(User Level: User is not logged in.)

व्यक्ती-परिचय

जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद

    दिग्दर्शक व पटकथाकार चेतन आनंद यांचा जन्म ३ जानेवारी १९२१ लाहोर येथे झाला. चेतन आनंद हे देव आनंद आणि विजय आनंद यांचे जेष्ठ बंधू.

    अॅडव्होकेट पिसोरिलाल आनंद घराण्यात जन्मलेल्या चेतन आनंद यांनी लाहोर शासकीय महाविद्यालातून शिक्षण पूर्ण केल्यावर ते डेहराडूनचा डून स्कूलमधे शिकवू लागले. कथालेखनाची आवडच असल्याने त्यांना त्यांच्या कथेवर चित्रपट बनवण्याचा ध्येयाने मुंबईत घेऊन आली. त्यांची सम्राट अशोकवरील कथा ऐकून त्यावर चित्रपट बनण्याऐवजी दिग्दर्शक फणी मुजुमदार यांनी या देखणा, शार्प तरुणाला त्यांचा राजकुमार चित्रपटात नायकाची भूमिका ऑफर केली. अन अशाप्रकारे लेखक बनण्यास आलेले चेतन आनंद १९४४ साली राजकुमार या चित्रपटाचे नायक बनले. हा चित्रपट जरी तिकिटाचा खिडकीवर क्लीक झाला नाही तरी निराश न होता त्यांनी आता पटकथा लेखनाबरोबर दिग्दर्शनही करायचे ठरवले अन त्यातूनच ’नीचानगर’ या चित्रपटाची निर्मिती झाली.

    ज्यामुळे अभिनेत्री कामिनी कौशल पुढे आल्या. १९४६ मधील चेतन आनंद यांचा या चित्रपटाला आंतरराट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवात सर्वोत्कृट चित्रपटाचा जागतिक सन्मान मिळाला. ज्याला प्रख्यात सतारवादक पं.रवीशंकर यांचे चे संगीत होते.

    आंतरराष्ट्रीय कान्स चित्रपटमहोत्सवाचे नामकरण पुढे ग्रॅण्ड प्रिंक्स असे झाले. चेतन आनंद हे हाडाचा दिग्दर्शक होते. पुढे चित्रपटात काम करण्याच्या इराद्याने आलेला देव आनंदने आपला थोरला भावाच्या मदतीने १९४९ साली निर्मिती क्षेत्रात पर्दापण करुन नवकेतन चित्रसंस्थेची रीतसर स्थापना करुन या बॅनरतर्फे आपला ’अफसर’ याचित्रपटाची निर्मिती केली. ज्यात त्याच्याबरोबर सुरैया नायिका होती व चेतन आनंदचे दिग्दर्शन होते. हा चित्रपट चांगला चालला. ज्यामुळे प्रोत्साहित होऊन चेतन आनंद यांनीच नंतर नवकेतनचा ’टॅक्सी ड्रायव्हर’ आणि ’आँधिया' या चित्रपटाची निर्मिती केली. या दोन्ही चित्रपटांपैकी ’टॅक्सी ड्रायव्हर’ला चांगले यश मिळाले. नंतर मग गीताबालीसह नवकेतनचाच फंटुश हा देव आनंदचा चित्रपटही चेतन आनंद यांनीच दिग्दर्शित केला.

    आपल्या कथाकल्पनेशी विचारांशी एवढेच नव्हे तर जीवनविषक तत्वज्ञानाशी एकनिष्ठ अन प्रामाणिक राहणाऱ्या चेतन आनंद यांचे पुढे नवकेतनशी जमू शकले नाही. कारण त्याच्याकडे देवआनंद सारखा पूर्णत: व्यावसायिक दृटिकोन नव्हता. तिकिटाचा खिडकीशी तडजोड ते कधीच करत नसल्याने अल्पावधीतच ते नवकेतनशी फारकत घेउन ते वेगळे झाले. एक उत्तम प्रतिभा शाली विचारवंत व सृजनशील दिग्दर्शकाचे त्याच्या विचारसरणीच्या आग्रहीपणामुळे कुणाशीच तसे पटणे अवघड होते. त्यांनी स्वत:ची स्वतंत्र चित्रसंस्था निर्माण केली. अन त्यांनी निर्मिलेला आणि दिग्दर्शित केलेला त्यांचा गाजलेला व नावाजलेला पुरस्कारप्राप्त चित्रपट म्हणजे १९६२ चा चिनी आक्रमणावर बेतलेला "हकीकत " हा चित्रपट होय आजच्या भाषेत त्यात तत्कालीन सर्व आघाडीचे व नवोदित कलाकार असल्याने तो मल्टीस्टार असूनही त्यात कलाकारांपेक्षा परिस्थितीला महत्व होते.

    बलराज सहानी, संजय, धम्रेद्र, जयंत, प्रिया राजवंश, विजय आनंद सारखे कलाकार व मदनमोहन यांची एकसे बढके एक सुरेल सुमधुर अजरामर गाणी. ज्यात 'कर चले हम फिदा जानेमन साथियो" या गाणाचा राट्रीय गीतांचा सन्मान मिळाला. या चित्रपटासाठी ते कितीतरी दिवस तयारी करत होते. याच दरम्यान देव आनंद "गाईड" चित्रपटाची तयारी करत होते अन या चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचा थोरला भावाने चेतन आनंद यांनी करावे अशी देवसाहेबांची उत्कट इच्छा होती. पण हकिकत चित्रपटाचे लडाख लेह भागात चित्रिकरणास नेमकी त्याच वेळेस संरक्षण खाताने परवानगी दिली. अन चेतन यांनी आपला "हकिकत" या ड्रीम प्रोजेक्टला सर्वोच्च प्राधान देत गाईड दिग्दर्शित करणास नकार दिला.

    पण "हकिकत" हा भव्य कृष्ण धवल चित्रपट सुरु करणापूर्वी त्यांनी "किनारे किनारे "हा जयदेव यांचा फक्त संगीतामुळे स्मरणात राहिलेला देवआनंद मिनाकुमारीचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांच्या हिमालय प्रॉडक्शन हाउसतर्फे त्यांनी 'हकिकत'नंतर "आखरी खत",हसते जख्म, हिररांझा, हिंदुस्थानकी कसम, कुदरत, हाथोकी लकिर आदि चित्रपट निर्माण केले ज्यामध्ये केवळ प्रिया राजवंश हीच नायिका असायची. चेतन आनंद यांनी त्यानंतर जवळपास दशकभरानंतर ‘हिंदुस्थान की कसम’ या युद्धपटाची निर्मिती व दिग्दर्शन केले.

    पण मदन मोहन यांचे संगीत वगळता त्या चित्रपटात फारसा थरार नव्हता. त्यांच्या अखेरच्या पर्वात त्यांनी "जानेमन व साहेबबहादूर हे त्यांच्या नावलौकिकाला न शोभणारे चित्रपट दिले. "परमवीर चक्र" ही त्यांची दूरदर्शन मालिकाही याच काळात त्याना चांगले यश देउन गेली. नवकेतनचा "कालाबाजार"मधे प्रथमच चेतन आनंद, विजय आनंद व देव आनंद हे तिघे बंधू एकत्र चमकले. ज्यात चेतन आनंद यांनी एका निष्णांत वकिलाची भूमिका केली होती. तर गोल्डीने एका पळपुट्या प्रियकराची ..

    चेतन आनंद हे त्यांच्या’ हकीकत’ या सिनेमासाठी या कथेला सूट होईल अशी नायिका ते शोधत होता. योगायोगाने गाठ पडलेल्या प्रिया राजवंश यांचे व्यक्तीमत्व त्याला खूप भावलं. त्यांनी थेट तिच्याशी संपर्क साधून त्यांना आपल्या सिनेमासाठी साईन केले. याचकाळाच चेतन आनंदच्या विवाहित आयुष्यात ब-याच अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्याची पत्नी उमा पासून ते विभक्त झाला होते. प्रिया राजवंश यांनी केवळ अभिनयच नव्हे तर कथा, पटकथा, संवाद आणि संकलन या सर्व कामात चेतन आनंद यांना मदत केली.

    त्यामुळे हकीकतच्या चित्रीकरणादरम्यान या दोहोंत जवळीक वाढली. त्या दोघांच्या वयात बावीस वर्षांचे अंतर असूनही त्यांचे एकमेकावर निस्सीम प्रेम केले. वयातले अंतर त्यांच्या प्रेमात अडसर ठरले नाही. चेतनचे तिच्यावर प्रेम असले तरी इंडस्ट्रीत त्यांच्या नात्यास त्याने चर्चेचा विषय होऊ दिले नाही. त्या दोघांचाही लुक काहीसा ऑफबीट असल्याने त्यांच्या जोडीत विजोडपणा कधी वाटला नाही. ‘हकीकत’नंतर प्रिया आणि चेतन एकत्र राहू लागले होते. या दोघांनी लग्न केले नाही. मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना पती-पत्नी म्हणूनच ओळखले जात होते. ‘हकीकत’नंतर प्रिया राजवंश यांना अनेक ऑफर आल्या. चेतन आनंद यांनी हयात असेपर्यंत त्याच्या प्रत्येक चित्रपटात प्रिया राजवंश यांना रोल दिले. चेतन आनंद यांनी हकीकत, आखरी खत, हीर राँझा, हसते जख्म असे चित्रपट दिले.

    चेतन आनंद यांचे चिरंजीव केतन आनंद यांनी टूटे खिलौने हा चित्रपट आणि काही लघुपट तयार केले. चेतन आनंद यांच्या सर्व चित्रपटाना मदनमोहन यांचे संगीत व कैफी आझमी यांची गीतरचना असे. त्यांचे चित्रपट अत्यंत तरल,भावदर्शी व वास्तवाचे भान न हरपू देताही विलक्षण काव्यात्मक असत. मग तो "हिर रांझा"असेल वा "हसते जख्म..नीचानगर त्यांच्या "हकिकत"या चित्रपटाला १९६५ मधे सर्वोत्कृट चित्रपटाचा व्दितीय क्रमांकाचा राट्रीय सन्मान मिळाला. चेतन आनंद यांचे ६ जुलै १९९७ रोजी निधन झाले.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    संदर्भ. इंटरनेट/ दिलीप कुकडे

      January 3, 2019


  • संगीतकार वसंत देसाई

    उत्तम गळा , दमदार आवाज , बळकट कमावलेले शरीर आणि जबरदस्त आलापी आणि गुरुकडे केलेला रियाज ह्यामुळे त्यांची शास्त्रीय संगीताची बैठक तयार झाली. त्यांनतर ते ठिकठिकाणी गाण्याच्या मैफली करू लागले . त्यामुळे त्यांना इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनीतर्फे गाण्यासाठी बोलवण्यात आले तेव्हा त्यांनीच संगीत देऊन स्वतःच्याच आवाजात गाणी गायली.

      June 23, 2021


  • संत तुकाराम

    भागवत धर्माचा पाया ज्ञानेश्वरांनी घातला आणि त्यावर कळस चढविण्याचे कार्य संत तुकारामांनी केले. मराठी काव्यात ‘अभंग‘ प्रकार निर्माण केला. त्यांच्या अभंगाची संख्या ५ हजार आहे. अभंगात सुभाषितवजा पंक्ती आढळतात शुध्द परमार्थाची शिकवण. भक्तीची कास. नामस्मरण व सतसंग यावर अभंगरचना. सगुण-निर्गुण हे आध्यामिक साक्षात्काराचे पैलू.

    तुकारामांचा जन्म, पुण्याजवळील देहू गावी, इ.स. १६०८ मध्ये झाला. प्रारंभी ते सुखी संसारी गृहस्थ होते. ते व्यवसायाने वैश्य होते. त्यांची दुकानदारी उत्तम चालली होती. पण दुष्काळ पडला, पत्नी वारली, मुगला गेला. इकडे दिवाळे निघाले. तुकाराम विठ्ठलभक्तीकडे वळले. अभंगरचना करु लागले. महान विठ्ठलभक्त झाले. श्रीविठ्ठलाचा त्यांना साक्षात्कार झाला. भक्तिमार्गाचा जयजयकार करीत त्यांनी जगाचा निरोप घेतला. फाल्गुन वद्य द्वितीयेला ‘तुकाराम बीज‘ म्हणतात. तुकारामांनी आपले लौकिक आणि अध्यात्मिक जीवनातले अनुभव आपल्या अभंगांतून व्यक्त केले आहेत. उत्स्फूर्त आणि उत्कट भावोद्रेकाची ही अभंग -कविता म्हणजे मराठी भाषेचे अक्षर -लेणे आहे.

    संत तुकाराम हे महाराष्ट्राचे सर्वात लाडके संत आहेत. ज्या काळात संत तुकाराम महाराष्ट्रात पुण्याजवळच्या देहू गावी जन्माला आले त्याच काळात अनेक संत होऊन गेले. म्हणून त्या काळाला भक्तियुग म्हणतात. त्यांच्या जन्मवर्षाबद्दल इतिहासकारांमध्ये मतभेद आहेत, त्यातल्या चार लोकप्रिय तारखा १५६८, इ.स. १५७७, इ.स. १६०८ आणि इ.स. १५९८ या आहेत. इ.स. १६५० मधे एका सार्वजनिक समारंभात, श्री विठ्ठल त्यांना सदेह वैकुंठी घेऊन गेले अशी मान्यता आहे. विष्णूचे दुसरे रूप असलेला पंढरपूरचा श्री विठ्ठल वा विठोबा हा तुकारामांचा लाडका देव होता.

      March 12, 2015


  • वर्षा उसगांवकर

    वर्षा उसगांवकर ही मराठी आणि हिंदी चित्रपटांतील ग्लॅमरस अभिनेत्री आहे. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या वर्षाने केवळ त्यासाठी गोवा सोडून मुंबईत बस्तान बसवले.

    तिची दखल मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीने घेतली ती आचार्य अत्रे लिखित 'ब्रम्हचारी' या नाटकातील बोल्ड नायिकेमुळे.

    नाट्य, दूरचित्रवाणी इत्यादी माध्यमांमध्येही तिने काम केले आहे.

    वर्षा उसगावकरचे काही चित्रपट :

    तुझ्यावाचून करमेना
    गंमत जंमत
    खट्याळ सासू नाठाळ सून
    सगळीकडे बोंबाबोंब
    मज्जाच मज्जा
    रेशीमगाठी
    आत्मविश्वास
    हमाल दे धमाल
    कुठं कुठं शोधू मी तुला
    नवरा बायको
    अफलातून
    भुताचा भाऊ
    पसंत आहे मुलगी
    आमच्या सारखे आम्हीच
    मालमसाला
    उपकार दुधाचे शेजारी शेजारी
    पटली रे पटली
    घनचक्कर
    बाप रे बाप
    डोक्याला ताप नाही
    मुंबई ते मॉरिशस
    ऐकावं ते नवलच
    एक होता विदूषक
    शुभमंगल सावधान

    विकिपिडियावरील माहितीचे पान (इंग्रजी)

    ## Varsha Usgaonkar

    अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

      April 14, 2010


  • शंकर केशव कानेटकर (कवी गिरीश)

    बाल-गीत, कांचनगंगा, फलभार, चंद्रलेखा, सोनेरी चांदणे हे काव्यसंग्रह, चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या इनॉक आर्डेनचा ‘अनिकेत’ हा काव्यानुवाद ही त्यांची काव्यसंपदा. स्वप्नभूमी हे माधव जूलियनांचे चरित्र त्यांनी लिहिले.

      November 8, 2017


  • जेष्ठ अभिनेते नाना पाटेकर

    नाना पाटेकर यांचे मूळ नाव विश्वनाथ पाटेकर. त्यांचा जन्म १ जानेवारी १९५१ रोजी झाला. नाना पाटेकर यांचे वडील दिनकर पाटेकर हे चित्रकार होते. नाना मुंबईतील जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’चे विद्यार्थी होते. नाना पाटेकर यांनी ’गमन’ या १९७८ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून चित्रसृष्टीत पदार्पण केले. ही भूमिका इतकी छोटी होती की ते प्रेक्षकांच्या नजरेतही आले नाहीत. पुढे आठ वर्षे नाना चित्रपटात मिळेल ती भूमिका करत राहिले. सुरवातीला जाहिरात एजन्सीमध्ये काम केले. त्याच दरम्यान "हमीदाबाईची कोठी' या नाटकामध्ये भूमिका केली व मोठे यश मिळाले. अगदी सुरवातीला "दमन', "गड जेजुरी जेजुरी' आदी चित्रपटांमध्ये काम केले. रंगभूमीवर आपला ठसा उमटवल्यावर रुपेरी पडद्याकडे वळलेल्या पाटेकर यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीही गाजवली आहे.

    नाना पाटेकर यांनी अभिनय केलेला माफीचा साक्षीदार हा मराठी चित्रपट त्यांच्या अभिनयामुळे इतका गाजला की या चित्रपटाची हिन्दी आवृत्तीस ’फांसी का फंदा’ ही सुद्धा खुप गाजली. मोहरे आणि सलाम बॉम्बे या चित्रपटांमध्ये अभिनय केलानंतर त्यांना हिन्दी फिल्म इंडस्ट्रीमध्ये खलनायकाचे काम मिळायला सुरुवात झाली मा.नाना पाटेकर यांनी खलनायकाबरोबर अनेक चित्रपटांमध्ये नायकाची भुमिकासुद्धा केली आहे. अंधायुद्ध, परिंदा, अंगार, तिरंगा, क्रांतिवीर, वजूद, अब-तक-छप्पन, अटॅक ऑफ २६११, गुलाम-ए-मुस्तफा, टॅक्सी नं. ९२११, यशवंत, युगपुरुष, खामोशी, अपहरण, वेलकम, हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. नाना पाटेकर यांनी प्रहार चित्रपटात एका सैनिकाची भूमिका साकारली होती. ही भूमिका पडद्यावर वास्तवदर्शी वाटावी म्हणून नाना भारतीय सैनिकांसोबत दिवस राहिले होते. विशेष म्हणजे ते त्यावेळी ते कलाकार म्हणून नाही तर एक सैनिक म्हणून राहिले होते.नाना यांनी सैनिकाच्या भूमिकेकरिता जवळपास तीन महिने पुण्याला जाऊन ट्रेनिंग घेतली होती. जेणेकरून प्रहार मधील कमांडोची भूमिका ते अधिक चांगल्या पद्धतीने साकारू शकतील.

    प्रहार या चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले होते. सैनिकांसोबत राहत असताना नाना पाटेकर यांच्या धाडसी व्यक्तिमत्वाने भारावून गेलेल्या सैनिकांनी त्यांना 'कॅप्टन' या पदवीने सन्मानित केले.१९८९ साली ’परिंदा’ मध्ये केलेल्या खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्म फेअर पारितोषिक मिळाले. तसेच १९९२ साली ’अंगार’ या चित्रपटातील खलनायकाच्या भुमिकेसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट खलनायक चा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९९४ साली ’क्रांतिवीर’ चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. अपहरण या चित्रपटातील त्यांच्या खलनायकाच्या भुमिकेला सर्वोत्कृष्ट खलनायक फिल्मफेअर पुरस्कार आणि स्टार स्क्रीन पुरस्कार मिळाले. बंगाल फिल्म पत्रकारिता संघातर्फे बेस्ट ऍक्टर पुरस्कार अबतक छप्पन या चित्रपटातील भूमिकेकरिता मिळाला. इतरांपर्यंत संवाद फेकण्याची त्यांची शैली. या क्षणी त्यांच्या चेहर्या वर येणारे चढउतार नैसर्गिकच. मनात खोलवर दाबून ठेवलेला राग काढतेवेळी चेहर्याटवर येणारा संताप सहजरीत्या त्यांच्या अभिनयातून आपणास पहावयास मिळते. ही व यासारखी अनेक चित्रपटांतून त्यांनी आपले कलाकौशल्य दाखविले.

    हिंदी सिनेसृष्टीतील ट्रॅजिडीकिंग म्हणवणारे दिलीपकुमार, अभिनय सम्राट राजकुमार आणि यँग्री यंग मॅन अभिताभ बच्चन यांचीही अभिनयशैली निराळी, या महान नायकांच्या अभिनयक्षमतेला नानांची अभिनयक्षमताच टक्कर देऊ शकते असं म्हणायला हरकत नाही. ‘खामोशी’ चित्रपटातील नाना पाटेकरांची भूमिका अगदी वेगळीच. जिवंत अभिनय आपणास त्यांच्या चित्रपटातून पहावयास मिळतात. टेलिव्हीजन कार्टून मालिका ‘जंगल बुक’ याकरिता स्वतःचा आवाज दिला. यशवंत, आंच, वजूद या चित्रपटातून त्यांनी गाणी ही गायली. नाना पाटेकर यांचा अभिनय असलेला डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांचे प्रेरणादायी कार्य सांगणारा ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे-द रिअल हिरो’ हा चित्रपट नक्की बघावा. तसेच गेल्या वर्षी जानेवारीत प्रदर्शित झालेला नाना पाटेकरचा 'नटसम्राट' शिरवाडकर यांचे 'नटसम्राट' या चित्रपटात गणपतराव बेलवलकर यांची भूमिका पेलणारे नाना पाटेकर यांनी ती भूमिका अतुच्य कळसावर नेऊन ठेवली. मा.नानांनी देऊळ चित्रपटात पण सुंदर भूमिका केली आहे. अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे मानकरी ठरलेल्या मा.नाना यांना भारत सरकाने ‘पद्मश्री’ सन्मानाने गौरवले आहे. पत्नी निलकांती व मुलगा मल्हार पाटेकर हा त्यांचा परिवार.

    नाना पाटेकर यांनी सप्टेंबर २०१५ मध्ये मकरंद अनासपुरे याच्याबरोबर ‘नाम फाउंडेशन’ या धर्मादाय संस्थेची स्थापना केली. या संस्थेअंतर्गत ते महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील शेतक-यांना मदत करतात.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९३२२४०१७३३
    संदर्भ. इंटरनेट

      January 1, 2018


  • नीलकंठ खाडिलकर

    खाडिलकर हे एक उत्तम मुलाखतकार होते. त्यांनी घेतलेल्या गोळवलकर गुरुजी आणि सत्य साईबाबा यांच्या मुलाखती अतिशय गाजल्या होत्या.

      July 1, 2022


  • मकरंद प्रधान

    देशोदेशी व्यापार करणार्‍या प्रत्येक उद्योजकाकडे कंटेनर भरुन पाठविण्याइतका माल नसतो. अशा कंटेनर पेक्षा कमी आकाराच्या मालाची दाही दिशांना निर्धोक ने-आण करण्याच्या व्यवसायात मकरंद प्रधान यांनी संधी शोधली. त्यांच्या सीपी वर्ल्ड ग्रुपने जगात १४०० कोटी तर देशांतर्गत कंपनीने ३०० कोटींच्या वार्षिक उलाढालीपर्यंत मजल मारली. युरोप, आशिया, अफ्रिका, आखात व अमेरिका अशा जगभर पसरलेल्या उद्योगाबरोबरच प्रधान यांनी भारतातही मोठा विस्तार केला...

    दाही दिशा व्यापाराच्या

      July 14, 2017


  • डॉ. माधव त्र्यंबक पटवर्धन (माधव जूलियन)

    माधव जूलियन हे मराठी कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य देखील होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो.

      March 14, 2014


  • जेष्ठ रंगकर्मी गोपीनाथ सावकार

    ‘संगीत ययाती आणि देवयानी’ हे नाटक गोपीनाथ सावकार यांनी त्यांच्या ‘कलामंदिर’ या नाटय़संस्थेतर्फे २० ऑगस्ट १९६६ रोजी रंगभूमीवर आणले. पहिला प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघाच्या रंगभूमीवर सादर केला गेला होता.

      January 14, 2019