(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जेष्ठ कलाकार बलराज साहनी

    त्यांचे खरे नाव युधिष्ठिर साहनी. त्यांचा जन्म १ मे १९१३ रोजी पंजाबच्या सरगोधा जिल्ह्यातील भेरा येथे एका पंजाबी खत्री कुटूंबात झाला होता. बलराज साहनी यांनी लाहोरच्या लाहोर विद्यापीठामध्ये प्रोफेसर सोढी आणि प्रोफेसर बुखारी यांच्या मार्गदर्शनात शेक्सपिअर लिखित नाटकात अभिनय केला. लाहोर विद्यापीठातून इंग्लिश साहित्य व हिंदी विषयांत पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही काळ रावळपिंडी येथे कौटुंबीक व्यवसायात व्यतित केला. पुढे १९३० साली ते पत्नी दमयंती सह रविंद्रनाथ टागोरांच्या शांतिनिकेतनात अध्यापनासाठी गेले. मा.बलराज साहनी हे काही काळ ‘शांतिनिकेतन’मध्ये प्राध्यापक होते. शांती निकेतनमध्ये बर्नाड शॉ यांच्या ‘आर्म्स अँड मॅन’ मध्ये काम केले. 'इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन' (आय.पी.टी.ए.) व 'पंजाबी कला केंद्राचे' ते संस्थापक सदस्य होते. १९३८ साली महात्मा गांधींसोबत कार्य केल्यानंतर ते लंडन येथील बी.बी.सी. च्या हिंदी विभागात निवेदक म्हणून रुजू झाले. तेथे ते १९४३ पर्यंत होते. नंतर मात्र, लंडनमध्ये बी.बी.सी मध्ये नोकरी करून भारतात आल्यानंतर त्यांनी भारतीय नाटकातच काम केले. बलराज साहनी यांनी चित्रपट उद्योगात वयाच्या ३४ व्या वर्षी प्रवेश केला. बलराज साहनी हे चित्रपटसृष्टीतील मातब्बर कलावंत होते. हिंदी चित्रपटांत त्यांनी तब्बल २५ वर्षे काम केले. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीचा ठसा उमटवला. रंगभूमी आणि एकूणच सांस्कृतिक विकासात त्यांनी मोलाची भर घातली. बलराज सहानी हे एक श्रेष्ठ चित्रपट अभिनेते म्हणून लोकांना माहित आहेत. पण ते एक थोर तत्त्वचिंतक, समाजसेवक होते ही गोष्ट पहात थोड्यांना ज्ञात आहे.

    देव आनंद अभिनीत ‘बाजी’ चित्रपटाची पटकथा बलराज साहनी यांनी लिहिली. काही वर्षांनंतर चेतन आनंदच्या ‘हकीकत’ मध्ये त्यांनी अभिनयाबरोबरच लेखन आणि निर्मितीतसुद्धा सहकार्य केले. सारांश एवढाच की, हे सगळे शिक्षित लोक होते आणि कोणताही वाद ताणत नव्हते. बलराज साहनी यांचा चेहरा पारंपरिक नायकाचा नव्हता. ते मध्य अवस्थेत अभिनयाशी जोडले गेले होते. जिया सरहदी यांच्या ‘हम लोग’ च्या शूटिंग वेळी त्यांना रोज तुरुंगातून आणावे लागत होते. कारण एका आंदोलनामुळे त्यांना राजकीय बंदी बनवण्यात आले होते. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘धरती के लाल’ मध्ये त्यांनी अभिनय केला होता. मात्र, १९४६ मध्ये जागोजागी दंगे झाल्यामुळे चित्रपटाचे सामान्य प्रदर्शन होऊ शकले नाही. बिमल रॉय यांनी ‘दो बीघा जमीन’ मध्ये त्यांना मुख्य भूमिकेत घेतले. चित्रपटाच्या यशासोबत बलराज यांनासुद्धा खूप प्रशंसा मिळाली. अमिय चक्रवर्ती यांच्या ‘सीमा’ मध्ये त्यांनी गांधीवादी संस्थेच्या प्रमुखाची भूमिका केली होती. या भूमिकेची खूप प्रशंसा झाली होती. हा चित्रपट शंकर-जयकिशन-शैलेंद्र यांच्या यांच्या गीत व संगीत्नाने आठवणीत राहीला. ‘काबुलीवाला’ मध्येही बलराज यांच्या अभिनयाची प्रशंसा झाली. हा चित्रपट रवींद्रनाथ टागोर यांच्या कहाणीवर आधारित होता. शांती निकेतनशी जोडलेले असल्यामुळे रवींद्रनाथ टागोर यांनी कधी काळी हा चित्रपट पंजाबीमध्ये लिहिण्याची प्रेरणा बलराज यांना दिली होती. बलराज साहनी यांचे अजूनही ‘वक्त’ मधील गाणे ‘ओ मेरी जोहरा जबी, तुझे मालूम नहीं, तू अब तक हैं हंसी और मैं जवां.’ लक्षात आहे.. ते पठाण कुटुंबाच्या उत्सवात गाणे म्हणत आहेत.

    बलराज साहनी यांचे ‘गरम कोट’, ‘सट्टा बाजार’, ‘सीमा’, ‘लाजवंती’, आणि ‘गर्म हवा’ अविस्मरणीय चित्रपट होते. एमएस सथ्यु यांचा ‘गर्म हवा’ फाळणीवर बनलेला महान चित्रपट होता. मा.बलराज साहनी अतिशय संवेदनशील व्यक्ती होते. त्यांची कलात्मक आवड त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक कार्यात दिसून आली. ते स्टार असूनही खूपच सामान्य जीवन जगत होते. राज खोसला यांच्या ‘दो रास्ते’ मध्ये त्यांनी सावत्र भावाची भूमिका केली होती. तो त्या कुटुंबाचा प्रमुख असतो. राज खोसला एक स्वछंदी व्यक्ती होते. त्यांना लवकर आणि कमी खर्चात काम करणे आवडत नव्हते. त्यांच्यासारखे विविध चित्रपट इतर दिग्दर्शकांनी केले नाहीत. पंचवीस वर्षांच्या चित्रपट कारकिर्दीत बलराज साहनी यांनी १२५ चित्रपटांत अभिनय केला. बिमल रॉय यांचा "दो बिघा जमीन‘, अमिया चक्रवर्ती यांचा "सीमा‘, राजेंद्रसिंह बेदी यांच्या "गरम कोट‘ या कथेवरील चित्रपट, हेमंत गुप्ता याचा "काबुलीवाला‘, यश चोप्रा यांचा "वक्त‘ यांतील त्यांचा अभिनय अविस्मरणीय आहे. एम. एस. सथ्यू यांचा "गरम हवा‘ या त्यांनी अभिनय केलेल्या शेवटच्या चित्रपटात फाळणीनंतर पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार देणाऱ्या मुस्लिमाचे त्यांचे पात्र अनेक पिढ्यांच्या स्मरणात राहील. जीवनाचे शेवटचे क्षण त्यांनी अमृतसरच्या पंजाबी कला केंद्रात घालवले. या संस्थेसाठी त्यांनी एक नाटक ‘क्या यह सच है बापू’ लिहिले. मात्र हे ‘अर्श-फर्श’ च्या नावाने सादर करण्यात आले. बलराज साहनी यांचे १३ एप्रिल १९७३ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      May 2, 2017


  • सुधाकर तोरणे

    सुधाकर तोरणे यांनी १९६५ पासून महाराष्ट्रात जिल्हा माहिती अधिकारी म्हणून यवतमाळ, जळगांव, रत्नागिरी, रायगड, धुळे,नाशिक, पुणे या जिल्ह्यात काम करताना तेथील लोकजीवनाशी संपूर्ण समरस.- उपसंचालक म्हणून मुंबई, पुणे, नाशिक येथे कार्य.

      December 7, 2011


  • कीर्तनकार चारुदत्त आफळे

    कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचा जन्म ३ जून १९६७ रोजी झाला.

    चारुदत्त आफळे उर्फ बुवा शालेय वयापासून आजवर गेली ४० हून अधिक वर्षे चारुदत्त आफळे संगीत रंगभूमीवर कार्यरत आहेत. आफळे घराणे क्षेत्र माहुलीचे सज्जनगडाच्या पायथ्याचे. समर्थ रामदासस्वामींच्या समाधीमंदिराकडून आफळे कुटुंबाला कीर्तनसेवेचे व्रत मिळाले. हे व्रत चारुदत्त आफळे निष्ठेने चालवीत आहेत. वडील गोविंदस्वामी आफळे आणि आई सौ. सुधाताई गोविंद आफळे. गोविंदस्वामी आफळे हे तरुण - बाल - वृद्धांची अलोट गर्दी खेचणारे असे त्यांच्या काळातले ते एकमेव कीर्तनकार होते. तसेच सुधाताईही उत्तम कीर्तन प्रवचन करीत असत. त्या होमिओपॅथीक डॉक्टर ही होत्या. आणि हिंदुमहासभेच्या कट्टर कार्यकर्त्या होत्या. चारुदत्त आफळे यांनी मराठी विषय घेऊन B.A. पदवी प्राप्त केली व संगीत विषय घेऊन M.A. पदवी प्राप्त केली. आणि भक्तीसंगीत व नाट्यसंगीत यावर ते Ph.D. केली आहेत. आई वडिलांकडून मिळालेली समृद्ध कीर्तन विद्या जोपासत असताना – श्री. दत्तदासबुवा घाग, श्री. श्रीपादबुवा ढोले, श्री. सुंदरबुवा मराठे अशा नामवंत कीर्तनकारांचे मार्गदर्शन बुवांना लाभले. बुवांनी त्यांच्या आयुष्यातले पहिले कीर्तन वयाच्या पाचव्या वर्षी केले. शाळा महाविद्यालयात असताना देखील काही कीर्तने केली. पण पूर्णतः कीर्तन सेवा १९८८ पासून सुरु झाली. संगीत शिक्षणासाठी त्यांनी मुकुंदबुवा गोखले, पित्रे बुवा, पं.आगाशे बुवा, पं.शरद गोखले, मधुकर खाडिलकर, पं. विजय बक्षी, ऋषिकेश बडवे अश्या अनेकांचे मार्गदर्शन लाभले. शिलेदार यांच्या मराठी रंगभूमीच्या अनेक संगीत नाटकांना चारुदत्त आफळे यांनी ऑर्गन साथ केली आहे.

    १९८८ ते २०१८ या तीस वर्षांत देश विदेशातून ५००० चे वर कीर्तने त्यांनी केली आहेत. नाट्यप्रयोग, नाट्यगीते कार्यक्रम यांची संख्या वेगळी आहेच. महाराष्ट्रासह इंदोर, उज्जैन (मध्यप्रदेश), बडोदा (गुजरात), ग्वाल्हेर, लखनौ (उत्तरप्रदेश), दिल्ली, कोलकाता (बंगाल), हैद्राबाद (आंध्र), बेळगाव, बेंगलोर (कर्नाटक) इ. प्रांतातून कीर्तन, प्रवचने झाली. श्रीलंका, कुवेत, दुबई, मस्कत, दोहा, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया अशा परदेशातही कीर्तनाचा गजर पोहोचविला.

    कीर्तन करण्याबरोबर अनेक मुलामुलींना ते कीर्तनाचे प्रशिक्षण देतात. राजर्षी शाहू महाराजांवरील शाहू या मालिकेत बालगंधर्वांचे काम करण्याचेही त्यांना भाग्य मिळाले.हेमंती बॅनर्जी कृत बालगंधर्व वरील माहितीपटात बुवांनी बालगंधर्वांची भूमिका केली. ज्या माहितीपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

    नाट्यसेवेसाठी त्यांना पुणे मराठी ग्रंथालयाकडून पाटणकर पुरस्कार मराठी नाट्य परिषदेकडून – पं. पलुस्कर पुरस्कार, बालगंधर्व रसिक मंडळाकडून – बालगंधर्व पुरस्कार, मंगेशकर प्रतिष्ठानाकडून – मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, व या वर्षी पुणे महानगर पालिकेकडून "बालगंधर्व पुरस्कार" असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

    -- संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      June 3, 2022


  • (पं.) मनोहर चिमोटे

    चिमोटे, (पं.) मनोहर
    भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
    ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अ‍ॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे.

    पंडित मनोहर चिमोटे
    भारतीय संगीतात वाद्यसंगीताचे एक स्वतंत्र आणि समृद्ध असे दालन आहे. वाद्यांमधून अभिजात संगीताचा संपन्न अनुभव देऊ शकणाऱ्या प्रतिभासंपन्न कलावंतांची खाणच भारतात गेल्या काही शतकांमध्ये निर्माण होत आलेली आहे. भारतीय संगीताच्या अभिव्यक्तीसाठीच्या वाद्यांबरोबरच परदेशातून आलेल्या रीड ऑर्गन (पायपेटी) किंवा हार्मोनिअम या वाद्यांनी भारतीय संगीतात गेल्या दोन शतकांच्या काळात भरीव कामगिरी केली आहे.
    ब्रिटिश राजवटीत आलेल्या या वाद्यांचे भारतीयीकरण करून त्यांना आपल्या संगीतात इतक्या सहजपणे मिसळवून टाकण्याची किमया येथील कलावंतांनी अशी काही करून दाखवली, की परदेशीयांना हे वाद्य आपलेच आहे काय, अशी शंका यावी. पंडित मनोहर चिमोटे हे असे एक अव्वल दर्जाचे हार्मोनियम वादक होते. हार्मोनियम या मूळ वाद्याची जवळीक अ‍ॅकॉर्डियन, ऑर्गन या वाद्यांशी असली, तरीही तिची निर्मिती भारतीय संगीतासाठी नव्हती. चिमोटे यांनी पन्नास वर्षांपूर्वी तिला भारतीय रुपडे चढवले आणि तिला येथील संगीताच्या दरबारात मानाचे स्थान मिळवून दिले. हार्मोनियमचे आगमन होण्यापूर्वीच्या काळात गायनाची संगत करण्यासाठी सारंगी हे तंतुवाद्य उपयोगात येत असे. वादकांच्या कर्तृत्वाने हार्मोनियमने गायनाच्या साथीचे वाद्य म्हणून प्रवेश केला आणि आता ते वाद्य भारतीय संगीताच्या मैफलीतील एक अविभाज्य घटक बनले आहे. पंडित चिमोटे यांनी परदेशी बनावटीच्या स्वर निर्माण करणाऱ्या स्वरपट्टय़ांवर भारतीय स्वरांचे केलेले आरोपण फारच यशस्वी झाले. गंधार हा स्वर भारतीय संगीतातील एक स्वयंभू स्वर समजला जातो. गंधाराच्या स्वरावर आधारित त्यांनी तयार केलेल्या हार्मोनियमचे नावही आपोआप ‘संवादिनी’ असे झाले आणि मग ती भारतीयच होऊन गेली. चिमोटे यांचा जन्म नागपूरचा आणि कर्मभूमी मुंबई. लहानपणी पंडित भीष्मदेव वेदी या प्रख्यात वादकाकडून त्यांनी हार्मोनियम वादनाचे धडे घेतले आणि मग त्यावर स्वप्रतिभेने नवनवीन प्रयोग केले. भारतातील अनेक दिग्गज कलावंतांबरोबर त्यांनी मैफलींमध्ये साथ केली होती. जेव्हा हे वाद्य स्वतंत्रपणे संगीत निर्माण करू शकते असा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण झाला, तेव्हा त्यांनी साथ करणे बंद केले आणि त्यानंतर केवळ स्वतंत्रपणे संवादिनीचे एकलवादन करण्यासाठीच आपले आयुष्य व्यतीत केले. मैफलीत गायकाच्या बाजूला असणारे हे वाद्य तिच्या मध्यभागी आणण्याचे श्रेय पंडित चिमोटे यांना द्यायला हवे. भारतातल्या सगळ्या संगीत महोत्सवात त्यांच्या संवादिनी वादनाने रसिकांची वाहवा मिळवली. ‘सूरमणी’, राज्य शासनाचा पुरस्कार, आदर्श संगीत शिक्षक पुरस्काराने त्यांना सन्मानित केले गेले. त्यांनी विद्यादानाचे जे मोठे कार्य केले, त्यामुळे अनेक युवक संवादिनी वादनाकडे वळू लागले. व्हायोलिन, सतार, बासरी या वाद्यांबरोबर संवादिनीची जुगलबंदी घडवणारे चिमोटे हे एकमेव कलाकार होते. त्यांच्या निधनाने संगीताच्या क्षेत्रात स्वकर्तृत्वाने झळाळणाऱ्या एका विद्वान कलावंताचा अस्त झाला आहे.

      August 5, 2017


  • डॉ. द्वारकानाथ शांताराम कोटणीस

    भारत व चीन या दोन देशांमध्ये मैत्रीचे ऋणानुबंध निर्माण करण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. दुसर्‍या चीन जपान युध्दाच्या पार्श्वभूमीवर, भारताने चीनमध्ये आपत्ग्रस्त वैद्यकीय सुविधेसाठी पाठविलेल्या ५ वैद्यकीय तज्ञांपैकी ते एक होते. अचूक वैद्यकिय कौशल्ये, प्रसंगवधानी स्वभाव, व असामान्य नेत्तृत्वगुणांमुळे कित्येक जखमी चिनी नागरिकांन व सैनिकांना पुनर्जीवन मिळाले होते.

      January 22, 2010


  • पार्श्वगायक मुकेश

    ते गायक-अभिनेता कुंदनलाल सहगल यांचे मोठे प्रशंसक होते आणि त्यांच्याप्रमाणेच गायक अभिनेता बनण्याचे त्यांचे स्वप्न होते.

      July 22, 2021


  • आज अभियंता दिन

    आज १५ सप्टेंबर..आज अभियंता दिन म्हणुन साजरा केला जातो.

    याचे कारण हा दिवस भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे.
    जन्म.१५ सप्टेंबर १८६१

    मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे पिता श्रीनिवासशास्त्री विद्वान संस्कृत पंडीत होते. अशा वातावरणात त्यांच्यावर उच्च संस्कार होणारच.पण घरची हलाखीची होती.त्यांनी शालेय शिक्षण तालुक्याला एकटे राहुन गरीबीशी झुंज देत अव्वल गुणांनी पूर्ण केले.व ते बंगळुरूला उच्च शिक्षणासाठी आले.तेथेही त्यांनी विशेष गुणवत्ता किताब घेऊन B.A. केले.आता त्यांना तांत्रिक शिक्षणाची लागली.

    गुणवंतांना गुणग्राहकांची कमी नसते. म्हैसुरुच्या राजांनी त्यांना पुण्यात अभियांत्रिकी पदवीसाठी शिष्यवृत्ती दिल्याने त्यांनी पदवी प्राप्त केली ती साधीसुधी नाहीतर सक्करपासून थेट दावणगेरी पर्यंत पसरलेल्या मुंबई राज्यात प्रथम क्रमांकात.या दैदिप्यमान यशाची नोंद सरकारने घेऊन त्यांची लगेच सन १८८४ मध्ये सहाय्यक अभियंता या पदावर थेट नेमणुक केली.येथेही त्यांनी आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला. या काळात त्यांनी खडकवासला धरणासाठी एका अभिनव अशा.स्वयंचलित गेटची निर्मिति केली. यामुळे विशिष्ठ पातळी वरील अतिरिक्त पाणीच वाहुन जाई. हे गेट भारतात प्रथमच झाले होते. या डिझाईनचे नावच पुढे विश्वैश्वरय्या गेट झाले. १९०७ साली त्यांनी सरकारी नोकरीतून निवृत्ती घेतली.

    एखादा असता तर निवांत आयुष्य जगला असता.पण नियतिला त्यांच्या कडून अजून काही भव्य दिव्य करून घ्यायचे होते.त्यांची कीर्ती ऐकुन हैद्राबादच्या निजामांनी त्यांना सरकारचे विशैष सल्लागार म्हणुन पद दिले. येथे त्यांनौ हैद्राबाद परिसरातील दोन नद्यांवर धरणे बांधुन शहर पूरमुक्त केलेच पण त्यामुळे त्या शहराचा कायापालट होऊ शकला. म्हैसुर नरेशांनी त्यांना मुख्य अभियंता पदाची ऑफर.दिली व त्यांनी ती स्विकारली. म्हैसुरला ते १९२६ पर्यंत राहिले.त्यांनी कृष्णराज सागर धरण, वृंदावन उद्यान व अनेक विकासकामे पार पाडली.काही काळ ते दिवाणही होते.या व्यतिरिक्त उद्योग सिंचन शेती या क्षेत्रातही मौलिक योगदान दिले. पाण्याचा अपव्यय टाळुन पुरेपूर वापर करणारी ब्लॉक सिस्टिम ही त्यांचीच देणगी देशाला.

    म्हैसुरचे पद सोडल्यानंतर निवृत्तीपश्चात केवळ अभियांत्रिकी नव्हेच तर उद्योग,अर्थ, नगरसुधार इ. कार्यात मोलाचे योगदान दिले.समर्थ भारत हे त्यांचे स्वप्न होते. त्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन सर्वोच्च बहुमान केला. मा. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले.

    अभियंता दिना निमीत्त सर्व अभियंत्यांना अभिवादन व हार्दिक शुभेच्छा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      September 15, 2016


  • बॉलीवूडचा विनोदी अभिनेता देवेन वर्मा

    बॉलीवूडमधील लोकप्रिय विनोदी अभिनेता देवेन वर्मा यांचा आज जन्मदिवस. त्यांचा जन्म २२ आक्टोबर १९३७ रोजी झाला

    देवेन वर्मा यांनी अनेक चित्रपटांत विनोदी भूमिका अतिशय खूबीने वठवल्या होत्या.

    हिंदी चित्रपटसृष्टीत ‘अंगूर’, ‘खट्टामिठा’ या चित्रपटांमधील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. विनोदाचे टायमिंग साधण्यात हातखंडा असलेल्या देवेन यांना ‘चोरी मेरा काम’, ‘चोर के घर चोर’ आणि ‘अंगूर’ या चित्रपटांतील भूमिकांसाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट हास्यकलाकाराच्या श्रेणीत सन्मानित करण्यात आले होते.

    देवेन वर्मा यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. चमत्कार, जुदाई, इश्क, चोर के घर चोर, अंगुर, खट्टा-मीठा, कोरा कागज, चोरी मेरा काम यातील देवेन वर्मा यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ‘दोस्त असावा तर असा’, ‘हा खेळ सावल्यांचा’ या मराठी चित्रपटांतही त्यांनी काम केले होते.

    त्यांनी स्वतःचे प्रॉडक्शन हाऊस सुरु करत काही चित्रपटांची निर्मिती व दिग्दर्शनही केले होते.

    देवेन वर्मा यांचे २ डिसेंबर २०१४ रोजी निधन झाले.

    -- संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

      October 22, 2016


  • गायिका धोंडूताई कुलकर्णी

    धोंडुताई यांनी सुरवातीला जयपूर घराण्याचे उस्ताद अल्लदिया ख़ाँ साहेब यांचे भाचे नथ्थन ख़ाँ यांच्याकडे तीन वर्ष शिकल्या. त्यानंतर याच घराण्याची तालीम त्यांनी आयुष्यभर घेतली.

      August 5, 2021


  • ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त

    १९७९ साली त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘अपराध’ त्यातील मांडणीमुळे लोकप्रिय ठरला आणि त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठीचा राज्य शासनाचा पहिला पुरस्कार पटकावला. आपल्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कळत-नकळतपणे अपराध करण्याच्या मानवाच्या मूलभूत प्रवृत्तीवर हा चित्रपट भाष्य करतो.

      January 21, 2022