(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कॅप्टन विक्रम बत्रा

    कारगिलच्या युद्धात त्यांनी १३ जम्मू म्हणजे काश्मिर रायफल्सचे नेतृत्व केले. या युद्धात त्यांनी केलेल्या अविस्मरणीय कामगिरीबद्दल त्यांचा १९९९च्या ऑगस्टमध्ये परमवीरचक्र देऊन सन्मान करण्यात आला.

      September 9, 2021


  • अच्युत केशव अभ्यंकर

    अच्युत केशव अभ्यंकर

    अच्युत अभ्यंकर यांनी किराणा घराण्याचे अध्वर्य कै.पं. फिरोझ दस्तूर यांकडून शास्त्रीय संगीताच्या प्रेमाखातर, त्याची जोपासना व प्रचाराचा विडा उचललेल्या अभ्यंकरांनी आकाशवाणी येथे उच्च श्रेणीचे कलाकार म्हणून अनेक गाण्याचे कार्यक्रम केले.

      June 5, 2017


  • चित्रकार मारिओ मिरांडा

    मुंबई सोडून ब्राझील किंवा पॅरिसला जाण्याचा विचार त्यांच्या डोक्यामध्ये असतानाच त्यांना ‘ करंट ‘ साप्ताहिकाने त्यांना पहिला ब्रेक दिला. त्यानंतर ‘ टाईम्स ‘ ने त्यांना घेतले.

      August 12, 2021


  • सुधीर राशिंगकर

    मुंबईच्या व्यावसायिक वर्तुळामध्ये सुधीर राशिंगकर यांचे नाव माहित नसलेला उद्योजक विरळाच असावा, एवढया सक्रियतेने व सक्षमतेने आपल्या उत्तुंग कारकिर्दीत, मुंबईच्या व्यावसायिक विस्तारीकरणामागे त्यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. शैक्षणीक दिवसांपासुनच त्यांच्यातील इतरांना दिपवणारी बुध्दिमत्ता, व दुसर्‍यांना सतत आपल्या खिशांत ठेविण्यासाठी लागणारी संभाषण कला त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली पाहून ते व्यावसायिक उड्डाणपट्टीवर, आपल्या यशाचे विमान लीलया उडवू शकतील, याची त्यांच्या घरच्यांना चांगलीच कल्पना होती.

      August 29, 2011


  • दामोदर गणेश पुजारे

    लाकडासारख्या कठीण वस्तूमध्ये इतकी जिवंत जादू असावी हा एक चमत्कारच! हा चमत्कार प्रत्यक्ष उतरवणारे ठाण्यातील एक प्रसिद्ध कलावंत म्हणजे दामोदर गणेश पुजारे. पुजारे ह्यांचा जन्म ११ जुलै १९३४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातला वालावलचा. पुढे त्यांनी उच्च कलाशिक्षणासाठी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला आणि १९६२ साली ते आर्ट मास्टर झाले.

      May 16, 2014


  • प्रख्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

    गिरीश कर्नाड दिग्दर्शित ‘चेलुवी’ या कन्नड सिनेमाद्वारे आपल्या करिअरला सुरुवात करणा-या सोनालीने केवळ देशांतच नव्हे, तर परदेशातही आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे.

      November 3, 2021


  • जेष्ठ नाट्यकर्मी व नाटककार सत्यदेव दुबे

    सत्यदेव दुबे यांना क्रिकेटपटू व्हायचे होते. परंतु, नाटकाकडे आकृष्ट झाले. त्यांचा जन्म १९ मार्च १९३६ रोजी मध्य प्रदेशातील बिलासपूर येथे झाला. मराठी भाषिक नसूनही त्यांनी मराठी रंगभूमीवरही आपले नाव गाजविले. भारतीय रंगभूमीवर पन्नास वर्षे वावरलेल्या दुबेंनी भारतीय रंगभूमीला अनेक वैशिष्टय़पूर्ण नाटके दिली, नाटककार दिले. नवे नाटककार घडवले. पूर्णपणे ‘नाटकमय’ होऊन दुबेंनी नाटक हाच आपला श्वास मानला. लहानपणी त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार झाले. ते उत्तर आयुष्यातही स्वत:ला संघाचे खंदे समर्थक होते. केवळ रंगभूमीचा ध्यास घेतलेले सत्यदेव दुबे हे कडवा हिंदुत्ववादी होते. ते १९५२ साली मुंबईला आले. तेव्हापासून ते या ना त्या प्रकारे मुंबईतील आणि भारतीय रंगभूमीशी निगडीत होते. दुबे यांनी रंगभूमीवरील फार मोठा काळ बघितला. त्यांनी सुरुवातीची वर्षे अल्काझी यांच्या थिएटर युनिटमध्ये काढली. त्यांना या संस्थेत विजय आनंद घेऊन गेला होता.

    दुबेंना रंगभूमीवरील जादू आवडली आणि बघता बघता ते नाटय़कर्मी झाले. त्यांनी काही काळ लिंटास या तेव्हाच्या प्रख्यात जाहिरात संस्थेत नोकरी केली होती. हा छोटासा काळ सोडला तर ते नेहमी रंगभूमीशी संबंधित राहिले. धर्मवीर भारती यांचे ‘अंधायुग’ हे नभोनाटय़ दुबे यांनी १९६२ साली रंगभूमीवर आणले. या नाटकाने त्यांना भरपूर नाव मिळवून दिले. दुसरे प्रकरण सुरू होते ते दुबे यांनी या नाटकाबद्दल लिहिलेल्या लेखाने. दुबे यांनी एके ठिकाणी नमूद केले आहे की हे नाटक १९६२ साली रंगभूमीवर येणे याला महत्त्व होते. देशावर चीनचे आक्रमण झालेले होते. दुबेंच्या प्रयत्नांमुळे हे नाटक जगभर गेले. विनोद दोशी या उद्योगपतींनी दुबेंना ताडदेव येथील वालचंद टेरेस या इमारतीचा तळमजला नाटके करण्यासाठी दिला. यामुळे दुबेंच्या आयुष्याची दिशा पक्की झाली. येथे दुबेंनी सुमारे चार वर्षे नाटके केली. १९८० च्या दशकात छबिलदास चळवळ जोरात होती. त्यात दुबेंचा सिंहाचा वाटा होता.

    या काळातील दुबेंचे महत्त्वाचे नाटक म्हणजे ‘हयवदन’. पौल यांना दिलेल्या मुलाखतीत दुबे नमूद करतात की, त्या काळी स्त्रीच्या भावविश्वाबद्दल लिहिण्याची एक लाट आली होती. ‘हयवदन’च्या आगेमागे ‘आधेअधुरे’ आले, त्याचप्रमाणे सुरेंद्र वर्माचे ‘द्रौपदी’ आले. दुबेंच्या मते ‘हयवदन’मध्ये स्त्रीच्या वासनेबद्दल जी भूमिका घेतली, ती खूप वेगळी होती. दुबेंचे १९९० च्या दशकातील बरेचसे काम पृथ्वी थिएटरमध्ये झाले. सुमारे पन्नास वर्षे दुबे भारतीय रंगभूमीशी निगडीत होते. या दरम्यान त्यांनी सुमारे पन्नास नाटके सादर केली. या दरम्यान ते पूर्ण वेळ रंगभूमीशी निगडीत होते. त्यांनी नाटकांचे दिग्दर्शन केले, नाटकांची भाषांतरे केली, प्रसंगी नाटकात भूमिका केल्या. मुख्य म्हणजे तरुण रंगकर्मीसाठी वेळोवेळी कार्यशाळा घेतल्या. आज भारतीय रंगभूमीवर कदाचित असा एकही महत्त्वाचा नट नसेल, जो कधी ना कधी दुबेंजींच्या सहवासात आला नसेल. ते अविवाहित होते. त्यांचे असंख्य शिष्यगण हेच त्यांचे गणगोत होते. अमोल पालेकर, नसिरुद्दीन शाह, अमरीश पुरी, यांच्यासारखे प्रतिभावान कलावंत त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले. मराठीत अमरिश भंडारी, मोहन भंडारी, चेतन दातार, किशोर कदम, सचित पाटील, ऋषिकेश जोशी या अभिनेत्यांबरोबरच महेश एलकुंचवार, गो. पु. देशपांडे, राजीव नाईक, शफाअत खान, चेतन दातार, संदेश कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी आदी नाटककारांना त्यांनी घडविले.

    त्यांनी मराठी-हिंदी-गुजराती रंगभूमीबरोबरच बंगाली रंगभूमीसाठीही काम केले. श्याम बेनेगल यांच्या 'भूमिका','निशांत', 'अंकुर', 'कलयुग' चित्रपटाचे पटकथा व संवादलेखनही त्यांनी केले होते. १९७८ साली सत्यदेव दुबे यांना भूमिका चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, व १९८० साली जुनून चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट संवादासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. ‘अंधा युग’, ‘आधे अधुरे’, ‘ययाती’, ‘संभोग से सन्यास तक’, ‘एवम् इंद्रजित’, ‘अंधारयात्रा’, ‘हयवदन’, ‘पगला घोडा’, ‘रस्ते’, ‘गिधाडे’, ‘शांतता कोर्ट चालू आहे’, ‘तुघलक’, ‘नाणेफेक’ यासारख्या गाजलेल्या नाटकांचे दिग्दर्शन केले होते.

    निर्मिती करण्याबरोबरच चेतन दातारकडून ‘सावल्या’ हे नाटक लिहून घेण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. सत्यदेव दुबे यांना अनेक पुरस्कार मिळाले होते. १९७२ साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार तर १९९९ साली कालिदास सन्मान, २०११ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. संगीत नाटक अकादमीनेही गौरवले. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासाचा आणि योगदानाचा दशकनिहाय आढावा घेणारा ‘सत्यदेव दुबे : ए फिफ्टी इअर्स जर्नी थ्रू थिएटर’ हा ग्रंथ संदर्भग्रंथाच्या पलीकडे जाऊन दुबे माणूस आणि नाटय़कर्मी यांचे अनेक कंगोरे उलगडून दाखवण्याचे काम करतो. शांता गोखले यांनी या पुस्तकाची रचना पाच भागांत केली आहे. पहिल्या भागात १९६० च्या दशकाची चर्चा आहे. यालाच ‘भुलाभाई मेमोरिअल इन्स्टिटय़ुटचा काळ ’असे म्हणतात.

    त्यानंतर दुसरा भाग आहे १९७० च्या दशकाबद्दल. याला ‘वालचंद टेरेसचा काळ’ असे म्हणतात. तिसरा भाग ‘छबीलदास चळवळी’चा, जी १९८० च्या दशकात बहरून आली होती. चौथ्या भागात, १९९० च्या दशकात पृथ्वी थिएटरमध्ये दुबेंजी केलेल्या कामाची चर्चा आहे. नोव्हेंबर २००८ मध्ये पृथ्वी थिएटरमध्ये दुबेंच्या कामाचे प्रदर्शन व चर्चासत्रे असा कार्यक्रम आयोजित केला होता. याची चर्चा पाचव्या भागात आहे. या प्रकारे या पुस्तकात दुबेजींच्या पन्नास वर्षाच्या कामाचा आढावा आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या कामाची चिकित्सा, त्यांच्याबद्दल अनुकूल-प्रतिकूल टीका असा भरगच्च मजकूर आणि निवडक छायाचित्रे आहेत. सत्यदेव दुबे यांचे २५ डिसेंबर २०११ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      December 26, 2017


  • निर्णयसागर पंचागचे कृष्णाजी विठ्ठल सोमण

    १९७४ मध्ये जळगाव येथे भरलेल्या ज्योतिष संमेलनाचे क. वि. सोमणशास्त्री अध्यक्ष होते. त्यावेळी केलेल्या भाषणातही त्यांनी दृकप्रत्यय गणिताच्या पंचांगाचे महत्त्व वर्णन केले.

      April 7, 2022


  • पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी

    साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव खोताचे काम करीत असत. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींनी विपुल वांगमय लिहिले आहे. कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वांगमयातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली. गुरुजींनी आपल्या सर्व लेखक समाज उद्धवासाठी केले त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणी द्वारे प्रकट केले. साने गुरुजी यांची कर्मभूमी खानदेशची. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर आणि प्रताप विद्यालयात त्यांनी अध्यापन केले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्या.मची आईचे लेखन पूर्ण केले. धुळ्यातील कारागृहात असताना त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली गीताई लिहिली. मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. "श्याामची आई‘ च्या एकपात्री प्रयोगांनी तर संस्काराची शिदोरी अधिकच घट्ट केली. गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांताप्रांतातील हेवादेवाही अद्याप नष्ट झालेला नाही. क्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधूप्रेमाचे वारे वाहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, हि मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलना मध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. मा.साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      January 3, 2017


  • आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक

    मराठीतून उच्च शास्त्रीय विषय शिकवण्याची त्यांना मोठी तळमळ होती. त्यांना कालाजंत्रीकार म्हणून ओळखत असत. मोडक यांनी रसायनशास्त्राबरोबरच पदार्थविज्ञानशास्त्र, यंत्रशास्त्र, आरोग्यशास्त्र, प्राणिशास्त्र अशा शास्त्रीय विषयांवरील पंचवीसहून अधिक पुस्तके लिहिली.

      December 2, 2021