(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जेम्सबॉण्ड 007 या जेम्स बॉण्डचा जनक इयान फ्लेमिंग

    इयान फ्लेमिंग यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक नोकऱ्या केल्या. या नोकऱ्यांदरम्यान आलेला अनुभवच त्यांना जेम्स बॉण्डचे पात्र हुबेहूब साकारण्यात झाला असे म्हटले जाते. दुसऱ्या महायुध्दाच्या काळात इयान यांनी ब्रिटनच्या नाविक दलाच्या गुप्तहेर खात्यात नोकरी केली आणि त्याच ठिकाणी काम करताना त्यांच्या डोक्यात साकारले ऑपरेशन गोल्डन आयचे कथानक. याच दरम्यान युनिटो २० असॉल्ट युनिट आणि टी फोर्स ह्या दोन गुप्तहेर संघटना उभारण्याचे काम त्यांच्या देखरेखीखाली झाले. युध्दकाळातील ही नोकरी आणि त्यानंतर केलेल्या पत्रकारितेतील नोकरीने जेम्स बॉण्डकरिता भरपूर खाद्य इयान यांना उपलब्ध झाले. या अनुभवावरच आधारित १९५२ मध्ये पृथ्वीतलावर अवतरला जेम्स बॉण्ड ००७.

      May 28, 2022


  • बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार राजेश खन्ना

    बॉलिवूडचे पहिले सुपर स्टार राजेश खन्ना यांचा जन्म २९ डिसेंबर १९४२ रोजी झाला. ‘...बाबू मोशाय! जिंदगी और मौत उपरवाले के हाथ में हैं। जहाँपनाह, इसे ना तो आप बदल सकते हैं, ना मैं... हम सब रंगमंच के कठपुतलियोंमें बंधी हैं, कौन कब कैसे उठेगा यह कोई नहीं जानता... हाऽऽ हाऽऽ हाऽऽ’ राजेश खन्ना यांनी ‘आनंद’चा दर्द अत्यंत प्रभावीपणे या संवादातून साकारला. या चित्रपटात छोट्या-छोट्या संवादातून ‘आनंद’ आयुष्याचा काय भरंवसा, म्हणून प्रत्येक क्षणाचा भरभरून आनंद घ्या. हे छोट्या-छोट्या संवादातून सांगत असतो.

    ‘जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं.’ हा संवादही असाच बोलका, तर ‘आनंद मरते नहीं, अमर होते है ।’ हा चित्रपटाचा शेवट होतानाचा संवाद या कथेचे खूपच मोठे सार आहे. आनंद चित्रपटातील हे संवाद मा. राजेश खन्ना यांनी इतके प्रभावी पणे म्हणलेत की हा संवाद आज ही अंगावर काटा आणतो.

    बॉलीवूडचा ‘सुपरस्टार’ अशी ओळख असलेला राजेश खन्ना यांनी चित्रपटात येताना आपले खरे नाव बदलले. त्यांचे मूळचे नाव जतीन खन्ना. गिरगावातच राहणारे अभिनेते रवी कपूर अर्थात जीतेंद्र यांच्यासोबत मा.राजेश खन्ना यांनी केसी कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेतले. महाविद्यालयात असताना ‘जतीन’ खन्ना हे वेगवेगळ्या नाटय़स्पर्धामध्ये भाग घेत असे. प्रत्येक स्पर्धेत बक्षीस जतीन घेऊनच जाणार हे ठरलेले असायचे. एकदा युनायटेड प्रोडय़ुसर्स आणि एका चित्रपटविषयक मासिकाने ‘टॅलेंट हंट’ स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेतही मा. जतीन खन्ना यांनी चांगली कामगिरी केली. त्याच वेळी काही निर्मात्यांनी जतीन खन्ना याला आपल्या चित्रपटासाठी साइन केले होते. त्यावेळी बक्षीस म्हणून चेतन आनंद दिग्दर्शित आखरी खत आणि रवींद्र दवे दिग्दर्शित राज या दोन चित्रपटांमध्ये त्यांना हिरो म्हणून काम करण्याची संधी मिळाली.

    राजेश खन्ना यांनी १९६६ मध्ये ‘आखरी खत’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल ठेवले. १९६७ साली भारतातून आखरी खत या सिनेमाची ‘बेस्ट फॉरेन लँग्वेज फिल्म’ श्रेणीत ऑस्करसाठी पहिल्यांदाच शिफारस करण्यात आली होती. त्यांची अदाकारी पाहून जी. पी. सिप्पी आणि नासीर हुसैन यांनी त्यांना आपल्या चित्रपटांमध्ये ब्रेक दिला. त्या वेळी एका प्रसिद्ध न्युमरॉलॉजिस्टने जतीन खन्ना यांना नाव बदलण्याचा सल्ला दिला. तू तुझे नाव बदललेस तर बॉलीवूड तुझ्यासाठी लाल गालिचा अंथरेल, तू प्रसिद्ध होशील, असा सल्ला दिला तो जतीन यांनी मानला आणि जतीनचा ‘राजेश खन्ना’ झाले. १९६९ साली प्रदर्शित झालेल्या आराधना या चित्रपटाने राजेश खन्ना यांचे आयुष्यच बदलून टाकले.

    शर्मिला टागोर आणि फरीदा जलाल या अभिनेत्रींसोबत आराधनामधील राजेश खन्नांचा डबल रोल प्रेक्षकांना एवढा आवडला की, ते रातोरात सुपरस्टार बनले. दो रास्ते, हाथी मेरे साथी, सफर, आनंद, अमर प्रेम या सिनेमांनी त्यांच्या सुपरस्टारपदावर शिक्कामोर्तब केले. १९६९ ते १९७२ या काळात त्यांनी लागोपाठ १५ सुपरहिट सिनेमे दिले. त्यांचा हा विक्रम बॉलिवूडमध्ये अद्याप कुणीही मोडू शकलेले नाही. त्यानंतर राजेश खन्ना सुपरस्टारपदावर अक्षरशः आरूढ झाले. असे होत असे की राजेश खन्ना यांची एक झलक पाहण्यासाठी तरूणी रस्त्यावर गर्दी करायच्या. राजेश खन्ना यांच्या स्वागतासाठी त्याकाळी तरूण मुली वेड्यासारख्या वागत असत. राजेश खन्नाच्या गाडीवर लिपस्टिकचा सडा पडत असे. रक्ताने राजेश खन्नाला लव्ह लेटर लिहिणार्याक फॅन्सची संख्याही मोठी असायची.

    भारतात एखाद्या सिनेस्टारच्या वाट्याला प्रेक्षकांचे एवढे प्रेम पहिल्यांदाच पाहायला मिळाले. चालण्याबोलण्याची विशिष्ट ढब, मानेला खास झटका देत, हातवारे करत नाचण्याची विशिष्ट शैली, जबरदस्त संवादफेक आणि ओठांवर कायम रूंजी घालतील अशी गाणी यामुळे राजेश खन्ना हे अफलातून रसायन बनून गेले. राजेश खन्नांचा अभिनय, किशोर कुमार यांचे त्यांच्यासाठी पार्श्वैगायन आणि आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांचे संगीत असा त्रिवेणी संगम जुळून आल्यानंतर ८० च्या दशकापर्यंत राजेश खन्ना बॉलिवूडचे अनभिषिक्त सम्राट बनले. सर्वाधिक मानधन घेण्याचा सिलसिला त्यांनीच सुरू केला. आपल्या चाहत्यांमध्ये 'काका' नावाने प्रसिद्ध असलेल्या राजेश खन्ना यांचे १९७० च्या दशकात 'आराधना' आणि 'अमर प्रेम' याबरोबरच अनेक चित्रपटांनी रौप्य आणि सुवर्णमहोत्सव साजरे केले होते.

    रोमँटिक हिरो म्हणून नावारूपाला आलेले राजेश खन्ना यांचे आधी तत्कालिन फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रू यांच्यासोबत सूत जुळले. परंतु त्यांचा ब्रेकअप झाल्यानंतर, मार्च १९७३ मध्ये राजेश खन्ना यांनी आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या डिंपल कपाडिया यांच्याशी विवाह केला. त्यावेळी डिंपलचा बॉबी हा सिनेमा रिलीज देखील झाला नव्हता. डिंपलपासून त्यांना ट्विंकल आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. १९८४ मध्ये डिंपल आणि राजेश खन्ना विभक्त झाले. परंतु त्यांनी घटस्फोट घेतला नाही. १९९२ साली कॉंग्रेसच्या वतीने त्यांनी नवी दिल्ली मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि ते लोकसभेवर खासदार म्हणून निवडून आले. राजेश खन्ना यांचे निधन १८ जुलै २०१२ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

    राजेश खन्ना यांची गाणी.
    https://www.youtube.com/watch?v=UEI_1SLR4mY
    https://www.youtube.com/watch?v=EkuVh_tmb0g

      December 29, 2018


  • आकाशवाणी पुणे केंद्र

    २ ऑक्टोबर १९५३ रोजी आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना झाली.

    गेली ६४ वर्षे आकाशवाणी पुणे केंन्द्र श्रोत्यांसाठी " बहुजन हिताय बहुजन सुखाय " ह्या ब्रीद वाक्याचं पालन करत आले आहे... !!!
    सुधा नरवणे,भालचंद्र जोशी, सुधीर गाडगीळ अशा अनेकांची वृत्त निवेदनाची कारकीर्द आकाशवाणी पुणे केंद्रात बहरली.
    आकाशवाणीवर सकाळच्या सत्रात चिंतन, आपले आरोग्य, बातम्या सारखे कार्यक्रम, तसेच विविध भारती वरील सकाळी शास्त्रीय संगीत विषयाला वाहलेला हा आणि जुन्या हिंदी गाण्यांचा भुले बिसरे गीत हा कित्येक वर्षे सुरु असलेला कार्यक्रम आजही अनेक श्रोते ऐकत असतात. कुठल्याही विषयाचे बंधन नाही, अतिशय आशयपूर्ण, माहितीपूर्ण असे विविध कार्यक्रम प्रत्येक पुणे आकाशवाणीवर वर्षी येत असतात.

    मराठी साहित्याशी निगडीत असलेले पुस्तक वाचनाचे कार्यक्रम असो, किंवा बऱ्याच वेळेला आकाशवाणीच्या खजिन्यातून निवडक कार्यक्रम पुन:प्रसारित करतात, त्यातही गेल्या पिढीतील कलाकार, व्यक्ती यांची ओळख होत राहते. दुपारचे कार्यक्रम जास्त ऐकले जात नाहीत असे वाटते,पण गृहीणी त्याचा आस्वाद घेत असतात. संध्याकाळचे, विशेषत: रात्रीचे कार्यक्रम जसे नभोनाट्य, राष्ट्रीय शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम, हे देखील दर्जेदार असतात. पुणे विविधभारतीवरील रात्रीचा छायागीत हा हिंदी गाण्यांचा कार्यक्रम देखील कित्येक वर्ष चालू आहे. भारताची, तसेच महाराष्ट्राची संस्कृती जतन करणारे कार्यक्रम जसे संकृत भाषेवरील गीर्वाण भारती, संगीत नाटकांच्या इतिहासावरील कार्यक्रम, असे वैविध्य असते.

    सामाजिक बांधिलकी जपणारे, आणि त्या निमित्त वेगवेगळया व्यक्ती, संस्था यांचा परिचय करून देणारे कार्यक्रम देखील अतिशय उद्भोधक असतात. पुणे आकाशवाणीवर ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांनी सादर केलेला १९६० च्या दशकात सादर केलेला गीतरामायण हा कार्यक्रम तर दंतकथा होवून बसला होता. पण आज काल प्रायोजित कार्यक्रमांचा देखील आकाशवाणीवर भडीमार असतो, त्यातही काही चांगले प्रायोजित कार्यक्रम आहेत,पालखीवर दरवर्षी "पायी वारी पंढरीची "ही कार्यक्रम मालिका प्रसारित करण्याची परंपरा आकाशवाणी पुणे केंद्रानं जपली आहे.

    या वर्षी पुणे आकाशवाणीने "निवेदक आपल्या भेटीला" या कार्यक्रमा अंतर्गत पुणे आकाशवाणीचे निवेदक श्रोत्यांच्या भेटीस आणले होते.
    यात मंगेश वाघमारे, गौरी लागू, सिद्धार्थ बेंद्रे, प्रतिमा कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी,डॉ.प्रतिमा जगताप, कैलास जगताप, संजय भुजबळ या निवेदकांनी आयोजित केलेल्या बहारदार रंजक कार्यक्रमाचा आस्वाद रसीकांनी घेतला.पुणे आकाशवाणीचा ब्लॉगदेखील आहे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      October 2, 2017


  • अभिनय सम्राट “डॉ. काशिनाथ घाणेकर”

    …… आणि डॉ. काशीनाथ घाणेकर’ असे जाहिरातीमधून प्रसिद्ध होताच नाट्यगृहे हमखास ‘हाऊस फुल्ल’ होत व त्यांच्या एन्ट्रीलाच टाळ्यांचा कडकडाट होई. डॉ.काशीनाथ घाणेकर व्यवसायाने डेंटीस्ट होते. त्यांनी मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीला दिलेले योगदान अतुलनीय आहे.

      September 14, 2017


  • पांडुरंग श्रीधर आपटे

    गांधीवादी साहित्यिक पांडुरंग श्रीधर आपटे यांनी अनेक चरित्रे लिहिली. याशिवाय आपल्या पूर्वजांचा शोध (डार्विनवरून) आणि अलौकिक अभियोग (पशू, पक्षी, वनस्पती यांची मानवनिर्मित निसर्गर्‍हासाबद्दल फिर्याद) ही त्यांची पुस्तके आहेत.

    १९ डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे निधन झाले.

    Pandurang Shridhar Apte

      November 7, 2017


  • पडद्यावरचे देखणे रुबाबदार पोलीस इन्स्पेक्टर इप्तेखार

    इत्तफाक मधील सी.आय.डी. इन्स्पेक्टर कर्वें या भुमिकेने त्यांचे आयुष्य बदलून टाकले. धुम्मस या गाजलेल्या गुजराती नाटकावर आधारित हा सिनेमा एकाच सेटवर संकलनासह आठ दिवसात तयार झाला. इन्स्पेक्टर चा युनिफॉर्म त्यांच्या व्यक्तीमत्वाला इतका शोभला की तश्याच भुमिकेचे सिनेमे भरभर मिळत गेले.

      February 22, 2022


  • बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपची अभिनेत्रीं परवीन बाबी

    गुजरातच्या जुनागढमधील एका मध्यम वर्गीय मुस्लिम कुटूंबात परवीन जन्माला आली होती. त्यांचा जन्म ४ एप्रिल, १९४९ रोजी झाला. तिच्या आईवडिलांची ती एकुलती एक मुलगी होती. परवीन यांचे शालेय व महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबादेत झाले. इंग्लिश साहित्यात तिने मास्टर्स पदवी प्रथम श्रेणीतून मिळवली होती. तिचे इंग्लिश अगदी अस्खलित होते, परवीन वली मोहम्मद खान बाबी उर्फ परवीन बाबी यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली होती. तिच्या आरसपानी सौंदर्याने तिला बॉलीवूडने खुणावले. ती आली, तिने पाहिले अन तिने जिंकले अशी तिची अवस्था झाली. तिचे अनेक चित्रपट सुपरहिट झाले अन अनेक फ्लॉपही झाले. पण ती ग्लॅमरची आयडॉल बनून राहिली. ८० च्या दशकात झीनत अमानच्या बरोबरीने परवीन बाबीसुध्दा बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून नावारुपास आली होती. या दोघींमध्ये काही फरक होते.

    झीनतचे विचार पूर्णत: व्यवसायिक होते. तिने आपल्या प्रत्येक यशाला आणि अपयाशाला समजून-उमजून संभाळले. परंतु परवीनने असे कधीच केले नाही. कदाचित छोट्या शहरातून आलेली परवीन ग्लॅमरस आणि श्रीमंत आयुष्य संभाळू शकली नाही. तिच्या वाट्याला आलेले बेसुमार ग्लॅमरस आयुष्य आणि यश हेच तिचे शत्रू बनले. त्यामुळे बॉलिवूडध्ये तिला प्रत्येकजण आपला शत्रुच्या रुपात दिसत होता. तिच्या या वागण्यानेच सर्वांनी तिच्या व्यवसायिक आणि खासगी आयुष्याचा फायदा घेतला. ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून ओळखली जाणारी परवीन १९७६ मध्ये टाइम मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकली होती. या मॅगझिनच्या कव्हर पेजवर झळकणारी परवीन पहिली भारतीय अभिनेत्री होती. खासगी आयुष्यात ती बोल्ड आणि बिनधास्त होती. यश चोप्रांच्या 'दीवार' या सिनेमात तिने बोल्ड सीन्स दिले होते. सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि परवीन बाबीच्या जोडीला त्याकाळात बरेच पसंत केले गेले होते. 'अमर अकबर एंथोनी', 'दीवार', 'शान', 'ख़ुद्दार', 'काला पत्थर', 'सुहाग', 'नमक हलाल' या सिनेमांमध्ये ही जोडी झळकली. १९७३ मध्ये 'चरित्र' या सिनेमाद्वारे आपल्या करिअरची सुरुवात करणा-या परवीनने आपल्या करिअरमध्ये ५० सिनेमांमध्ये अभिनय केला. १९८८ मध्ये आलेला 'आकर्षण' हा तिचा शेवटचा सिनेमा होता.

    १९७४ मध्येय प्रदर्शित झालेला मजबूर आणि १९७७ मध्ये अमर अकबर एंथोनी ही त्यांची करिअरमधील सर्वात हिट राहिलेली चित्रपट राहिलेली आहेत. त्या पडद्यावर जितक्या धाडसी आणि बिनधास्त होत्या, तेवढ्या खासगी जीवनात खूप एकाकी होत्या. बॉलीवूडमध्ये एकेकाळी टॉपच्या अभिनेत्रींमध्ये स्थान मिळविणाऱ्या अभिनेत्री परवीन बाबी हिच्या आयुष्याचा अखेरचा काळ खूपच बिकट गेला. डॅनी, महेश भट्ट, कबीर बेदी सारख्या प्रसिध्द' कलाकरांबरोबर त्या लिव्ह इन रिलेशनशीपमध्येव राहिल्या. परवीन बाबी यांचे निधन २० जानेवारी, २००५ रोजी झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३

      January 24, 2018


  • भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव

    १० एप्रिल २०१७ रोजी जाधव यांना पाकिस्तानमधील फील्ड जनरल कोर्ट मार्शलने फाशीची शिक्षा सुनावली. १८ मे २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने या खटल्यावरील अंतिम निर्णयासाठी अगोदर दिलेल्या फाशीला स्थगिती दिली. १७ जुलै २०१९ रोजी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने जाधव यांच्या सुटकेसाठीचे भारताचे अपील फेटाळून लावले आणि पाकिस्तानला फाशी स्थगित करण्याचे आदेश दिले.

      April 16, 2022


  • संतूरवादक पं. उल्हास बापट

    अभिजात संगीतात तंतूवाद्य वादकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पं. उल्हास बापट हे त्यांपैकीच एक होते.

    त्यांचा जन्म ३१ ऑगस्ट १९५० रोजी झाला. शास्त्रीय तसेच उपशास्त्रीय आणि सुगम अशा संगीतातील सर्वच अंगांना आपल्या कौशल्यपूर्ण वादनाने एका उंचीवर नेऊन ठेवणारा हा समर्थ संतूर वादक होता. त्यांनी संतूरची पूर्णत: स्वतंत्र वादनशैली विकसित केली होती. पं. उल्हास बापट यांचे वडील पोलीस उपायुक्त यशवंत गणेश बापट, हे एक उत्तम गायक होते. वयाच्या पाचव्या वर्षी मुलाचा संगीताकडे असलेला कल त्यांच्या लक्षात आला आणि पंडित उल्हास बापट यांना पंडित रमाकांत म्हापसेकर यांच्याकडे तबल्याच्या शिकवणीसाठी पाठविले गेले. या बालवयातील संगीतशिक्षणामुळे उल्हास बापट यांना तालाचे उत्तम ज्ञान झाले, आणि ते पुढील आयुष्यात सातत्याने उपयोगी पडले.

    पुरसे तबला शिक्षण झाल्यावर उल्हास बापट आपल्या वडिलांकडे कंठसंगीत शिकले. त्याच काळात ते प्रसिद्ध सरोद वादक श्रीमती झरीन दारूवाला यांच्या संपर्कात आले. झरीन दारूवाला यांच्यानंतर त्यांनी के.जी. गिंडे आणि वामनराव सडोलीकर यांना गुरू केले आणि त्यांच्याकडे असलेल्या रागशास्त्र, बंदिशी आणि खयाल गायन यांच्या माहितीच्या अफाट साठ्यातले थोडेफार हस्तगत केले.

    दोन घराण्यांच्या गायकीचा केलेल्या अभ्यासातून त्यांना संगीतातील सौंदर्याचा साक्षात्कार झाला. गायन शिकताना पंडित उल्हास बापट यांना, संतूर या वाद्यात गोडी निर्माण झाली, आणि त्यांनी संतूरवादनात प्रावीण्य मिळविण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले. संतूरची 'क्रोमॅटिक ट्युनिंग ही त्यांनी स्वत: संशोधन केलेली पद्धत होती.

    संतूर वाजवताना साधारणत: जो राग वाजवायचा त्या रागाचे स्वर एका बाजूस लावून घेण्याची पद्धत प्रचलित होती पण पं उल्हास बापट यांनी एक सर्वस्वी भिन्न अशी पद्धत शोधली. या 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अनावश्यक स्वर कौशल्याने वगळून केवळ रागात समाविष्ट असलेले स्वर वाजवण्याचे नैपुण्य त्यांनी संपादन केले जे निश्चितच कौतुकास्पद आहे. संतूरवर 'मींड' काढण्याचीही त्यांची खास पद्धत असे. त्यामुळे ते रागमाला (अनेक राग अंतर्भूत असलेली रागांची मालिका) तसेच अनेक भावगीतेही 'क्रोमॅटिक पद्धतीनुसार अतिशय परिणामकारक रित्या सादर करत असत.

    प.उल्हास बापट यांच्या संतूरमधून श्रावणधारा झिरपत असत. तिन्ही सांजा, केतकीच्या बनी, मी मज हरपून, श्रावणात घननीळा, समईच्या शुभ्र कळ्या, रिमझिम झरती, स्वर आले दुरुनी, या चिमण्यांनो, पैल तो गे, मालवून टाक दीप अशा अनेक गीतांचे संतूरवादन त्यांच्या 'संतूरच्या भावविश्वात' या CD द्वारे आपल्याला अनुभवता येते. या गीतांकडे त्यांनी 'बंदिश' म्हणून पाहिले व त्यानुसार त्या गीतांचा स्वरविस्तार केला. आर.डी बर्मन यांच्या बरोबर अनेक वर्ष काम केले होते. पंचमदाचे लाडके संतुर वादक होते.

    पंचमदांच्या अनेक अजरामर गाण्यांच्या संगीतात उल्हास बापट यांच्या संतूरचे सूर गुंजले. तसेच पंडित उल्हास बापट यांनी अनेक हिंदी मराठी गीतांना संतूर सुरांनी सजवलं होते. इजाजत मधील मेरा कुछ सामान, जैत रे जैत मधील मी रात टाकली, शिवाय तळव्यावर मेंदीचा अशा कितीतरी गाण्यांसाठी पं. उल्हास बापट यांनी संतूर वाजविले आहे. पं.उल्हास बापट यांनी बाहुलीचं लगीन,चुलीवरची खीर अशी काही बालगीतं संगीतबद्ध केली होती.

    पंडित नारायण मणी यांच्याबरोबर उल्हास बापट यांच्या ध्वनिमुद्रित संतूरवादनाचे ’इन कस्टडी ॲन्ड कॉन्व्हरसेशन्स’ नावाचे दोन आल्बम प्रकाशित झाले आहेत. पं.उल्हास बापट यांनी त्यांच्या "सहज स्वरांतून मनातलं" हे आत्म चरित्रपर पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात संतूर आणि तबला वादनाबरोबरच त्यांचे भाषेवर ही उत्तम प्रभुत्व आढळून येते. शास्त्रीय संगीत, तसेच चित्रपट सृष्टीशी जवळचा संबंध असल्यामुळे, त्यांच्या गाठीला अनेक आठवणी होत्या. त्या त्यांनी ,मिश्किलपणे आणि रंगतदार करून पुस्तकात सादर केल्या आहेत.

    दि. ४ जानेवारी २०१८ रोजी त्यांचे निधन झाले.

    पं.उल्हास बापट यांचे संतूर वादन
    https://www.youtube.com/watch?v=HdIsFM9hwiE
    http://gaana.com/artist/pt-ulhas-bapat-1

    अधिक माहितीसाठी हा लेख वाचा.

    #PtUlhasBapat #UlhasBapat

      June 7, 2022


  • माधव गडकरी

    पत्रकार

      April 21, 2010