(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे संस्थापक केसरी पाटील

    केसरी टूर्स ची पहिली सहल राजस्थानला गेली होती. ज्यामध्ये तेरा पर्यटक होते. मध्यमवर्गीय आणि उच्च गध्यमवर्गीय अशा दोन स्तरांतले सर्व धर्मीय, देश-विदेशातील पर्यटक त्यांच्याबरोबर प्रवास करत असून पर्यटकांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आणि प्रेमामुळे ते अधिकाधिक प्रगती करत आहेत. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या जडणघडणीत मोलाचा वाटा असलेल्या वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील व झेलम चौबळ या त्यांच्या कन्या होत. २०१३ मध्ये केसरी टूर्स मधून वीणा पाटील बाहेर पडल्या व त्यांनी आपली कंपनी वीणा वर्ल्ड स्थापन केली. केसरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स ला ISO 9001-2000 आणि OHSAS18000-2007 ही प्रमाणपत्रे मिळाली होती. ही दोन्ही प्रमाणपत्रे मिळवणारी केरारी ही जगातील पहीलीच पर्यटन कंपनी होती.

      April 11, 2022


  • पत्रकार निखील वागळे

    २००७ साली निखिल वागळे हे नेटवर्क १८ च्या IBN लोकमत या चॅनलचे संपादक झाले. २००७ ते २०१४ पर्यंत निखिल वागळे यांनी चॅनेल च्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक वादग्रस्त मुद्द्यांना हात घातला. या दरम्यान त्यांचा ‘आजचा सवाल’ हा डिबेट शो त्यांच्या आक्रमक पणामुळे चांगलाच चर्चेत राहिला पण त्यांची ही आक्रमकता कधी कधी उद्धट रूप धारण करते असा आरोप सुद्धा त्यांच्यावर होत राहिला.

      April 23, 2022


  • ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुम

    तबस्सुम या जरी अभिनेत्री म्हणून आपण ओळखत असलो तरी त्या दूरदर्शन वरून १९७२ ते १९९३ सादर झालेल्या फूल खिले हैं गुलशन गुलशन या कार्यक्रमामुळे घराघरात पोहचल्या.

      July 9, 2017


  • आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच डिकी बर्ड

    आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच डिकी बर्ड

    डिकी बर्ड उजव्या हाताने गोलंदाजी करत असत. ते राईट आर्म ऑफ ब्रेक गोलंदाज होते. १९५६-५९ यॉर्कशायर कडून ते पहिला प्रथम श्रेणीचा सामना खेळले. १२ ऑगस्ट १९६४ रोजी अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळले. १९७० मध्ये अंपायर म्हणून त्यांनी आपले करिअर सुरु केले. डिकी बर्ड हे क्रिकेटचा एवढ्या वर्षांचा काळ बघितलेला एकमेव जिवंत माणूस असावेत.

      April 19, 2022


  • अशोक शंकरराव चव्हाण

    राजकारणाचा वारसा वडिलांकडून लाभलेले पण स्वकर्तृत्वाच्या आधारे यशाचे शिखर गाठणारे सक्षम नेतृत्व.

      September 3, 2010


  • फिनोलेक्सचे उद्योगसमूहाचे संस्थापक-अध्यक्ष प्रल्हाद पी छाब्रिया

    भारत आणि इस्रायल यांच्या संयुक्त भागीदारीतून फिनोलेक्स प्लॅसन लि. ही कंपनी त्यांनी स्थापन केली. इस्रायलबरोबर उद्योगाची भागीदारी करणारी फिनोलेक्स ही देशातील पहिली कंपनी ठरली.

      March 12, 2022


  • सुभाष स नाईक

    सुभाष नाईक हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. ते विविध विषयांवर विपुल लेखन करतात. ते मराठीसृष्टीचे एक मुख्य लेखक असून मराठीसृष्टीविषयी प्रचंड आत्मियता असलेले आधारस्तंभ आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि कवितासंग्रह प्रकाशित झाले आहेत.

      October 7, 2019


  • प्रयोगशील शेतकरी राजेंद्र पवार

    प्रयोगशील शेतकरी राजेंद्र पवार यांनी बारामती अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून जागितक पातळीवरील प्रयोगशील शेती बारामतीत केली आहे. कृषी, शैक्षणिक, औद्योगिक, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात नवनव्या संकल्पना त्यांनी राबविलेल्या आजपर्यंत दिसून आल्या आहेत. राजकारणात नसले तरी त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे.

      January 14, 2024


  • सुपर स्टार अभिनेते भरत जाधव

    मराठीतील किंग ऑफ कॉमेडी पर्सन व मराठी चित्रपट सृष्टीतील सुपर स्टार अभिनेते भरत जाधव यांचा जन्म १२ डिसेंबर १९७३ रोजी झाला.

    भरत जाधव हे मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रातील एक अग्रगण्य नाव. भरत जाधवचा जन्म लालबाग – परळ परिसरात झाला. तिथेच भरत जाधवचं बालपण गेले. भरत जाधव यांनी शाहिर साबळे यांच्या मार्गदर्शना खाली "लोकधारा" मधून आपली अभिनय यात्रा सुरु केली.

    भरत जाधव यांनी आपल्या आजवरच्या कारकिर्दीत जवळपास ८५ चित्रपट, आठ दूरचित्रवाणी मालिका केल्या तरी नाटकांमुळे ते अधिक लक्षात राहिला आहेत. गिरणी कामगारांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे सीरियस ‘अधांतर’ नाटक असो किंवा ‘ऑल द बेस्ट’, ‘श्रीमंत दामोदरपंत’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘ढॅण्ट ढॅण’ आणि ‘सही रे सही’ ही कॉमेडी नाटके. भरत जाधव यांची भूमिका नेहमीच ‘फ्रेश’ वाटली. पूर्वीचे ‘सही रे सही’ आणि आताचे ‘पुन्हा सही रे सही’ नाटक त्याच्या नाटय़ कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरले. या नाटकाचे हजारो प्रयोग झालेत.

    तब्बल १५ वर्षे हे नाटक सलगपणे सुरू आहे. ‘सही रे सही’ या नाटकात भरत जाधवने गलगले, कुरियर घेण्यासाठी आलेला माणूस, श्रीमंत म्हातारा व वेडसर मुलगा अशा चार भूमिका केल्या आहेत. या नाटकाचे एका वर्षात ५६५ प्रयोग झाले होते. त्यासाठी त्याची नोंद गिनीज बुकमध्ये झाली होती. ‘सही रे सही’ या नाटकाचे ‘अमे लई गया, तमे रही गया’ या नावाने गुजराती भाषेत प्रयोग झाले. त्यात शर्मन जोशीने प्रमुख भूमिका केली होती. गुजराती ‘सही रे सही’ नाटकाचे २० महिन्यांत ३५० प्रयोग झाले होते. एखाद्या नाटकाचे इतके प्रयोग होणे, हे गुजराती रंगभूमीवर प्रथम घडले होते.

    ‘सही रे सही’ नाटकाचे ‘हम ले गये, तुम रह गये’ या नावाने हिंदीत भाषांतर झाले. हिंदी नाटकात जावेद जाफरीने प्रमुख भूमिका साकारली होती. भरत जाधव निर्मिती क्षेत्रात असून 'भरत जाधव एन्टरटेन्मेंट' या नावाने कार्यरत आहे. मराठी चित्रपटसृष्टी बॉलीवूडइतकी श्रीमंत नसली तरी मराठीतला सुपस्टार भरत जाधवने सर्वप्रथम स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन विकत घेऊन आद्य नटाचा मान मिळवला आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

    भरत जाधव यांची प्रमुख नाटके- सही रे सही, श्रीमंत दामोदर पंत, ऑल द बेस्ट, आमच्या सारखे आम्हीच
    भरत जाधव यांची चित्रपट- श्रीमंत दामोदर पंत, खो खो, फेकमफाक, नो एंट्री पुढे धोका आहे, डावपेच, क्षणभर विश्रांती, रिंगा रिंगा, शिक्षणाच्या आयचा घो, जावई बापू जिंदाबाद, गलगले निघाले, साडे माडे तीन, मुंबईचा डबेवाला, मुक्काम पोस्ट लंडन, हय़ांचा काही नेम नाही, बकुळा नामदेव घोटाळे, नाना मामा, माझा नवरा तुझी बायको, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, चालू नवरा भोळी बायको, जत्रा, खबरदार, पछाडलेला, सरीवर सरी, हाऊसफुल्ल, नव-याची कमाल, बायकोची धमाल, खतरनाक, वास्तव, हसा चकटफू.

      October 29, 2019


  • हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते ब्रॅड पिट

    काही वर्षे अभिनय केल्यावर, त्याने जेनिफर एनिस्टन आणि ब्रॅड ग्रे यांच्या सहकार्याने प्लॅन बी एंटरटेनमेंट या प्रॉडक्शन हाऊसची स्थापना केली. या प्रॉडक्शन हाऊसचा पहिला चित्रपट ‘ट्रॉय’ २००४ मध्ये प्रदर्शित झाला होता. आज ‘प्लॅन बी’ एन्टरटेन्मेंट ही एक अतिशय यशस्वी प्रॉडक्शन कंपनी आहे.

      December 18, 2021