जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
एचआयव्ही / एड्स' वरील संशोधनासाठी पुण्यात भोसरी येथे कार्यरत असलेल्या नॅशनल एडस् रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजेच राष्ट्रीय एडस् नियंत्रण संस्थेचा (नारी) इतिहास त्याचे संचालक डॉ. रमेश परांजपे यांच्याविषयी पूर्ण होऊ शकत नाही. 'एचआयव्ही' च्या विषाणूंशी लढा देणार्या शास्त्रज्ञांच्या या 'सेनापती' बद्दल...
डॉ. रमेश परांजपे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला एचआयव्ही विरोधी लढ्याचे सेनापती हा लेख पुढील पानावर वाचा.
डॉ. रमेश परांजपे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला एचआयव्ही विरोधी लढ्याचे सेनापती हा लेख वाचा.

Dr Ramesh Paranjape
November 7, 2017
जितेंद्र रघुवीर यांना आत्तापर्यत बालगंधर्व पुरस्कार, कलागौरव पुरस्कार,इंडियन मॅजीक ॲकाडमी पुरस्कार, अखिल मराठी नाट्य परिषद पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच जितेंद्र रघुवीर यांचा युनायटेड नेशन्स, भारत सरकार ऑस्टेलिया व फिजी सरकार यांनी गौरव केला आहे.
June 28, 2022
खाप्रुमामा ना त्यांची आई 'खाप्रु' असे म्हणत व तेच नाव पुढे रुढ झाले. त्यांनी संगीताचे प्रारंभिक धडे त्यांचे काका सारंगीवादक रघुवीर पर्वतकर यांचेकडुन व तबल्याचे शिक्षण चुलते हरिश्चंद्र पर्वतकर यांच्याकडून घेतले. तसेच पखवाजाचे धडे आपल्या चुलत भावाकडुन घेतले. खाप्रुजींना लयकारीची दैवी देणगी होती. दिलेल्या लयीच्या कितीहीपट लय ते वाजवून दाखवू शकत असत. तसेच एखादा तालाचा ठेका धरुन त्याची कितिही भागात विभागणी करणेहि त्यांना जमत असे. त्यांचे काही ध्वनीमुद्रण त्या काळात प्रकाशित झाले होते, १९१९ साली पं. विष्णु पलुस्कर यांनी आयोजीत केलेल्या संगीत संमेलनात त्यांनी आपली कला त्या काळच्या अग्रगण्य संगीतकारांसमोर सादर केली. त्यांच्या अद्वितीय लयकारीमुळे अनेक दिग्गज संगीतकारांनी त्यांची प्रशंसा केली.
१९३९ साली संगीतसम्राट अल्लादियाखाँ यांनी त्यांना एका समारंभात सन्मानपूर्वक 'लयभास्कर' हि पदवी दिली. तसेच गोव्यातील रसिकांकडून त्याना 'तालकंठमणि' हि पदवी देण्यात आली. त्यांना तबला, पखवाजाबरोबरच सारंगीवादन व गायन पण येत असे. त्यांनी आपले उर्वरीत आयुष्य तबला, ताल व लयशास्त्र ह्यात घालविले. लयीच्या अद्भुत दैवी देणगीमुळे ते एकाच वेळी पाच वेगवेगळ्या तालांचा ठेके धरुन त्यांना एकाच वेळी समेवर आणू शकत. उदा. डाव्या हाताने त्रिताल (१६ मात्रा), उजव्या पायाने झपताल (१० मात्रा), उजव्या हाताने धमार (१४ मात्रा), डाव्या पायाने चौताल (१२ मात्रा) व तोंडाने सवारी (१५ मात्रा) असे पाच तालाचे ठेके धरुन समेवर आणणे त्यांना सहज जमत असे. त्यांनी अनेक नविन तालांची निर्मिती केली. त्यातला त्यांच्या खास आवडीचा म्हणजे 'परब्रह्मताल' (१५.७५ पावणेसोळा मात्रा). लय त्यांच्या जीवनात इतकी भिनली होती की झोपेतसुद्धा त्यांचे हात लयीत हलत असत.
लक्ष्मण पर्वतकर यांचे ३ सप्टेंबर १९५३ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
September 3, 2017
प्रसिद्ध बासरीवादक, संगीतज्ञ, संहितालेखक, जाहिरातलेखक आणि इंग्रजी भाषेचे प्राध्यापक अजित सोमण यांचा जन्म ६ ऑगस्ट १९४७ रोजी झाला.
अजित सोमण यांचे मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषांवर प्रभुत्व होते. तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालय, तसेच स.प. महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथे इंग्रजी तसेच रानडे इन्स्टिट्यूट येथे पत्रकारिता, तर सिम्बायोसिस येथे अजित सोमण यांनी Creative writing and Mass communication अशा विषयांचे अध्यापन केले.
पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रात त्यांनी १५ वर्षांहून अधिक काळ अप्लाईड म्युझिक, म्युझिक ॲप्रीसिएशन हे विषय शिकवले. या अभ्यासक्रमासाठी पाठ्यपुस्तक म्हणून वापरल्या जाणाऱ्या 'संगीत' या पुस्तकाचे ते सहलेखक होते. सोमण यांनी लिहिलेल्या अनेक जिंगल्स व जाहिराती प्रसिद्ध झाल्या. "ऊंचे लोग ऊंची पसंद", "चवीनं खाणार त्याला केप्र देणार", " या वर्षी पु.लंची दिवाळी तुमच्या घरी ", "सकाळ घरात आला की, आजोबांपासून नातवापर्यंत सासूपासून सुनेपर्यंत सगळ्यांचा स्वार्थ एकदम जागा होतो", " प्रत्येक कुटुंबासाठी-कुटुंबातील प्रत्येकासाठी सकाळ" या काही त्यांच्या गाजलेल्या जाहिराती आहेत.
अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.
June 4, 2022
८६ वर्षापूर्वी आज पहिला मराठी बोलपट दाखविला गेला. ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रभात फिल्म कंपनी चा ’अयोध्येचा राजा’ हा बोलपट मुंबईच्या ’कृष्णा’ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. हा मराठीत बनलेला पहिला बोलपट आहे. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शिलेल्या या चित्रपटाची निर्मिती प्रभात फिल्म कंपनीने केली. गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, बाबूराव पेंढारकर, मास्टर विनायक यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका केल्या होत्या. प्रभात फिल्म कंपनी ही महाराष्ट्रातील व भारतातील बोलपट बनवणाऱ्या चित्रपट-निर्मिती करणार्या् कंपन्यांपैकी एक होती. मराठी चित्रपटसृष्टीत “प्रभात फिल्म कंपनी” च्या बहुमूल्य योगदाना सोबतच तिचं अतिउच्च असं स्थान आहे. प्रभातच्या चित्रपटांमध्ये दर्जात्मक प्रयोगांसोबतच तांत्रिक गुणवत्ता या बाबी महत्वपूर्ण ठरल्या. “अयोध्येचा राजा” या पहिल्या बोलपटात अयोध्येतील राजा हरिश्चंद्र यांच्या सत्यवादी आणि स्वत:च्या शब्दावर ठाम असणार्याय वृत्तीचं चित्रण यामध्ये करण्यात आलं आहे. गोविंदराव टेंबे, मास्टर विनायक, दुर्गा खोटे, बाबुराव पेंढारकर अशा कलाकार मंडळींच्या सहज-सुंदर अभिनयाने तयार झालेली ही कलाकृती म्हणजे मराठी चित्रपट विश्वातलं “मानाचं सुवर्ण पान” म्हणावं लागेल.
“अयोध्येचा राजा” या चित्रपटाने दुर्गा खोटें यांच्या रुपाने भारतातील बोलपटासाठी पहिली अभिनेत्री मिळाली. दुर्गा केळेकर आणि दुर्गा शिरोडकर अशा दुर्गा नावाच्या दोन नट्या काम करत असल्यामुळे भारत मुव्हीटोनचे मालक माणिकलाल शेठ यांनी दुर्गा केळेकर यांचे ‘‘ज्योत्स्ना” असे नामकरण केले. हीच ज्योत्स्ना पुढे ज्योत्स्ना भोळे म्हणून प्रसिद्धिला आल्या. पुढे हिंदीमध्ये “अयोध्ये का राजा” ह्या नावाने सुद्धा हा सिनेमा प्रदर्शित झाला. मराठी सिनेमाचा जेव्हा जेव्हा उल्लेख येइल त्या त्या वेळेस 'प्रभात फ़िल्म ' चे नाव प्रामुख्याने घेतले जाईल. मराठी चित्रपट-दिग्दर्शक व्ही. शांताराम, विष्णुपंत दामले, शेख फत्तेलाल, केशवराव धायबर आणि सीताराम बी. कुलकर्णी यांनी मिळून १९२९ साली प्रभात फिल्म कंपनी स्थापली. १९३२ साली कंपनीने आपले मुख्यालय पुण्यास हलवले. १९२९ ते १९४९ या कालखंडात प्रभात फिल्म कंपनीने २० मराठी, २९ हिंदी आणि २ तमीळ भाषीय चित्रपटांची निर्मिती केली. मात्र आर्थिक गणित बिघडल्यामुळे १९५२ साली प्रभात स्टुडिओसह सर्व मालमत्ता लिलावात काढावी लागून कंपनी बंद पडली. २१ सप्टेंबर १९३४ रोजी प्रभात फिल्म कंपनीने पुण्यातले प्रभात टॉकीज, आता २०१४ साली ज्या जागेवर आहे ती जागा सरदार किबे यांच्याकडून भाडेपट्ट्यावर घेतली. आणि तिथे थिएटर बांधले.
http://www.prabhatfilm.com/home.htm
अयोध्येचा राजा
१९३२
पौराणिक
३५ मिमी/कृष्णधवल/१३१४२ फूट/१२६ मिनिटे/ प्रमाणपत्र क्र. बी११०६०/ ६-२-३२
निर्मिती संस्था :प्रभात फिल्म कंपनी
दिग्दर्शक :व्ही. शांताराम
कथा :ना. वि. कुलकर्णी
संवाद :ना. वि. कुलकर्णी
संगीत :गोविंदराव टेंबे
छायालेखन :केशवराव धायबर
संकलक :व्ही. शांताराम
गीतलेखन :गोविंदराव टेंबे
कला :साहेबमामा फत्तेलाल
वेषभूषा :एच्.एस्.काकडे
गीत मुद्रण :विष्णुपंत दामले
ध्वनिमुद्रक :विष्णुपंत दामले
निर्मिती स्थळ :कोल्हापूर
रसायन शाळा :प्रभात फिल्म कंपनी
कलाकार :कुमार दिगंबर, गोविंदराव टेंबे, दुर्गा खोटे, निंबाळकर, बाबूराव पेंढारकर, बुवासाहेब, मा. विनायक, मानाजीराव माने, शंकरराव भोसले
गीते :१) पंढरी माहेर विठोबा माऊली, २) पंढरीसी जावे ऐसे, ३) चला पंढरीसी जाऊ, ४) असे कशी कुदशा, ५) नामीं जे तरले, ६) निराधार निराभिमान, ७) पुरवि माझी आस, ८) प्रियजन भक्ता समान, ९) जाऊ म्हणता पंढरी, १०) पडता जडभारी दासी, ११) पुनित भावना, १२) अवघी हे पंढरी, १३) शेवटची विंनती ऐका, १४) सखूसाठी सखू बनलो, १५) मधूसूदना हे माधवा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
February 6, 2019
सरुवातीला शिवसेना पक्षातून आमदार त्यानंतर युती सरकारच्या कार्यकाळात कॅबिनेटमंत्रीपद, पुढे युतीने महाराष्ट्रातील सत्ता गमावल्यानंतर १९९९ साली शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करुन ठाणे व नवीमुंबई भागात या पक्षाचे स्थान बळकट करण्यात नाईक यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. १९९९ साली राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता आल्यावर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व विविध मंत्रीपद गणेश नाईक यांनी भुषविली आहेत. त्यानंतर २००९ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक प्रथमत: खासदार म्हणुन निवडून आले.
त्यांची राजकीय कारकीर्द त्यांच्या दुरदृष्टीमुळे वा माणसे ओळखण्याच्या त्यांच्या विलक्षण कसबामुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यांमध्ये भरणारी अशीच राहिली आहे. आपल्या कार्यकाळात नाईक यांनी जव्हार, मोखाडा, कल्याण, उल्हासनगर, पालघर, वसई, मिरा-भाईंदर, विक्रमगड, ठाणे शहर व नवी मुंबई अशा अनेक ठिकाणी जनता दरबार आयोजित करून सामान्य जनतेचे मुलभूत प्रश्न व असंख्य समस्यांना नाईक यांनी मोठ्या कौशल्याने सोडवले होते.
कामगार मंत्री असताना अनेक गिरणी कामगारांना न्याय, बालकामगारमुक्त महाराष्ट्र, बालकामगारांचे पुनर्वसन, राज्यातील असंख्य सुरक्षा कामगारांना वेतन हमी, असंघटित कामगारांसाठी समान वेतनाची तरतुद, कंत्राटी कामगारांच्या समस्या अशा प्रकारचे कामगार हिताचे निर्णय त्यांनी घेतले होते. विशेष म्हणजे कामगार मंत्री असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राट कामगारांना पालिकेत चतुर्थ श्रेणी कर्मचार्यांप्रमाणे वेतन देण्याची तरतूद करून त्यांनी आपल्या देशापुढे माणुसकीचे अनोखे उदाहरण सादर केले होते. पर्यावरण व वनमंत्री असताना वन कर्मचार्यांना पाचवा वेतन आयोग लागू करणाचे, व वन्य जीवांपासून संरक्षण करण्याकरिता लागणारी शस्त्रे त्यांना पुरविण्याचे काम त्यांच्या पाठपुराव्यामुळे साकार झाले होते. तसेच उत्पादन शुल्क मंत्री म्हणून देखील त्यांनी राज्याच्या महसुलामध्ये मोठी भर घातली होती. भूगर्भातील उष्णतेवर तयार करण्यात येणरा विद्युतप्रकल्प ठाणे जिल्ह्यात सर्वप्रथम उभारण्यात यावा हे त्यांचे स्वप्न त्यांच्या वेगळेपणाविषयी बरेच काही सांगून जाते.
गणेश नाईक यांचा राजकारणाचा व समाजकारणाचा वारसा त्यांचे दोन्ही पुत्र म्हणजे नवीमुंबईचे महापौर सागर नाईक व आमदार संजीव नाईक हे चालवत आहे. नवीमुंबई म्हणजे नाईक मुंबई अशी ओळख निर्माण ते यशस्वी झाले असा सूर उपरोधक पणे तर कधी मिश्कीलरित्या माध्यामातुन किंवा जनतेतुन निघत असतो.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत गणेश नाईक यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता.
January 12, 2015
शंकरबापू आपेगावकर यांचा जन्म अंबाजोगाई तालुक्यातल्या आपेगाव या छोट्या गावात झाला. लहानपणापासूनच त्यांना पखवाज वाजवायचा नाद होता.
शंकरबापू आपेगावकर हे राष्ट्रीय ख्यातीचे पखवाजवादक होते. ते वारकरी प्रकारचे सुद्धा पखवाजवादन करीत. त्यांचा १९८६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव केला होता.
शंकरबापू आपेगावकर यांचे मूळ नाव शंकर शिंदे होते.
शंकरबापू आपेगावकर यांचा मुलगा उद्धवबापू आपेगावकर हे ही पखवाजवादक आहे.
शंकरबापू आपेगावकर यांचे निधन ९ जानेवारी २००४ रोजी झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ. इंटरनेट
January 9, 2018
श्री शैलेश पालकर हे पत्रकार असून रायगड आणि सिंधूदुर्ग या जिल्ह्यांमधील विविध विषयांवर लिखाण करत असतात.
September 13, 2011
शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. शिवांगी कोल्हापुरे या गायिका असून हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे त्यांचे पती. पंढरीनाथ कोल्हापुरे हे अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आजोबा.
July 4, 2022
दलित चळवळीतील आघाडीचे कार्यकर्ते आणि लेखक, विचारवंत प्रा. अरुण कांबळे हे आघाडीचे आक्रमक दलित नेते म्हणून समस्त महाराष्ट्राला परिचित असलेले दलित पॅंथरचे अध्यक्ष आणि संस्थापक सदस्य होते.
July 27, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti