(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शिवकर बापूजी तळपदे

    (जन्म - 1864 ) ( मृत्यू 1917 )

    शिवकर बापूजी तळपदे या मराठी शास्त्रज्ञाचा जन्म 1864 साली झाला. त्यावेळी भारत पारतंत्र्यात होता आणि आधुनिक शिक्षणाचा प्रसारही फारसा झालेला नव्हता. आपले शालेय शिक्षण झाल्यावर ते मुंबईच्या जे जे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेत अध्यापक म्हणून नोकरी करू लागले. त्यांच्या संस्कृत विद्या आणि वेद वाड्गमय यांचा मोठाच व्यासंग होता. प्राचीन काळी झालेल्या शास्त्रीय प्रगतीची पुसट ओळख त्यांना या संस्कृत वाडमयातुन झाली आणि तिकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. त्यातील यंत्रे आणि तंत्रे यांचा अधिक अभ्यास करून त्यावर सखोल चिंतन ते करू लागले. यातुनच त्यांचे त्याविषयीचे संशोधन सुरू झाले. नोकरी करता करताच ते हे संशोधनकार्य फावल्या वेळात करीत असत.

    अशा प्रकारे आपले संशोधनास स्वतंत्रपणे आणि मिळेल त्या तुटपुंज्या सामग्रीवर मोठया चिकाटीने ते करीत होते आणि एक दिवस त्यांनी विमान बनविले वेदातील मंत्राच्या आधाराने त्यानी संशोधन करुन हे विमान बनविले होते. त्या विमानाचे नाव त्यांनी मरुत्सखा असे ठेवले होते पारा आणि सूर्याचे किरण यांच्या प्रक्रियेतून जी शक्ती निर्माण होईल त्या शक्तीवर त्यांचे हे विमान चालत असे 1895 साली यांनी या विमानाचे उड्डाण मुंबईच्या चौपाटीवर यशस्वीपणे करून दाखविले होते बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड, लालजी नारायण, न्यायमूर्ती रानडे यांच्यासारख्या थोर व्यक्तीनी तेथे उपस्थित राहून हे विमानोड्डाण प्रत्यक्षपणे पाहिले आणि त्यांचे कौतूक केले.

    परंतू परतंत्र असलेल्या भारतातील या संशोधकाकडे परकिय राज्यकर्ते आपूलकिने लक्ष देणे अन त्याला पूढे सहाय्य करणे कसे शक्य होते म्हणून त्यांचा तो शोध तेवढयावरच राहिला आणि पुढे 1903 साली राईट बंधूंनी अमेरिकेत विमान तयार करुन पहिले विमान उड्डाण करण्याचा मान मिळविला. ते 1917 साली कैलासवासी झाले.

      March 11, 2015


  • पुरुषोत्तम भास्कर भावे

    ६ नाटके, २ प्रवासवर्णन, २ व्यक्तिचित्रे, २८ कथासंग्रह, १८ लेखसंग्रह, निवडक कथा संग्रहाचे दोन भाग इतके त्यांचे साहित्य प्रसिद्ध झाले.

      July 6, 2022


  • प्रा. प्रदीप ढवळ

    एखाद्या व्यक्तिचं कर्तुत्व आणि त्यांची आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा ही त्याला एका अशा पदावर नेऊन ठेवते जिथे तो माणूस यशाच्या मागे लागत नाही तर यश त्याच्या मागे लागतं. पण त्यावेळी देखील यशापशाची पर्वा न करता आपल्या कामात, त्या कामाच्या धुंदीतच जगायला त्याला आवडतं.

      May 23, 2014


  • ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने

    राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण संचालक, ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने आतापर्यंत १ लाख ४९ हजार पेक्षा अधिक मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वीरित्या केल्या आहेत.

      February 28, 2024


  • तारक मेहता

    तारक मेहता यांच्या लेखनामध्ये नेहमीच नव्या पिढीच्या विचारांचे प्रतिबिंब पाहायला मिळाले. ‘दुनियाने उंधा चष्मा’ या सदरासाठी आणि अनोख्या लेखन शैलीसाठी तारक मेहता ओळखले जायचे. गुजराती रंगभूमीसाठी तारक मेहता यांचे योगदान फार महत्त्वाचे आहे.

      March 3, 2025


  • दत्तात्रय केसरीनाथ दिघे (द. के. दिघे)

    दत्तात्रय केसरीनाथ दिघे यांचा जन्म मुंबई येथील बारभाई मोहल्ला या मुस्लिम वस्तीत दि. १८ मे १९१९ रोजी झाला.

    वयाच्या विसाव्या वर्षापासून त्यांनी विविध शासकीय कार्यालयात इंग्रजी लघुलिपी लेखक (stenographer) म्हणून ३७ वर्षे काम केले. सन १९७७ मध्ये ते सेवानिवृत्त झाले.
    राष्ट्रभाषेचे प्रचार कार्य :-
    महात्मा गांधी यांची हिंदी राष्ट्रभाषा व्हावी अशी इच्छा होती. त्यानुसार आधी हिंदी भाषेच्या चार परीक्षा उत्तीर्ण करुन गिरगावामध्ये जनतेला हिंदी शिकवण्याचे कार्य सेवानिवृत्तीने केले व सुमारे पाचशे लोकांना ही भाषा शिकवली.
    समाजकार्य : -
    निवृत्तीनंतर सन १९८० पासून समाजसेवेस आरंभ केला कोकणस्थ नामदेव शिंपी समाजाची ३१ डिसेंबर १९८९ ची समाजाची विविध क्षेत्रातील परिस्थिती दर्शविणारा शिरगणती (खानेसुमारी) १९९१ मध्ये एका जाहीर समारंभात प्रकाशीत केली. समाजासाठी “वधूवर सूचक मंडळ” काढले. त्याचा लाभ अनेक विवाहोत्सुक मंडळींनी घेतला.
    १९९२ पासून समाजात असलेल्या “अखिल कोकणस्थ नामदेव शिंपी प्रतिनीधी मंडळ” या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारले. या समाजाला लग्न समारंभ व इतर मंगल व सांस्कृतिक कार्यक्रमाची, तसेच विविध संस्थांच्या बैठकांसाठी एका ज्ञातिगृहाची आवश्यकता होती. पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी सतत ७५ वर्षे यासाठी प्रयत्न केले पण ते असफल राहिले श्री. दिघे यांनी अध्यक्ष झाल्यावर इतर काही संस्थांच्या कठोर प्रयत्नाने हे ज्ञातिगृह बांधून सज्ज केले.
    लेखन कार्य :-
    सन २००९ साली समाजाच्या माहितीसाठी व इतर इतिहास प्रेमींसाठी “कोकणस्थ नामदेव शिंपी” समाजाचा सामाजिक व सांस्कृतिक इतिहास हा ३०० पानी ग्रंथ एका जाहीर सभेत प्रकाशित केला. “दर्याचा राजा” या त्रैमासिकात “एक अल्पसंख्यांक पण विकसनशील पोटजात कोकणस्थ नामदेव शिंपी” या शिर्षकाखाली एक संशोधनावर लेख प्रकाशित केला.
    ज्ञान लालसा :- ६५/६६ व्या वर्षी फला ज्योतिषी शास्त्र, हस्त सामुद्रिक शास्त्र, अंक शास्त्र (Neumerology) या शास्त्रांचा अभ्यास केला. महाराष्ट्र ज्योतिष परिषदेची “ज्योतिष शास्त्री” ही पदवी परीक्षा उत्तीर्ण केली. एका निबंध स्पर्धेत ज्योतिष शास्त्रावरील निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे रु. ५०० चे बक्षीस मिळवले.
    संपर्क :
    श्री. द. के. दिघे
    ए-८७ कमल पुष्प, वांद्रे रेक्लमेशन,
    वांद्रे, (प.) मुंबई ४०००५०
    दूरध्वनी क्र. - २६४२९९५५६

    (संदर्भ : स्वतः पाठविलेल्या माहितीवरुन)

      August 20, 2010


  • उद्योजक लक्ष्मणराव किर्लोस्कर

    भारतातील चार राज्यांत पसरलेल्या किर्लोस्कर उद्योगसमूहात १८,००० हून अधिक लोक काम करतात. देशातील विजेच्या मोटारी, डीझेल एंजिने व सेंट्रिफ्युगल पंप यांच्या एकूण उत्पादनापैकी अनुक्रमे ३६, ६५ व ४० टक्के उत्पादन किर्लोस्करांकडून होते. ह्या समूहाचे एकूण वार्षिक उत्पादन ६३ कोटी रूपयांचे आहे.

      September 26, 2021


  • चित्रपट-दिग्दर्शक व नाट्यदिग्दर्शक केदार शिंदे

    केदार शिंदे हा शाहीर साबळे यांचा नातू. त्या मुळे त्याला लहानपणापासून पासूनच कलेची आवड होती. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्याने आपल्या कारकिर्दीची सुरुवात 'महाराष्ट्राची लोकधारा' या कार्यक्रमापासून केली. त्यानंतर त्याने भारत जाधव आणि अंकुश चौधरीबरोबर एक एकांकिका केली होती. केदार शिंदे याने व्यावसायिक नाटकांच्या क्षेत्रात 'बॉम्ब-ए-मेरी-जान' या नाटकाने पहिलं पाऊल टाकलं. ह्या नाटकाला फारसं यश मिळाले नाही. पण त्यानंतर आलेल्या त्याच्या जवळजवळ सर्व नाटकांनी व्यावसायिक यश मिळवलं. या नाटकांमध्ये 'आमच्या सारखे आम्हीच', 'मनोमनी', श्रीमंत दामोदरपंत', 'तू तू मी मी', विजय दिनानाथ चव्हाण', 'आता होऊनच जाऊ दे', 'सही रे सही', 'लोच्या झाला रे', 'गोपाला रे गोपाला' ह्यांचा समावेश होतो. त्याने मुख्यतः खळखळून हसवणारी विनोदी नाटकेच केली आहेत. दूरदर्शन मालिका आणि चित्रपट करतानाही त्याने हीच गोष्ट काटेकोरपणे पाळली आहे. त्यामुळे "केदार शिंदे=धमाल कॉमेडी" हे एक समीकरणच बनलंय.नाट्यसुष्ट्रीमध्ये भरघोस यश मिळवल्यानंतर त्याने पुढचं पाऊल टाकलं ते दूरदर्शन मालिकांच्या क्षेत्रात. इथेही त्याने 'हाउसफुल्ल', 'हसा चटकफु', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'जगावेगळी', 'साहेब, बिवी आणि मी', 'घडलंय बिघडलंय' या झी मराठीवरील मालिकांमधून प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं.

    त्याचा पहिला चित्रपट 'अगं बाई... अरेच्या' म्हणजे मराठी चित्रपट सुष्ट्रीतील एकप्रकारची क्रांतीच होती. ह्या चित्रपटामध्ये मराठी चित्रपटसुष्ट्रीत पहिल्यांदाच 'आईटेम साँगचा वापर करण्यात आला होता. ह्या गाण्याचं नृत्य-दिग्दर्शन बॉलीवूडमधील प्रसिद्ध नृत्य-दिग्दर्शक फराह खान हिने केलं होतं, तर या गाण्यामध्ये सोनाली बेंद्रे नाचली होती. ह्या चित्रपटाने तुफान यश मिळवलं. ह्यानंतरही केदारने 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे' यासारखे हिट चित्रपट दिले. त्याने २०१० मध्ये हिंदी चित्रपटसुष्ट्रीमध्येही पदार्पण केलं. त्याने तब्बू आणि शर्मन जोशी प्रमुख भूमिकेत असलेला 'तो बात पक्की' या चित्रपटच दिग्दर्शन केलं. परंतु या चित्रपटाला फारसं व्यावसायिक यश मिळाले नाही. केदार शिंदेने दिग्दर्शित केलेल्या गुजराती नाटकाचा शुभारंभ ऑगस्ट मध्ये मुंबईत झाला. 'नाटक ना नाटक नु नाटक' असं या गुजराती नाटकाचे नाव असून 'द प्ले दॅट गोज राँग' या गाजलेल्या अमेरिकन नाटकाचा हा अधिकृत रिमेक आहे. बॉलिवूडस्टार शर्मन जोशीनं या नाटकाची निर्मिती केली आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 17, 2018


  • यशवंत दत्त (यशवंतसिंह महाडीक)

    अभिनेते यशवंत दत्त यांना खर्‍या अर्थाने नाव मिळवून दिले ते “नाथ हा माझा” या नाटकाने! या नाटकातील सुभानराव यशवंत दत्त यांनी इतका अप्रतिमरित्या रंगवला की प्रेक्षकांची त्यांना प्रचंड दाद मिळत असे.

      May 24, 2014


  • कर्करोग संशोधक डॉ.कमल जयसिंग रणदिवे

    रणदिवेंना वासंती देवी अमीरचंद पुरस्कार, वाटुमल फाउण्डेशनचा पुरस्कार, सॅडो अवॉर्ड, टाटा मेमोरियल सेंटरचे सुवर्णमहोत्सवी मानचिन्ह व बनारस हिंदू विद्यापीठाचा पुरस्कार असे अनेक मानसन्मान मिळाले. त्यांची इंडियन नॅशनल सायन्स अकॅडमी व महाराष्ट्र अकॅडमी ऑफ सायन्स या संस्थेत ‘फेलो’ म्हणून निवड झाली. महाराष्ट्र राज्याच्या विज्ञान व तंत्रज्ञान समितीच्या सदस्या असताना त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. भारत सरकारने ‘पद्मभूषण’ ही पदवी बहाल करून राष्ट्रपातळीवर त्यांच्या कार्याचा गौरव केला.

      November 8, 2021