जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
December 15, 2010
जन्म - १२ ऑगस्ट १८८०
१८८०> “दादासाहेब खापर्डे यांचे चरित्र” लिहिणारे दादासाहेबांचे पुत्र, बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म, “साहित्याची प्रेरणा, पद्धती आणि ध्येय” हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.
mss
August 2, 2017
‘साधना’ला मराठी वृत्तपत्रसृष्टीत वैचारिक प्रतिष्ठा मिळवून देणारे संपादक यदुनाथ दत्तात्रय थत्ते यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९२२ रोजी झाला.
July 19, 2022
विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक विनायक सदाशिव वाळिंबे यांचा जन्म ११ ऑगस्ट १९२८ रोजी झाला.
विनायक सदाशिव वाळिंबे उर्फ वि. स. वाळिंबे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहेत ते विचारवंत पत्रकार, अभ्यासू संपादक आणि मुख्य म्हणजे म्हणजे ‘पुलं’च्या शब्दांत सांगायचं झालं तर अत्यंत ‘वाचनीय लेखक’ म्हणून! या दोनच शब्दांत ‘पुलं’नी त्यांच्या सर्व लेखनाचं सार सांगितलंय. उमेदवारीचा काळ ‘अग्रणी’ दैनिकात, ‘रोहिणी’ मासिकात, नंतर ‘प्रभात’ आणि ‘ज्ञानप्रकाश’ वृत्तपत्रात काढल्यानंतर, वाळिंबे यांनी आपल्या पत्रकारितेचा महत्त्वाचा सर्व काळ पुण्यात ‘केसरी’ वृत्तपत्रात काढला. त्यांच्या सुहृदांनी त्यांच्यावर लिहिलेल्या लेखांचा संग्रह ‘उमदा लेखक, उमदा माणूस’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याचं संपादन डॉ. अरुणा ढेरे यांनी केलं आहे.
गरुडझेप, हिटलर, इंदिरा गांधी बंगलोर ते रायबरेली, इस्रायलचा वज्रप्रहार, नेताजी, ऑपरेशन थंडर, पराजित-अपराजित, सत्तावन्न ते सत्तेचाळीस, सावरकर, श्री शिवराय, स्टॅलिनची मुलगी, व्होल्गा जेव्हा लाल होते, १९४७, वॉर्सा ते हिरोशिमा, स्वातंत्र्यवीर अशी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आणि वाचकप्रिय आहेत. वि. स. वाळिंबे यांचे २२ फेब्रुवारी २००० रोजी निधन झालं.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
August 11, 2021
कलाक्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून राजू फुलकर यांच्याकडे पाहिले जात होते. एकांकिकेतून त्यांनी विविधांगी विषय मांडले. राजू फुलकर यांनी चाळीस वर्षे रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात काम केले. ‘लोकधारा’ कार्यक्रमात हृदयस्पर्शी लोकगीते गाणारे गायक, अनेक वाद्ये वाजवणारे वादक ही त्यांची ओळख होती.
March 4, 2025
‘शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.
July 29, 2021
वैशिष्ट्यपूर्ण केशरचनेमुळे एकेकाळी "फॅशन आयकॉन‘ म्हणून ओळखल्या जाणारी गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी नय्यर तथा साधना यांचा जन्म २ सप्टेंबर १९४१ रोजी झाला. प्रसिद्ध नृत्यांगना साधना बोस यांच्या नावावरून साधना यांच्या वडिलांनी त्यांचे नाव साधना असे ठेवले होते.
साधना शिवदासानी यांचे पुढील शिक्षण मुंबईतच झाले. चर्चगेट येथील जय हिंद महाविद्यालयात त्या शिकल्या. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यशस्वी अभिनेत्री बनण्याचे त्यांचे स्वप्न होते. कुटुंबाचा त्यांना पूर्ण पाठिंबा होता. वडिलांनी त्यांचे हे स्वप्न पूर्ण होण्यासाठी मेहनत घेतली. १५ वर्षांच्या साधनाला महाविद्यालयातील एका नाटकात भूमिका करताना काही निर्मात्यांनी पाहिले आणि चित्रपटांत काम करण्याची संधी दिली. १९५८ मध्ये "अबाना‘ या भारतातील पहिल्या सिंधी चित्रपटाद्वारे त्यांनी अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटाचे मानधन म्हणून त्यांना एक रुपया मिळाला होता.
प्रसिद्ध निर्माते शशिधर मुखर्जींनी साधना यांचा 'स्क्रीन' मॅगझिनमधील फोटो पाहून त्यांना आपल्या अभिनय प्रशिक्षण शाळेत प्रवेश दिला, आणि 'लव्ह इन सिमला' या चित्रपटात प्रमुख भूमिका दिली. अभिनेता जॉय मुखर्जी यांच्यासोबतचा हा चित्रपट खूप गाजला आणि साधना यांची यशस्वी कारकीर्द सुरू झाली. त्या चित्रपटातील त्यांची हेअरस्टाईल पुढे 'साधना कट' या नावाने खूप प्रसिद्ध झाली. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान साधना आणि आर.के. नय्यर यांचे प्रेम जमले. पुढे त्यांनी विवाह केला. त्यांनी ‘गीता मेरा नाम’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. अनीता, मेरा साया आणि वो कौन थी या चित्रपटांमुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये ‘मिस्ट्री गर्ल’ म्हणूनच ओळखले जायचे.
मनोज कुमारसोबत त्यांनी केलेल्या "वो कौन थी‘ चित्रपटातील त्यांचा डबल रोल खूप गाजला. या चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले. मा.साधना यांचे २५ डिसेंबर २०१५ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
December 26, 2017
मायकेल जॅक्सन नावाचे एक भन्नाट आणि बेभान, चित्तथरारक आणि अचाट तुफान मनात आणि तनात १९८० ते १९९५ या काळात ते तुफान घोंघावले.त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९५८ रोजी झाला.मायकेल जॅक्सनमध्ये अशी काय ‘मॅजिक’ होती, असे काय गूढ होते, की ज्यामुळे प्रभुदेवा, मिथुन चक्रवर्तीपासून राज ठाकरेंपर्यंत आणि युरोपपासून जपानपर्यंत, जवळजवळ जगभरचे तत्कालीन तरुण-तरुणी त्याच्या प्रभावाखाली आले होते? मायकेल जॅक्सनची विलक्षण ऊर्जा? त्याचा झपाटा? त्याच्या ‘साँग-डान्स’मधील इलेक्ट्रिकल चार्ज? त्याचा आवाज? गाण्याच्या ओळी? मायकेल नावाची मॅजिक जगभर पसरली ती त्याच्या १९८३च्या ‘थ्रिलर’ या थरारक अल्बमनंतर. त्याच्या लाखो चाहत्यांना त्याच्या गाण्यांमधले शब्द व त्यांचे संदर्भ समजतही नसत. परंतु असेही कित्येक कोटी तरुण होते, की जे त्याची गाणी, नृत्य, हावभाव आणि वैचित्र्यपूर्ण भासणारे पदन्यास या सर्वाचे सहीसही अनुकरण करायचा प्रयत्न करीत असत.
मायकेल जॅक्सन अजिबात न आवडणाऱ्यांचाही एक मोठा वर्ग होता. पण साधारणपणे तो वर्ग तेव्हा पन्नाशीच्या आसपास वा पलीकडे गेला होता. तरुण वर्गातही थोडेफार ‘अॅाण्टी-जॅक्सन’ होते, पण चाहत्यांचा दबदबा (आणि दहशत!) इतकी प्रचंड होती, की त्या ‘विरोधकांचा’ आवाज त्या अफलातून आणि कान भेदून जाणाऱ्या तडाखेबंद ड्रम्सच्या ध्वनी-प्रतिध्वनींमध्ये पूर्णपणे बुडून जात असे. ज्यांना ‘जॅक्सन फिनॉमिनन’ने कधीच संमोहित केलेले नव्हते, त्यांना त्याची ‘मॅजिक’ही उमजली नव्हती आणि आता सुरू झालेले ‘ग्लोबल मोर्निग’ ही उमजलेले नाही.
मायकेल जॅक्सन ही अगदी चपखल असे ‘अमेरिकन फिनॉमिनन’ होते. त्याच्या अगोदर असेच तुफान एल्विस प्रिस्ले या नावाने अमेरिकेत आणि मग जगभर पसरले होते; पण प्रिस्लेच्या काळात टेलिव्हिजन आणि खासगी वाहिन्या आजच्यासारख्या जगभर फोफावल्या नव्हत्या. कम्प्युटर आणि इंटरनेट क्रांतीच्या दोन दशके अगोदर एल्विसचे पर्व होते. त्या दोघांच्या ‘ब्रॅण्ड’चा बाज जरी वेगळा असला तरी एक पर्व संपले आणि काही वर्षांतच दुसरे पर्व सुरू झाले असे म्हणण्यासारखी स्थिती होती. विशेष म्हणजे आज जगभर अमेरिका ओळखली जाते ती केवळ त्यांच्या व्हिएतनाम-अफगाणिस्तान-इराक येथील हिंस्र कारवायांमुळे नव्हे; तर हॉलिवूड-एल्विस- मायकेल जॅक्सन अशा ‘मॅजिक मेकर्स’मुळे अमेरिकेत निर्माण होणारी अशी तुफाने झपाटय़ाने ‘लेजंड्स्’ होतात. हा हा म्हणता ती ‘लेजंड्स्’ जगभरच्या लोकांच्या मनाचा कब्जा घेतात. त्यांचे वर्णन योग्य-अयोग्य, चूक-बरोबर, नैतिक-अनैतिक अशा निकषांवर करणे म्हणजे तो हंगामा, ते ‘फिनॉमिनन’, ते अनोखे चैतन्य न समजून घेण्यासारखे आहे.
अमेरिकेतील अशी ‘फिनॉमिना’ झपाटय़ाने कॉर्पोरेट रूप धारण करतात. हा हा म्हणता ती ‘ग्लोबल कॉर्पोरेट्स्’ बनतात. एकदा अशी ‘लेजंड्स्’ जागतिक कॉर्पोरेट झाली, की त्यात अब्जावधी डॉलर्स गुंतवले जातात, कोटय़वधी लोक त्यांचे ग्राहक होतात, त्या संशोधनातून एक सामूहिक झिंग तयार होते; मग ती झिंग मार्केट केली जाते, सीडी-डिव्हीडीज्, कॅसेट्स्, टी. व्ही. चॅनल्सच्या माध्यमातून ती झिंग घराघरात पोहोचते- लहान मुले आणि तरुण-तरुणी त्यात इतके दंग होतात, की त्यांच्या पालकांना हे कळेनासे होते, की ‘या पिढीला कशाने झपाटले आहे?’ भुताने झपाटल्यावरही माणूस (म्हणजे तरुण-तरुणी) जसे वागणार नाही तसे वर्तन पाहून काही पालक भयभीत होतात. तेही स्वाभाविकच म्हणावे लागेल. मायकेल जॅक्सनच्या (आणि इतरही ‘डान्स-साँग शोज्’च्या) वेळेस ज्या प्रकारच्या आर्त किंकाळ्या, अश्रूपात, छाती बडवून घेत त्याबरोबरच होणारा अक्षरश: लाखो चाहत्यांचा भन्नाट नाच हे सर्व वरकरणी वेताळाने झपाटल्यासारखेच वाटते/ दिसते. त्याच्या मरणानंतरही तो ‘पेनकिलर’ घेऊन मरण पावला, की हृदयविकाराच्या झटक्याने यावर वादंग सुरू झाला आहे. मायकेल जॅक्सनचे निधन २५ जून २००९ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट / लोकसत्ता
June 27, 2017
आज ९ नोव्हेंबर.. आज अभिनेता व दिग्दर्शक सुबोध भावेचा वाढदिवस.
सुबोध भावे यांचा जन्म ९ नोव्हेंबर १९७५ रोजी झाला.
मराठी सिनेसृष्टीतील एक चतुरस्त्र अभिनेता अशी सुबोध भावेची ओळख आहे. मालिका, नाटक आणि सिनेमांमधून त्याने सशक्त भूमिका साकारल्या. ‘अवंतिका’,‘वादळवाट’ आणि सध्या सुरू असलेली ‘का रे दुरावा’ ही मालिका प्रचंड लोकप्रिय होत्या. लावणीवर आधारित असलेल्या ढोलकीच्या तालावर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केलेले आहे.
‘बालगंधर्व’ सिनेमातील सुंदर व अप्रतिम भूमिका साकारून सुबोधने सर्वांची मनं जिंकली तर ‘लोकमान्य-एक युगपुरूष’ सिनेमातील त्याने साकारलेल्या लोकमान्यांच्या कणखर भूमिकेचं सर्वत्र कौतुक झालं. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत त्याने ‘कट्यार काळजात घुसली’ या संगीत सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळलीय. ‘कट्यार काळजात घुसली’, ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या चित्रपटांच्या प्रसिद्धीनंतर सुबोध भावे यशाच्या शिखरावर आरुढ झाला आहे. तो आता एक मल्याळम चित्रपट करणार असल्याचे समजते. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांच्या ‘पिन्नेयुम’ या चित्रपटाद्वारे सुबोध मल्याळम चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- विकिपिडीया
November 9, 2016
भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेचा माजी विद्यार्थी असलेल्या संजय भन्साळी यांनी विधू विनोद चोप्राचा साहाय्यक दिग्दर्शक म्हणून काही चित्रपटांमध्ये भाग घेतला. त्यांचा जन्म २४ फेब्रुवारी १९६३ रोजी झाला.१९९६ साली त्यांनी स्वत: प्रमुख दिग्दर्शक बनून खामोशी ह्या चित्रपटाची निर्मिती केली. तेव्हापासून त्यांनी अनेक यशस्वी हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. त्यांना आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत. आज बॉलीवूडमध्ये संजय लीला भन्साळी यांचे मोठे नाव आहे. ऐतिहासिक चित्रपट बनविण्यात त्यांचे नाव आघाडीवर घेतले जाते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 25, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti