(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • स्वातंत्र्य चळवळीचे इतिहासकार – वसंत गोविंद पोतदार

    वसंत गोविंद पोतदार यांना संगीत दिग्दर्शक सी.रामचंद्र यांनी १९६२ साली स्वतःचे सहाय्यक म्हणून काम करण्यासाठी मुंबईत आणले.पु.ल. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोतदार यांनी ‘वंदे मातरम्’च्या क्रांतिगाथेवर भारतभर हिंडून एकपात्री प्रयोग केले.

      September 8, 2023


  • गोपाल नीलकंठ दांडेकर

      December 15, 2010


  • जेष्ठ किराणा घराण्याच्या गायिका, गंगूबाई हनगळ

    “कन्नड कोकिळा" अशी गंगूबाई हनगळ यांची ओळख होती, त्यांचे वडील चिक्कूराव नाडगीर व्यवसायाने वकील होते. त्यांची आई अंबाबाई कर्नाटकी पद्धतीचे गाण छान गात असे. त्यांचा जन्म ५ मार्च १९१३ रोजी धारवाड येथे झाला. पण गंगूबाईंना मात्र उत्तर हिंदुस्थानी संगीतच जास्त आवडे. गंगुबाईंचा कल पाहून त्यांच्या आईनेही संगीत क्षेत्रात त्यांची प्रगती व्हावी म्हणून खूप मेहनत घेतली. गंगूबाईंच पाळण्यातील नाव गांधारी अस होत. त्यांच्या आईच्या आईचे 'गंगव्वा' होते.या नावातून गंगू हे स्वतःच नाव तर 'हनगल' हे गावाच नाव आडनाव म्हणून त्यांनी स्वीकारले होते. त्यांचे शालेय शिक्षण फक्त पाचवीपर्यंत झाले होते. बाकी पुढची सारी वर्षे संगीतातच त्यांनी खर्ची घातली. सोळाव्या वर्षी त्यांचे गुरुराव कौलगी या वकीलाशी लग्न झाले. १९३७ पासून सवाई गंधर्वानी कुंदगोळ या हुबळीपासूनच्या जवळच्या गावात त्यांना संगीत शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यांच्या घरी जाऊन गंगुबाई शिकत होत्या, त्या वेळी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी तेथे दुसरे सहाध्यायी होते. नंतर ते गंगुबाईंचे गुरुबंधू झाले. १९३८ च्या नंतरच्या काळात गंगूबाईंनी सर्व महत्त्वाच्या संगीतपरिषदा गाजवल्याच; पण परदेशातही कार्यक्रम करून रसिकांना मंत्रमुग्ध केले. तरुणपणी उंच टिपेला जाऊन भिडणारा गंगूबाई हनगळ यांचा आवाज घशाच्या विकारवरील उपचारात १९५५ साली पुरुषी झाला. एकंदरीत त्यांच्या गाण्यात पुरुषी लकबीच जास्त होत्या. त्यांना गमकाच्या अंगाने गायला खूप आवडे; जे स्त्री गायिका सहसा गात नसत. नेहमी डावा हात कानावर दाबून उजवा हात पुढे पसरून गाण्याची त्यांची एक विशिष्ट लबक होती. गाताना त्यांचा मुद्रा अभिनय, आणि हाताच्या हालचाली यामुळे त्यांचे गाणे अधिक खुलत असे.

    गंगुबाई मुळच्या किराणा घराण्याची गायकी शिकल्या पण इतर घराणातल्या व गवयांच्या गाण्यातल्या त्यांना आवडलेल्या गोष्टी त्यांनी घेतल्या व किराणा घराण्याच्या चौकटीत आणून बसविल्या. हिराबाई बडोदेकर या त्यांच्या आदर्श होत्या. १९३२ च्या सुमारास मुंबईतील मैफलीत ज्येष्ठ गायिका मेनका शिरोडकर, जद्दनबाई (अभिनेत्री नर्गिसच्या आई), पार्श्वयगायक के. एल. सैगल यांच्यासारख्या दिग्गजांनी गंगूबाईंचे गाणे ऐकून आनंद व्यक्त केला होता. याच साली एचएमव्हीने त्यांच्या गांधारी हनगल या नावाने बारा गाण्यांची ध्वनिमुद्रिका काढली. बाबूराव पेंढारकर यांच्या "विजयाची लग्ने' या चित्रपटातही त्या गायिल्या होत्या. सवाई गंधर्व यांच्याकडे रीतसर शिक्षणा नंतर ख्यालगायिका हीच त्यांची ओळख बनली. १९३२ ते ३५ या काळात गंगूबाईनी "गांधारी हनगल' या नावाने जवळ जवळ साठेक गाणी ध्वनि मुद्रीत केली.

    मिया मल्हार, खंबायती, जोगिया, मालकंस, अडाणा, शुद्धसारंग, मुलतानी, शंकरा, हिंडोल, बागेश्री, देस, मांड, दुर्गा, बहार, भूपाली, बिहाग, पूरिया, कामोद, भैरवी, अशा विविध रागातल्या तीन साडेतीन मिनिटाच्या ध्वनिमुद्रिका त्यांनी दिल्या. शास्त्रीय संगिताबरोबरच ठुंबरी, भावगीत, भक्तीगीत व गझल गायानाच्याही त्यांच्या ध्वनिमुद्रिका आहेत. त्यांनी मुलांसाठी गायलेली गाणी विशेष गाजली. मराठी भावगीतांच्या इतिहासातील पहिली युगलगीत विख्यात गायक जी. एन जोशी व गंगूबाई हनगळ यांची आहेत. गंगूबाई जलसेही करत असत. रेडिओ व गणपती उत्सवातही त्यांची गाणी होत असत. गाण्यावर विलक्षण प्रेम करणाऱ्या गंगूबई हनगल यांना अनेक पदव्यांनी गौरविले गेले. हुबळी येथे त्यांच्या नातवाने त्यांच्या स्मरणार्थ 'स्मरण मंदिर' नावाचे एक संग्रहालय उभे केले आहे.त्यात त्यांची छायाचित्र, ध्वनिमुद्रिका, तानपुरे पहायला मिळतात.

    गंगूबाई कलाकार म्हणून फार मोठ्या होत्याच; पण एक माणूस, विचारी नागरीक म्हणूनही थोर होत्या. आपल्या जीवनातल्या अनेक आठवणी 'दि साँग ऑफ माय लाईफ' नावाच्या पुस्तकात लिहिल्या आहेत. भारत सरकारने गंगूबाई हनगळ त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी अलंकृत केले होते. त्यांना पन्नासहून अधिक पुरस्कार मिळाले होते. त्यात संगीत नाटक अकादमी पुरस्कार, चार मानद डॉक्टरेट, २४ पुरस्कार यांचा समावेश आहे. किमान नऊवेळा पंतप्रधान व पाचवेळा राष्ट्रपतींकडून त्यांचा खास गौरव झाला होता. फक्त पाचवी शिकलेल्या गंगूबाईंनी संगीताच्या मानद प्राध्यापिका म्हणून काम केले. १९९२ ते १९९४ त्या कर्नाटकाच्या विधान परिषदेच्या सदस्या होत्या. गंगूबाई हनगळ यांचे २१ जुलै २००९ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      March 5, 2019


  • गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर

    मोगुबाई कुर्डीकर या किशोरी अमोणकर यांचा मातोश्री. त्यांचा जन्म १५ जुलै १९०४ रोजी झाला.अत्रौली (जयपूर) घराण्याचे अत्यंत कठीण गायकीची महाराष्ट्रातील अनेक अभ्यास केला गेला आहे, पण ही परंपरा सर्वात चागल्या गायीका म्हणुन मान गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकर यांना जातो. विदुषी मोगुबाई कुर्डीकर त्या वेळच्या परंपरेच्या मानाने उदारमतवादी होत्या. दुसऱ्या घराण्याचे गाणे शिकवण्यासाठी त्यांनी ताईंना अन्य गुरुजनांकडे जाण्याचे उत्तेजन दिले. जरी केसरबाई यांच्या प्रति मोगुबाई कुर्डीकर ची सांगीतिक स्पर्धा होती, तरीही मोगुबाई कुर्डीकर नी किशोरीताईंना केसरबाईंकडे शिकायला पाठवले. दुर्दैवाने काही कारणामुळे हे शिक्षण झाले नाही. ताईंना अन्यहि काही गुरु होते. मोहनराव पालेकरांची ताईंना काही वर्षे तालीम होती.त्याच्या शिष्य, शिष्या पैकी पद्मा तळवलकर, कमल तांबे , वामनराव देशपांडे, सुहासिनी मुळगावकर, बबनराव हळदणकर, अरुण द्रविड, व मा.किशोरी अमोणकर हे आहेत. विदुषी मोगुबाई कुर्डीकर या रागांचे भाव प्रकट करणार्या स्वर व राग वैशिष्ट्यांचे विशेष महत्त्व लहानपणी किशोरीताईंना वारंवार समजावून सांगत असत. जयपूर घराण्याची गायकी ही आकारयुक्त असते. आकाराच्या स्वरूपात स्वरांचे अत्युच्च स्वरूप प्रकट होत असते. स्वरांच्या बिंदूचे किरण किंवा प्रकटणारी आभा किती गहन व खोल जाते, जयपूर घराण्यात शिकवताना रागांची नावे सांगितली जात नाहीत. मा.मोगुबाई कुर्डीकर पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मा.मोगुबाई कुर्डीकर यांचे १० फेब्रुवारी २००१ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ.इंटरनेट

      July 17, 2017


  • यत्न तोची देव जाणावा

    १९९२ साली जॉन कोयुम नावाचा १६ वर्षांचा मुलगा युक्रेममधून त्याच्या आई व आजीबरोबर अमेरिकेत कॅलिफोर्नियाधील माऊंटनव्हु या गावी आला तो आपली गरीबी व दारिद्र्य घेऊनच. त्याने ग्रोसरी स्टोअरमध्ये ‘झाडुवाला’ म्हणून काम करायला सुरवात केली तर त्याच्या आईने बेबी सिटर म्हणून काम करायला सुरवात केली. घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची होती. त्यामूळे ‘सोशल सपोर्ट प्रोग्रॅम’ च्या आधारे ही फॅमिली कशी बशी तग धरून राहीली.

    तो 18 वर्षांचा झाला आणि त्याला कॉंप्युटर प्रोग्रॅमींग आणि नेटवर्कींगमध्ये रस वाटू लागला. पण पुस्तके विकत घेण्यापुरतेही पैसे नसायचे. त्याने पुस्तकाच्या दुकानातून जुनी पुस्तके उधारीवर आणून अभ्यास करायला सुरवात केली. अभ्यास झाला की तो आणलेली जुनी पुस्तके दुकानदाराला परत करायचा. त्याचा इंटरेस्ट वाढू लागला तेव्हा त्याने सॅन ओजे युनिव्हर्सिटींमध्ये ऍडमीशन घेतली. त्याच वेळी एका सॉफ्टवेअर कंपनीत सिक्युरिटी टेस्टर म्हणून काम करायला सुरवात केली. दिवसभर कॉलेज व रात्री नोकरी असे त्याचे जिवनचक्र सुरू झाले.

    1997 साली त्याला याहूमध्ये नोकरी मिळाली. त्याने 9 वर्षे नोकरी केली. त्याचवेळी त्याची ओळख ब्रॅयन ऍक्टन या तरुणाबरोबर झाली. लोकांना उपयोगी पडेल असे एखादे कॉम्युटर ऍप्लिकेशन तयार करण्याची कल्पना त्याच्या डोक्यात आली. त्याने असे ऍप्लिकेशन तयार पण केले. याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटल्याने त्याने व त्याच्या मित्राने कंपनी सोडली व स्वतःची कंपनी स्थापन केली.

    पण त्याचा हा प्रयोग संपुर्ण फसला. त्याचे ऍप्लिकेशन काही लोकांना आवडले नाही. नोकरी नाही, पैसे नाहीत, धंदा नीट चालत नाही अशी त्याची अवस्था झाली. म्हणून त्याने परत नोकरी शोधायला सुरवात केली. त्याने फेसबूक मध्ये अर्ज केला. त्याला मुलाखतीला बोलावणे आले पण त्याला ‘रिजेक्ट’ करून परत पाठवले.

    जानेवारी 2009 मध्ये त्याने आयफोन विकत घेतला आणि त्याच्या लक्षात आले की यामूळे अनेक ऍप्लिकेशनसाठी मोठे मार्केट खुले झाले आहे. त्याने चार दिवसातच स्मार्ट फोनसाठी एक ऍप्लिकेशन तयार केले व बाजारात आणले. अल्पावधीतच हे ऍप्लिकेशन लोकप्रीय झाले व फेसबुकच्या मार्क झुकेरबर्गच्या कानावर याची माहीती पोचली. त्याने जॉन आणि ब्रायनला भेटायला बोलावले. फेब्रुवारी 2014 मध्ये फेसबूकने ही कंपनी 1.9 मिलीयन डॉलर्सला ( म्हणजे 1 कोटी 90 लाख डॉलर्स= 123 कोटी रुपये) विकत घेतली व ब्रायनला बोर्ड ऑफ डायरेक्टर्समध्ये घेतले. ज्या फेसबूकने ब्रायनला नोकरीसाठी ‘रिजेक्ट’ केले होते त्याच कंपनीनीने त्याला डायरेक्टर म्हणून नियुक्त केले.

    या ऍप्लिकेशनचे नाव आहे ‘व्हॉट्स अप’

    तात्पर्य -

    यत्न तोची देव जाणावा. प्रयत्न कधी सोडू नये. प्रयात्नांती परमेश्वर या म्हणीवर विश्वास ठेवावा.

    अर्थात असे करायचे की नाही हे तुमचे तुम्हीच ठरवायचे!

    -- उल्हास हरी जोशी
    मोः-9226846631/ 8308462259

      October 10, 2016


  • रामचंद्र भिकाजी जोशी (Jr.)

    प्रवासवर्णनकार, समीक्षक रामचंद्र भिकाजी जोशी यांचा जन्म जुलै १९०३ मध्ये झाला.

    मजल दरमजल, वाटचाल आदी त्यांची स्थलवर्णनात्मक पुस्तके. काचेचे कवच, झम्मत हे त्यांचे कथासंग्रह तर “वाताहत” ही कादंबरी. “सोन्याचा उंबरठा” हे व्यक्तिचित्रणपर पुस्तक तर “साठवणी” हे स्वत:च्या जीवनातील आठवणींचे पुस्तक म्हणजे त्यांचे आत्मचरित्र होय.

    #Ramchandra Bhikaji Joshi (Jr)

      December 9, 2016


  • जर्मनीचा हुकूमशहा ॲ‍डॉल्फ हिटलर

    चित्रे काढून अगर प्रारूपकाराचे (ड्राफ्ट्समन) काम करून तो जगत होता. ह्याच काळात हिटलरचा श्रमजीवी वर्गाशी संपर्क आला. ह्या वर्गाविषयी त्याला सहानुभूती वाटण्याऐवजी घृणा उत्पन्न झाली. साम्यवादविरोध तो येथेच शिकला. त्याचप्रमाणे त्यांचा ज्यूद्वेषही याच वेळी जागृत झाला. ज्यू लोकांच्या पापाचा इतिहास वाचून त्यांनी आपल्या ज्यूद्वेषाचा पाया बळकट केला. लोकशाही मार्गाचा अवलंब करणे हेही मूर्खपणाचे आहे, असे त्याचे मत बनले. हुकूमशाही सर्वश्रेष्ठ आहे हे पायाभूत सत्य हिटलर व्हिएन्ना येथेच शिकला.

      April 20, 2022


  • जयसिंग चव्हाण

    नाट्यनिर्माता म्हणून सत्तर ते ऐंशीच्या दशकात जे रंगकर्मी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून उदयाला आले आणि आपला छोटासा का होईना पण गडद ठसा उमटवून गेले, त्यात जयसिंग चव्हाण यांचे नाव प्रामुख्याने घ्यावे लागेल.

      April 19, 2011


  • महाकवी कालिदास दिन

    महकवी कालिदास यांचे वाङमय प्रसिद्ध असले, तरीदेखील त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल निश्चित माहिती उपलब्ध नाही. त्यांच्याबद्दल एक लोककथेनुसार अशी आख्यायिका आहे की, विद्योत्तमा नावाच्या एका राजकुुमारीने जो तिला शास्त्रार्थात हरवेल त्याच्याशी लग्न करायचे ठरवले होते. राज्यातील सर्व विद्वानांना ती हरवते. तिचा सूड उगवण्यासाठी राज्यातील सर्वात मूर्ख व्यक्तीचा शोध घेऊन, त्याला जिंकवून तिचा विवाह लावून दिला जातो. कालांतराने हे जेव्हा तिला कळते तेव्हा ती व्यक्तीचा अपमान करते. ती म्हणते, ‘अस्ति कश्चित् वाग्‌विशेषः? आपल्या वाणीमध्ये काही विशेषत: आहे?’ राजकन्या रागात त्या व्यक्तीला हाकलून देते.

      July 11, 2021


  • गायिका अंजनीबाई मालपेकर

    अंजनीबाई मालपेकर भेंडीबाजार घराण्याच्या सुप्रसिध्द गायिका होत्या. त्यांचा जन्म २२ एप्रिल १८८३ रोजी झाला. अंजनीबाई मालपेकर यांनी नजीरखाँ व खादिमा, हुसेनखाँ या तीन भावांच्या कडून संगीताचे शिक्षण घेतले. राग `यमन’ हा भेंडीबाजार घराण्याच्या उस्ताद नजीरखाँनी अंजनीबाईंना शिकवलेला पहिला राग. त्याची तालीम साडेतीन वर्ष चालली होती. अंजनीबाईंचा `मध्यम’ स्वर एखाद्या ज्योतीसारखा कसा प्रज्वलित व्हायचा याचं वर्णन खुद्द कुमार गंधर्वांनी करून ठेवलं आहे.

    कुमार गंधर्व म्हणत असत, “देवधर मास्तरांच्या सांगण्यावरून अंजनीबाई मला शिकवायला तयार झाल्या. त्यावेळी त्यांचा प्रत्येक सूर चैतन्यानं पुलकित होऊन समोर येई. सुरांचं हे सामर्थ्य मी यापूर्वी कधी बघितलं नव्हतं.” मा.अंजनीबाई मालपेकर ह्याचे शब्दलालित्य, सुंदर सांगीतिक आशय आणि लयीची गंमत यासाठी या घराण्यातील चिजा प्रसिद्ध होते. त्या बंदिश धृपद अंगाने म्हणत.

    खानेपुरी, मुखविलास, आलापी, बोल भरणे, खुलाबंद बोल, उचकसमेट, मींड, कणस्वर, लयीच्या अंगाने सुंदर सरगम करणे इ. त्यांचे गानविशेष म्हणता येतील. हेमराज नावाच्या कर्नाटकातील विख्यात वाद्यनिर्मात्यानं संपूर्ण आयुष्यात बारा-तेराच तंबोरे केले. पैकी एक तंबोरा त्यांनी अब्दुल करीम खाँना भेट दिला आणि दुसरा अंजनीबाईंना. अंजनीबाईंना कोणी भेटायला आलं की यमन रागातील चिज गुणगुणून त्या पाहुण्यांचं स्वागत करीत.

    भेंडीबाजार घराण्याचा खरा उत्कर्ष झाला तो अंजनीबाई मालपेकर आणि उस्ताद अमान अली खाँ यांच्या काळात. मा.अंजनीबाईकडे बेगम अख्तर, नैनादेवी, कुमार गंधर्व, किशोरी आमोणकर यांच्यासारख्या अनेक मान्यवरांनी संगीताचे धडे घेतले. विदुषी अंजनीबाई मालपेकर यांनी आपल्या अतीव सुरेल स्वरलगावाने आणि लयीच्या समझदारीतून ही गायकी पेश केली. विदुषी अंजनीबाई यांची आग्रा-परंतु मुलायम गमक असलेल्या अशा-गायकीची दुर्दैवाने कुणीच दखल घेतली नाही.मा.अंजनीबाई मालपेकर यांचे ७ ऑगस्ट १९७४ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ नवशक्ती

      August 7, 2017