(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भारताच्या पहिल्या महिला शास्त्रज्ञ कमला सोहोनी

    एक वर्ष संपल्यावर कमला सोहोनी सी.व्ही. रामन यांना भेटल्या आणि म्हणाल्या ‘‘ सर, वर्ष पूर्ण झालं. माझ्या प्रवेशाचं काय? ’’ रामन म्हणाले, ‘‘ अर्थात तू इथे राहून संशोधन पुरं कर. तुझी ज्ञानलालसा, तळमळ, जिद्द पाहून मला इतका आनंद झालाय की मी आणखी दोन मुलींना या वर्षी प्रवेश देऊन माझी चूक सुधारणार आहे.

      July 27, 2021


  • कॅप्टन दिलीप दोंदे

    कमांडर दोंदे यांनी ५६ फूट लांबीच्या म्हादेईतून पहिली सागरपरिक्रमा ऑगस्ट २००९ रोजी सुरू करून एप्रिल २०१० मध्ये पूर्ण केली. पण नौकेची दुरुस्ती, शिधा साठवणे आणि विविध देशांतील लोकांच्या भेटी घेणे यासाठी चार वेळा थांबे घेतल्यामुळे ही परिक्रमा १५७ दिवसांत पूर्ण झाली होती.२३ हजार समुद्र मैल अंतर पार करताना त्यांनी चार थांबे घेतले.

      September 26, 2021


  • ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव

    आज ३० नोव्हेंबर..ज्येष्ठ मराठी लेखक आनंद यादव यांची जयंती.
    आनंद यादव यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९३५ रोजी कोल्हापूर येथे झाला.
    अतिशय गरीब कुटुंबात जन्माला आलेल्या आनंद यादव यांनी साहित्य क्षेत्रात कादंबरीकार अशी स्वतःची वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली होती. झोंबी, घरभिंती हय़ा त्यांच्या कादंबऱया वाचकप्रिय ठरल्या होत्या. त्यांच्या झोंबी या कादंबरीला १९९० मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्य प्रकारातही त्यांनी चौफेर मुशाफिरी केली होती. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले होते. आनंद यादव यांना यादव यांच्या नटरंग कादंबरीवरून चित्रपटनिर्मिती झाली होती. आनंद यादव यांनी सुमारे ४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. आनंद यादव यांचे २७ नोव्हेंबर २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      December 1, 2016


  • ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे

    सुलभा देशपांडे या माहेरच्या सुलभा कामेरकर. मुंबईतच लहानाच्या मोठय़ा झालेल्या सुलभा देशपांडे यांनी सिद्धार्थ महाविद्यालयातून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षिका म्हणून छबिलदास हायस्कूलमध्ये कारकीर्दीची सरुवात करणाऱ्या सुलभाताईंचे रंगभूमीशी इतक्या सहजतने धागे जुळले की पुढे याच छबिलदास हायस्कूलमध्ये ‘अविष्कार’च्या रुपाने त्यांनी नाटय़चळवळीचे कार्य उभारले. शांतता कोर्ट चालू आहे, या विजय तेंडुलकर यांच्या नाटकातील लीला बेणारे या शिक्षिकेची त्यांची भूमिका अतिशय गाजली. या व्यक्तिरेखेने त्यांच्या अभिनयाची ताकद पहिल्यांदा जगाला दाखवून दिली. याच नाटकावर याच नावाचा चित्रपटही आला आणि त्याचीही रसिकांनी दखल घेतली.

    ‘जैत रे जैत’, ‘चौकट राजा’, ‘विहीर’, ‘हापूस’ या चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. ‘इन्व्हेस्टमेंट’ हा त्यांचा शेवटचा मराठी चित्रपट ठरला. ‘रेनेसाँ’च्या काळात समाजजीवन ढवळून निघाले असताना त्याचे परिणाम नाटय़-चित्रपट क्षेत्रावरही तितक्याच वेगाने झाले. विजय तेंडुलकरांनी मुलांसाठी नाटक लिहायला सांगितले म्हणून सुलभाताई लिहित्या झाल्या. त्यांचा रंगभूमीशी संबंध आला तेव्हा नवविचाराचे वारे ‘रंगायन’च्या निमित्ताने उभे राहिले होते. विजयाबाई मेहता यांनी स्थापन केलेल्या या ‘रंगायन’च्या प्रवाहात त्या सामील झाल्या. आणि मग त्याच ‘रंगायन’चे बोट पकडून प्रायोगिक रंगभूमीवर निष्ठेने काम करता करता तिथून बाहेर पडून १९७१ साली पती अरविंद देशपांडे यांच्याबरोबरीने त्यांनी ‘अविष्कार’ची सुरूवात केली. पहिल्यांदा छबिलदास शाळेच्या सभागृहात मुहूर्तमेढ झालेली या ‘अविष्कार’ची नाटय़चळवळ त्यांनी शेवटपर्यंत सुरूच ठेवली.

    रंगभूमीपुरती आपली अभिनयकला मर्यादित न ठेवता त्याच वेळी हिंदीत जो समांतर चित्रपटांचा प्रवाह सुरू झाला होता त्यातही सुलभाताई तितक्याच उत्साहाने सामील झाल्या. ७३ हून अधिक हिंदी सिनेमांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. हिंदीत ‘भूमिका’, ‘अरविंद देसाई की अजब दास्ता’, ‘गमन’, ‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यू आता है’, ‘विजेता’, ‘भीगी पलके’, ‘इजाजत’, ‘विरासत’ 'आदमी खिलौना है', 'गुलाम-ए-मुस्तफा' हे त्यांचे चित्रपट गाजले. ‘कोंडुरा’ या हिंदी तसेच तेलुगू चित्रपटातही त्यांनी भूमिका केली होती. ‘राजा रानी को चाहीए पसीना’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला बालचित्रपट गाजला होता. 'चौकट राजा', 'जैत रे जैत', सारख्या मराठी चित्रपटांमधून त्यांचा अभिनय गाजला होता. त्यांनी अनेक हिंदी व मराठी दूरचित्रवाणी मालिकांतही काम केले होते. तीन वर्षांपूर्वी हिंदीत ‘सोनी’ वाहिनीवरील ‘केहता है दिल जी ले जरा’ या मालिकेतून त्यांनी अशीच एक छान आजी रंगवली होती. त्याहीवेळी पंच्याहत्तरी पार केलेल्या मा.सुलभा देशपांडे यांचा उत्साह हा तरुण कलाकारांनाही लाजवणारा होता. त्यावेळी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून चांगली भूमिका आपल्या वाटय़ाला येत नाही, अशी तक्रार त्यांनी केली होती. मात्र ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अस्मिता’ मालिकेमुळे त्यांची तीही इच्छा पूर्ण झाली. अनेक कलावंत त्यांनी घडविले होते.

    १९८७ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. डॉ. श्रीराम लागू यांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या तन्वीर पुरस्काराने २०१० साली त्यांच्या रंगभूमीच्या सेवेचा गौरव करण्यात आला. ‘इंग्लिश विंग्लिश’ हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा हिंदी चित्रपट ठरला. सुलभा देशपांडे यांचे ४ जून २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      June 5, 2017


  • अमृता खानविलकर

    अमृता खानविलकर हिची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४ मधील “झी इंडियाज् बेस्ट सिनेस्टार्स की खोज” या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली.

      November 23, 2018


  • नंदू भेंडे

    ज्या काळात मराठी घरांमध्ये पॉप आणि रॉक संगीत हे शब्द अनभिज्ञतेच्या किंवा विनाकारण हेटाळणीच्या सुरात उच्चारले जात, त्या काळात नंदू भेंडे यांनी छेडलेली मराठी रॉकची तार आज अन्य कितीतरी जणांमुळे झंकारत राहिली आहे.

      June 30, 2022


  • डॉ. गोपाळ शिवराम लागवणकर

    डॉ. गोपाल शिवराम लागवणकर  हे  निष्णात शल्यचिकित्सक (सर्जन) व वैद्यकीय ग्रंथांचे लेखक होते. मराठीत “शस्त्रवैद्यक” आणि ”न्यायवैद्यक” ही पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच “दंभहारक” या टोपण नावाने अनेक लेख लिहिले.

      August 23, 2017


  • जयंत श्रीधर एरंडे

    (जन्म १९४५)
    एम.एस्सी. (भौतिकी)
    निवृत्त उपमहासंचालक - प्रसार भारती,

    आकाशवाणी कार्यक्रम निर्मिती, वर्तमानपत्रे-मासिके यात लेख, पुस्तक, लेखन, परिसंवाद-मेळावे यांचे आयोजन,

    साई दर्शन, ए-२०४, रामबाग, स्वामी विवेकानंद रस्ता,
    बोरिवली(प.), मुंबई ४०००९२, फोन : २८०५९५४२

    माहितीस्त्रोत - (म.वि.प.चा.) विज्ञानतंत्रज्ञान कोष

      December 15, 2010


  • भुली हुई यादों मुझे इतना ना सताओ

    गाण्याचा कुठलाही प्रकार गाऊ शकणारी रफीची रेंज नाही, आवाज कसाही फिरवण्याची किशोरसारखी दैवी देणगी नाही किंवा शास्त्रीय संगीताने दिलेला मन्ना डे सारखा आत्मविश्वास नाही. सरळ सोप्प्या सुटसुटीत चाली गाणारा मुकेश तरीही प्रत्येक गानरसिकांच्या हृदयात वेगळी जागा स्थापन करून आहे.

      July 26, 2017


  • बॉबी तल्यारखान

    पारसी समाजाचे भारतीय क्रिकेटला मोठे योगदान आहे. पॉली उम्रीगर, नरी काँट्रॅक्टर हे दोन कर्णधार भारताला दिले ते पारशानीच. अर्देशिर फुर्दोरजी सोहराबजी ऊर्फ बॉबी तल्यारखान हे सुद्धा पारशी. मंगेश पाडगावकरांसारखा जाड चष्मा आणि दाढी असलेले हे एक महान समालोचक होते. बॉबी तल्यारखाननी एकदा तंत्रशुद्ध फलंदाज विजय़ मर्चंटची खिल्ली उडवली होती.

      July 13, 2021