जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
शिवांगी, पद्मिनी आणि तेजस्विनी या पंढरीनाथ कोल्हापुरे यांच्या तीन मुली. त्यांपैकी पद्मिनी कोल्हापुरे आणि तेजस्विनी कोल्हापुरे यांनी अनेक हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. शिवांगी कोल्हापुरे या गायिका असून हिंदी चित्रपट अभिनेते शक्ती कपूर हे त्यांचे पती. पंढरीनाथ कोल्हापुरे हे अभिनेत्री श्रद्धा कपूरचे आजोबा.
July 4, 2022
देशात ब्रेन ड्रेन सुरु असताना आशुतोष वैद्य यांनी आयटी मध्ये करिअर घडविणार्या तरुणांपुढे आदर्श घालून दिला.
ब्रेन गेन
July 24, 2015
‘बाबला ऑर्केस्ट्रा’ने लाईव्ह परफॉर्मन्स, फ्युजन म्युझिक, पारंपरिक संगीताला आधुनिक रूप देण्याच्या आणि स्वतंत्र संगीताच्या (Non-film music) क्षेत्रात निर्माण केलेले स्थान आजही अढळ आणि मार्गदर्शक मानले जाते. आजचे अनेक गरबा किंग, रिदम अरेंजर्स आणि लाईव्ह बँड्स हे बाबला यांनाच आपले आदर्श मानतात. भारतीय चित्रपट संगीताच्या पलीकडे जाऊन जगाला आपल्या तालावर नाचवणारा एक ‘रिदम किंग’ म्हणून बाबला यांचे नाव संगीताच्या इतिहासात नेहमीच सुवर्ण अक्षरांनी लिहिले जाईल.
August 4, 2026
सुष्मिता सेनने १९९४ मध्ये जेव्हा ‘मिस यूनिव्हर्स’चा किताब जिंकला तेव्हा ती फक्त १६ वर्षांची होती. तिचा जन्म १९ नोव्हेंबर १९७५ रोजी हैदराबाद येथे झाला. सुष्मिता तेव्हा एक मध्यम वर्गातील मुलगी होती. स्पर्धेत जाण्यासाठी तिच्याकडे पुरेसे पैसेही नव्हते. त्यामुळे मिस युनिव्हर्स स्पर्धेत जाताना तिने तिचे कपडे कोणत्याही डिझायनरकडून शिवून न घेता तिच्या आइने आणि मीना बाजारातील एका टेलरने मिळून शिवले. सुष्मिताने वयाच्या २५व्या वर्षी आपली पहिली मुलगी रिनी हिला दत्तक घेतले. तिच्या या निर्णयाने सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला होता. असे सांगितले जाते की, सुष्मिताने मिस युनिव्हर्स ही स्पर्धा एका प्रश्नाच्या उत्तराने जिंकली. सुष्मिताचा सामना ऐश्वर्याबरोबर होता. दोघींमध्ये अटीतटीची स्पर्धा होती. पण एका मुलाखतीच्या फेरीमध्ये सुष्मिता वरचढ ठरली. दोघांनाही एकच प्रश्न विचारला गेला. दोघींना विचारण्यात आले की, जर तुम्हाला अशी एखादी ऐतिहासिक घटना बदलायची असेल तर ती काय असेल? यावर ऐश्वर्याने उत्तर दिले होते की, माझ्या जन्माची तारीख. तर सुष्मिताने उत्तर दिले, इंदिरा गांधी यांचा मृत्यू. असे मानले जाते की या प्रश्नाच्या उत्तराने त्यांच्या भविष्याचा निर्णय केला होता. या स्पर्धेत अव्वल किताब पटकावणारी ती पहिली भारतीय स्त्री ठरली. महेश भट्ट यांच्या ‘दस्तक’ या सिनेमातून सुष्मिताने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सुष्मिताचा ‘बीवी नंबर वन’ हा सिनेमा फार गाजला होता. या सिनेमासाठी सुष्मिताला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहकलाकाराचा पुरस्कारही मिळाला होता. हिंदी भाषेतील चित्रपटांसोबत त्यांनी काही तमिळ व इंग्लिश भाषांतील चित्रपटांमधूनही भूमिका केल्या.
संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
November 19, 2018
रामचंद्र विनायक ओतुरकर हे “हिंदुस्थानचा सांपत्तिक इतिहास' तसेच अन्य महाविद्यालयीन पुस्तकांचे कर्ते होते. २४ ऑक्टोबर १८९८ रोजी रामचंद्र विनायक ओतुरकर यांचा जन्म झाला.
## Ramchandra Vinayak Oturkar
July 27, 2017
शंकर जयकिशन, नौशादपासून मदनमोहन पर्यंत आणि सचिनदेव बर्मनपासून राहुलदेव बर्मनपर्यंत त्यांच्यापाशी आठवणींचा खजिना होता. याच संगीतकारांच्या अमर्याद कर्तृत्वाच्या छायेत अमीन सायानी यांची पर्सनॅलिटी फुलली.‘जी-हाँ बहनो और भाइयो’.. म्हणत सुरुवात करणारी त्यांनी शैली निर्माण केली. नंतर त्यांनी अनेक कार्यक्रम सुध्दा निवेदित केले.
February 29, 2024
१९६९ साली म्युन्सिपल नाट्यस्पर्धेत ‘सुतक’ नावाची एकांकिका त्यांनी लिहिली. या स्पर्धेतत्यांच्या लिखाणाला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. त्यानंतर वामन तावडे यांनी ‘छिन्न’ हे दोन अंकी नाटक लिहिले. हे नाटक सदाशिव अमरापूरकर यांच्या वाचनात आले आणि त्यांनी ते स्पर्धेसाठी घेतले. या नाटकाचा प्रवास पुढे वामन तावडे यांच्या नाट्यलेखनातील कारकिर्दीला पुढे घेऊन गेला. वामन तावडे यांच्या ‘छिन्न’ या नाटकाने अनेक पारितोषिके मिळवली.
June 7, 2022
कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते.
July 20, 2022
अभिनेत्री गिरिजा जोशी तिचा उठावदार बोलका चेहरा, पारंपरिक आणि पाश्चिमात्य या दोन्ही पेहरावांसाठी अनुरूप आहे.
‘गोविंदा’, ‘प्रियतमा’, ‘धमक’, ‘देऊळ बंद’, ‘वाजलंच पाहिजे’ यासारख्या रूपेरी पडद्यावरच्या कलाकृतींमधून वेगळ्या धाटणीच्या भूमिकांतून नेहमीच अभिनेत्री म्हणून समोर आलेल्या गिरिजा जोशीने अल्पावधीतच आपला चाहता वर्ग तयार केला. पदार्पणापासूनच तगडय़ा कलाकारांसोबत अभिनय साकारलेल्या गिरिजाने आपला कसदार अभिनय सादर करत अभिनय क्षेत्रावर आपली वेगळी छाप पाडली. अभिनयासोबतच शास्त्रीय संगीत आणि कथ्थक नृत्याची जाण असलेल्या गिरिजाचा मोहक चेहरा अल्पावधीतच घराघरात पोहचला.
गिरिजाने २०१३ साली ‘गोविंदा’ या सिनेमातून सिनेइंडस्ट्रीत प्रवेश केला. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलंच नाही. गिरिजाने आज अभिनय क्षेत्रात आपला वेगळा ठसा जरी उमटवला असला तरीही लहानपणी तिला अभिनय क्षेत्रात यावं असं अजिबात वाटत नव्हतं. गिरिजाला खरंतर एअर होस्टेस म्हणून करीअर करायचं होत. मात्र गिरिजाच्या वडिलांनी तिच्यातला कलाकार बालपणीच हेरला आणि तिला अभिनयाची गोडी लावली. ‘ऐश इज बार्ंनग’ या तिने अभिनय साकारलेल्या एकांकिकेला राज्यस्तरीय पारितोषिकं लाभली आणि हाच दिवस गिरिजासाठी टार्ंनग पॉइंट ठरला.
गुढीपाढवा निमित्ताच्या विशेष फोटोशूटसाठी मला गिरिजाचं फोटोशूट करण्याची संधी मिळाली होती. या पाडव्याच्या शूटसाठी तिची वेशभूषा आणि तिचा एकूणच लूक कसा असेल हे तिच्याशी बोलून शूटचा दिवस आम्ही निश्चित केला. मॉर्डन टच असलेला पारंपरिक साज आम्ही निश्चित केला होता. हा मॉर्डन टच असलेला पारंपरिक साज लक्षात घेऊन तशीच वेशभूषा आणि रंगभूषा तिची करण्यात आली होती. पिवळ्या उठावदार रंगाची साडी, त्यावर साजेसा दिसेल असा हातात पांढऱया-लाल रंगांचा चुडा, नाकात मोत्यांची नथ, कलाकुसर केलेले दागिने, केसात मळलेला गजरा, कपाळावर टिकली असा तिचा शृंगार होता. तिचा हाच मोहक चेहरा कॅमेराबद्ध करण्यासाठी मी प्रयत्न करत होतो. गुढीची पूजा करतानाचे तिचे काही फोटो मी टिपले. वृत्तपत्राची गरज असलेले फोटो टिपल्यानांतर याच वेषभूषेतले तिचे काही पोर्टेट मी टिपले. तिच्या चेहऱयावरचं स्मितहास्य आणि सोनेरी झाक असलेली लायटिंग यामुळे मला एका पाठोपाठ एक असे अनेक चांगले फोटो टिपता आले.
पारंपरिक वेषभूषेतल्या लूकनंतर गिरिजाचं ग्लॅमरस फोटोशूट करायचं ठरलं होतं. यासाठी तिचा मेकओव्हर करावा लागणार होता. मेकओव्हरला साधारणपणे एक-दीड तास जाईल हे हेरून माझी टीम पुढच्या लायटिंगच्या तयारीला लागली. शूटच्या मध्ये बराच वेळ होता. याच वेळी गिरिजा तिच्या अभिनयाच्या प्रवासाबद्दल सांगत होती. तिला खरंतर एअर होस्टेस म्हणून करीअर करायचं होतं. पुढे त्या दिशेने तिने अभ्यासदेखील सुरू ठेवला होता. रुईया महाविद्यालयातून पॉलिटिक्स आणि सायकोलॉजी (मानसशास्त्र) या विषयांचं पदवी शिक्षण पूर्ण केलं. तर यानंतर सायकॉलॉजीचं पदव्युत्तर शिक्षणदेखील तिने पूर्ण केलं होत. गिरिजाचे वडील त्याकाळचे उत्तम दिग्दर्शक होते. त्यांच्याकडूनच गिरिजाला अभिनयाचं बाळकडू मिळालं. अभ्यासाच्या जोडीनं गिरिजाला लहानपणापासूनच नृत्य आणि संगीत याची वेगळी गोडी होती. पाचवीत असल्यापासून तिने गुरुवर्या गांगल यांच्याकडून शास्त्रीय संगीताचा नियमित अभ्यास करण्यास सुरुवात केली होती. तर यांच्या जोडीने पं.गोपीकृष्ण यांचे शिष्य राजकुमार केतकर यांच्याकडून तिने कथ्थकचे धडे गिरवले. हाच नृत्यकलेचा उपयोग तिला पुढे झाला. महाविद्यालयात तिने दीपाली विचारे हिच्या मार्गदर्शनाखाली अनेक नृत्य कार्यक्रमांतही सहभाग नोंदवत आपल्या नृत्याची चुणूक दाखवल्याचे ती सांगत होती.
पारंपरिक लूकनंतर आता गिरिजाचा मॉर्डन आणि ग्लॅमर्स लूक होता. गोविंदा आणि प्रियतमा या सिनेमांतून तिची मध्यमवर्गीय स्त्राrची तसेच गावरान महिलेची भूमिका समोर आली होती. मात्र यापलीकडे गिरिजा किती बोल्ड आणि ब्युटीफुल आहे हे दाखवण्यासाठी तिचा ग्लॅमरस मेकओव्हर करण्याचं आम्ही ठरवलं होत.
पारंपरिक साडीनंतर गिरिजाने गडद काळ्या रंगाचा वनपीस परिधान केला होता. वेशभूषा लक्षात घेऊन ‘लो की’ (low key) लायटिंग करून तिचे काही मिड शॉटस् आणि हेडशॉटस मी कॅमेराबद्ध केले. तर यानंतर पुन्हा लूक बदलून तिने गुलाबी रंगाचा टॉप आणि हॉट पॅन्ट परिधान केली. यात गिरिजा अधिकच बोल्ड दिसत होती. तिच्या या लूकमधल्या दिलखेच अदा मी कॅमेराबद्ध केल्या. अर्थात तब्बल सहा तास चालेल्या या एकूण शूटनंतर आणि नऊ जणांच्या अथक मेहनती अंती गिरिजाचे विविध लूक मला कॅमेराबद्ध करण्यात यश आले होते.
गोविंदा आणि प्रियतमा या सिनेमांतून गिरिजाची समोर आलेली प्रतिमा पुसून तिने पुढे काही सिनेमात अभिनय साकारण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या ‘चूक भूल द्यावी घ्यावी’ या आगामी सिनेमातून तिचा हा बोल्ड लूक समोर येईल. तर आगामी ‘रघु रोमिओ’ या सिनेमातही तिने साच्याबाहेरील अभिनय साकारल्याचं पाहायला मिळणार आहे. आपल्या कसदार अभिनयानं वेळोवेळी रसिकमन जिंकलेल्या गिरिजानं अथक मेहनतीने आणि परिश्रमाने तिचा पुढचा अभिनयाचा प्रवास सुरू ठेवला आहे. आगामी सिनेमांतून गिरिजा आपल्या अभिनयानं यापुढेही यशाचा आलेख उंचच उंच ठेवेल.
धनेश पाटील
dhanuimages@gmail.com
March 4, 2019
ठाणे जिल्ह्यातील प्रसिध्द वृत्तपत्र वितरक व्यावसायिक अशी ख्याती असलेल्या अरविंद दातार यांचं वितरण कार्य मुंबई ते बदलापूर, चर्चगेट ते विरार, कल्याण ते कसारा, भिवंडी, नवी मुंबई अश्या परिक्षेत्रांत आहे. आदित्य असोसिएट्सचे व अश्विनी पब्लिसिटीचे ते संचालक असून अनेक सामाजिक संस्थांचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे
अरविंद दातार ह्यांचे वडिल अच्युत दातार हे वयाच्या १३व्या वर्षी आपले मुळगाव पनवेल तालुक्यातील वावंजेपाला येथून ठाणे शहरात उदरनिर्वाहासाठी आले. ते त.र.पुरोहित यांच्याकडे वृत्तपत्र वाटण्यासाठी नोकरीला लागले. त्यांची इनामदारी व कामकाज पाहून पुरोहित यांनी त्यांचा व्यवसाय अच्युत दातार यांच्याकडे सोपविला आणि वडिलांचा हा व्यवसाय आता त्यांचे दोन सुपुत्र अरविंद दातार आणि अरूण दातार समर्थपणे सांभाळत त्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे.
अरविंद दातार यांची ही सामाजिक तळमळ पाहून मिलिंद बल्लाळ यांनी त्याना ठाण्यामध्ये सुरू झालेल्या चौथ्या रोटरी क्लबच्या सदस्य पदासाठी निमंत्रण दिले. रोटरीमध्ये अनेक महत्त्वाची पदे भुषवित ते २०११-२०१२ या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचे अध्यक्ष झाले.
अरविंद दातार यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनच्या माध्यमातून वाडा, मोखाडा, जव्हार या परिसरात चेकडॅमद्वारे पाणी साठवून अनेक शेतकर्यांना लाभ मिळवून दिला. वाडा येथे तत्कालीन अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दातार यांनी शाळा दत्तक घेतली. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचा अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारताच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय जालन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात झाडे लावण्याचा विक्रम केला होता.
दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित
January 3, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti