(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • विख्यात उर्दू शायर निदा फाजली

    दुनिया जिसे कहते है', 'होश वालों को खबर क्या', 'चुप तुम रहो, चुप हम रहें' यासारख्या अनेक लोकप्रिय गझल लिहीणारे मुक्तिदा हसन निदा फाजली उर्फ निदा फाजला यांचा जन्म एका काश्मिरी कुटुंबात, दिल्ली येथे झाला, शिक्षण ग्वाल्हेर येथे झाले. त्यांचा जन्म १२ ऑक्टोबर १९३८ रोजी झाला. १९५८ साली त्यांनी ग्वाल्हेर कॉलेजमधून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. निदा फाजली यांचे वडीलही उर्दू शायर होते. लहान वयातच फाजली यांनी लिखाणाला सुरूवात केली. एकदा ते एका मंदिरासमोरून जात असताना एक व्यक्ती सूरदासाचे भजन म्हणताना त्यांनी ऐकले. त्या पदाच्या सौंदर्यामुळे प्रभावित झालेल्या निदा यांनी कविता लिहीण्यास सुरूवात केली. मात्र उर्दू कवितांमधे फारसा वाव नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी मीर व गालिब यांना आत्मसात केले आणि स्वत:च्या भावना नेमक्या शब्दांत मांडू लागले. नोकरीच्या शोधात १९६४ साली ते मुंबईत आले.

    सुरूवातीच्या काळात त्यांनी धर्मयुग आणि ब्लीट्स मासिकांसाठीही लेखन केले. त्यांच्या लिखाणाच्या शैलीमुळे हिंदी व उर्दूतील अनेक साहित्यिक तसेच चित्रपट दिग्दर्शक प्रभावित झाले. विख्यात चित्रपट निर्माते व दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्या 'रझिया-सुलतान' चित्रपटासाठी गीते लिहीणारे जान निसार अख्तर यांचे अकस्मात निधन झाले. त्यानंतर अमरोही यांनी फाजली यांच्याकडे विचारणा केली असता चित्रपटातील दोन गाणे लिहून दिली व अशाप्रकारे त्यांनी चित्रपट गीतांसाठी लेखन करण्यास आरंभ केला. त्यानंतर त्यांनी अनेक गीते तसेच गझल लिहील्या. प्रसिद्ध टी.व्ही. मालिका 'सैलाब'च तसेच 'जाने क्या बात हुई' आणि 'ज्योती' यांचे शीर्षकगीतही त्यांच्याच लेखणीतून उतरले. त्यांच्या यादगार गझला आणि शायरींची यादी लांबलचक आहे. परंतु ‘कभी किसी को मुकम्मल जहां नहीं मिलता,’ ‘होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है.... ’ आणि ‘तू इस तरह से मेरी जिंदगी में शामिल है’ या जीवनातील क्लिष्टता सहजसाध्या तऱ्हेने मांडणाऱ्या या गझला निदा फाजलींच्याच.

    निदा फाजली यांच्या बहुतांश गझलांना जगजित सिंह यांनीच आवाज दिला. १९९४ साली त्यांनी प्रसिद्ध गजलगायक जगजित सिंग यांच्यासोबत काढलेला आल्बम 'इनसाईट' मधील कविता आणि संगीत खूप नावाजले गेले. मा.फाजली यांना १९९८ साली 'साहित्य अकादमी पुरस्कारा'ने गौरवण्यात आले. तर 'सूर' या चित्रपटातील गीतलेखनासाठी २००३ साली त्यांनी 'उत्कृष्ट गीतकारा'चा पुरस्कार देण्यात आला. २०१३ साली भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवले. मा.निदा फाजली यांचे ८ फेब्रुवारी २०१६ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- इंटरनेट

    फाजली यांची साहित्यसंपदा काव्यसंग्रह : - लफ़्ज़ों के फूल - मोर नाच - आँख और ख़्वाब के दरमियाँ - खोया हुआ सा कुछ (१९९६) - आँखों भर आकाश - सफ़र में धूप तो होगी

    फाजली यांच्या लोकप्रिय गझल्स व गीते : - तेरा हिज्र मेरा नसीब है, तेरा गम मेरी हयात है ( चित्रपट - रझिया सुलतान) - आई ज़ंजीर की झन्कार, ख़ुदा ख़ैर कर (चित्रपट - रझिया सुलतान) - होशवालों को खबर क्या, बेखुदी क्या चीज है (चित्रपट - सरफ़रोश) - कभी किसी को मुक़म्मल जहाँ नहीं मिलता ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता) - तू इस तरह से मेरी ज़िंदग़ी में शामिल है ( चित्रपट - आहिस्ता-आहिस्ता) - आ भी जा.. ( चित्रपट - सूर) - चुप तुम रहो, चुप हम रहें (चित्रपट - इस रात की सुबह नहीं) - दुनिया जिसे कहते हैं, मिट्टी का खिलौना है (गझल) - हर तरफ़ हर जगह बेशुमार आदमी (गझल) - अपना ग़म लेके कहीं और न जाया जाये (गझल) - टी.व्ही. मालिका 'सैलाब'चे शीर्षकगीत

      November 10, 2017


  • भूदान चळवळीचे प्रवर्तक विनोबा भावे

    आज ११ सप्टेंबर.. थोर गांधीवादी आणि भूदान चळवळीचे प्रवर्तक आचार्य विनोबा भावे याी जयंती.

    विनोबाजींचा जन्म ११ सप्टेंबर १८९५ रोजी झाला.

    भगवद्गीतेचे सार सोप्या रसाळ शैलीत ‘गीताई’ आणि ‘मधुकर’ सारख्या ग्रंथांतून सांगणार्‍या विनोबांची भेट ७ जून १९१६ रोजी मोहनदास गांधी नावाच्या एका महात्म्याशी झाली आणि त्यांच्या आयष्यानेच एक नवे वळण घेतले. त्याक्षणापासून ब्रह्मचर्याची शपथ घेऊन त्यांनी जीवनसाधनेस सुरूवात केली. वाई मुक्कामी स्वामी केवलानंद सरस्वतींच्या चरणाशी उपनिषदे, ब्रह्मसूत्रे, शांकरभाष्य व पतंलजोगाचे शिक्षण घेतले.

    पुढे १९२१ मध्ये जमनालाल बजाजांनी साबरमतीच्या आश्रमाची शाखा वर्ध्याला काढली. तिचे संचालक म्हणून ८ एप्रिल १९२१ रोजी महात्माजींच्या १९४० त्या वैयक्तिक सत्याग्रहाचे गांधीजींनी निवडलेले पहिले ते सत्याग्रही होते.

    विनोबांनी १९५१ ते ५३ हा भूदान यात्रेचा कालावधी वगळता सारे आयुष्य वर्ध्याच्या पवनार आश्रमात काढले.

    भारत सरकारने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ देऊन सन्मान केला.

    विनोबा भावे यांचे १५ नोव्हेंबर १९८२ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर, पुणे.
    ९४२२३०१७३३

    संदर्भ.इंटरनेट

      September 11, 2016


  • मराठी साहित्य विश्वात वादळ निर्माण करणारे साहित्यिक भाऊ पाध्ये

    भाऊ पाध्ये यांचे लेखन थेट वास्तवाला भिडणारे असे. मुंबईतील संक्रमणकाळ त्यांच्या लेखणीने नेमकेपणाने व बारकाव्यानिशी टिपला होता. पाध्येंनी मुंबईचे उघडे नागडे विश्व जसे आहे तसे मांडले. कुठलाही निष्कर्ष काढण्याच्या भानगडीत ते पडले नाही. त्यांनी आपल्या उभ्या आयुष्यात मुंबईत व एकंदरीत शहराच्या आरशात पाहिलेले, अनुभवलेले, मनावर कोरले गेलेले प्रसंग, घटना अभिव्यक्त केल्या आहेत.

      February 26, 2019


  • ‘रोमन हॉलिडे’ प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री ऑड्रे हेपबर्न

    ऑड्रे हेपबर्न चे खरे नाव ऑड्रे रस्टन. ऑड्रे हेपबर्न ही मूळची ब्रसेल्सची. ऑड्रे रस्टनने पुढे आपल्या नावातले रस्टन काढून हेपबर्न केले. त्यांचा जन्म ४ में १९२९ रोजी झाला. तिच्या लहानपणी वडिलांची नोकरी फिरतीची असल्यामुळे तिचे वास्तव्य बेल्जियमखेरीज इंग्लंड आणि हॉलंडमध्येही झाले. त्यामुळे ती डच, फ्रेंच, इंग्लिश, जर्मन आणि स्पॅनिश सफाईदारपणे बोलत असे. ब्रसेल्समध्ये प्रथम बॅले नृत्याचे शिक्षण घेतल्यावर ती लंडनच्या वेस्ट एंड या संगीत नाटक कंपनीत कोरस गायिका आणि छोटय़ामोठय़ा भूमिका करू लागली. पुढे ब्रॉडवेवर समावेश झाल्यावर तिची ओळख युरोप- अमेरिकेत एक होतकरू कलाकार म्हणून झाली. १९५१ साली ब्रॉडवेच्या ‘जिगी’ या नाटकात ऑड्रेने केलेल्या भूमिकेने तिला एक अभिनेत्री म्हणून उंचीवर नेऊन ठेवले.

    हॉलीवूडची एक आघाडीची चित्रतारका म्हणून ऑड्रेचे नाव झाले ते १९५३ साली प्रकाशित झालेल्या ‘रोमन हॉलिडे’ या चित्रपटाने. रोमन हॉलिडेमध्ये तिने राजवाडय़ाच्या बंदिस्त आयुष्याला कंटाळून बाहेरचे मुक्त जग अनुभवण्यासाठी पळून शहरात गेलेल्या एका राजकन्येची भूमिका साकारली. तिने साकारलेल्या अल्लड, अवखळ, निरागस राजकन्येने ऑड्रेला १९५४ सालचे उत्कृष्ट अभिनेत्रीचे अकॅडमी अॅजवॉर्ड म्हणजेच ऑस्कर अॅावॉर्ड मिळवून दिले. त्यानंतरच्या तिच्या साब्रीना (१९५४), द नन्स स्टोरी (१९५९), ब्रेकफास्ट अॅकट टिफनीज (१९६१), शराड (१९६३), माय फेअर लेडी (१९६४) तसेच वेट अन्टिल डार्क (१९६७) या चित्रपटांतील अभिनयाने लोकप्रियतेचे शिखर गाठले. या चित्रपटांपकी पाच चित्रपटांतील सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचे ऑस्कर पुरस्कार ऑड्रेला मिळाले आणि बाकी चित्रपटांसाठी तिला गोल्डन ग्लोब, सेसिल डिमेलो अॅिवॉर्ड, ग्रॅमी अॅकवॉर्ड, सिने अॅिक्टर्स गिल्डतर्फे जीवनगौरव हे पुरस्कार मिळाले.

    १९८८ साली चित्रपट क्षेत्रातून निवृत्ती स्वीकारल्यावर ऑड्रेने तिच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९३ पर्यंत युनिसेफसाठी इथिओपिया, सुदान, सोमालिया वगरे दुष्काळग्रस्त आणि गरीब देशांतील कुपोषित मुलांसाठी मदतकार्य केले. ऑड्री हेपबर्न यांचा अभिनय, त्यांचे सौंदर्य व त्यांची सामाजिक जाणीव या विषयी विनिता महाजनी यांनी ‘मृगनयनी मनस्विनी : ऑड्री हेपबर्न’ हे पुस्तक लिहिले आहे. ऑड्रे हेपबर्नचे २० जानेवारी १९९३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 24, 2018


  • अभिनेता संजीव कुमार

    संजीव कुमार या नावाने प्रसिद्ध असलेले हरिहर जरीवाला या प्रतिभासंपन्न आणि सृजनशील अभिनेत्याने हिंदी सिनेमातील नायकाच्या पारंपरिक चौकटीला छेद देत स्वतःची वेगळी शैली चित्रसृष्टीत रूढ केली.

      July 9, 2017


  • क्रिकेटपटू विनू मंकड

    प्रत्येक खेळाडूची अशी इच्छा असते की त्यावेळी विस्डेन ( WISDEN ) च्या पहिल्या पाच खेळाडू मध्ये यावे. विनूभाई यांचे नाव १९४७ साली त्यामध्ये आले. त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमधील दुहेरी कामगिरी करून विक्रम त्यावेळी कसोटी सामन्यांमध्ये रचला तो म्हणजे १००० ध्वनीचा आणि १०० विकेट्सचा. याला इंग्लिशमध्ये ‘ डबल ‘ म्हणतात. त्यांनतर हा विक्रम इयान बोथट ने मोडला. ही दुहेरी कामगिरी त्यांनी २३ कसोटी सामन्यांमध्ये पुरी केली तर एम. ए . नोबल या खेळाडूला २७ कसोटी सामने लागले तर कीथ मिलरला ३३ कसोटी सामने लागले.

      April 12, 2021


  • राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे

    सिनेमा, रेडीओ, टी.व्ही. अश्या विविध माध्यमांमुळे कीर्तन हा प्रकार थोडा मागे पडू लागला होता. त्यात आफळे बुवांनी नवचैतन्य निर्माण केले. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री, गहिवर दाटेल असा करूण रस तर मिश्कील कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार त्यांच्या कीर्तनातून होत असे.

      June 6, 2022


  • क्रिकेटपटू जॉन “डग” इन्सोल – 18 April

    डग इन्सोल यांनी त्यांचा पहिला कसोटी सामना २० जुलै १९५० रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यांनी शेवटचा कसोटी सामना ३० मे १९५७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला . निवृत्तीनंतर ते ते इंग्लंडच्या क्रिकेट सिलेक्टर्स कमिटीचे चेअरमन होते तसेच १ ऑक्टोबर २००६ मध्ये एक वर्षासाठी एम. सी .सी. चे प्रसिडेंटही होते. ते एम.सी.सी. कमिटीवर २० वर्षाहून अधिक काळ होते.

      April 18, 2021


  • संकेत आहिरे

    संकेत अहिरे यांनी जर्मनी सारख्या प्रतिष्ठीत व तंत्रज्ञानप्रेमी देशात आपल्या प्रगल्भ बुध्दिमत्तेचा व अफाट कल्पनाशक्तीचा सुंदर मिलाफ साधला असून, आपल्या कार्यक्षमतेने सर्वच भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. कन्सेप्ट मिडीया वर्क्स ही जर्मनीमधील प्रथितयश व वेब तसेच संगणक क्षेत्रातील कोणत्याही समस्येवर रामबाण इलाज असणारी कंपनी आहे.

      August 16, 2011


  • अभिनेता टायगर श्रॉफ

    टायगर श्रॉफ हा अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा होय. टायगरचे खरे नाव जय हेमंत श्रॉफ आहे. मुळ गुजराती कुटुंबातील असलेल्या टायगरचे आजोबा काकूभाई श्रॉफ (जॅकी श्रॉफचे वडील) गुजराती ज्योतिषी होते.

      April 27, 2024