जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
December 15, 2010
निशीकांत कामत हा आजच्या तरूण पिढीचा दबलेला आवाज चित्रपटांद्वारे सगळ्यांपुढे मांडणारा एक नव्या व ताज्या दमाचा दिग्दर्शक. नव्या पिढीच्या आकांक्षाचं, स्वप्नांचं, व अपेक्षांचं प्रतिनिधीत्व करणारे असे त्याचे चित्रपट आजच्या दिग्दर्शकांच्या विशिष्ठ साच्यापेक्षा खुप वेगळे व आशयपुर्ण असतात. प्रेक्षकांच तीन तास निव्वळ मनोरंजन करण्यापेक्षा त्यांना विचार करायला लावतील व समाजात वावरणार्या अपप्रवृत्तींविरोधात आवाज उठवायला लावतील असे चित्रपट बनवण्याकडे त्याचा कल असतो व त्याची ही वेगळी तर्हा व शैली प्रेक्षकांनी चांगलीच उचलून धरली आहे.
August 1, 2011
हेमंत करकरे हे मुंबईचे दहशतवाद विरोधी पथक मुख्याधिकारी होते.
December 15, 2010
शम्मी कपूर यांनी गंभीर भूमिका म्हणता येतील, तशा फारशा भूमिका केल्याच नाहीत. एक मस्त कलंदर, काहीसा खुशालचेंडू तरुण अशी त्यांची प्रतिमा होती. त्यांचा जन्म २१ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला. पण प्रेक्षकांना जसे गंभीर भूमिका करणारे अभिनेते हवे असतात, तसेच जीवनावर ओसंडून प्रेम करणारे, आनंदी, मन प्रसन्न करणारे अभिनेतेही हवे असतात. जे आपल्याला आयुष्यात करणे शक्य नाही, ते पडद्यावरील अभिनेत्याच्या माध्यमातून उपभोगून घेण्याची ही सामान्य माणसाची गरज शम्मी कपूर यांनी यशस्वीपणे पूर्ण केली.
‘तुमसा नही देखा’ या चित्रपटाने त्यांना यशाची खरी चव चाखायला मिळाली, तरी तोपर्यंतचे त्यांचे चित्रपट साफ कोसळले होते. इतके की चित्रपटसृष्टीला रामराम ठोकून चहाच्या मळ्याचे व्यवस्थापक म्हणून काम करण्याची त्यांनी तयारी चालविली होती. तेव्हा ‘तुमसा नही देखा’ लोकप्रिय झाला. हिंदी नायकाला लागणारे देखणेपण त्यांच्याकडे होते, पण नायकाची बांधेसूद व कमावलेली देहयष्टी नव्हती. त्यांनी जी वैविध्यपूर्ण नृत्ये केली आहेत, तशी सध्या नृत्याचे पध्दतशीर शिक्षण घेतलेल्या अभिनेत्यांनाही करणे जमणार नाही. त्यातही पडद्यावरील त्यांची बरीचशी नृत्ये ही त्यांची स्वत:ची होती. त्याकाळी स्वतंत्र नृत्यदिग्दर्शक नेमण्याची पध्दत नव्हती. त्यामुळे अभिनेत्याला स्वत:लाच गाण्याच्या भावार्थानुसार नृत्य करावे लागे.
धसमुसळा, रांगडा प्रणय, नायिकांना थकविणारी भन्नाट नृत्यशैली आणि गीत संगीताची मेजवानी देत एका पाठोपाठ मनोरंजक चित्रपटांचा धडाका लावणारे म्हणून शम्मी कपूर यांची खासीयत होती. १९६०च्या दशकावर शम्मी कपूर यांनी अधिराज्य गाजविले होते. ‘जंगली’ या चित्रपटात त्यांनी ठोकलेल्या ‘याहू’ अशा रोमॅंटिक आरोळीने त्यापुढील चार पिढय़ांवर आपली मोहिनी कायम ठेवली आहे.
ही त्यांच्या वागण्या-बोलण्याची विशिष्ट ढब, नाच करतानाची बेभान अदा यासारख्या गोष्टींमुळे शम्मी कपूर यांनी आपले एक स्थान निर्माण केले होते. ‘जंगली’, ‘काश्मीर की कली’, ‘ऍन इव्हनिंग इन पॅरीस’, ‘तीसरी मंझील’, ‘ब्रह्मचारी’ यासारख्या चित्रपटांनी त्यांना बॉलीवूडमध्ये अढळस्थान मिळवून दिले. नव्या अभिनेत्रींना पदार्पणाची संधी देण्याबद्दल त्यांचे स्थानही महत्त्वाचे आहे.
जगात नवीन काय घडत आहे, याबद्दल त्यांना उत्सुकता होती. संगणक आणि इंटरनेटशी दोस्ती करणाऱ्या भारतातील अगदी प्रारंभीच्या व्यक्तींपैकी शम्मी कपूर हे एक होते. ‘याहू!’ कंपनीने आपले भारतातील कार्यालय सुरू केले तेव्हा शम्मी कपूर हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. ‘याहू!’शी शम्मी कपूर यांचे असलेले रुपेरी नाते हे जसे त्यास कारण होते, तसेच त्यांचे इंटरनेटचे प्रेम आणि त्याबद्दलची माहिती हेही त्याचे कारण होते. ‘याहू!’ ही त्यांच्या मालकीची वेबसाइट आहे का, अशी विचारणा अनेकदा लोक त्यांना करीत. स्वत:ची वेबसाइट निर्माण करणारे ते पहिले भारतीय अभिनेते होते.
शम्मी कपूर यांचे निधन १४ ऑगस्ट २०११ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
https://www.youtube.com/watch?v=0prXbQEgFkI
शम्मी कपूर यांची माहिती आजकी फनकार कार्यक्रमात.
https://www.youtube.com/watch?v=igrDASLbC2w
शम्मी कपूर यांची अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गाणी
https://www.youtube.com/watch?v=A-4aWPj2u4U
https://www.youtube.com/watch?v=A3UaHh41EFk
https://www.youtube.com/watch?v=95pl9bqnFdA
August 14, 2021
शांताबाई शेळके या सुप्रसिद्ध मराठी कवियत्री , गीतकार आणि लघुनिबंधकार होत्या. त्यांच्या कवितांनी आणि त्यावर बनलेल्या गाण्यांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले आहे.
July 28, 2017
“सिंहासन” मधील “माणिकराव” यांची दत्ता भट यांची एक अजरामर भूमिका. हा जब्बार पटेलांचा सिनेमा अप्रतिमच आहे. या चित्रपटातील दत्ता भट हे सत्यनारायणासमोर साष्टांग दंडवत घालून मनातील विचार तो बोलतात, त्यावेळचा मुद्राभिनय आणि आवाजाचा बाज व फेक जबरदस्त होती.
June 29, 2022
रिची बेनॉ हे स्पिनर आणि गुगली टाकत होते परंतु ते चेंडूला फ्लाइट द्यायचे आणि त्याचबरोबर योग्य दिशा देत असत त्यामुळे समोरचा फलंदाज सतत दडपणाखाली असायचा. ते आजच्या शेर्न वॉर्न अँशले गिल्स प्रमाणे अराउंड द विकेट टाकायचे . त्याचपप्रमाणे ते त्या काळामध्ये अत्यंत प्रभावी क्लोज फिल्डर होते.
April 10, 2021
आपल्या अभिनयाने व डान्सने सगळ्यानांच भारावून टाकणारा हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता हृतिक रोशन याचा जन्म १० जानेवारी १९७४ रोजी झाला.
हृतिक रोशनच्या वाटचालीचा विचार करायचा झाला तर, वडील राकेश रोशन यांच्याकडून मिळालेला अभिनयाचा वारसा घेऊन आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यात हृतिक यशस्वी ठरला. ‘कहो ना प्यार है’ या पहिल्याच चित्रपटात आपले नाणे खणखणीत असल्याचे त्याने सिद्ध केले. तेव्हापासून त्याने अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत व त्याला सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ‘फिजा’, ‘मिशन काश्मीर’, ‘कोई मिल गया’ या चित्रपटानंतर तो प्रस्थापित नायक बनला. ‘कहो ना प्यार है’ हा पहिला चित्रपट सुपर-डुपर हिट ठरल्यानंतर तो त्याची मैत्रीण सुझान हिच्यासोबत विवाहबद्ध झाला. विवाहापूर्वी सुझानशी त्याची मैत्री होती. त्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात होऊन त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या १२ वर्षापासून त्यांचा संसार सुखाने सुरू होता. त्यांना रेहान व रिधान ही दोन मुले आहेत. विवाहसंस्थेचा पूर्णपणे सन्मान ठेवून हृतिकने अत्यंत जड अंत:करणाने पत्नीशी विभक्त झाला. हृतिक हा बॉलिवुडमधील सुजाण व विचारी अभिनेता म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रातील बहुतेक मंडळी केवळ फॅशनेबल कपडे आणि इतर प्रकारचे बडेजाव करत फिरत असताना हृतिक मात्र पुस्तकात रमतो. प्रत्येक भूमिकेचा तपशीलवार अभ्यास आणि ती परिपूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत घेतो. याच हृतिकने आपल्या खासगी जीवनात बाब उघड करताना सभ्य व सुजाणपणाचे दर्शन घडवले. पडद्यावरील आदर्श सुपरमॅनप्रमाणेच खासगी आयुष्यात त्याने आपले सभ्यपण जपले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 11, 2017
लतादीदींनी हिंदी,मराठी भाषेत तर गाणी गायलीच आहेत पण ३६ हुन अधिक प्रादेशिक व विदेशी भाषेत सुद्दा गाण्याचे रेकॉर्डिंग केले. १९८६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा हिंदी सिनेमातील सर्वोच्च सन्मान होता. दिदीच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग २७ जानेवारी १९६३ रोजी त्यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत गाऊन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित-जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आणले.
September 28, 2017
मडोना यांचे पूर्ण नाव मडोना लुईस व्हेरोनिका चिकोअ्ने. मडोना मोठेपणी ती प्रचंड प्रसिद्ध गायिका, नृत्यांगना, अभिनेत्री, मॉडेल, उद्योजिका, लेखिका, फॅशन डिझायनर वगैरे होईल असं कुणाला वाटलं नसेल.
August 16, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti