जगभरातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय व्यक्तींचा परिचय.. हा आहे सामान्यज्ञानाचा खजिना…
१९९० साली सचिन खेडेकर यांनी जीवा सखा या मराठी चित्रपटा द्वारे पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले आहे. त्यांचा जन्म १४ मे १९६५ रोजी झाला.
मराठी चित्रपटांप्रमाणेच त्यांनी बॉलिवुडमध्येदेखील आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांनी आतापर्यत अनेक बॉलिवुड चित्रपट केले आहे. त्यांचा पहिला बॉलिवुड चित्रपट १९९७ मध्ये प्रदर्शित झाला आहे. जिद्दी असे या बॉलिवुड चित्रपटाचे नाव आहे.
आपली माणसे, चिमणी पाखरे, विधिलिखित, लालबाग परळ, शिक्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श, फक्त लढ म्हणा असे अनेक मराठी चित्रपट त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय त्यांचा हा चित्रपट फारच गाजला होता.
रूस्तम, क्रिश ३, मुंबई कटींग, आजान, जंग, बादशाह, रॉक, अनुराधा, बबल गम, तीस मार खॉं असे अनेक तगडे बॉलिवुड चित्रपटदेखील त्यांनी केले आहेत.
त्यांची सिंघम या सुपरहीट बॉलिवुड चित्रपटातील गोठया नावाची भूमिका विशेष गाजली होती.कौन होईल मराठी करोडपती हा छोटया पडदयावरील त्यांचा कार्यक्रमाचे अॅकंरींग त्यांनी केले होते.सचिन खेडेकर यांना बॉलिवुड ,मराठी चित्रपट आणि छोटया पडदयावर देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. त्यांच्या अभिनयाचे कौतुक नेहमीच ऐकण्यास मिळाले आहे. सैलाब या टीव्ही शोसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेता म्हणून पुरस्कारदेखील मिळाला आहे. तसेच ऐतिहासिक भूमिकेसाठीदेखील त्यांना उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
May 15, 2017
लोकोत्तर पुरुषांच्या पश्चात त्यांच्या वंशजांवर काळाचा दबाव नकळत निर्माण होत असतो. विशेषत: बौद्धिक क्षेत्रातील अशा महान व्यक्तींच्या पुढील पिढय़ांना ती क्षमता टिकवून ठेवता येतेच असे नाही. परंतु अशाही स्थितीत आपण स्वकर्तृत्वाने अपवाद ठरावे, असे बहुधा डॉ. सदानंद मोरे यांनी ठरवले असावे. महाराष्ट्राच्या तार्किक आणि बौद्धिक परंपरेतील मुकुटमणी असलेल्या संत तुकाराम महाराज यांच्या घराण्यात जन्मलेल्या डॉ. मोरे यांनी गेल्या पस्तीस वर्षांमध्ये संतपरंपरेचा अभ्यास करून जो अन्वयार्थ लावला, तो त्यांच्यातील अभ्यासकाचे दर्शन घडवणारा आहे.
महाराष्ट्रातील लोकव्यवहाराचा त्यांचा अभ्यास केवळ तत्त्वज्ञान आणि अध्यात्माच्या अंगाने केलेला नाही. राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकारण या क्षेत्राचीही जोड त्यांच्या अभ्यासाला मिळाल्यामुळे तो अनेकांगी आणि परिपूर्णतेकडे जाणारा ठरला आहे. ‘लोकमान्य ते महात्मा’ या त्यांच्या ग्रंथातून त्यांचा हा अभ्यास जसा लक्षात येतो, तसाच ‘ज्ञानोबा तुकाराम’, ‘पालखी सोहळा-उगम आणि विकास’, ‘अमृतानुभवाची वासुदेवी टीका’, ‘तुकाराम गाथेची देहू प्रत’ , ‘मंथन’, ‘त्रयोदशी’ या सारख्या लिखित आणि संपादित ग्रंथांमुळे लोकव्यवहारातील गुंतागुंत अधिक सोपी करून सांगण्याचा त्यांचा प्रयत्नही अभ्यासकांच्या मनात ठसतो. तत्त्वज्ञान विषयाचे गेली ३५ वर्षे अध्यापन करणारे डॉ. मोरे हे पुणे विद्यापीठाच्या संत ज्ञानदेव व संत तुकाराम अध्यासनांचे प्रमुख होते. अध्यापन हा जरी त्यांचा धर्म असला तरीही सतत चिंतन आणि त्याचे विश्लेषण हा त्यांचा स्वभाव आहे. नाशिक येथे या आठवडय़ात होत असलेल्या संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली निवड म्हणजे त्यांच्या आजवरच्या विविधांगी अभ्यासाचा गौरव आहे, असे म्हटले पाहिजे. मराठी माणसांचा देशपातळीवरील पहिला जनसमुदाय म्हणून महाराष्ट्राचा जो उल्लेख होतो, त्याचे कारण महाराष्ट्रातल्या संतपरंपरेने येथील जनतेला आत्मभान आणि राष्ट्रभान दिले हे आहे, त्यामुळेच संत नामदेव पंजाबपर्यंत जाऊ शकले आणि मराठय़ांनी पानिपतापर्यंत विस्तार करण्याचे स्वप्न पाहिले, असे मत डॉ. मोरे आवर्जून मांडतात. मोरे यांच्या निवडीमुळे संतसाहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळू शकेल, यात शंका नाही.
--------------------------------------------------------------------------
MSS - 0042
मोरे, (डॉ.) सदानंद श्रीधर
२५ जून १९५२
१९५२ > लेखक, गाढे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज डॉ. सदानंद श्रीधर मोरे यांचा जन्म. त्यांच्या अभ्यासाची साक्ष देणार्या अनेक पुस्तकांपैकी ‘मंथन’ हे पहिले तर ‘त्रयोदशी’ हे ज्ञानेश्वरांविषयीचे. ‘तुकाराम दर्शन’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. ‘लोकमान्य ते महात्मा’, ‘कृष्ण : द मॅन अॅंड हिज मिशन’ ही इंग्रजी पुस्तकं, तीन काव्यसंग्रह अशी त्यांची ग्रंथसंपदा.
August 5, 2017
विख्यात मराठी कवी. संपूर्ण नाव यशवंत दिनकर पेंढारकर.
July 14, 2017
महाराष्ट्राला अभिमान वाटावा असं नाट्यक्षेत्रातील एक नाव म्हणजे दर्जेदार नाटकांचे लेखक वसंतराव कानेटकर. फक्त नाटककार नाही तर कथा, कादंबरी आणि वैचारिक लेखन करणारे वसंतराव कानेटकर हे एक अभ्यासू व्यक्तिमत्व.
February 4, 2010
जन्मः १३ नोव्हेंबर १८५५
मृत्यूः १४ जून १९१६
गोविंद बल्लाळ देवल हे आद्य मराठी नाटककार होते. त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके - दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे.
गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म कोकणातला, त्यांचे बालपण सांगली जिल्ह्यात गेले आणि शालेय शिक्षण बेळगाव येथे झाले आणि तेथेच ते प्रख्यात नाटककार व अभिनेते बळवंत पांडुरंग किर्लोस्कर यांच्या संपर्कात आले. शिक्षण पूर्ण झाल्यावर (१८७९) देवल त्याच शाळेत शिक्षक म्हणून काम करीत. बेळगाव येथे असतांनाच देवल यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत जाण्यास सुरूवात केली होती. त्यांना त्या नाटक कंपनीत भूमिकाही मिळत गेल्या तसेच किर्लोस्कर यांचे सहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही देवल काम करू लागले. १८८५ साली किर्लोस्कर यांच्या निधनानंतरही देवल त्याच संस्थेत दिग्दर्शक म्हणून काम करीत राहिले. काही वर्षांनी (१८९४) मग देवल पुणे येथील शेतकी शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. मूळ स्वभाव नाटककाराचा असल्याने देवल यांनी पुण्यात आर्योद्धारक नाटक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. १९१३ साली देवल बाल गंधर्व यांच्या गंधर्व नाटक मंडळीत गेले.
गोविंद देवल बल्लाळ यांचे मराठीसृष्टीवरील लेख.
गोविंद बल्लाळ देवल (14-Jun-2017)
महान मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल (1-Apr-2019)
December 15, 2010
December 15, 2010
माउथ ऑर्गन व गिटार वादक भानू गुप्ता यांचा जन्म १२ डिसेंबर १९३० रोजी साली रंगून, बर्मा येथे झाला. ब्रिटीश नौकेदाराकडून ते माउथ ऑर्गन वाजवण्यास शिकले. जपानी भाषा लिहिता आणि लिहिता यावे म्हणून भानू यांनी १२ व्या वर्षी जपानी सैन्यात इंग्लिश दुभाषी म्हणून काम केले. १९५० मध्ये त्यांचे कुटुंब रंगून हून कोलकता येथे आले. कोलकातामध्ये त्यांनी तेल तंत्रज्ञान अभ्यास केला आणि नंतर काल्टेक्स कंपनीमध्ये नोकरीही केली. कोलकात्यात असताना भानू नाईटक्लब मध्ये माउथ ऑर्गन वाजवत असत. अखेरीस १९५९ साली मध्ये नऊ वर्ष कोलकाता येथे राहल्यानंतर भानू मुंबईसाठी रवाना झाले.
संगीत दिग्दर्शक सी. रामचंद्र यांच्या पैगाम चित्रपटातून त्यांना पहिला ब्रेक मिळाला. लवकरच त्यांनी बिपीन दत्ता आणि सलील चौधरी यांच्या बरोबर काम करण्यास सुरवात केली. व लोकप्रिय हिंदू माउथ ऑर्गन वादक अशी ओळख मिळवली. (त्या काळात ख्रिश्चन माउथ ऑर्गन वादक खूप होते.) पुढे ते गिटार पण शिकले, व त्यांनी आर.डी. बर्मन यांच्या कडे गिटारवादक म्हणून काम करण्यास सुरवात केली. त्यांनी अनु मलिक, नदीम श्रवण आणि बप्पी लाहिरी यांच्यासाठी माउथ ऑर्गन वादक व गिटारवादक म्हणून काम केले होते.
भानू गुप्ता हे आर, डी,बर्मन यांचे जिवलग मित्र व सहकारी होते. त्यांनी शोले चित्रपटातील माऊथ ऑर्गन ची थीम वाजवली होती. भानू गुप्ता यांचे २८ जानेवारी २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
https://www.youtube.com/watch?v=g6RDGEIY9Yo
October 30, 2019
नाना पळशीकर यांचा जन्म २० मे १९०८ रोजी मध्यप्रदेशातील भंडारा येथे झाला. नाना पळशीकर म्हणजे नारायण बळवंत पळशीकर.
नाना पळशीकर हे केवळ आपल्या मुद्राअभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे असामान्य चरित्र अभिनेते होते. मध्य प्रदेशात जन्म झाल्यामुळे त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर देशप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. नागपूर येथे हिंदू महासभेच्या कार्यक्रमात कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आली. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेगडेंवार तेथे होते, त्या वेळी नाना पळशीकर यांनी एक छोटा कार्यक्रम केला होता. तो पाहून त्यांनी नानांची प्रशंसा केली आणि म्हणाले , " तू खूप चांगला अभिनय करतोस, तू सिनेमात गेलास तर चांगले नांव कमवशील."
त्या काळात नागपूरला एक चित्रपट संस्था मूकपट तयार करत होती. त्या मूकपटात नारायण यांना काम मिळाले. त्याचवेळी त्यांनी त्यांचे नाव ' नाना पळशीकर ' असे केले. चित्रपट क्षेत्रात नाव कमवावे या हेतूने नाना प्रभात कंपनीत पुण्याला गेले. पण तिथे काम मिळाले नाही. मग ते मुबंईला गेले आणि तिथे रोज एक रुपया रोजदारीवर रणजित स्टुडिओमध्ये काम करू लागले. त्यावेळी रणजीत स्टुडिओत १९३५ साली ' देशदासी ' या चित्रपटाचे काम चालले होते. त्या चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर ' बॅरिस्टर की बीबी' या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली. पुढे काहीतरी काम मिळाले पाहिजे असा विचार करता असताना द्वारका प्रसाद जे मध्यप्रदेशचे गृहमंत्री होते त्यांच्याशी त्यांची भेट झाली. ते ' धुवादार' चित्रपटाची निर्मिती करत होते त्यांनी नाना पळशीकर यांना त्या चित्रपटासाठी करारबद्ध केले. त्यातील त्यांची भूमिका गाजली. त्यानंतर त्यांनी बॉम्बे टॉकीजच्या ' दुर्गा', नया संसार', ' कंगन', ' आझाद ' या चित्रपटात चरित्र अभिनेत्याच्या भूमिका केल्या. त्यामुळे त्यांना खुपच प्रसिद्धी मिळाली. त्यांच्या नावाचा बोलबाला पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमल कलामंदिर मध्ये बोलवून घेतले. त्यांना ' माली ' या हिंदी चित्रपटात आणि ' भक्तीचा मळा ' या मराठी चित्रपटात भूमिका दिली.
'माल' या चित्रपटासाठी त्यांनी एक हिंदी गीतही लिहिले. 'भक्तीचा मळा' हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली.
त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली त्यामुळे त्यांना मराठी चित्रपटात कामे करण्यास वेळही मिळत नसे. तरीही १९५५ च्या 'मूठभर चणे', १९६२ च्या 'प्रेम आंधळं असत' आणि १९६३ च्या ' फकिरा ' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे 'जेम्स आयव्हरीच्या ' द गुरु ' नावाच्या अमेरिकन चित्रपटातही त्यांनी काम केले. ह्या चित्रपटात काम केल्यावर जेम्स यांनी विधान केले ' की त्यांना जेव्हा ह्या चित्रपटात घेतले तेव्हा मला कल्पना नव्हती की ते इतके चांगले आणि प्रामाणिक कलाकार आहेत ते.' त्यांच्या त्या कामाची न्यूयॉर्क मॅगझीनने देखील प्रशंसा केली होती.
नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना ' कानून ' ह्या चित्रपटातील भुमीकेसाठी , तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्हणून फिल्मफेअरची पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे त्यांना १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतहोत्सवानिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते पारितोषीक देण्यात आले. नाना पळशीकरांनी कंगन, कुवारा बाप (१९४२) , दो बिघा जमीन, बाप बेटी , श्री.४२० , जेलर , अनाडी , दोस्ती , शेर और सपना , कानून, माया , हेमराज , आखरी खत , आदमी और इन्सान , ललकार , शोर, धुंद, प्रेम पर्वत , आक्रोश , गांधी, कानून क्या करेगा अशा अनेक चित्रपटात कामे केली.
नाना पळशीकर यांनी १०० हून अधिक हिंदी व फक्त ४ मराठी चित्रपटात कामे केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत नेहमी चरित्र भूमिका केल्या होत्या.
नाना पळशीकर यांचे २ जून १९८४ रोजी निधन झाले.
May 5, 2022
कोल्हापूर येथून शिक्षण घेतल्यानंतर कुलदीप पवार मुंबईत दाखल झाले. तिथे प्रभाकर पणशीकर यांनी ‘इथे ओशाळला मृत्यू‘ ह्या नाटकात संभाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी दिली. त्यांची ही भूमिका खूप गाजली देखील.
June 10, 2022
साने गुरुजी यांचा जन्म २४ डिसेंबर १८९९ रोजी झाला. कोकणात पालगड या गावी साने गुरुजींचे वडील सदाशिवराव खोताचे काम करीत असत. लहानपणापासून गुरुजींचे आपल्या आईवर अतोनात प्रेम होते. श्यामची आई या पुस्तकात त्यांनी आपल्या आईच्या साऱ्या आठवणी सांगितल्या आहेत. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवनविकास झाला. सर्वांवरती प्रेम करण्याचा धडा साने गुरुजींच्या आईंनीच त्यांना दिला. साने गुरुजींचे मन अतिशय भावनाप्रधान व संस्कारक्षम होते. म्हणूनच आईने पेरलेल्या सदभावनांची वाढ त्यांच्या ठिकाणी लवकर झाली. गुरुजींनी विपुल वांगमय लिहिले आहे. कादंबऱ्या लेख, निबंध, काव्य, चरित्रे, नाट्यसंवाद, इत्यादी साहित्यांच्या विविध क्षेत्रात त्यांची लेखणी अविरत चालत होती. त्यांच्या वांगमयातून कळकळ, स्नेह, प्रेम गोष्टींचा वर्षाव झालेला आहे. त्यांच्या भाषेला एक प्रकारची धार आहे, बोध आहे. त्यांची साधीसुधी भाषाच लोकांना आवडली. गुरुजींनी आपल्या सर्व लेखक समाज उद्धवासाठी केले त्यांच्या मनात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक विषयासंबंधी जे विचारांचे, भावनांचे कल्लोळ उठले ते ते सर्व त्यांनी आपल्या लेखणी द्वारे प्रकट केले. साने गुरुजी यांची कर्मभूमी खानदेशची. अमळनेर येथील तत्त्वज्ञान मंदिर आणि प्रताप विद्यालयात त्यांनी अध्यापन केले. स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाबद्दल त्यांना तुरुंगवास झाला. नाशिक कारागृहात त्यांनी श्या.मची आईचे लेखन पूर्ण केले. धुळ्यातील कारागृहात असताना त्यांनी विनोबा भावेंनी सांगितलेली गीताई लिहिली. मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी त्यांनी विपुल लेखन केले. "श्याामची आई‘ च्या एकपात्री प्रयोगांनी तर संस्काराची शिदोरी अधिकच घट्ट केली. गुरुजींनी अमळनेर, धुळे व काही काळ नाशिक येथे वास्तव्य करून खानदेशला कर्मभूमी बनविले. गुरुजींचे आणखी एक मोठे कार्य म्हणजे आंतरभारतीची स्थापना करण्याचा प्रयत्न होय. प्रांताप्रांतातील हेवादेवाही अद्याप नष्ट झालेला नाही. क्रांतीयता या भारतीयाच्या एकत्वताला बांधक ठरणार असे दिसू लागले म्हणून त्यांनी प्रांताप्रांतातील द्वेष नाहीसा होऊन सर्व बंधूप्रेमाचे वारे वाहावे यासाठी निरनिराळ्या प्रांतातील लोकांना परस्परांच्या भाषा शिकाव्यात चालीरीती समजून घ्याव्यात यासाठी आंतरभारतीचा प्रयोग करून पाहण्याचे ठरविले. यासाठी पैसा जमवून निरनिराळ्या प्रांतीय भाषा शिकू इच्छीणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतन प्रमाणे काही सोय करावी, हि मनीषा त्यांनी महाराष्ट्र साहित्य संमेलना मध्ये याच ठरावावर बोलत व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काही पैसाही गोळा केला होता. मा.साने गुरुजी यांचे ११ जून १९५० रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
January 3, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti