलेल्या ६७ वर्षे जुन्या `दै. युगधर्म' या दैनिकाचे ते मुंबईचे ब्यूरो चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर याच वृत्तपत्र समूहातील `दै. देश', `दै. उद्याची खबर आज', `दै. विदर्भ पुकार' या दैनिकांसाठीही ते मुंबईचे विशेष प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत.

    पूर्णवेळ पत्रकारिता करत त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, व्यापार-उद्योग अशा विविध क्षेत्रातील वार्तांकनं तसेच लेखन केले आहे. व्यसनमुक्ती तसेच अवैध दारूचे धंदे, व्यसनापायी होणारी सामाजिक हानी, राजकारणात सत्शीलपणा येण्यासाठी आग्रही राहिलेले त्यांचे लेखन, विविध सामाजिक बाबी आदी विषयांवर त्यांनी गेल्या २३ वर्षांमध्ये नियमितपणे व सातत्याने लिखाण केले आहे. त्याच्या उपयोग महाराष्ट्राच्या विकासात हातभार लागण्यासाठी झालेला आहे. प्रत्येक बातमीमागे त्याची वस्तुनिष्ठता तसेच त्याचा सापेक्षपणा ठळकपणे अधोरेखित होतो.

    अनेक चरित्रपर व मार्गदर्शनपर पुस्तकांचे लेखन त्यांनी केले आहे. पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने कांची कामकोठी पीठाचे जगदगुरु शंकराचार्य यांच्या हस्ते पुरस्कारदेखील मिळाला आहे. त्याचबरोबर अन्य संस्थांनीही त्यांच्या पत्रकारितेतील कार्याचा गौरव केला आहे. व्यसनमुक्ती उपक्रमांबरोबरच अन्य कामिगरींमध्ये त्यांचा लौकिक राहिला आहे. महाराष्ट्रातील जलसिंचन प्रकल्प, पंचतारांकित औद्योगिक वसाहती, कृषी प्रकल्प अशा अनेक विषयांवर त्यांनी अभ्यास करून पत्रकारितेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विविध प्रकल्पांची पाहणी करून त्याबाबत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून त्यांची सोडवणूकदेखील केलेली आहे. त्याची अनेक उदाहरणे आहे. आपल्या लिखाणातून राज्यातील असंख्य वाचकांवर शासनाच्या वतीने राबवण्यात येणा-या उपक्रमांचे तसेच योजनांचे विवेचन विश्लेषणात्मक रुपाने दिले आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये या योजनांचे स्वरुप समजून त्याचा उपयोग कल्याणकारी कार्यासाठी करून घेण्यास हातभार लागला आहे. गेली पाच वर्षे सलगपणे ते विधिमंडळाच्या अधिवेशनांचे वार्तांकन करत असल्यामुळे शासकीय कामकाजांना त्यांनी वृत्तपत्राच्या माध्मयातून प्रसिद्धी देऊन जनमानसांपर्यंत शासनाचे विविध कार्य पोहचवले आहे.

    व्यसनमुक्तीच्या उपक्रमांना आपल्या लिखाणातून प्राधान्य देत महाराष्ट्राच्या विविध विकास कामं, योजना यांच्याशी संबंधित माहिती, त्याच्यावरील विश्लेष्ण तसेच त्याच्या प्रचारासाठी सातत्याने त्यांच्याकडून होत असलेल्या लिखाणातून राज्याच्या विकासकार्यात त्यांचेदेखील भरीव योगदान काही प्रमाणात लाभत आहे.

    भारतीय पत्रकार संघाचे सरचिटणीस म्हणून त्यांनी पत्रकारांचे साहित्य संमेलन दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या सहकार्याने आयोजित केले. त्यालादेखील राज्यभरातील पत्रकारांनी उत्तम प्रतिसाद दिला होता.
    त्यांनी आतापर्यंत अनेक पुस्तके व लेख लिहले आहेत. पुस्तकांमध्ये अधिकांश आत्मचरित्रपर लिखाण असून त्यात राजकीय नेते शरद पवार, विक्रमराव सावरकर, पी. एस. लाड, उद्योजक भाई सावंत, शिक्षणकर्मी अनंत वामन वर्तक, पुष्पकांत अनंत म्हात्रे आदींचा समावेश आहे. त्याचबरोबर `लघुउद्योजकांच्या दुनियेत' हे त्यांचे पुस्तक तत्कालिक उद्योगमंत्री लिलाधर डाके यांच्या हस्ते प्रकाशित झाले. त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्याशिवाय अनेक प्रासंगिक लेखन ते वृत्तपत्रांमधून करत असतात. त्यांचे अनेक लेख महाराष्ट्रातील नामांकित वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

    केंद्रीय श्रमिक शिक्षण मंडळ, कुर्ला व श्रमिक पत्रकार संघटना असलेल्या भारतीय पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ६ जानेवारी २०१७ या दिवशी पत्रकारितेतील उल्लेखनीय व समर्पित कार्याबद्दल व श्रमिक पत्रकार म्हणून २५ वर्षे कार्य केल्याबद्दल विशेष पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

    महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने त्यांची परिक्षक म्हणून नियुक्ती केली होती. ती जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

    मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या वतीने राष्ट्रीय लोकअदालत अंतर्गत त्यांना न्यायालयीन खटल्याच्या न्यायप्रक्रियेत पत्रकार व समाजसेवक म्हणून सहभागी करून घेतले जाते.

    कोकण मराठी साहित्य परिषदेचे ते अजीवन सदस्य असून त्यांनी कोमसापच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या साहित्य संमेलनात मोलाची भूमिका बजावली. या संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात झालेल्या या भव्य संमेलनाच्या आयोजनापासून ते संपूर्ण संमेलन पूर्ण होईपर्यंत प्रसिद्धी समिती प्रमुखपदाची जबाबदारी यशस्वीरित्या सांभाळली. त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

    ऋजुता फाऊंडेशनचे ते विश्वस्त असून त्यांनी महिला साहित्यिकांचे राज्यव्यापी संमेलन दादर – माटुंगा सांस्कृतिक केंद्रात आयोजित केले. त्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. विजया वाड होत्या तसेच गिरीजा किर यांना जीवनगौरव पुरस्कार दिला गेला. भाषा संचालनालयाच्या संचालिका डॉ. मंजुषा कुलकर्णी यांच्यासह देश-विदेशातील अनेक सुप्रसिद्ध महिला साहित्यिका यात सहभागी झाल्या होत्या. या संमेलनाचे नेटनेटके आयोजन अशोक शिंदे यांनी केले व संमेलन यशस्वी केले.

    स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, मुंबई यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या निवडक ग्रंथ संपदांचा 12 भारतीय भाषांमध्ये अनुवाद तसेच ब्रेल लिपीत त्याचे रुपांतरण करण्याचा प्रकल्प त्यांनी एकट्यानी यशस्वीपणे राबविला आहे. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे साहित्य मराठी, हिंदी, इंग्रजीसह गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळ्म, आसामी, पंजाबी, उडिया या भाषांमध्ये उपलब्ध झाले आहे.

    माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांनी लिहलेल्या `शिवसेना – काल, आज आणि उद्या' या अभ्यासपूर्ण ग्रंथाच्या निर्मितीसाठी संपादकीय स्तरावर सहकार्य केले असून तसा उल्लेख प्रकाशकांनी प्रस्ताविकेत केला आहे.

    राजहंस प्रकाशनच्या वतीने गाजत असलेल्या आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक संदीप वासलेकर लिखित `एका दिशेचा शोध' या पुस्तकाच्या संपादकीय प्रक्रिया त्यांचा सहभाग असून तसा उल्लेख लेखकाने आपल्या मनोगतात केला आहे.

    अनेक स्वयंसेवी संस्थांशी ते संबंधित आहेत. रामचंद्र प्रतिष्ठान या विश्वस्त संस्थेच्या तसेच अर्थनीती मासिकाच्या वतीने त्यांनी लेख, निबंध स्पर्धा अशा साहित्यिक उपक्रमांचे आयोजन केले आहे.

    श्रमजीवी वर्गात त्यांचे व्यावसायिक कार्य येत असून त्यातून त्यांनी महाराष्ट्राच्या समाजाच्या विकासात अप्रत्यक्षपणे भरीव योगदान दिले आहे.

      February 27, 2017


  • बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार राजेश खन्ना

    सुपर स्टार राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. ‘...बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं... हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता... हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’ मा.राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो. ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद मा. राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.

    बॉलीवूडचा ‘सुपरस्टार’ अशी ओळख असलेला मा.राजेश खन्ना यांनी चित्रपटात येताना आपले खरे नाव बदलले. त्यांचे मूळचे नाव जतीन खन्ना. गिरगावातच राहणारे अभिनेते रवी कपूर अर्थात जीतेंद्र यांच्यासोबत मा.राजेश खन्ना यांनी केसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना ‘जतीन’ खन्ना हे वेगवेगळ्या नाटय़स्पर्धामध्ये भाग घेत असे. प्रत्येक स्पर्धेत बक्षीस जतीन घेऊनच जाणार हे ठरलेले असायचे. एकदा युनायटेड प्रोडय़ुसर्स आणि एका चित्रपटविषयक मासिकाने ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतही मा. जतीन खन्ना यांनी चांगली कामगिरी केली. त्याच वेळी काही निर्मात्यांनी जतीन खन्ना याला आपल्या चित्रपटासाठी साइन केले होते. त्यावेळी बक्षीस म्हणून चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये त्यांना हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मा.राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये ‘आखरी खत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. १९६७ साली भारतातून आखरी खत या सिनेमाची ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. त्यांची अदाकारी पाहून जी. पी. सिप्पी आणि नासीर हुसैन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. त्या वेळी एका प्रसिद्ध न्युमरॉलॉजिस्टने जतीन खन्ना यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. तू तुझे नाव बदललेस तर बॉलीवूड तुझ्यासाठी लाल गालिचा अंथरेल, तू प्रसिद्ध होशील, असा सल्ला दिला तो जतीन यांनी मानला आणि जतीनचा ‘राजेश खन्ना’ झाले. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे आयुष्यच बदलून टाकले. शर्मिला टागोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की, ते रातोरात सुपरस्टार बनले. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब केले. १९६९ ते १९७२ या काळात त्यांनी लागोपाठ १५ सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. त्यानंतर राजेश खन्ना सुपरस्टारपदावर अक्षरशः आरूढ झाले. असे होत असे की राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरूणी रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या स्वागतासाठी त्याकाळी तरूण मुली वेड्यासारख्या वागत असत. राजेश खन्नाच्या गाडीवर लिपस्टिकचा सडा पडत असे. रक्ताने राजेश खन्नाला लव्ह लेटर लिहिणार्याक फॅन्सची संख्याही मोठी असायची. भारतात एखाद्या सिनेस्टारच्या वाट्याला प्रेक्षकांचे एवढे प्रेम पहिल्यांदाच पाहायला मिळाले. चालण्याबोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वैगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. सर्वाधिक मानधन घेण्याचा सिलसिला त्यांनीच सुरू केला. आपल्या चाहत्यांमध्ये 'काका' नावाने प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांचे १९७० च्या दशकात 'आराधना' आणि 'अमर प्रेम' याबरोबरच अनेक चित्रपटांनी रौप्य आणि सुवर्णमहोत्सव साजरे केले होते. रोमँटिक हिरो म्हणून नावारूपाला आलेले राजेश खन्ना यांचे आधी तत्कालिन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यासोबत सूत जुळले. परंतु त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर, मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा बॉबी हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता. डिंपलपासून त्यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. १९८४ मध्ये डिंपल आणि मा.राजेश खन्ना विभक्त झाले. परंतु त्यांनी घटस्फोट घेतला नाही. १९९२ साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. मा.राजेश खन्ना यांचे निधन १८ जुलै २०१२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 29, 2016


  • दिलीप अच्युत सोमण

    श्री. दिलीप सोमण हे ठाणे येथील प्रसिध्द उद्योजक आहेत. ते बी. इ. (मेकॅनिकल) असून त्यांना इंजिनियरिंग उद्योगातील सुमारे ३७ वर्षांचा अनुभव आहे.

      July 2, 2010


  • मराठी नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते, लेखक कमलाकर सारंग

    चाळीस एक वर्षांपूर्वी नाटककार सुरेश खरे यांनी ‘आरोप’ नाटक लिहिले होते. त्यांचा जन्म २९ जून १९३४ रोजी झाला. त्यात लालन सारंग आणि जयराम हर्डीकर यांच्या भूमिका होत्या. मराठी प्रमाणे गुजराती रंगभूमीवरही याचे प्रयोग झाले. कमलाकर सारंग यांनी ‘आरोप’ नाटक दिमाखात रंगभूमीवर आणले होते. त्यांनी दिग्दर्शिन केलेली घरटे आमुचे छान, बेबी व जंगली कबूतर इत्यादी नाटके गाजली. मराठी नाट्यअभिनेत्री मा.लालन सारंग या यांच्या पत्नी होत. सखाराम बाइंडर इत्यादी नाटकांतील या दोघांचा अभिनय विशेष नावाजला गेला.

    विजय तेंडुलकर लिखित 'सखाराम बाइंडर हे नाटक प्रचंड वादग्रस्त व वादळी ठरले. लालन सारंग यांनी 'चंपा' आणि निळू फुले यांनी 'सखाराम' या भूमिका केल्या होत्या. या नाटकाने इतिहास घडविला. या नाटकाविरुद्ध दिग्दर्शक कमलाकर सारंग यांना लढा द्यावा लागला. नाटकाविरुद्ध खटला भरला गेला. हे नाटक म्हणजे 'विवाह संस्था' संकटात सापडण्याचे भय आहे, असा आक्षेप घेण्यात आला होता. या संदर्भात लालन सारंग यांनी आपल्या लिखाणात म्हटलंय, ''सखाराम सुरू झालं आणि तेरा प्रयोगांतच नाटक अश्लील आहे, अशी बोंब उठली आणि ३३ कटसकट नाटक सेन्सॉर झालं. त्यानंतर त्यावर बंदी आली. आम्ही सेन्सॉर बोर्डाविरुद्ध कोर्टात गेलो.

    सहा महिने लढल्यावर नाटक एकही कट न करता हायकोर्टातून सुटलं आणि पुन्हा दिमाखानं प्रयोग सुरू झाले. पुन्हा तीन महिन्यांतच पुण्यातल्या 'लिंग निर्मूलन समितीनं' तेंडुलकरांच्या नाटकांवर बंदी म्हणून 'घाशीराम कोतवाल' व 'सखाराम बाइंडर' ही नाटके होऊ द्यायची नाहीत, असा फतवा काढला. पुन्हा एकदा लढा देऊन त्यातूनही आम्ही बाहेर पडलो.. या सगळ्यांतून जाताना मी व सारंग कळत-नकळत धीट होत गेलो.'' त्या म्हणतात, ''स्वत:चं सॉफिस्टिकेटेड व्यक्तिमत्त्व पूर्ण बदलून एक गावरान, रांगडी, बिनधास्त चंपा उभी करताना खूप विचार करावा लागला होता.'' कमलाकर सारंगानी सखाराम बाइंडर नाटकाच्या वेळच्या आठवणींवर "बाइंडरचे दिवस" नावाचे पुस्तक लिहिले. सखाराम बाइंडर या नाटकाचा हा भन्नाट प्रवास कमलाकर सारंग यांनी 'बाइंडरचे दिवस' या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. कमलाकर सारंग यांचे २५ सप्टेंबर १९९८ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      September 25, 2017


  • लेखक रवींद्र सदाशिव भट

    त्यांनी १९६८-८० या कालावधीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर नोकरी केली. १४ वर्षे महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह काम केले. त्यांना राष्ट्रपती पुरस्कार, मसाप पुरस्कार, चेतना ट्रस्टचा पुरस्कार, दर्पण, पुणे विद्यापीठाचा आणि ना.ह.आपटे स्मृती पुरस्कार मिळाले होते.

      September 17, 2021


  • प्रसिद्ध अभिनेता रणधीर कपूर

    रणधीर कपूर यांची एक हिंदी चित्रपट प्रसिद्ध अभिनेता व करीश्मा व करीना कपूर यांचे वडील व राजकपुर यांचा मुलगा अशी ओळख आहे. त्यांचा जन्म १५ फेब्रुवारी १९४७ रोजी झाला. रणधीर कपूर यांना चित्रपट क्षेत्र हे वारसाने मिळाले आहे. त्यांचे वडील राज कपूर हे हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार होते. तर रणधीर कपूर यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात ‘श्री ४२०’ चित्रपटात बालकलाकार म्हणून केली होती. ‘दो उस्ताद’ चित्रपटात काम केलेल्या रणधीर कपूर यांनी १९६८ सालच्या ‘झुक गया आसमान’ चित्रपटा दरम्यान सहायक दिग्दर्शक म्हणूनही काम पाहिले होते. १९७१ च्या ‘कल आज और कल’ चित्रपटात अभिनय केलेल्या रणधीर कपूर यांनी या चित्रपटाद्वारे चित्रपट दिग्दर्शनाच्या क्षेत्रात देखील पाऊल ठेवले. चित्रपटात कपूर कुटुंबातील पृथ्वीराज कपूर, राज कपूर आणि रणधीर कपूर या तीन पिढ्यांनी अभिनय केला होता. याशिवाय बबीताने देखील महत्वाची भूमिका साकारली होती. सत्तर ऐंशीच्या दशकात त्यानी हिंदी चित्रपट जवानी दिवानी, हाथ कि सफाई, रामपूर का लक्ष्मण, ढोंगी, खलिफा, कच्चा चोर, कल आज और कल, पोंगा पंडित, कस्मे वादे, बिवी ओ बिवी, भंवर, हरजाई, हमराही, चाचा भातीजा,राम भरोसे,आज का महात्मा, लफंगे, खलिफा आखरी डाकू, पुकार असे चांगले व उत्तम चित्रपट दिले. किशोरकुमार व त्याचे चांगले जमत असे. किशोरकुमार यांनी गायलेली गुम है किसीके प्यारमे दिल सुबह शाम', 'जा ने जा धुंडता फिर रहा' व 'भवरे की गुंजन ए मेरा दिल' ही गाणी अजून लोकांच्या तोंडावर आहेत.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      February 15, 2017