जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
“हृदयशारदा”, “आकाशगंगा हे संग्रह. “झोपडपट्टीतील झिपर्या” व “सारेच खोटे” ही पुस्तके त्यांनी कुमारांसाठी लिहिली. “स्त्रीजीवनाची नवी क्षितिजे”, “स्त्रीजीवनविषयक प्रश्न” अशी पुस्तके, अनेक कथासंग्रह त्यांनी लिहिले.
November 7, 2017
एस.एम.जोशी यांनी आयुष्यभर सामान्यांसाठी जीव ओतून काम केले. त्यांचा जन्म १२ नोव्हेंबर १९०४ रोजी येथे झाला.त्यांच्या स्फटिकासारख्या स्वच्छ, पारदर्शक, प्रामाणिक आणि सात्त्विक व्यक्तिमत्त्वाने त्या काळात अनेकांना प्रेरणा दिली. एस.एम. यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाची सुरुवात स्वातंत्र्य चळवळीतूनच झाली. काही विशिष्ट ध्येये, जीवनमूल्ये आणि निष्ठा घेऊनच एस.एम. जोशी यांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला. युसूफ मेहेर अली यांच्या नेतृत्वाखाली युथ काँग्रेसमध्ये एस.एम.जोशी सहभागी झाले. पुढे १९४२ चे भारत छोडो आंदोलन व भूमिगत राहून केलेले काम, एकूण सात वष्रे भोगलेला कारावास, त्यातली अर्धीअधिक सक्तमजुरीची शिक्षा- हे सर्व करत असताना इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाल्यावर स्वतंत्र भारताची जडणघडण ही आíथक व सामाजिक न्याय आणि समता यावर आधारित समाजनिर्मितीची असली पाहिजे, या ध्येयाने प्रेरित होऊन १९३६ मध्ये काँग्रेस सोशालिस्ट पार्टीच्या स्थापनेत ते सहभागी झाले.
माणसाला दुसऱ्या माणसाबद्दल वाटणारी सहानुभूती आणि प्रेम हेच जीवनमूल्य प्रधान समजले पाहिजे आणि तेच शाश्वत सत्य आहे, या समाजवादी मूल्यावरच समाजाची उभारणी केली पाहिजे, हा मूलभूत सिद्धान्त त्यांनी आपलासा केला. स्वातंत्र्यलढय़ाबरोबरच मा.एस.एम यांनी कामगार चळवळीत भाग घेतला तो एका मोठय़ा ध्येयासाठी. त्यांनी कामगार चळवळीकडे फक्त कामगारांच्या वाजवी मागण्या मान्य करून घेण्याचे एक साधन म्हणून कधीच पाहिले नाही. या लढय़ाचा उपयोग समताधिष्ठित नवसमाजाची उभारणी करण्यासाठी होईल, असे त्यांना वाटत होते आणि म्हणूनच कामगारांच्या न्याय्य लढय़ाला विधायक वळण देण्याचा आणि कामगारांना सामाजिक बांधीलकीची शिकवण देण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला. कामगार चळवळ अहिसक व सहिष्णू मार्गाने लढत असताना तिला समाजपरिवर्तनाची दिशा देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. प्रथम त्यांनी पुण्यातील लहान-लहान कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या भांडी कामगारांची संघटना बांधली. नंतर हळूहळू रेवडी कामगार, तपकीर कामगार, विडी कामगार यांच्या युनियन बांधल्या. पण त्यांचे मुख्य काम पुण्यातील खडकी- देहू रोड येथील संरक्षण कारखान्यातील कामगारांच्यात होते.
सर्वप्रथम ५१२ कमांड वर्कशॉपच्या युनियनचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली. नंतर त्यांनी ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशनची स्थापना करून त्याचे ते पहिले जनरल सेक्रेटरी झाले. कामगारांनी कारखान्याची शिस्त पाळली पाहिजे, प्रामाणिक राहिले पाहिजे, जास्तीत जास्त मेहनत करून चांगले उत्पादन केले पाहिजे; तसेच दारू, जुगार अशा व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, घरातील स्त्रियांना सन्मानाने व समानतेने वागविले पाहिजे- या सर्व गोष्टींवर ते कामगारांशी संवाद साधत असत.
राष्ट्रीय दृष्टिकोन न सोडता आणि सामाजिक कर्तव्याची जाण ठेवूनच एस.एम कामगार चळवळीत उतरले होते. स्वातंत्र्यलढा आणि कामगार चळवळ याचबरोबर एस.एम यांची दोन फार महत्त्वाची योगदाने म्हणजे राष्ट्र सेवादल आणि संयुक्त महाराष्ट्र. एस.एम यांनी जरी पक्षीय राजकारणात हिरिरीने भाग घेतला तरी त्यांचा मूळ पिंड रचनात्मक आणि विधायक काम करण्याचाच होता. राष्ट्र सेवादलाच्या उभारणीत व राष्ट्र सेवादलाचे पहिले दलप्रमुख म्हणून त्यांनी तरुणांच्या एका संपूर्ण पिढीलाच पुरोगामी विचारांनी भारून टाकले. त्यांचे हे योगदान अत्यंत मोलाचे आहे.
एस.एम यांच्या राजकीय प्रवासातील संयुक्त महाराष्ट्र चळवळ हा सर्वोच्च बिंदू म्हणता येईल. संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन आक्रमक असूनही अहिंसक होते. लोकांचा उद्रेक, गोळीबार वगरे झाला नाही असे नाही. पोलिसांच्या गोळीबारात १०५ निरपराध माणसे मारली गेली; पण त्या वेळेस मुंबई व महाराष्ट्राची जनता नेतृत्वहीन होती. जनतेच्या प्रक्षोभाला एका संघटित व अहिंसक आंदोलनाची योग्य दिशा देण्याची नितांत गरज होती. कुठलेही आंदोलन सफल होण्यासाठी कणखर, प्रामाणिक आणि कार्यक्षम नेतृत्व लागते. अशा कठीण परिस्थितीत संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली आणि समितीचे सरचिटणीस म्हणून एसेमच्या नावाची घोषणा झाली. समितीचे सरचिटणीस या नात्याने एस.एम यांनी महाराष्ट्राच्या जनतेला नेतृत्व दिले.
आंदोलनाला एक नतिक दिशा दिली आणि सर्व विरोधी पक्षांची एकजूट करून संयुक्त महाराष्ट्र संसदीय व सत्याग्रहाच्या मार्गाने खेचून आणला. संयुक्त महाराष्ट्र समिती हे अनेक पक्षांचे एक कडबोळे होते. प्रजा समाजवादी पक्ष, कम्युनिस्ट, शेकाप, हिंदू महासभा, रिपब्लिकन पक्ष अशा भिन्न विचारांच्या पक्षांना एकत्र घेऊन जाण्याची तारेवरची कसरत एसेमच करू शकत होते. याचे कारण त्यांच्यावर सर्व पक्षांतील नेत्यांचा असलेला पूर्ण विश्वास. एसेमबद्दल सर्वाना खात्री होती की, हा अत्यंत प्रामाणिक आणि निस्वार्थी माणूस असून वैयक्तिक स्वार्थ तर सोडाच, पण ध्येयपूर्तीसाठी स्वत:च्या पक्षाचे हित पण ते बाजूला ठेवतील. डॉ. डांगे, आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे, दाजीबा देसाई, बी. सी. कांबळे, दत्ता देशमुख, डॉ. नरवणे, जयंतराव टिळक असे दिग्गज नेते होते आणि त्या सर्वाना खात्री होती की, एस.एम आपली कधीच फसवणूक करणार नाहीत.
एस.एम यांच्या बाबतीत आत एक आणि बाहेर दुसरेच, असा प्रकार नसायचा. जे काही बोलायचे-करायचे ते सर्व उघडपणे आणि सच्चेपणाने. त्यामुळे खूपदा न पचणारे, न आवडणारे निर्णयदेखील हे नेते एस.एम यांच्या विश्वासामुळे मान्य करीत असत. म्हणूनच आचार्य अत्रे यांनी खास आपल्या शैलीत एस.एम म्हणजे संयुक्त (एस) महाराष्ट्र (एम) असे समीकरण केले. एस.एम १९५७ मध्ये विधानसभेवर निवडून आले. नंतर १९६० मध्ये संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि प्रजा समाजवादी पक्ष समितीतून बाहेर पडला. त्यानंतर १९६२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत विरोधी पक्षांची दाणादाण करून काँग्रेसने आपले वर्चस्व पुन्हा एकदा प्रस्थापित केले. नानासाहेब गोरे त्या वेळी पुण्याहून लोकसभेसाठी आणि अण्णा परत विधानसभेसाठी उभे होते.
प्र.स.प. आणि समाजवादी पक्षाचे ऐक्य होऊन संयुक्त समाजवादी पक्षाची स्थापना १९६५ मध्ये झाली आणि एस.एम हे या पक्षाचे पहिले अध्यक्ष झाले. पण पक्षनिर्मिती होतानाच प्र.स.प.चे लोक त्यातून वैयक्तिक कारणास्तव बाहेर पडले. काही ध्येयधोरणे आणि कार्यक्रम यांवर मतभिन्नता होऊन पक्षातून बाहेर पडणे लोकशाही तत्त्वांना धरून झाले असते. पण एकदा बिनशर्त एकोपा झाल्यावर केवळ वैयक्तिक विरोध किंवा नाराजीसाठी पक्षात फूट पाडणे चुकीचे आहे, असे अण्णांचे ठाम मत होते. त्यामुळे अण्णा संयुक्त समाजवादी पक्षातच राहिले. पक्ष दुभंगून अण्णा एकीकडे आणि अनेक वर्षांचे सोबती सहकारी दुसरीकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली. त्या काळात अण्णांच्या अगदी जवळच्या सहकाऱ्यांनी अण्णांवर जे आक्षेप घेतले, त्यांच्या हेतूबद्दल शंका व्यक्त करणारी पत्रके काढली; त्यामुळे अण्णांना प्रचंड आत्मक्लेश झाले.
एस.एम पुण्यातून १९६७ मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जिंकून आले. तेव्हा इंदिरा गांधींनी काँग्रसचे राष्ट्रपतिपदासाठीचे अधिकृत उमेदवार संजीव रेड्डी यांच्या विरोधात व्ही. व्ही. गिरी यांना उभे केले होते. एक एक मत महत्त्वाचे होते. बाबू जगजीवनराम इंदिराजींच्या वतीने अण्णांना भेटायला घरी आले होते. बाबूजी अण्णांना म्हणत होते, ‘‘एसेम आप जैसे चारित्र्यवान नेताओं की कांग्रेस को जरूरत है.’’ पुढे जाऊन ते म्हणाले, ‘‘इंदिराजीने कहा है की, आप कांग्रेस में आकर कांग्रेस को सुधार सकते हो और कॅबिनेट मंत्री बनकर अपना योगदान दे सकते हो.’’ मा.एस.एम.जोशी यांनी हसत-हसत बाबूजींना उत्तर दिले- ‘‘बाबूजी मं अभी तक खुद की पार्टी को नहीं सुधार सका हूँ, तो कांग्रेस जैसी बडी पार्टी को कैसे सुधार सकता हूँ? आप इंदिराजी को बताईये की मेरा वोट जरूर व्ही. व्ही. गिरीजी को मिलेगा लेकिन उसके लिए कांग्रेस में आनेकी जरूरत नहीं है।’’
प्र.स.प. व सं.सो.पा.चे १९७१ मध्ये परत एकदा एकत्रीकरण होऊन समाजवादी पार्टीची निर्मिती झाली. आणीबाणीच्या काळात जयप्रकाशजींच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनात व पुढे जनता दल पार्टीच्या निर्मितीत एसेमनी भरीव योगदान दिले. समाजवादी पक्ष १९७७ मध्ये जनता दलात विलीन झाला. नंतरच्या काळात समाजवादी चळवळ राजकीयदृष्टय़ा कमकुवतच होत गेली आणि जुना समाजवादी पक्ष असा उरलाच नाही. मा.एस.एम यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वात महत्त्वाचा पलू म्हणजे त्यांना शोषित आणि वंचितांबद्दल वाटणारी कणव. नुसतीच कणव नाही तर त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी, त्यांचे अश्रू पुसण्यासाठी, त्यांचे दु:ख कमी करण्यासाठी ते कायम धावून जायला तयार असत. अण्णांच्या व्यक्तिमत्त्वातच एक प्रकारची जादू होती. त्यांचे ते निळेशार डोळे जितके तेजस्वी होते, तितकेच करुणेने भरलेले होते. लाल-गोरी कांती, भव्य कपाळ आणि मागे ओढलेले भरदार केस. प्रत्येकाला असे वाटे की, या माणसाकडे गेलो तर आपली व्यथा, आपले दु:ख निश्चितच कमी होईल. सानेगुरुजी जर आधुनिक महाराष्ट्राचे क्रांतिकारी संत होते, तर एसेम हे आधुनिक महाराष्ट्राचे राजकारणी संत होते. एस.एम.जोशी यांचे १ एप्रिल १९८९ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / अभय जोशी निवृत्त विंग कमांडर(मा.एस.एम.जोशी यांचे चिरंजीव)
April 1, 2019
शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर यांचा जन्म १७ ऑगस्ट १९४९ रोजी पुणे येथे झाला.
छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलू शकणारे निनाद बेडेकर यांची शिवचरित्राचे अभ्यासक अशी ख्याती होती. निनाद बेडेकर यांनी मॉडर्न शाळेतील शिक्षणानंतर शासकीय तंत्रनिकेतन येथून अभियांत्रिकी अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांच्या मातोश्री या सरदार रास्ते घराण्यातील होत्या. स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्यांनी महिलांचे संघटन केले होते. हाच वारसा निनाद बेडेकर यांच्याकडे आला. शिवचरित्राची गोडी लागल्याने बेडेकर इतिहास संशोधनाकडे वळाले. इतिहासाच्या अभ्यासासाठी त्यांनी मोडी, फार्सी, उर्दू या लिपींवर प्रभुत्व मिळविले. या लिपीमध्ये असलेल्या हस्तलिखिते आणि कागदपत्रांचे वाचन करून त्यांनी साहित्यनिर्मिती केली. त्याचबरोबरीने बेडेकर यांनी पर्शियन, पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजी या परकीय भाषा आत्मसात केल्या.
शिवचरित्र आणि १८ व्या शतकात देशभर विस्तारलेले मराठी साम्राज्य या विषयांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. राज्यातील आणि देशातील किल्ल्यांवर भ्रमंती करून शिवकालीन इतिहासामध्ये ते रममाण झाले होते. शिवरायांचा राज्यकारभार आणि मराठेशाही संदर्भात त्यांनी वेगळ्या दृष्टिकोनातून लेखन केले. शिवाजीमहाराजांचे युद्धकौशल्य, नेतृत्वगुण, दुर्गबांधणी, आरमार उभारणी या पैलूंचा स्वतंत्रपणे अभ्यास करून त्यांनी लेखन केले होते. शिवरायांची व्यवस्थापकीय कौशल्ये हा विषय ते एमबीएच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये समजावून सांगत असत. लालित्यपूर्ण शैलीमध्ये ऐतिहासिक लेखन करणाऱ्या बेडेकर यांची ‘शिवभूषण’, ‘थोरलं राजं सांगून गेलं’, ‘गजकथा’, ‘हसरा इतिहास’, ‘दुर्गकथा’, ‘विजयदुर्गचे रहस्य’, ‘समरांगण’ आणि ‘झंझावात’ ही निनाद बेडेकर यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांनी ३५ पुस्तकांसह शेकडो लेख आणि शोधनिबंध लिहिले. गेल्याच महिन्यात त्यांचे ‘अजरामर उद्गार’ हे अखेरचे पुस्तक प्रकाशित झाले होते.
इतिहास संशोधनाच्या कार्यामध्ये रममाण होण्यासाठी त्यांनी किर्लोस्कर कमिन्समधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. भारत इतिहास संशोधक मंडळ, श्री रायगड स्मारक मंडळ, श्री राजगड स्मारक मंडळ, गोनीदा दुर्गप्रेमी मंडळ या संस्थांशी संबंधित असलेले बेडेकर हे पुरुषोत्तम करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धाचे आयोजन करणाऱ्या ‘महाराष्ट्रीय कलोपासक’ संस्थेचे अध्यक्ष होते.
निनाद बेडेकर यांना शिवभूषण, दुर्ग साहित्य पुरस्कार, जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार, पुराण पुरुष पुरस्कार, शिवपुण्यतिथी रायगड पुरस्कार या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. शनिवारवाडा येथील ध्वनिप्रकाश योजनेमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी बेडेकर यांनी संहितालेखन केले होते. गड-किल्ल्यांच्या जतन-संवर्धनासाठी राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीमध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून निनाद बेडेकर यांची नियुक्ती झाली होती. छत्रपती शिवाजीमहाराज आणि मराठेशाहीच्या इतिहासावर अधिकारवाणीने बोलणाऱ्या अभ्यासकांच्या प्रभावळीमध्ये निनाद बेडेकर यांनी आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. वयाची साठी पूर्ण झाल्यावर २००९ मध्ये बेडेकर यांनी युवक आणि गडप्रेमींना घेऊन ६१ किल्ल्यांवर भ्रमंती करण्याचा संकल्प केला होता. मात्र, त्या वर्षभरात त्यांनी १०१ किल्ल्यांना भेटी दिल्या.
निनाद बेडेकर यांचे १० मे २०१५ रोजी निधन झाले. आपल्या समूहातर्फे निनाद बेडेकर यांना यांना आदरांजली.
शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक निनाद बेडेकर (16-May-2017)
शिवचरित्राचे सव्यसाची अभ्यासक निनाद बेडेकर (10-May-2019)
शिवचरित्राचे अभ्यासक निनाद बेडेकर (17-Aug-2021)
#NinadBedekar
May 5, 2022
भारतातील पहिल्या बॉंबचा यशस्वी रित्या प्रयोग करणारे पहिले क्रांतिकारक म्हणजे खुदिराम बोस.खुदिराम बोस यांचा जन्म 3 डिसेंबर 1889 रोजी बंगाल मधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी गावी झाला.त्र्यलोक्यनाथ बोस हे त्यांचे वडील. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीप्रियादेवी. खुदिराम यांना एक मोठी बहीण होती तिचे नाव अपरूपा. खुदिराम 10 वर्षाचे असताना त्यांचे आईवडील निजधामास गेले. यानंतर त्यांचा सांभाळ हा त्यांच्या बहिणीने केला.पुढील शिक्षणासाठी खुदिराम हे मिदनापूर येथे आले. जसे जसे वय वाढत होते तसे तसे क्रांतिकार्याची ओढ खुदिराम याना लागत गेली.
मिदनापूर येथे “युगांतर” या क्रांतिकारक गुप्त संस्थेचे ज्ञानेन्द्र नाथ बोस यांनी त्यांना क्रांतिकार्यत येण्यास सांगितले. 1905 साली ब्रिटिश व्हाइसरॉय लोर्स कर्झन याने बंगालच्या फाळणीला मान्यता दिली आहे अशी घोषणा केली. या निर्णयामुळे बरेच बंगाली तरुण त्वेषाने पेटून उठले. या फाळणीचा विरोध सुरेंद्रनाथ बॅनर्जी, बिपिनचंद्र पाल, आणि लोकमान्य टिळक या सर्वांनी केला.
यानंतर मिदनापूर येथे 1906 साली स्वदेशीच्या आंदोलना वेळी एक शेतकी प्रदर्शन भरले होते यावेळी खुदिराम आणि सत्येंद्रनाथ बोस यांनी पत्रके वाटली. सत्येंद्रनाथ यांच्या कडे युगांतर मिदनापूर चे नेतृत्व होते. यावेळी पोलिसांनी टाकलेल्या धाडी मध्ये कसे बसे प्रयत्न करून खुदिराम यांनी तिथून पळ काढला,त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांनी जंग जंग पछाडले होते. यामुळे त्यांना आपले घरदार ओडावे लागले आणि ते एका विणकामच्या शाळेच्या वस्तीगृहवर जाऊन राहू लागले. पोलिसांना याचा सुगावा लागताच त्यांनी एक दिवशी अचानक छापा घातला आणि खुदिराम यांना अटक केली.1906 एप्रिल मध्ये खुदिराम यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवण्यात आला.हा खटला मिदनापूर येथील सेशन कोर्टसमोर चालला. यातून 16 मे 1906 रोजी खुदिराम बोस निर्दोश सुटले.
बंगालच्या फाळणी विरोधी आंदोलनात बऱ्याच क्रांतिकार्यना क्रूर शिक्षा ठोठावण्यात आल्या. या शिक्षा देणाऱ्या मध्ये कलकत्त्याच्या चीफ मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड हा अग्रेसर होता. याच चीफ मॅजिस्ट्रेट ने नंतर युगांतर, नवशक्ती, संध्या,वसुमती, यांच्या संपादकांना कठोर शिक्षा दिल्या. याबद्दल ब्रिटिश सरकारने किंग्जफोर्डची मुझफ्फरपूर ला जज म्हणून बदली केली. आता क्रांतिकारकांचा निर्णय झाला होता बैठकीत किंग्जफोर्ड ला यमसदनी धडण्याचा निर्णय झाला होता. यानंतर खुदिराम कलक्त्यास येऊ लागले तिथे त्यांचे मामा सतीशचंद्र दत्त यांच्याकडे कॉर्पोरेशन ⅘ स्ट्रीट येथे उतरत असत. याचदरम्यान युगांतरच्या कलक्त्यामधील कार्यालयात गेले त्यावेळी त्यांना किंग्जफोर्ड बद्दल चा बेत समजला. याच वेळी त्यांची आणि प्रफुल्लकुमार चाकी यांची भेट झाली.
पुढचा बेत आखण्यासाठी सगळे क्रांतिकारी एकत्र जमलेल्या गुप्त बैठकीत किंग्जफोर्ड ला मारण्याची जबाबदारी कोण घेणार याचा निर्णय होणार होता. त्यासाठी सगळ्यांच्या नावाच्या चिठया टाकण्यात आल्या. यात पहिले नाव होते प्रफुल्लकुमार चाकीं आणि नरेंद्र गोस्वामी. पण अचानक नरेंद्र गोस्वामी ने हे काम करण्यास नकार दिला.त्यांच्या जागी मग खुदिराम बोस यांची निवड करण्यात आली. 23 एप्रिल 1908 रोजी दोघेही जण मुजफ्फरपूर ला येण्यासाठी निघाले.
किंग्जफोर्ड ला मारण्यासाठी बॉम्ब चा वापर होणार होता, पण भारतात बॉम्ब बनवण्याची कृती उपलब्ध नव्हती. यासाठी लंडनहून हेमचंद्र दास हे बॉम्ब बनवण्याची कृती घेऊन सेनापती बापट यांच्या सांगण्यावरून भारतात आले.सेनापती बापट यांनी एका रशियन मुलीच्या मदतीने मिळवलेली भाषांतर करून हि केउती मिळवली होती आणि या मागची प्रेरणा होती स्वातंत्रवीर विनायक दामोदर सावरकर. खुदिराम यांच्याजवळ असणारा बॉम्ब हा आता याच कृतीवरून बनवलेला होता.
24 एप्रिल रोजी खुदिराम आणि प्रफुल्लकुमार मुजफ्फरपूर येथे पोहचले.यानंतर किंग्जफोर्ड च्या संपूर्ण हालचालींची रेकी करण्यात आली. 30 एप्रिल रोजी दोघेही जण कामगिरीवर निघाले. थोड्याच वेळात ते किंग्जफोर्ड च्या बंगल्यासमोर येऊन उभे राहिले.रात्री साडेआठच्या वेळेस खुदिराम बॉम्ब घेऊन किंग्जफोर्ड च्या गाडीचे घोडे आणि समोरून येणाऱ्या गाडीचे घोडे यांच्यात साम्य दिसल्यावर त्या गाडीच्या दिशेने धावत सुटले. त्यांच्या पाठोपाठ प्रफुल्लकुमार हि निघाले.त्या वेळी अंधार असल्यामुळे गाडीच्या आतील बाजूस कोण आहे हे खुदिराम याना समजू शकले नाही. खुदिराम यांनी नेम धरून त्या गाडीवर तो बॉम्ब फेकला आणि स्फोट होऊन प्रचंड आवाज झाला. भारतातातील पहिला श्रीगणेशा मुजफ्फरपूर मध्ये झाला होता.पण स्फोट झालेल्या गाडीत किंग्जफोर्ड हा नव्हताच. यात स्त्रिया आणि दोन युरोपिअन जीव मारले गेले.
यानंतर खुदिराम बोस यांना अटक झाली त्यांच्यावर खटला चालवण्यात आला. या खटल्या अंतर्गत 11 ऑगस्ट 1908 या दिवशी खुदिराम यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. सकाळी 6 वाजता या दिवशी खुदिराम यांना फाशी देण्यात आली. आणि या भारतमातेसाठी एक 19 वर्षाचा तरुण हसत हसत फासावर गेला.
संदर्भ - मृत्युंजयाचा आत्मयज्ञ - वि श्री जोशी
August 11, 2016
डॉ.किरण चित्रे या माहेरच्या किरण तासकर. डॉ.किरण यांचा जन्म अहमदनगरचा. बालपण शालेय शिक्षण शारदाश्रम विद्यामंदिर येथे व महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालय मुंबईत झाले. डॉ.किरण चित्रे यांना प्रसारण क्षेत्रांत खूप जण मानतात. किरण चित्रे या निर्मिती सहाय्यक ते सहाय्यक संचालक एवढ्या पदापर्यंत विविध स्तरांवर दूरदर्शनच्या मुंबई केंद्रावर गेली ३३ वर्ष कार्यरत होत्या.
June 26, 2021
मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चार वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर त्यांनी कलकत्ता इथे स्टुडिओ थाटून व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात केली.
October 2, 2021
प्रांत आणि भाषेची बंधने संगीताच्या सुरेल स्वरावर ओलांडून हिंदी, मराठी, तेलगु, मल्याळम, कन्नड भाषिक रसिकांची लोकप्रियता मिळवणारे अशी संगीतकार आणि गायक शंकर महादेवन यांची ओळख आहे. त्यांचा जन्म ३ मार्च १९६८ रोजी झाला.
भारतीय चित्रपटांसाठी संगीत दिग्दर्शन करणाऱ्या शंकर एहसान लॉय यातील ते एक सदस्य आहेत. त्यांचे ब्रेथलेस साँग तर पुन:पुन्हा ऐकावेसे वाटते. मन उधाण वाऱ्याचे हे ‘अगं बाई अरेच्चा’ चित्रपटातील गाणे शंकर महादेवन यांच्या जादुई आवाजामुळे मनाला भिडते. ‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद, मनमंदिरा ही एकापेक्षा एक सरस गाणी त्यांनी गायली.
केरळमधल्या तमिळ अय्यर कुटुंबात मुंबईत जन्मलेल्या महादेवन यांची मातृभाषा तमिळ असली तरी त्यांची कर्मभूमी बालपणापासूनच महाराष्ट्र राहिली. मराठी भाषेवर आणि मराठी मातीवर प्रचंड प्रेम असलेल्या महादेवन यांनी बालपणीच ख्यातनाम संगीतकार श्रीनिवास खळे यांच्याकडे संगीताचे आणि गायनाचे धडे घेतले. शास्त्रीय गायनाचे प्रशिक्षणही घेतले. पं. भीमसेन जोशी आणि लता मंगेशकर यांनी गायिलेल्या "राम का गुनगान गाईयेगा' या देशभर गाजलेले गीत श्रीनिवास खळे यांनी एचएमव्हीसाठी संगीतबध्द केले. त्या वाद्यमेळ्यात वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी महादेवन यांनी सतारीची साथ केली होती. वीणा, सतार आणि अन्य वाद्यांच्या वादनाचे प्रशिक्षण, रियाज सुरू असताना, त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. मुंबई विद्यापीठातून कॉम्प्युटर इंजिनियरिंगची बी. ई. पदवी मिळवल्यावर ओरॅकल व्हर्शन ६ या कंपनीत त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियरिंगचीही नोकरी केली. ख्यातनाम सॉफ्टवेअर कंपन्यातही त्यांनी काही काळ नोकरी केली. संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासह देशातील ख्यातनाम संगीतकारांच्याकडे त्यांनी तमिळ, तेलगु, कन्नड, मराठी, हिंदी चित्रपटांसाठी गीते गायिली आहेत. जगदीश खेबुडकर यांनी लिहिलेल्या आणि अजय-अतुल यांनी संगीतबध्द केलेल्या "मोरया मोरया' या लोकप्रिय गीताचे गायक शंकर महादेवनच आहेत.
१९९५ पासून चित्रपटात पार्श्वगायन करणाऱ्या महादेवन यांनी गायिलेल्या कंडुकोदायन या तमिळ चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. हिंदी, तेलगु, कन्नड चित्रपटांना त्यांनी संगीतही दिले आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटामधून शंकर महादेवन अभिनय क्षेत्रात पण पदार्पण केला आहे. आतापर्यंत दोनशेच्यावर चित्रपटात गीत गायन करणाऱ्या शंकर महादेवन यांना केरळ, तमिळनाडू, आंध्र सरकारने अनेक पुरस्कारांनी गौरविले आहे. पाच राष्ट्रीय पुरस्कारांचेही ते मानकरी आहेत. सर्वोत्कृष्ट पार्श्वगायनाबद्दल चार फिल्मफेअर पुरस्कारही त्यांना मिळाले. त्यांचा आशा भोसले जीवन गौरव पुरस्कारानेही सन्मान केला आहे. शंकर महादेवन हे नवी मुंबई महानगर पालिकेचे स्वच्छता ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून अभियानात सहभागी झाले आहेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
March 3, 2018
स्त्री शिक्षण ज्याकाळात सामाजिकदृष्ट्या वर्ज्य मानली जात होती अश्या परिस्थितीत शिक्षणासाठी पुढाकार घेणारी महिला म्हणजे रमाबाई महादेव रानडे.
May 7, 2014
रामनगरी’ या विनोदी अंगाने समाजदर्शन घडवणार्या अजरामर आत्मपर पुस्तकाचे लेखक राम विठोबा नगरकर हे एक उत्कृष्ट विनोदी अभिनेते होते.
November 10, 2016
पाप्युलर या मराठी साहित्यविश्वामधील अग्रणी समजल्या जाणार्या पुस्तक प्रकाशन संस्थेचे रामदास भटकळ हे संस्थापक आहेत. रामदास भटकळ यांचा जन्म ५ जानेवारी १९३५साली झाला. त्यांचे शालेय शिक्षण रॉबर्ट मनी हायस्कूल, तर एलफिन्स्टन महाविद्यालयातून पदवी, चर्चगेटच्या गव्हर्नमेन्ट लॉ कॉलेज येथे एल.एल.बी त्यानंतर मुंबई विद्यापीठून राज्यशास्त्र विषयातून एम.ए.पूर्ण केले.
१९५२ मध्ये पॉप्युलर बुक डेपोच्या मराठी प्रकाशनाचे रामदास भटकळ यांनी कामाला सुरूवात केली. तर १९५८ पासून इंग्रजी प्रकाशनाच्या कामाला सुरुवात केली. १९६१ साली प्रकाशन व्यवसायासंबंधी प्रशिक्षणासाठी लंडनच्या “इंग्लिश युनिव्हर्सिटीज प्रेस”मध्ये तीन महिन्याची नोकरी करुन प्रकाशन कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर इंग्लंडच्या ग्रंथव्यवहाराचा अभ्यास देखील. १९६५ रोजी यु.एस.स्टेट डिपार्टमेन्टच्या निमंत्रणावरुन अमेरिकन ग्रंथव्यवहाराचा अभ्यास केला.
“बॉम्बे बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स असोशिएशन” व “कॅपेक्सिल” या निर्यातदारांच्या संस्थेच्या “बुक्स अॅन्ड पब्लिकेशन पॅनेल”चे अध्यक्षपद रामदास भटकळ यांनी भुषविले आहे.
“द पोलिटिकल आल्टर्नेटिव्हस इन इंडिया”, “जिगसॉ”, “मोहनमाया”, “जगदंबा”, “रिंगणाबाहेर” या पुस्तकांचे रामदास भटकळ यांनी लेखन केले आहे. “फ्रँकफुर्ट” येथे आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय पुस्तक प्रदर्शनात पाच वेळा सहभाग देखील नोंदवला आहे. महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट प्रकाशनाच्या पहिल्या पुरस्काराचे भटकळ मानकरी आहेत.
January 16, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti